पंचम पुरीवाला, ऑप.जी.पी.ओ, मुं.४००००१
माहितिये ? पंचम पुरीवाला ?
इथली पुरी भाजी खास भय्या स्टाइल, क्रमांक १ ची, वादच नाही.
माझे एक नातेवाईक- जे आर.बी.आय. मधे असतात, ते तर म्हणतात : पु~या साजूक तुपातल्या असतात म्हणे.
असो.माझे वडील आम्हाला पूर्वी इथे कायम घेऊन जायचे. मुळात मुलुंडसारख्या उपनगरातून त्या वेळी ( साधारण ७९-८० चा काळ असेल तो) VT ला जाणं, हेच मुळी कस्सलं भार्री वाटायचं तेव्हां.
तर एकदा दादा मला ह्या पंचम पुरी वाल्याकडे घेऊन गेले. तिथली ती लाल भोपळ्याची भाजी, त्याच्याबरोबर मिळणा~या त्या मिरच्या, सग्गळं मी माझ्या जिभेवर तश्शाच ठेवून अगदी अलिकडे गेलो होतो.अपेक्षित गर्दी, तिथे मुंबईचा घाम वगैरे सगळं होतच आणी तश्शीच चव, अज्जूनही. यावेळी मी पालक सुद्धा खाल्ली. अ.प्र.ती.म.......फक्त !
आणखी एक गोष्ट विषेश उल्लेख करायची....
मी काऊंटरला बिल द्यायला गेलो आणी गल्ल्यावरच्या तरूणाला जस्ट म्हणालो...
"कुछ २०-३० साल पहले मेरे पिताजी और मैं यहां अक्सर आया करते थे"
"..."
" अब भी वोही टेस्ट हैं"
पुन्हा हा तरूण माझ्याकडे पाहून "म्यूट"च.
अखेर त्यानी "एक मिनट" म्हणून बेसनात पिचकारी थुंकली , आणी म्हणाला ..
"अभी क्यों नही आये पिताजी, उनको भी लेके आते"
(तो वडिलांना ओळखत-बिळखत नाही बरं का)
मी जरा ओशाळून..."वो......अब नही हैं"
पुन्हा तरूण "म्यूट" प्रोफाईलात, पण ह्या वेळी भाव मात्र वेगळा होता.
असो. तर मी बिल सरसावलं, तर "म्यूटा"तल्या तरूणाची "म्यूटा"तलीच, फक्त हातानीच खूण :-
"पैसे राहूदेत" अशी.
मी निघालो, ५-१५ ची डेक्कन पकडायची होती.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
देजावू फीलिंग का येते आहे ?
कारण...
व्वा व्वा... सुरेखच आहे हा
लेख डिलीट करता येइल का ?
काहीतरी अस्संच familiar घडलं
गवी उर्फ गंदे अंकल
होय, लिंक पाहिली, माझा पाहतो
नाही.. असू दे हो.. एका
का?
प्रतिसाद.
मलाही हेच वाटत होतं प्रभाकर !
च्यायला !
फार स्वप्नं बघू नयेत माणसाने.
हा हा हा
तुमी फकस्त लिवता.. वाचीत नै,
"थर्मास छान आहे हो तुमचा.
+१
मिपावर इतकी प्रचंड वाचन
मागच सगळ वाचा निवांत वेळ
मीही म्यूट झाले. चांगले लेखन
तोडलस मित्रा
प्रेरक, धन्यवाद !
खि खि खि
आइला, खरंच की.
अरारा..
बेसिन असु शकेल !!
आत्ताच आस्वाद घेतला मिपा
कसं होतं त्ये सांगा की...
वा व्वा गवि, मानलं,
अगदी छोटी आणि भट्टीस्वरुप
ही जागा आता ट्राय केलीच
जेवण बनवताना त्यात सोडा घातला
धन्यवाद
तद्न्य म्हणून नव्हे पण जनरल
जेवणातील सोडा.