..

प्रियाली's picture
प्रियाली in जनातलं, मनातलं
6 Jul 2008 - 5:37 pm

..

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 Jul 2008 - 5:53 pm | विसोबा खेचर

त्या रात्री आमच्या स्वागताला पर्जन्यराज नेहमीप्रमाणे हजर झाले. विजांच्या चकचकाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडला. भर जंगलात डोंगरमाथ्यावर रात्रीच्या काळोखात निसर्गाचे विलोभनीय रुद्र रूप आणि अधूनमधून येणारे प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज, घुत्कार आणि चित्कारांत ती रात्र सरली.

वा! मस्त वर्णन...

तिला माणसांची भीती नव्हती की या माणसांना आपण पिंजर्‍यात बंद केलं आहे याची खात्री झाली होती का काय देव जाणे.

क्या बात है! हे वाक्य आवडलं...

प्रियाली, जियो! बर्‍याच दिवसांनी तुझा लेख वाचायला मिळाला. सुंदर अनुभवकथन...

तात्या.

प्रियाली's picture

6 Jul 2008 - 6:10 pm | प्रियाली

हल्ली पूर्वीसारखा वेळ नसतो. हा लेखही तासाभरात उरकावा लागला. त्यामुळे मनासारखं उतरत नाही म्हणून लिहित नाही.
लिहिण्याची इच्छा झाली हेच खूप...सुट्टीचा परिणाम असावा. ;)

नंदन's picture

6 Jul 2008 - 6:07 pm | नंदन

वर्णन आणि छायाचित्रे आवडली. लेखाचे 'बेअरिंग' उत्तम सांभाळले आहे :)
ब्ल्यू ग्रासचीही फेरी झाली का स्मोकीमध्ये?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रियाली's picture

6 Jul 2008 - 6:09 pm | प्रियाली

सध्या आम्ही आमच्या ब्याकयार्डात उगवतो आहे. ;)

लेखाचे 'बेअरिंग' उत्तम सांभाळले आहे

शब्दच्छल मस्त!

सहज's picture

6 Jul 2008 - 6:32 pm | सहज

सहल वर्णन मस्त.

मामाबेयर बेबीबेयर अनुभव छानच!

चित्रा's picture

6 Jul 2008 - 7:59 pm | चित्रा

लेखन आवडलेच.
आपण बहुतेक वेळा निसर्ग अगदी हवा तेवढाच घरात येऊ देत असतो , कुठे फुलदाणीतली फुले, एखादा पाळीव प्राणी, पक्षी वगैरे, असे कुठेतरी बाहेर गेले की कळते आपण किती नगण्य प्राणी असतो ते :-)

पिवळा डांबिस's picture

6 Jul 2008 - 7:40 pm | पिवळा डांबिस

छान लेख, आवडला! अस्वलांच्या बाबतीतला अनुभव तर अगदी प्रातिनिधीक!!

उत्तर अमेरिकेत हिंडण्याफिरण्याचे महिने तीन. जून ते ऑगस्ट.
खरं आहे, पण स्मोकी माऊंटनला जायला फॉल उत्तम हो. फोलियेज काय सुंदर रंग पकडतं म्हणून सांगू!! पुढल्या वेळी एक फॉलमध्ये ट्रीप कराच! यू वोन्ट बी डिसअपॉईंटेड!!!

मिडवेस्टात राहणारी माणसं माणूसघाणी असतात का असा प्रश्न एखाद्याला पडला असेल तर खरेखुरे उत्तर येथे मिळून जावे.
हे मस्त!!:)
अहो एलाय लिलीचा उमेदवार आमच्याकडे मुलाखतीसाठी आला तर अर्धा दिवस त्याला नुसतं बोलतं करण्यात निघून जातो!!:))
खरंतर, माणसांपासून दूर जाऊन आराम करायचा झाला तर मिडवेस्टासारखी दुसरी जागा नाही!!!
हा तर षटकार!!!:))
आम्ही आधी इस्ट (खडूस) आणि आता वेस्ट (उधळे) कोस्ट वाले असल्याने तुमच्या विधानातली सत्यता लगेच पटली!!!!:)

“माझी गाडी.... ही अस्वलं खरवडून तर नाही ना ठेवणार?” ह्याच्या डोक्यात तिसरेच विचार सुरू होते.
तुम्हाला विनोदी वाटतंय, पण खरंतर मी 'त्याच्या' भावनेशी सहमत आहे.
अहो जावे त्याच्या (नवरेलोकांच्या) वंशा, तेंव्हा कळे...:))
बाकी त्याला म्हणावं की गाडीत एकही खाद्यपदार्थ ठेवू नकोस मग काही ताप नाही. पण एक बिस्कीट जरी आत राहिलं तर गाडीची खैर नाही. अस्वलांना वास येतो. गाडी लॉक करूनही काही उपयोग नाही. स्वानुभवावरून सांगतोय, अस्वलं त्यांची एक ट्रीक वापरून लॉक उघडतात...:(

सध्या आम्ही आमच्या ब्याकयार्डात उगवतो आहे.
कधी बोलावताय पार्टीला?
:)

प्रियाली's picture

6 Jul 2008 - 9:06 pm | प्रियाली

स्मोकी माऊंटनला जायला फॉल उत्तम हो. फोलियेज काय सुंदर रंग पकडतं म्हणून सांगू!!

सहमत आहे. स्प्रिंग आणि फॉल ट्रिप्स केल्या होत्या. उन्हाळ्यात राहिली होती, यावर्षी ती ही केली.

अहो एलाय लिलीचा उमेदवार आमच्याकडे मुलाखतीसाठी आला तर अर्धा दिवस त्याला नुसतं बोलतं करण्यात निघून जातो!!

शक्य आहे. मी तर ऐकून आहे की एलाय लिलीत मुलाखतीला आलेल्या क्यांडिडेटला विचारतात की 'तुला बोलता येतं का?' उत्तर नाही आलं तरच नोकरी मिळते. स्वानुभव!!

तुम्हाला विनोदी वाटतंय, पण खरंतर मी 'त्याच्या' भावनेशी सहमत आहे.

अहो विनोदी नाही, इतक्या वर्षांचा अनुभव आहे. तिथे अस्वलं होती, त्यांना सांगून काही परिणाम होणार नाही म्हणून ठीक. मी गाडी घेऊन लांबवर जात असेन तर "तू धड परतली नाहीस तर चालेल पण गाडी धड परत आली पाहिजे." असा हुकूम नेहमी मिळतो. ;)

गाडीत बरंच खाण्यापिण्याचं सामान होतं म्हणूनच आम्ही थोडे धास्तावलो होतो पण त्या आईला आपल्या छाव्यांपुढे बाकी काही दिसलं नसावं.

कधी बोलावताय पार्टीला?

हे बरंय आधी लिलीच्या लोकांना माणूसघाणं म्हणायचं आणि वर पार्टीही मागायची. ;) पण साहित्यसंमेलनाचं सूप वाजलं का श्रमपरिहार पार्टी इथेच ठेवू, आमच्या ब्याकयार्डात. :) जोक्स अपार्ट, कधीही या!

पिवळा डांबिस's picture

6 Jul 2008 - 9:15 pm | पिवळा डांबिस

हे बरंय आधी लिलीच्या लोकांना माणूसघाणं म्हणायचं आणि वर पार्टीही मागायची.
आयला, तुम्ही लिलीच्या?
मग सॉरी हां!
आम्हाला तरी काय माहिती?
इथे मिपावर बरेचसे लोक कॉम्प्यूटरवाले आहेत, आमच्यासारखे फार्मावाले कमीच!
पण आम्ही आम्हालाही खडूस आणि उधळं म्हटलंय हो!!!:)

जोक्स अपार्ट, कधीही या!
थॅक्यू!
आणि तुम्ही जेंव्हा कधी एल्.ए. ला याल तेंव्हा जरूर या!!

विकास's picture

6 Jul 2008 - 9:30 pm | विकास

लेख मस्त आहे. माउंट वॉशिंग्टनच्या भागात (व्हर्माँट/न्यू हँम्पशायर) बर्‍याचदा जाणे होते पण स्मोकी माउंटनचे वरील वर्णन ऐकून निश्चितच जावेसे वाटत आहे...

ऋषिकेश's picture

6 Jul 2008 - 9:49 pm | ऋषिकेश

वा! लई भारी!
फोटु आवडले खासच!

प्रवासवर्णन / अनुभवकथन माझा आवडता प्रकार असल्याने वाचायला खूप मजा आली.... अजून असेच लिखाण होऊ द्यात!
बाकी अनुभवकथन आवडलं ... मधेच थोडं विस्कळीत वाटलं.. पण एका तासात एका बैठकीत लिहिलं आहे .. म्हणून " कम्माल का है ! ;)"

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रियाली's picture

6 Jul 2008 - 10:49 pm | प्रियाली

ऋषिकेश,

अरे प्रवासवर्णन म्हणून लिहायला बसले नव्हते. अनुभव लिहायचा होता, दोघांची मिसळ झालीसं वाटतं. कुठे विस्कळीतपणा आला आहे ते खरडीतून कळव. मी ब्लॉगावर तरी व्यवस्थित करते.

विकास,

स्मोकीची ट्रिप जरूर करा. अतिशय सुरेख जागा आहे. नॅशनलपार्क सोडून गॅटलीनबर्ग आणि पिजन फोर्ज अशा दोन फनसिटिजही आहेत. तिथे म्युझिअम्स, आर्केड, अक्वेरियम, थीमपार्क्स, शोज आणि बरेच प्रकार आहेत. मुलांनाही आवडेल असे स्थळ आहे. परंतु, सहल कराल तेव्हा निवांत सहल करा. आम्ही मागे ३ दिवस आणि ५ दिवसांची ट्रिप केली होती. यावेळी तब्बल ७ दिवसांची. तरी कमीच पडली. काही अधिक फोटो येथे लावते.

DSC01896
ओढ्यावर पाणी पिणारे हरिण

DSC01849
स्मोकीतील धुक्याने अच्छादित एक पहाट

DSC00653
गॅटलिनबर्ग

धनंजय's picture

7 Jul 2008 - 2:04 am | धनंजय

सौम्य विनोदी शैली ही तुमची खास.
त्यानंतर गोडाधोडाचे म्हणून हे डेझर्ट कोर्सला दिलेले फोटो. ओढ्यातले हरीण क्लास!

चतुरंग's picture

7 Jul 2008 - 12:04 am | चतुरंग

स्मोकी माऊंटनबद्दल ऐकून होतो आता वाचूनही आहे. जंगलात जाऊन, तब्बल ७ दिवस राहूनही अपुरी वाटली ट्रिप, म्हणजे जबरदस्तच असणार निसर्गसौंदर्य.
प्रवासवर्णन छान आहे आणि फोटोही चांगले आलेत. अस्वल आई-बेट्यांची कहाणी 'रंजक' आहे! :S

चतुरंग

बेसनलाडू's picture

7 Jul 2008 - 7:59 am | बेसनलाडू

लेखन आवडले. फोटोही.
गॅटलिनबर्ग सुंदरच जागा आहे.रिवर राफ्टिंग इ. करता येते;ते मिळाल्यास जरूर करावे.
(एक्स्-एन्. सी. आइट् ;) )बेसनलाडू

अनिल हटेला's picture

7 Jul 2008 - 10:17 am | अनिल हटेला

प्रियाली जी!!!

छान प्रवास वर्णन ...

लिखाण ही मस्त आणी फोटोज ही....

जंगली असो का पाळीव, प्राणी असो का मनुष्य- आईही आईच असते याची जाणीव त्या दृष्यातून होत होती.

आवडले...

अजुन ही प्रवास वर्णन वाचायला आवडेल....

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्रियाली's picture

7 Jul 2008 - 2:43 pm | प्रियाली

लेखाला प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद.

चतुरंग,

बेलाने म्हटल्याप्रमाणे स्मोकीच्या या परिसरात रिव्हर राफ्टींग, हॉर्स रायडींग, बाईकिंग, ट्रेकिंग वगैरेही करता येते. पीजन फोर्ज परिसरात डॉलीपार्क, गो-कार्ट्स, गॉल्फ इ. करता येते. वेळ काढून जाऊन या. सात दिवस अपुरे आहेत याची प्रचीती यावी. :)

प्रभाकर पेठकर's picture

7 Jul 2008 - 5:31 pm | प्रभाकर पेठकर

अनुभवकथन अतिशय प्रवाही, उत्कंठावर्धक आणि (अस्वलांच्या भितीपोटी) तणावपूर्ण झाले आहे. छायाचित्रेही सुरेख आली आहेत. ओढ्यावर पाणी पिणारे हरीण मस्त.
अभिनंदन.

आनंदयात्री's picture

7 Jul 2008 - 5:46 pm | आनंदयात्री

छान लेख प्रिया ली. चित्र पण मस्त.
आम्हाला कधी जायला मिळणार :(

ऍडीजोशी's picture

7 Jul 2008 - 6:16 pm | ऍडीजोशी (not verified)

मीच जाऊन आल्या सारखे वाटले.

अवांतर - अस्वलांच्या माद्या या धोकादायक असून त्या माणसांवर हल्ले करण्याची शक्यता अधिक असते

:D
प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

आनंदयात्री's picture

7 Jul 2008 - 6:30 pm | आनंदयात्री

>>प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे.

=)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

प्रियाली's picture

7 Jul 2008 - 7:21 pm | प्रियाली

प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे.

=)) अगदी! तुमचं काँट्रॅक्ट दिलेलं आहे की द्यायचं आहे?

ऍडीजोशी's picture

7 Jul 2008 - 8:17 pm | ऍडीजोशी (not verified)

ऍडी म्हणे आता,
उरलो पिटण्या पुरता.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विसुनाना's picture

7 Jul 2008 - 6:49 pm | विसुनाना

सुंदर लेख. इतक्या गडबडीत लिहूनही छान जमलाय.सर्व प्रकाशचित्रंही उत्तम.
धबधब्याचं पेंटिंग करावं असं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2008 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रवास वर्णन, फोटू , लेखनाची शैली अन् खूसखुशीत संवाद लै आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकासराव's picture

8 Jul 2008 - 11:22 am | झकासराव

प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे. >>>>>>>>>
=))

प्रियाली अनुभव कथन छान आहे. प्रकाशचित्रे सगळीच मस्त.
मला धबधब्याच सर्वात जास्त आवडलं :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रियाली's picture

8 Jul 2008 - 3:10 pm | प्रियाली

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद.

हरीण पाणी प्यायला वाकले होते म्हणून क्यामेराची कळ दाबली तोपर्यंत त्याने पोझ देणे नाकारले. धबधब्याचा फोटो, धबधब्याखाली उतरून काढल्याने बरा आला पण त्या फोटोच्या आम्हीही दिसतोय हे आजच लक्षात आले. :)

सुवर्णमयी's picture

8 Jul 2008 - 5:01 pm | सुवर्णमयी

प्रियाली,
लेख आणि फोटो आवडले. बेयन (माझ्या मुलाच्या भाषेत, र चा पत्ता नाहीये अजून) फार धमाल आहेत. मुले एकदम खूष झालीत. काल बराच वेळ हेच फोटो बघणे सुरु होते.मी स्मोकी ला पाहिलेले फॉल कलर्स गेल्या दहा वर्षातले सर्वोत्तम आहेत.तेव्हा गॅटलिनबर्ग ला धावती भेट दिली होती. तो सर्व परिसर अतिशय मोहक आहे. त्या सर्व आठवणी लेख वाचून ताज्या झाल्यात.
सोनाली

संदीप चित्रे's picture

8 Jul 2008 - 9:09 pm | संदीप चित्रे

लेख आणि फोटू छान आहेत प्रियाली....
स्मोकीला यायला पाहिजे एकदा.
आम्हा बाराकरांना (बाग राज्यकरांना) अवतीभवती माणसंच माणसं (त्यातही देसीच देसी !!) बघायची सवय ;)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------

सर्किट's picture

9 Jul 2008 - 12:27 am | सर्किट (not verified)

छायाचित्रे आवडली. नेहमीचीच क्खुसखुशीत शैली वाचून बरे वाटले.

- सर्किट

टारझन's picture

9 Jul 2008 - 1:38 am | टारझन

असे अफाट निसर्ग सौंदर्य चित्रासकट आणि तेवढ्याच प्रभावी शब्दात मांडलेत... धन्यवाद प्रियाली....
अफ्रिकाही अशीच अफाट आहे.. सुंदर आहे... पण अजून जायचा योग नाही आला. पुन्हा त्यात आम्ही पडलो पुणेकर (सेंट न सेंट वाचवणारे) म्हणजे सफारीला जाताणा १० वेळा विचार...
फोटोज ने फार प्रभाव पडला .. अतिऊत्तम.. तुमच्या पूढच्या सूट्टीची आणि भटकंतीच्या अनूभव वाचण्याची वाट बघतोय...

चेंगट ) कु ख.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space