घरात पार्टी म्हंट्ली, की प्रत्येक वेळि काहि तारी वेगळे बनवायचि धडपड प्रत्येकाच्या घरी सुरु होते. त्यात घरी येणाऱ्या पाहुण्यांना बनवलेला पदार्थ आवडेल का ? या विचाराने आपण अनेक वेळा चिंतातूर होतो! हा गुंता सोडवायचा एक सोयीचा मार्ग म्हणजे, रोजच्या खाण्यात असलेल्या पदार्थांचाच उपोयोग करून, एका वेगळ्या मांडणिद्वारे तो पदार्थ पाहुण्यांसमोर पेश करणे. मी बनवलेले हे starter असेच काहीसे आहे. आपणास हा पदार्थ व मांडणी आवडेल अशी आशा करते :)
साहित्यः
उडदाचे पापड - ४
छोटी कोळंबी - १ वाटी
स्वीट कॉर्न - १ वाटी
कांदा - १/२ बारीक चिरुन
आले-लसुण - १ चमचा बारीक चिरुन
सोया सॉस - १/२ चमचा
व्हिनेगर - १/२ चमचा
रेड चिली सॉस - १/२ चमचा
काळि मिरी पावडर - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १/२ चमचा
चाट मसाला - १/२ चमचा
तेल - २ चमचे
मिठ चवीनुसार
कृती:
१. प्रत्येक पापड अर्धा कापुन घ्यावा. तव्यावर १-१ करुन १/२ पापड भाजुन घ्यावा.

२. १/२ पापड भाजुन झाल्यावर्म तव्यावरुन काढुन, गरम असतानाच त्याचा कोन करुन घ्यावा.

३. अशा प्र्कारे सर्व पापडांचे कोन करुन घ्यावेत.
४. पॅन मधे १ चमचा तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेले आले, लसुण व कांदा परतुन घ्यावा.
५. १-२ मिनिट परतल्यावर त्यात कोळंबी टाकुन परतावे. परतताना त्यात सोया सॉस, व्हिनेगर, रेड चिली सॉस, काळि मिरी पावडर व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे. कोळंबी शिजल्यावर हे मिश्रण वाटीत काढुन ठेवावे.
६. आता दुसर्या पॅन मधे १ चमचा तेल गरम करावे. त्यात हळद,लाल तिखट व स्वीट कॉर्न टाकुन परतावे.

७. १-२ मिनिटांनी त्यात चाट मसाला व चवीनुसार मिठ टाकुन एका वाटीत काढुन घ्यावे.
८. आता पापडाचा १ कोन हातात घ्यावा. त्यात आधी १ चमचा कॉर्न टाकावे व त्यावरती १ चमचा परतवलेली कोळंबी टाकावी.


९. वरतुन कोथिंबीरने सजवुन पापड रोल गरमा गरम serve करावेत.


प्रतिक्रिया
27 Apr 2013 - 3:59 am | शिल्पा ब
टाकोसारखं थोडक्यात ! छान आयड्या आहे.
27 Apr 2013 - 10:18 am | मोदक
टाको / टॅको खायची काही आयड्या आहे का हो..?
टॅको खाताना दरवेळी बेस तळातून मोडला जातो व फिलींग आणि ढबूमिरच्या सांभाळताना पुरेवाट होते. :-(
27 Apr 2013 - 4:04 am | रेवती
आयडीयाची कल्पना छान आहे. याचे शाकाहारी प्रकरण जमवायला हवे. फोटो नेहमीप्रमाणे क्यूट. कॉर्न परततानाचा फोटू आवडला, कारण त्यात तव्यात पडण्याआधीचे कणसाचे दाणे एखाद्या कुकरी शोमध्ये असतात तसे दिसतायत.
27 Apr 2013 - 4:06 am | काकाकाकू
वाफ आणि वरून पडणारे / उडवलेले मक्याचे दाणे यामुळे 'गतिमानता' जाणवते. बाय द वे, कुठल्याहि पापडाचा भाजल्यावर लगेच असा कोन करता येतो कि फक्त उडदाचाच जास्त लवचिक असतो?
29 Apr 2013 - 1:59 pm | Mrunalini
माझ्या कडे घरात फ॑त उडदाचेच पापड होते. पण मला नाहि वाटत असे कुठले दुसरे पापड तव्यावर भाजता येत असतील.
27 Apr 2013 - 9:54 am | कच्ची कैरी
व्हाट अॅन आयडिया मॅडमजी :) मस्त मी तर नक्की करुन बघणार
27 Apr 2013 - 10:30 am | इरसाल
मला काय वाटते, पापड कच्चा असताना त्यावर ब्रशने अंडे लावावे, ओलसर झाला कि कोन बनवुन त्यात ते सारण भरुन वरचे तोंड बंद करुन त्याला जर डीप-फ्राय/शॅलो-फ्राय केला तर ????????????
27 Apr 2013 - 10:59 am | आदूबाळ
पण आतल्या बाजूने पापड कच्चा रहाणार की!
@मृणालिनीतै
पाकृ फक्कड आहे. कोळंबीऐवजी दुसरं काहीतरी सारण वापरून प्रयत्न करतो...
27 Apr 2013 - 11:53 am | मोदक
इरसाल बुवा..
तेलामध्ये पापड फुलला तर कोन सुटून आतल्या सारणाचा तळलेला चिवडा होईल बहुदा!!
27 Apr 2013 - 12:37 pm | इरसाल
उडदाचा पापड नाय फुलत एवढा.
27 Apr 2013 - 11:38 am | सुहास झेले
मस्त !!!
27 Apr 2013 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार
एकदम झिंगा ला ला पाकृ आहे.
27 Apr 2013 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१११... एकदम तोंपासु पाकृ !
27 Apr 2013 - 12:53 pm | मुक्त विहारि
झक्कास..
27 Apr 2013 - 1:28 pm | चेतन माने
झक्कास
तोंपासू
27 Apr 2013 - 4:19 pm | गणपा
कल्पना चांगली आहे, पण उडदाचा पापड नीट भाजला गेला नाही तर दातात अडकुन बसतो.
तसच उडीद आणि कोलंबी काँबो कुछ जम्या नय. (हे मी माझ्या पुरता बोलतोय.)
बटाट्याचा / नाचणीचा पापड वापरुन बघायला हरकत नाही, पण ते (तळलेलेलच बरे लागत असल्याने) भाजायचे कसे हा प्रश्न आहे. :(
बाकी तुमच्या मेहनतीला, कल्पकतेला आणि टापटिपतेला दाद द्यावी तिककी कमीच. :)
29 Apr 2013 - 2:03 pm | Mrunalini
हो खरय.. पण तोच उडदाचा पापड तव्यावर निट भाजुन घेतला कि झाले... कारण तो गॅस वर भाजताना पुर्ण वाकडा होतो. मग त्याचा कोन नाहि करता येत. म्हणुन मी तव्यावर भाजला. आणि बटाट्याचा व नाचनीचा पापड तळलेलाच चांगला लागतो. पण असा गरम्-गरम तळलेला पापडाचा कोन करायचा म्हणजे हात चांगलेच भाजुन निघतील .;) म्हणुन हे ट्राय नाही केले अजुन.
27 Apr 2013 - 4:39 pm | तुमचा अभिषेक
झिंगा म्हणजे जीव की प्राण पण पापड फारसा आवडीचा नाही त्यामुळे द्विधा मनस्थितीत..
घरी तर काही जमणार नाही आपल्याला,
पण कधीतरी हॉटेलमध्ये झिंगा फ्राय आणि मसाला पापड ऑर्डर करून हे कॉम्बो कसे लागते बघायला हवे.. ;)
27 Apr 2013 - 5:28 pm | सानिकास्वप्निल
कोळंबी-कॉर्न,पापड असे वेगळेच कॉम्बिनेशन आहे, स्टार्टर म्हणून ट्राय करून बघीतले पाहीजे.
चणा-चाट, बारीक शेव वापरून ही बनवता येईल असे वाटते.
फोटो नेहमीप्रमाणे सुंदर :)
27 Apr 2013 - 7:25 pm | जेनी...
सॉरी मनु :(
आय डोन्नो ... पण कल्पना आणि पाक्रु तितकिशी ( मला ) रुचली नाहि :(
ग्लासावरच्या कोनचं प्रेझेन्टेशन नाहि आवडलं :(
त्या खालचा फोटो उत्तम आहे ...
टेस्ट बद्दलहि शंका आहे :(
29 Apr 2013 - 2:04 pm | Mrunalini
नो प्रॉब्लेम पुजा...
कोळंबी आवडत नसल्यास, तु त्यात फक्त कॉर्न वापरुन त्याचे चाट सारखे करु शकते. तळलेल्या पुरीला चांगला पर्याय आहे.
27 Apr 2013 - 7:45 pm | इन्दुसुता
प्रेझेन्टेशन आवडले.
मी मांस / मासळी खात नाही त्यामुळे खरेतर त्या पाकॄ ही मी पाहत नाही, ही केवळ नावात पापड असल्यामुळे वाचली.
आता ह्याची शाकाहारी आवॄत्ती आलूचाट / कॉर्न चाट घालून करून बघेन. शाकाहारी चव मस्तच लागेल यात अजिबात शंका नाही :)
27 Apr 2013 - 9:11 pm | दिपक.कुवेत
एकदा ट्राय करीन पण पापडचे कोन कितपत वळले जातील त्याबद्द्ल जरा साशंक आहे.
27 Apr 2013 - 9:31 pm | जेनी...
दीपू काका पापडाचा कून वळतू बगा पापूड १६ सेकंद मायक्रोवेव ला लावुन घ्या ...
बगा कसा वळ्तुय ते :)
28 Apr 2013 - 4:08 pm | दिपक.कुवेत
तु पापड काय...कोणालाहि कशीहि वळवशील :D
29 Apr 2013 - 2:08 pm | jaypal
पापडाची आयडीया लै अफलातुन. विविध सारणे सारुन प्रयोग करण्यात येईल.
29 Apr 2013 - 4:02 pm | विसोबा खेचर
लै भारी..!
30 Apr 2013 - 12:22 pm | अनन्न्या
मिपावर सदस्य झाल्यापासून प्रेझेंटेशनच्या आयडिया चोरून घरात वाहवा मिळू लागलीय!
1 May 2013 - 3:17 pm | अभ्या..
आम्हाला मात्र मिपासारखे प्रतिसाद घरी दिले तर फटके मिळतात ;)
30 Apr 2013 - 3:03 pm | अमोल केळकर
मस्तच :)
अमोल केळकर
2 May 2013 - 7:16 pm | ढालगज भवानी
प्रेझेंटशन ला १० पैकी १० मार्कं. बाकी गणपा यांच्यासारखेच म्हणते - उदीद + झिंगे कुछ जम्या नही.
2 May 2013 - 7:17 pm | पैसा
फोटो आणि कृती आवडली. कोलंबी ऐवजी दुसरे काही घालून करून पाहण्यात येईल.