Skip to main content

पार्टी आयडिया : झिंगा इन पापड कोन!!

लेखक Mrunalini यांनी शनिवार, 27/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
घरात पार्टी म्हंट्ली, की प्रत्येक वेळि काहि तारी वेगळे बनवायचि धडपड प्रत्येकाच्या घरी सुरु होते. त्यात घरी येणाऱ्या पाहुण्यांना बनवलेला पदार्थ आवडेल का ? या विचाराने आपण अनेक वेळा चिंतातूर होतो! हा गुंता सोडवायचा एक सोयीचा मार्ग म्हणजे, रोजच्या खाण्यात असलेल्या पदार्थांचाच उपोयोग करून, एका वेगळ्या मांडणिद्वारे तो पदार्थ पाहुण्यांसमोर पेश करणे. मी बनवलेले हे starter असेच काहीसे आहे. आपणास हा पदार्थ व मांडणी आवडेल अशी आशा करते :) साहित्यः उडदाचे पापड - ४ छोटी कोळंबी - १ वाटी स्वीट कॉर्न - १ वाटी कांदा - १/२ बारीक चिरुन आले-लसुण - १ चमचा बारीक चिरुन सोया सॉस - १/२ चमचा व्हिनेगर - १/२ चमचा रेड चिली सॉस - १/२ चमचा काळि मिरी पावडर - १/२ चमचा हळद - १/२ चमचा लाल तिखट - १/२ चमचा चाट मसाला - १/२ चमचा तेल - २ चमचे मिठ चवीनुसार कृती: १. प्रत्येक पापड अर्धा कापुन घ्यावा. तव्यावर १-१ करुन १/२ पापड भाजुन घ्यावा. papad २. १/२ पापड भाजुन झाल्यावर्म तव्यावरुन काढुन, गरम असतानाच त्याचा कोन करुन घ्यावा. cone ३. अशा प्र्कारे सर्व पापडांचे कोन करुन घ्यावेत. ४. पॅन मधे १ चमचा तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेले आले, लसुण व कांदा परतुन घ्यावा. ५. १-२ मिनिट परतल्यावर त्यात कोळंबी टाकुन परतावे. परतताना त्यात सोया सॉस, व्हिनेगर, रेड चिली सॉस, काळि मिरी पावडर व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे. कोळंबी शिजल्यावर हे मिश्रण वाटीत काढुन ठेवावे. ६. आता दुसर्या पॅन मधे १ चमचा तेल गरम करावे. त्यात हळद,लाल तिखट व स्वीट कॉर्न टाकुन परतावे. corn ७. १-२ मिनिटांनी त्यात चाट मसाला व चवीनुसार मिठ टाकुन एका वाटीत काढुन घ्यावे. ८. आता पापडाचा १ कोन हातात घ्यावा. त्यात आधी १ चमचा कॉर्न टाकावे व त्यावरती १ चमचा परतवलेली कोळंबी टाकावी. cone1 fill ९. वरतुन कोथिंबीरने सजवुन पापड रोल गरमा गरम serve करावेत. corn2 drop

वाचने 9478
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

In reply to by शिल्पा ब

टाको / टॅको खायची काही आयड्या आहे का हो..? टॅको खाताना दरवेळी बेस तळातून मोडला जातो व फिलींग आणि ढबूमिरच्या सांभाळताना पुरेवाट होते. :-(

आयडीयाची कल्पना छान आहे. याचे शाकाहारी प्रकरण जमवायला हवे. फोटो नेहमीप्रमाणे क्यूट. कॉर्न परततानाचा फोटू आवडला, कारण त्यात तव्यात पडण्याआधीचे कणसाचे दाणे एखाद्या कुकरी शोमध्ये असतात तसे दिसतायत.

वाफ आणि वरून पडणारे / उडवलेले मक्याचे दाणे यामुळे 'गतिमानता' जाणवते. बाय द वे, कुठल्याहि पापडाचा भाजल्यावर लगेच असा कोन करता येतो कि फक्त उडदाचाच जास्त लवचिक असतो?

In reply to by काकाकाकू

माझ्या कडे घरात फ॑त उडदाचेच पापड होते. पण मला नाहि वाटत असे कुठले दुसरे पापड तव्यावर भाजता येत असतील.

व्हाट अ‍ॅन आयडिया मॅडमजी :) मस्त मी तर नक्की करुन बघणार

मला काय वाटते, पापड कच्चा असताना त्यावर ब्रशने अंडे लावावे, ओलसर झाला कि कोन बनवुन त्यात ते सारण भरुन वरचे तोंड बंद करुन त्याला जर डीप-फ्राय/शॅलो-फ्राय केला तर ????????????

In reply to by इरसाल

पण आतल्या बाजूने पापड कच्चा रहाणार की! @मृणालिनीतै पाकृ फक्कड आहे. कोळंबीऐवजी दुसरं काहीतरी सारण वापरून प्रयत्न करतो...

एकदम झिंगा ला ला पाकृ आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

+१११... एकदम तोंपासु पाकृ !

कल्पना चांगली आहे, पण उडदाचा पापड नीट भाजला गेला नाही तर दातात अडकुन बसतो. तसच उडीद आणि कोलंबी काँबो कुछ जम्या नय. (हे मी माझ्या पुरता बोलतोय.) बटाट्याचा / नाचणीचा पापड वापरुन बघायला हरकत नाही, पण ते (तळलेलेलच बरे लागत असल्याने) भाजायचे कसे हा प्रश्न आहे. :( बाकी तुमच्या मेहनतीला, कल्पकतेला आणि टापटिपतेला दाद द्यावी तिककी कमीच. :)

In reply to by गणपा

हो खरय.. पण तोच उडदाचा पापड तव्यावर निट भाजुन घेतला कि झाले... कारण तो गॅस वर भाजताना पुर्ण वाकडा होतो. मग त्याचा कोन नाहि करता येत. म्हणुन मी तव्यावर भाजला. आणि बटाट्याचा व नाचनीचा पापड तळलेलाच चांगला लागतो. पण असा गरम्-गरम तळलेला पापडाचा कोन करायचा म्हणजे हात चांगलेच भाजुन निघतील .;) म्हणुन हे ट्राय नाही केले अजुन.

झिंगा म्हणजे जीव की प्राण पण पापड फारसा आवडीचा नाही त्यामुळे द्विधा मनस्थितीत.. घरी तर काही जमणार नाही आपल्याला, पण कधीतरी हॉटेलमध्ये झिंगा फ्राय आणि मसाला पापड ऑर्डर करून हे कॉम्बो कसे लागते बघायला हवे.. ;)

कोळंबी-कॉर्न,पापड असे वेगळेच कॉम्बिनेशन आहे, स्टार्टर म्हणून ट्राय करून बघीतले पाहीजे. चणा-चाट, बारीक शेव वापरून ही बनवता येईल असे वाटते. फोटो नेहमीप्रमाणे सुंदर :)

सॉरी मनु :( आय डोन्नो ... पण कल्पना आणि पाक्रु तितकिशी ( मला ) रुचली नाहि :( ग्लासावरच्या कोनचं प्रेझेन्टेशन नाहि आवडलं :( त्या खालचा फोटो उत्तम आहे ... टेस्ट बद्दलहि शंका आहे :(

In reply to by जेनी...

नो प्रॉब्लेम पुजा... कोळंबी आवडत नसल्यास, तु त्यात फक्त कॉर्न वापरुन त्याचे चाट सारखे करु शकते. तळलेल्या पुरीला चांगला पर्याय आहे.

प्रेझेन्टेशन आवडले. मी मांस / मासळी खात नाही त्यामुळे खरेतर त्या पाकॄ ही मी पाहत नाही, ही केवळ नावात पापड असल्यामुळे वाचली. आता ह्याची शाकाहारी आवॄत्ती आलूचाट / कॉर्न चाट घालून करून बघेन. शाकाहारी चव मस्तच लागेल यात अजिबात शंका नाही :)

In reply to by दिपक.कुवेत

दीपू काका पापडाचा कून वळतू बगा पापूड १६ सेकंद मायक्रोवेव ला लावुन घ्या ... बगा कसा वळ्तुय ते :)

मिपावर सदस्य झाल्यापासून प्रेझेंटेशनच्या आयडिया चोरून घरात वाहवा मिळू लागलीय!

मस्तच :) अमोल केळकर

प्रेझेंटशन ला १० पैकी १० मार्कं. बाकी गणपा यांच्यासारखेच म्हणते - उदीद + झिंगे कुछ जम्या नही.

फोटो आणि कृती आवडली. कोलंबी ऐवजी दुसरे काही घालून करून पाहण्यात येईल.