कांदा-लसूण मसाला

स्मिता चौगुले's picture
स्मिता चौगुले in पाककृती
18 Apr 2013 - 5:16 pm

सानिकाताईच्या "झणझणीत सातारी कोंबडी ' या पाकृत बऱ्याच मीपाकरांनी कांदा लसुन मसाल्याची ककृती विचारली आहे

म्हणून मला माहित असलेली कांदा-लसूण मसाल्याची गावराण पाकृ (आई कदुन शिकले आहे) ती एथे देत आहे.

आम्ही तो वर्षाचा एकदाच बनवतो त्याचे प्रमाण मी देवू शकते पण फोटो वैगेरे नाहित

हा कांदा-लसूण मसाला(आम्ही त्याला मसाला तिखट/काळे तिखट असे म्हणतो) फार झणझणीत असतो, थोडासाही पुरे होतो. मस्त तर्रीवाले मटण्-चिकण होते आणि हे वापरुन भाजी केली तर इतर मसाल्याची गरज ही नसते

साहित्य -

१ किलो लाल मीरच्या , शक्यतो लवंगी घेणे नसेल तर कोणतीही तिखट असणारी

१ किलो कांदा (कापून वाळवलेला )

१/४ लसून

१/४ धने

१/४ खोबरे खिसून / पातळ काप करून

५० ग्राम हळकुंड

५० ग्राम मोहरी

५० जिरे

मुठभर धोंड्फुल आणि तमालपत्र

तेल

१/४ किलो खडा मीठ

मसाले १ किलो मिरची साठी प्रत्येकी १० ग्रॅम (प्रत्येक मसाल्याचे २ भाग करणे - ५-५ ग्रॅम )

लवंग

दालचिनी

शाहजीरे

सालीसकट वेलची

(मिरे वापरत नाही कारण त्याने खूपच तिखट आणि जळजळीत तिखट होते, हवे असल्यास वापरू शकता पण थोड्या प्रमाणात )

इतर मसालेही वापरू शकता तुमच्या आवडी प्रमाणे

असेलतर

कोथिंबीर वाळवून

सुंठ (वाळवलेले आले )

कृती-

मिरच्या १ दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवणे आणि नंतर त्याची देठे काढणे (सगळ्यात कंटाळवाणे काम आणि हात हि तिखट होतात चुकून डोळ्याला लागला कि शिमगाच )

आता साहित्य भाजायला घेणे

जाड बुडाची कढई तापत ठेवणे (आम्ही गावी हे शक्यतो बाहेर चूलीवर करतो कारण पुढे सांगते)

१) त्यात आता कांदा भाजायला घ्या. तेल न घालता कांदा खरपूस अगदी लालसर असा मंद आचेवर भाजून घ्यावा, हाताने दाबले तर तुटायला हवा. आवश्यक वाटल्यास थोडेसे मीठ घालून भाजू शकता

२) लसूण थोडासा ठेचुन ठेवावा

३) धणे कपभर तेलात परतून घ्यावेत ३-४ मिनिट

४ ) आता खोबरेही खरपूस भाजून घेणे , याला तेल लागते

५) आता हळकुंड तळून घ्यायचे, तळला कि हा छान फुगतो

६) मोहरी जिरे देखील थोड्याशा तेलात टाकून परतून घेणे , हे करताना कढईवर १ मीन झाकण ठेवावे, नाहीतर अर्धे जिरे मोहरी तडतडून कढईच्या बाहेर पडतील

७) धोंड्फुल तमालपत्र आणि वापरणार असल्यास सुंठ देखील थोड्याशा तेलात तळून घ्यावे

८) साहित्यात मसाल्याचे २ भाग करण्यास सांगितले होते (प्रत्येकी ५-५ ग्रॅम )

१ भाग मसाला तेलात तळून घेणे, करपवू नयेत लगेच काढायचे तेलातून नाहीतर तुमचे तिखट कडवट होईल

आणि १ भाग मसाला तसाच कच्चा घ्यावा (याचे कारण मला नक्की सांगता येणार नाही, कदाचित मसाल्याचा सुगंध तीखटाला यावा यासाठी असेल)

आता महत्वाचा भाग, मिरच्या भाजणे

मिरच्या भाजताना भयंकर ठसका उठतो, किचनमध्ये केले तर घरात असणाऱ्या व्यक्ती याच्या ठसक्याने खोकायला लागतात म्हणून आम्ही हा मिरची भाजणीचा कार्यक्रम बाहेरच्या चुलीवर करायचो

मिरच्या मोठ्या लोखंडी पाटीत किंवा कढईत भाजाव्यात, थोडेसे कोरडे भाजून झाले कि त्यात पळीभर तेल घालावे आणि २-३ मिनिट पर्यंत चांगले भाजत राहणे (मिरची भाजताना सतत हलवत राहणे नाहीतर करपेल )

आता हे सर्व साहित्य आम्ही गावी मिरची कांडपात नेत असू पावडर करायला, मिरची कांडपाची सोय नसेल तर तुम्ही घरी मिकसर मध्ये करू शकता फक्त प्रमाण कमी हवे

एक एक करून सर्व साहित्य बारीक करून घ्यावे आणि चांगले मिसळावे

नंतर हि पावडर बारीक चाळणीतून चाळून घ्यावी आणि शक्यतो आपण लोणची वैगेरे ठेवतो तश्या चीनी मातीच्या बरणीत भरून घट्ट झाकून ठेवावे जेणेकरून मसाल्याचा वास टिकून राहील

टिप - १) भाजलेले खोबरे,कांदा आणि ठेचलेला लसुन हे तिन्ही वेगवेगळया भांड्यात ठेवावे , कांद्याचा कडकपणा टिकून राहायला हवा ना म्हणून

२) तळून राहिलेले तेल नंतर आम्ही तिखटाच्या पावडरीत मिसळतो पण जर तिखट खुप दिवस म्हणजे ६ महिने वैगेरे टिकवायचे असेल तर तेल घालू नये, कुबट वास येवू शकतो तेलाचा

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

18 Apr 2013 - 5:28 pm | कच्ची कैरी

पाककृती बद्दल धन्यवाद :)

यशोधरा's picture

18 Apr 2013 - 5:31 pm | यशोधरा

धन्यवाद!

दिपक.कुवेत's picture

18 Apr 2013 - 5:50 pm | दिपक.कुवेत

पण वेळखाउ दिसतेय त्यामुळे आयत आणणं परडवेल. अर्थात घरच्या मसाल्याची चव ती वेगळिच :)

स्मिता चौगुले's picture

19 Apr 2013 - 11:47 am | स्मिता चौगुले

वेळखाउ तर आहेच, म्हणूनच तो ६ महिने - १ वर्षातून एकदाच करतात...:)

पैसा's picture

18 Apr 2013 - 6:16 pm | पैसा

कृती समजली. कांदा किती दिवस उन्हात वाळवावा लागतो?

स्मिता चौगुले's picture

19 Apr 2013 - 8:37 am | स्मिता चौगुले

कांद्यातील पाण्याचा अंश निघून गेला पाहिजे इतका वाळवायचा म्हणजे भाजताना तो लवकर भाजला जाईल
उन्हाळ्यात यासाठी १ दिवस पुरेसा आहे

मस्त कलंदर's picture

18 Apr 2013 - 6:40 pm | मस्त कलंदर

आमच्याकडे यात तीळ, त्रिफळं(याला तिरफळ म्हणतात हे मुंबईत आल्यावर कळलं), चक्री, मोठी वेलची, काही तरी रामफूल असं आणि बरंच काही असतं. मी स्वतः अर्थातच करत नाही, पण आईकडून घेऊन येते. पावभाजी-मिसळ अश्शा ठसकेबाज होतात म्हणून सांगू... :-)

स्मिता चौगुले's picture

19 Apr 2013 - 8:43 am | स्मिता चौगुले

हो यात तुम्ही अजून बरेच मसाले वापरू शकता, पण त्याचे प्रमाण व्यवस्थित जमले पाहिजे नाहीतर हे तिखट खावून जळजळ, पित्त होण्याचे चान्सेस असतात

मुक्त विहारि's picture

18 Apr 2013 - 9:10 pm | मुक्त विहारि

आताच बायकोला लिंक पाठवून दिली.

आता बसु देत तिला बोंबलत...

मस्त कलंदर's picture

18 Apr 2013 - 9:33 pm | मस्त कलंदर

!!!

स्मिता चौगुले's picture

19 Apr 2013 - 8:44 am | स्मिता चौगुले

:)

सस्नेह's picture

18 Apr 2013 - 10:24 pm | सस्नेह

आमच्याकडे यात गरम मसाले हे घालतात.
१ किलो मिरच्यांसाठी प्रत्येकी १० ग्रॅम
लवंग दालचीन, दगडफूल किंवा धोंडफूल. बदामफूल,
जायपत्री, रामपत्री, तमालपत्री, त्रिफळ.
नाकेश्वर (नागकेशर ?), मसाला वेलची.
अन हे सर्व मसाले पाव वाटी तेलात तळायचे. हे तेल नंतर चटणी मिसळ्ताना घालायचे.
सुंठीऐवजी आले घालतात.

स्मिता चौगुले's picture

19 Apr 2013 - 11:53 am | स्मिता चौगुले

हो या मसाल्यात बरेच variations आहेत . जसे मालवणी मसाला, कोल्हापुरी मसाला

त्या त्या प्रदेशात जे मसाले आवडीने खाल्ले जातात, जे सहज मिळतात आणि जेवण बनवण्याच्या पद्धती यावर हे मसाले कमी जास्त प्रमाणात वापरले जातात

स्पंदना's picture

19 Apr 2013 - 7:49 am | स्पंदना

अच्छा मिसळलेल्या तिखटाला कांदा-लसुण मसाला म्हणतात तर.
ए मग माझ्याकडे मी कायम बनवते. दर सहा महिन्याला मी तिखट मिसळुन वर गरम मसालाही काढुन ठेवते त्यातुन.
अगदी काटेकोर प्रमाणात आहे माझ्याकडे हे मिसळणीचे तिखट.
या तिखटात शेंगदाणा तेल मिसळुन वर भाकरी अन कांदा....एकदम स्वर्गच! परवा धमुने पण या प्रकाराबद्दल लिहिलं होतं कुठेसं.

स्मिता चौगुले's picture

19 Apr 2013 - 8:45 am | स्मिता चौगुले

या तिखटात शेंगदाणा तेल मिसळुन वर भाकरी अन कांदा....एकदम स्वर्गच! परवा धमुने पण या प्रकाराबद्दल लिहिलं होतं कुठेसं.

हो अगदि...:) तोपासू

नवीन तिखट बनवले की आमच्याकडे चार दिवस हा फेवरीट मेनू असतो !

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2013 - 12:20 pm | प्रसाद गोडबोले

मस्तच !!

शहाजिरे आणि तमालपत्र ह्या दोन्ही मसाल्यांचा सुगंध स्वर्गीय असतो :)

आम्ही लहानपणी हा मसाला , मेतकुट , त्यात कच्चा कांदा बारीक कापुन , शेंगदाण्याचे कुट असे मस्त मिक्स करुन भाकरी बरोबर खायचो ...सोबत दही ! अहाहा :)

असाच एक गोडा मसाला नावाचा प्रकार असतो ... मला नक्की पाककृती माहीत नाही पण त्यात बहुतेक कांदा अन लसुण सोडुन सर्व घालत असावेत ( आईला विचारायला हवे , २५ वर्ष खावुन इन्ग्रेडियन्टस माहीत नाहीत हे लईच वाईट :( )

बाकी मसाल्याचा पाकृ बद्दल धन्यवाद !!

कपिलमुनी's picture

19 Apr 2013 - 12:41 pm | कपिलमुनी

मेतकुट ची पाकृ टाका कुणीतरी

स्वातीताईंची आहे मिपावर. देते सापडली की.

कपिलमुनी's picture

20 Apr 2013 - 3:22 pm | कपिलमुनी

आमच्या सांगली कडे एक डांगर नावाचा पदार्थ असतो .. डाळींचा मिळून बनवतात..कोरडा असतो ..मेतकूट सारखी पावडर असते..ति पण पाणी, ताक कांद्यासोबत खातात..भारी प्रकार असतो

अभ्या..'s picture

21 Apr 2013 - 5:34 pm | अभ्या..

डाळींचा मिळून बनवतात..कोरडा असतो ..मेतकूट सारखी पावडर असते

पूडचटणी काय?

कपिलमुनी's picture

22 Apr 2013 - 1:16 am | कपिलमुनी

घरी विचारून रेसिपी टाकतो

धमाल मुलगा's picture

22 Apr 2013 - 2:49 am | धमाल मुलगा

अभ्या, तुला बहुतेक 'गनपावडर' डोळ्यापुढं आली असावी. डांगर वेगळं असतंय.

प्रभाकर पेठकर's picture

22 Apr 2013 - 1:29 am | प्रभाकर पेठकर

डांगर उडदाच्या डाळीचा करतात.

कपिलमुनी's picture

22 Apr 2013 - 2:08 am | कपिलमुनी

धन्यवाद काका

स्मिता चौगुले's picture

19 Apr 2013 - 4:11 pm | स्मिता चौगुले

धन्यवाद

आम्ही लहानपणी हा मसाला , मेतकुट , त्यात कच्चा कांदा बारीक कापुन , शेंगदाण्याचे कुट असे मस्त मिक्स करुन भाकरी बरोबर खायचो ...सोबत दही ! अहाहा

पहायला हवे एकदा असे खाऊन

चावटमेला's picture

22 Apr 2013 - 4:52 pm | चावटमेला

आम्ही लहानपणी हा मसाला , मेतकुट , त्यात कच्चा कांदा बारीक कापुन , शेंगदाण्याचे कुट असे मस्त मिक्स करुन भाकरी बरोबर खायचो ...सोबत दही ! अहाहा

अगदी अगदी. आम्ही फक्त शेंगदाण्याचा कूट टाकायचो नाही, बाकी सगळं शेम टू शेम

बंडा मामा's picture

20 Apr 2013 - 4:58 pm | बंडा मामा

वा. फोटो नसले तरी मसाल्याचे वर्णन अगदी चित्रदर्शी आहे. किती बारकावे भरलेले असतात साधे वाटणारे मसाले बनवण्यात. इतक्या इल्याबोरेटली बनवलेला कोणताही विकतचा ब्रँडचा मसाला तुम्हाला माहित असल्यास कृपया तेही सांगा. ज्यांना हे घरी करणे शक्य नसेल ते निदान विकतचा का होइना हा आनंद घेऊ शकतील.

स्मिता चौगुले's picture

22 Apr 2013 - 8:22 am | स्मिता चौगुले

तुम्ही अम्बारीचा कांदा-लसूण मसाला वापरु शकता, जरी घरच्या मसल्या सारखा नसला तरी त्यातल्यात्यात बरा आहे

पाक्रुचे फोटो सध्या नाहीत पण पुढ्च्या वेळेस जेव्हा मसाला बनवेन तेव्हा काढेन आणी नक्की धाग्यावर अपलोड करेन

स्मिता चौगुले's picture

23 Apr 2013 - 3:34 pm | स्मिता चौगुले

मस्त कलंदरताईनी खाली दिलेले उत्तरात मसाल्याविषयी लिहिले आहे ते जरुर वाचावे

चंबु गबाळे's picture

22 Apr 2013 - 7:39 am | चंबु गबाळे

वाह.. वाचूनच मसाला करावा आणि झणझणीत सातार्याची कोंबडी हाणावी असं वाटतय..

सानिकास्वप्निल's picture

22 Apr 2013 - 4:39 pm | सानिकास्वप्निल

छान कृती पण माझ्यासाठी आयता मसाला आणलेलाच बरा ;)
आपल्याला हे जमणं अवघडच :)
हॅट्स ऑफ

स्मिता चौगुले's picture

22 Apr 2013 - 5:11 pm | स्मिता चौगुले

धन्यवाद सानिकाताई..:)

मस्त कलंदर's picture

22 Apr 2013 - 7:38 pm | मस्त कलंदर

सांगली परिसरात अशी तयार चटणी विकत मिळते. आमच्या तासगांवचा RA ब्रँड आणि दिवटेंची चटणी प्रसिद्ध आहे. सांगली किंवा मिरजेहून परतताना काकडवाडी फाट्यापासून कवठे एकंदकडे थोडंसं RA ब्रँडवाल्यांची फॅक्टरी आहे. संध्याकाळच्या वेळी कॉलेजहून परतताना भुकेल्या पोटी ताज्या चटणीचा घमघमाट अस्वस्थ करून सोडी. अहाहाहा..