शुभ मंगल सावधान …

(पुढील काव्य हे मंगलाष्टक्च्या लयीत वाचावे)

घातला दारी मंडप लग्नाचा, खर्च तो बहु केला…
पार्टी हळदीची दिली सर्वा, नाचुन जीव बहु थकला….
एवढे धुंद रात्रनृत्य ते झाले, सकाळी आम्बे हळदी मदतीला ….
तेव्हाच अंतर्मन सांगे हृदयाला, बाबा सांभाळ रे स्वतःला…
नाही कळले परी का म्हणतात तेव्हा …
शुभ मंगल सावधान …

आली समीप लग्न घटीका, heart beat तो वाढीला,
पाहिले न माझ्या वधूस पहिले, बाप धाका पुत्र घाबरला,
काय जाणे असेल कशी ती अप्सरा…
रंभा, उर्वशी कि मेनका, तेवढ्यातच भट कोकलला,
शुभ मंगल सावधान …

चुळबुळ बहू झाली ती मनास , हातास घाम हि सुटला,
अंतरपाट वैरी माझा, का आडवा कळेना …
डोळे मिटून वाट पाहत मी त्या क्षणाची …
समोर उभा ठाकला आणि शेवटचे भट पुटपुटला…
शुभ मंगल सावधान …

दृष्य समोरचे ते अघोरी, पाहूनच मला आली घेरी,
महाकाय तो देह पाटावरी, Balance स्वतःचे Manage करी …
हार हातात तिच्या वाटे भोवऱ्याची दोरी,
शंभर एकरा साठी बापाने दिला माझा बळी …
बापाचा रागाचा कटाक्ष पाहता गळून पडले अवसान ….
माळला हार तिच्या डोकी, आणि मीच दिली एक आरोळी …
शुभ मंगल सावधान … आयुष्य भर संभाळा हा पेहलवान …

काव्यरस: 
लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

:bigsmile: ह्हा ! ह्हा !! ह्हा !!!

:D :D :D

मस्तच.

अगागागागागा.
द मा मिरासदारांची कुठलीतरी कथा असावी असं वाटलं झटक्यात!

@आयुष्य भर संभाळा हा पेहलवान … >>> =))

अ वांतर--- वृत्तराजा ... ये रे ... ये... =))

भारी!

हाहाहाहा.... डोळ्यांसमोर दृश्य तरळून गेले.. :D

वा!! सुरेख!!

मस्ताड!

आजच्या युगातही असे घडते हे विश्वास ठेवण्यास कठीण आहे पण कवी म्हणतोय तर असेलही त्याचा तसा अनुभव.

अहो प्रभा काका, काल्पनिक आहे हो हे, सत्य असले तरी तसा काही प्रत्यक्ष अनुभव मी तरी पहिला नाही आहे.

हाहाहाहा

लै भारी..

भारीच भारी.
आता हिचे सासरचे नाव काय ठेवले, तेवढे नक्की सांगा.