ति आलि होति मझाकडे आज एकदम खुशित,
मि हि तिचे एकदम हसत स्वागत केले.
मि तिला म्हनालो " सखे मि काहिहि करेन तुला हसत पाहन्यासाटि,
तु फक्त एकदा हो म्हन ग"
तिने हि हसत उत्तर दिले " हो रे सखा आत मि तुझिच आहे रे , मझा स्वासाला गरज तुझिच आहे रे .."
आनि ति माझा मिटित विरुन गेलि ,
आता मि मि राहिलो नवतो . ति ति रहिलि नवति ,
दोघाना हि ओड लग्नचि लागलि होति ,
मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि,
मि तिला माझ्या लग्नाचि गोश्ट सानगितलि आनि लगेचच रुम तिचि गाटलि.
या भाबडिने हात तिचा कापला होत,
मि पोह्च न्यापुर्विच श्वास तिने सोड्ला होता,
येऊन पाहुन जा ग पत्रिका आपल्य लग्नाचि,
मि हे सार सोग केल होत ग तुला चिड्व्न्यासाटि.
चितेवर शरिर जळ्तय पन काळिज धड्धड्तय,
राहुन राहुन तिचा ओडी साटि धड्पड्तय......
प्रतिक्रिया
17 May 2013 - 4:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अवघड आहे.
17 May 2013 - 5:58 pm | प्यारे१
कुणाचं? ;)
17 May 2013 - 4:41 pm | आदूबाळ
मोकलाया पार्ट २!
17 May 2013 - 4:45 pm | स्पा
=)) =))
17 May 2013 - 4:45 pm | लाल टोपी
+१ तरीही मोकलाया ती मोकलाया तिची सर कोणालाच नाही
17 May 2013 - 5:38 pm | कोमल
प्रचंड.. :)) :)) :))

सं.मं ला विन्ति क्रुप्या अश धग्यन साटि "मोकलाया" नमक स्वत्नत्र विभग करन्यात यव..
सुदेशभौ नी हहपुवा केल्यबदल धन्यवद..
17 May 2013 - 5:46 pm | भावना कल्लोळ
सुदेशभौ,तुमची प्रेमाची व्यथा वाचुन माझ्या डोळ्यातलं पाणी काय थांबून नाही राहिलंय राव, किती हा इमोशनल अत्याचार
17 May 2013 - 6:00 pm | प्रभाकर पेठकर
एकच उचकी आली आणि मराठी व्याकरणाने प्राण सोडला.
17 May 2013 - 8:25 pm | सस्नेह
रामनाम सत्य है, 'व्य्था' बडी मस्त है...!
17 May 2013 - 11:46 pm | टिवटिव
हा हा हा...
17 May 2013 - 9:12 pm | इनिगोय
काय उगा चेष्टा करून ऱ्हायलीत समदी.. जरा भाव्णाओं को सम्जो!
17 May 2013 - 9:22 pm | आतिवास
असं लिहून नेमकं काय समाधान मिळ्तं याबद्दल कुतूहल वाटलं सहज :-)
17 May 2013 - 11:14 pm | आदूबाळ
कोणाला? लेखकाला का प्रतिसाद देणार्यांना?
17 May 2013 - 11:20 pm | आतिवास
लेखकाला!!
17 May 2013 - 9:26 pm | मराठे
कविता तशी चांगली पण (टैपिंग-मिश्टेकमुळे) वेशीला टांगली.
17 May 2013 - 9:32 pm | जेनी...
काय राव नव्या लेखकाचं नामोरण करताय :-/
17 May 2013 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
♥ " मेरा पती ' पती ' ... तेरा पती ' वनस्पती ' " ♥
सासुबैंच्या मुलाची स्तुती करून त्यांना खूष करण्याचा छुपा प्रयत्न, उघडपणे दिसतोय !
17 May 2013 - 10:23 pm | जेनी...
:D
18 May 2013 - 12:44 am | संजय क्षीरसागर
मला वाटलं कविनं जाताजाता तिची ओटी भरली की काय!
मग वाटलं साडी ओली होती की काय.
पुन्हा नीट वाचलं तेव्हा कळलं `ओढी साठी' म्हणायचंय
18 May 2013 - 11:05 am | डॉ सुहास म्हात्रे
छ्या, छ्या... तिने बँकेतून ओडी (ओव्हरड्राफ्ट) काढला होता. त्या नोटा कुठे ठेवल्यात ते शोधून काढण्याची ही धडपड आहे अशी आतल्या गोटातली बातमी आहे ;)
18 May 2013 - 11:56 am | संजय क्षीरसागर
पत्रिकेचा खर्च वाया गेला म्हणून...असाही अर्थ निघू शकतो
18 May 2013 - 12:07 pm | आदूबाळ
या आख्ख्या काव्यात "ओडी"तली दीर्घ "डी" सोडली तर एकही दीर्घ वेलांटी नाही. (मि मि, ति ति वगैरे चिक्कार आहेत)
18 May 2013 - 12:02 pm | अधिराज
बर्याच दिवसांनी इथे येण्याचे सार्थक झाले, दुसृयाना एवढे हसवणे येड्या गबाळ्याचे काम नोहे, जे कवीने करून दाखवले आहे.
आत मी तुझीच आहे, मग बाहेर कोणा दुसृयाची आहे का?
18 May 2013 - 1:19 pm | संजय क्षीरसागर
ती आली होती माझ्याकडे आज एकदम खुशीत,
मी ही तिचं एकदम हसत स्वागत केलं
मी तिला म्हणालो ‘सखे मी काहीही करेन तुला हसरं पाहण्यासाठी’
तू फक्त एकदा ‘हो’ म्हण गं
तिनं ही हसत उत्तर दिलं, ‘हो रे सख्या आता मी तुझीच आहे रे,
माझ्या श्वासाला गरज तुझीच आहे रे’....
आणि ती माझ्या मिठीत विरून गेली,
आता मी, मी राहिलो नव्हतो. ती, ती राहिली नव्हती,
दोघांनाही ओढ लग्नाची लागली होती,
मग कसं कोण जाणे तिच्या मिस-कॉलनं या स्वप्नाला नज़र लागली
बायकोनं तिच्या आधीच्या मित्राची रूम गाठली
या भाबडीचा हात त्यानं धरला
आणि मी पोहोचण्यापूर्वीच घात केला
येऊन पाहून जागं पत्रिका आपल्या लग्नाची
कायकाय थेरं करतेस मला चिडवण्यासाठी
बेडवर शरीर जळतंय, काळीज पण धडधडतंय
आम्ही अजून (इतकं) केलं नाही सांगण्यासाठी धडपडतंय
18 May 2013 - 2:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हे तर फारचं अवघड आहे. :D
18 May 2013 - 1:58 pm | ५० फक्त
व्यथा या शब्दावं मराठी आंतरजालाशी फार जुनं नातं आहे, जाणकार प्रकाश टाक्णार नाहीत, निळा तर अजिबात नाहीत.