पुण्यातील एक झकास आणि अर्थपूर्ण पाटी

परवाच पुण्यात जाऊन आलो आणि वैकुंठ स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला लागून एक पाटी लिहिली होती :

वहातुकीचे नियम पाळा
(स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराकडे बाण दाखवून त्या बाणाखाली Smile
इकडे यायचे टाळा !
---------------पुणे वहातुक नियामक मंडळ----------
भन्नाट "डोकॅलिटी" पुणेकरांची !

:)

वहातुकीचे नियम पाळा
(स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराकडे बाण दाखवून त्या बाणाखाली
इकडे यायचे टाळा !

सह्ही! Smile

आपला,
(मोटर वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत सजा झालेला) तात्या.

जास्त समर्पक

इकडे यायचे टाळा , ऐवजी , इकडे 'लवकर' यायचे टाळा असे हवे होते कारण तिथे जाणे अटळ आहे

जबरदस्त

जबरदस्त डोक वापरलये!!!!!!!!!!!!!
आपण पण फॅण आहे असल्या अफलातून पाट्याचा.....

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

झक्कास

झक्कास !!!!!!

पुणेरी पाट्या असतातच छान!!!!!!!!

मस्तंच

नमस्कार,
पाटी तर झक्कासच आहे पण त्याचा फोटो दिलात तर अजून मजा येईल.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

हो

हो मी वाचली आहे ही पाटी.
अजुन एक पाटी एका डॉक्टरांची होती.
मनपाभवनकडुन बालगंधर्व रंगमंदीराकडे जाताना उजव्या बाजुला आहे
" यक्रुत आणि काळीज यांचे तज्ञ"

खरं आहे

पुणेरी पाट्या भन्नाट असतात !
NIBM, कोंढव्या जवळील ऐका रिक्षाच्या मागे पाटी होती
पत्ता विचारल्यास रिक्षाचे भाडे द्यावे लागेल !
आपला
(आर्य)

चुकून

चुकून पुण्यातील एक झकास आणि अर्थपूर्ण पार्टी असे वाचले .... आणि काही तरी जोरदार वृत्तांत असेल असे वाटले.