आयटीच्या गोष्टी - नमन
आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
शिक्षण संपलेलं असतं. नोकरीलाही आता जवळपास दोन वर्ष होत आलेली असतात. इथे आता कामात मन लागत नसतं, डोळ्यांना तिकडचे वेध लागलेले असतात. मॅनेजरला तसं आडून आडून सुचवणं चालू असतं. मनात आशा निराशेचा हिंदोळा झुलत असतो. कारण, आयटीत नोकरीला लागल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीसाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेले असतात ती गोष्ट वास्तवात उतरण्याची वेळ आलेली असते. दोन वर्ष ऑफशोअरला (म्हणजे भारतात) काम केलं आता मला कंपनीने ऑनसाईटला पाठवायलाच हवं असं तो ठामपणे इतरांना सांगत असतो.
काय असतं एव्हढं ऑनसाईटमध्ये की ज्यामुळे आयटी इंडस्ट्री जॉईन करणारा जवळपास प्रत्येक कॉलेज पासआऊट अगदी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून एक दिवस ऑनसाईटला जाण्याची स्वप्नं पाहू लागतो? काय असतं एव्हढं ऑनसाईटमध्ये की ज्यामुळे प्रत्येक अनुभवी आयटी ईंजिनीयर नविन नोकरीसाठी मुलाखत देऊन झाल्यानंतर "हाऊ अबाऊट ऑनसाईट?" असा प्रश्न मुलाखतकाराला न चुकता विचारतो?
काय असतं एव्हढं ऑनसाईट असाईनमेंटमध्ये? ऑनसाईट म्हणजे बरंच म्हणजे बरंच काही असतं.
आपण ऑनसाईटबद्दल अगदी सविस्तर माहिती घेऊया.
या आधीच्या लेखात आपण दोन प्रकारच्या आयटी कंपन्यांची ओळख करुन घेतली, एक प्रोडक्ट बेस्ड आणि दुसरा प्रकार सर्व्हीस बेस्ड. प्रोडक्ट बेस्ड कंपनीची एक किंवा अनेक संगणक प्रणाली उत्पादने असतात. आणि ही उत्पादने ती कंपनी आपल्या ऑफीसमध्ये डेव्हलप करुन ईतर नित्योपयोगी वस्तूंसारखी संगणकाच्या दुकानांमार्फत किरकोळ विक्री करत असते. ही सारी उत्पादनं एका सीडीत किंवा अनेक सीडीच्या संचात मिळतात. आपण सीडी घरी आणायची, त्यातला सेटप प्रोग्राम रन करायचा, सेटप प्रोग्रामच्या सुचनांनुसार माहिती द्यायची की झालं. जेमतेम पंधरा वीस मिनिटांत ते सॉफ्टवेअर आपल्या संगणकामध्ये वापरण्यास उपलब्ध होतं. विंडोज सारखी संचालन प्रणाली संगणकावर स्थापित करायची असेल तर दिड दोन तास लागतात. अर्थात हे झालं वैयक्तिक वापरातील सॉफ्टवेअरबद्दल.
काही संगणक प्रणाली उत्पादनं मोठमोठया उद्योगसंस्थांमध्ये त्यांचा पुर्ण कारभार संगणकीकृत करण्यासाठी वापरली जातात. अशा संगणक प्रणालींना उद्योग संसाधने नियोजन प्रणाली (ईआरपी - एंटरप्राईज रीसोर्स प्लानिंग सिस्टीम) म्हणतात. आणि या सिस्टीम बरेच वेळा ग्राहकाच्या गरजेनुसार बनवल्या जातात किंवा आयटी कंपनी जी ईआरपी सिस्टीम बाजारात विकते तिच्यात ग्राहकाच्या गरजेनुसार फेरफार (कस्टमायझेशन) केले जातात. हे अर्थात उपलब्ध असलेल्या ईआरपी सिस्टीम मध्ये फेरफार करुन ती ग्राहक कंपनीच्या कर्मचार्यांच्या वापरायोग्य करण्यासाठी किंवा पुर्णतः नविन ईआरपी सिस्टीम बनवण्यासाठी संगणक प्रणाली विकासकांना (सॉफ्टवेअर डेव्हलपर्स) ग्राहक उद्योगाची सखोल माहिती (डोमेन नॉलेज) असावी लागते. त्या ग्राहक उद्योगाचे वेगवेगळे विभाग एकमेकांशी कशा पद्धतीने जोडलेले आहेत, त्यांच्यात कशा पद्धतीने माहितीची देवाण घेवाण होते ही माहिती गोळा करणे आवश्यक असते. तसेच एकदा हवी तशी संगणक प्रणाली बनवून झाली, तिच्या आवश्यक त्या चाचण्या झाल्या की ती प्रणाली ग्राहक उद्योगासाठी वापरात आणावी लागते. अर्थात आता ही प्रणाली एकाचवेळी त्या उद्योगाचे शेपाचशे किंवा हजारो कर्मचारी वापरणार असल्याने ती वापरात आणणे एक सेटप प्रोग्राम रन करुन होणार नसते. त्यासाठी सेवादाता (सर्व्हर), विदागार (डेटाबेस) अशा उच्च शक्तीच्या संगणक यंत्रणा बसवाव्या लागतात. आणि ही सारी कामे करण्यासाठी आयटी कंपनीला आपली काही माणसे त्या ग्राहक उद्योगाच्या कार्यालयात पाठवावी लागतात. संगणक प्रणालीच्या निर्मितीचं किंवा तिच्या स्थापनेचं किंवा तिच्या देखभालीचं काम ग्राहकाच्या कार्यालयातूनच करणे म्हणजे ऑनसाईट असाईनमेंट.
सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांमधल्या कामामध्ये काही वेळा थोडासा फरक असतो. बरेच वेळा प्रोजेक्टच्या सुरुवातीला एक दोन माणसे ग्राहकाच्या कार्यालयात संगणक प्रणालीच्या गरजांची माहिती (रिक्वायरमेंट गॅदरींग) मिळवण्यासाठी जातात. त्यानंतर ती संगणक प्रणाली पुर्णपणे आयटी कंपनीत विकसीत केली जाते. काही ग्राहक कंपन्यांचे स्वतःचे संगणक विभाग असतात. अशावेळी आयटी कंपन्यांचे काही विकासक ग्राह्काच्या कार्यालयातून ग्राहक कंपनीच्याच संगणक तज्ञांच्या देखरेखीखाली काम करतात. कामाचा व्याप जास्त असेल तर जोडीला आयटी कंपनीच्या कार्यालयातूनही काही माणसे काम करतात. म्हणजे आता एकाच प्रोजेक्टवर काम करणार्या दोन टीम तयार झालेल्या असतात. ग्राहकाच्या कार्यालयातून काम करणारी ऑनसाईट टीम आणि आयटी कंपनीच्या कार्यालयातून काम करणारी ऑफशोअर टीम. ऑनसाईट टीममधला आयटी कंपनीचा ज्येष्ट विकासक ऑफशोअर टीम आणि ऑनसाईट टीम मधला दुवा (ऑनसाईट कॉऑर्डीनेटर) म्हणून काम करतो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठून तरी कामच करायचे आहे. मग ते ग्राहकाच्या कार्यालयातून केले काय किंवा आयटी कंपनीच्या कार्यालयातून केले काय. काय फरक पडतो.
फरक पडतो. ग्राहक जर परदेशातील असेल तर खुपच फरक पडतो.
एव्हाना तुमच्या हे लक्षात आले असेल की मोठया संगणक प्रणालींचे दोन प्रकारचे ग्राहक असतात.
१. देशांतर्गत ग्राहक (डोमेस्टीक क्लायंट)
२. आंतरराष्ट्रीय ग्राहक (ईंटरनॅशनल क्लायंट)
जर देशांतर्गत ग्राहकाच्या कार्यालयात जाऊन विकासकांना काम करावयाचे असेल आणि हे ग्राहकाचे कार्यालय दुसर्या शहरात असेल तर आयटी कंपनी आपल्या विकासकांना प्रवासभत्ता देते. विकासकांची त्या शहरात राहण्याची सोय करते. पगार मात्र जो आहे तोच चालू राहतो.
ग्राहक जर परदेशातला असेल तर आयटी ईंजिनीयर्ससाठी ती सुवर्णसंधी असते. कामानिमित्त का होईना, कंपनीच्या खर्चाने परदेशवारी घडते. काम जास्त दिवस चालणार असेल तर कंपनीच्या खर्चाने सहा महिने वर्षभर त्या देशात राहताही येते. पगार मात्र दोन प्रकारे दिला जाऊ शकतो. एक म्हणजे कंपनी भारतातलाच पगार देते परंतू परदेशातला राहण्याचा आणि जेवणाचा खर्च कंपनी करते. म्हणजे भारतातला पगार पुर्णपणे बचत करता येऊ शकतो. दुसरा प्रकार म्हणजे आयटी कंपनी आपल्या आयटी ईंजिनीयर्सना ग्राहकाकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून पाठवते. ग्राहक कंपनी आयटी कंपनीला प्रत्येक कंत्राटी कर्मचार्याच्या कामाचा मोबदला महिना अखेरीस देते. आयटी कंपनी त्या रकमेतून आपले खर्च, फायदा वगैरे वजा करुन एक ठराविक रक्कम (त्या देशातील चलनात) आपल्या त्या देशातल्या कर्मचार्यांना देते. या पद्धतीत राहण्याची आणि जेवणाची सोय कर्मचार्यांनी आपली आपण करायची असते. तसेच तो कर्मचारी जेव्हढे दिवस परदेशातून काम करेल तितके दिवस भारतातील पगार बंद असतो. कामाचा कालावधी एक वर्षापेक्ष जास्त असेल तर बर्याचशा आयटी कंपन्या अकरा महिन्यानंतर आपल्या कर्मचार्यांना एक महिन्याची बिनपगारी सुट्टी घेऊ देतात. या सुटटीत त्या कर्मचार्याला भारतात येऊन परत जायचे असेल तर प्रवासभाडयाचा खर्च कंपनी करते.
देशांतर्गत ग्राहकाकडे ऑनसाईटला जाऊन काम करण्यास आयटी ईंजिनीयर्स तितकेसे उत्सुक नसतात. कारण एक दुसर्या शहरात जाऊन राहण्याचा अनूभव सोडला तर त्यात विशेष काही फायदा नसतो. कंपनी जरी प्रवासभत्ता देत असली आणि राहण्याची सोय करत असली तरी काही काळासाठी स्थलांतरीत होण्याच्या दगदगीमुळे आयटी ईंजिनीयर्स या प्रकाराला नाक मुरडतात.
परदेशात ऑनसाईट जाण्यासाठी मात्र आयटी कंपन्यांमध्ये गळेकापू स्पर्धा असते. कंपनीच्या खर्चाने परदेशवारी, वर्ष दोन वर्ष परदेशात राहावयास मिळाल्यास होणारी दहा वीस लाखांची बचत, परत आल्यानंतर मिळणारा "फॉरीन रीटर्न्ड" टॅग आणि आयटी मार्केटमध्ये मिळणारा भाव असे अनेक फायदे असल्यामुळे बरेच वेळा एखादया ऑनसाईट जागेसाठी आयटी ईंजिनीयर पाठवताना कधी कधी राजकारणाईतकेच गलिच्छ राजकारण खेळले जाते. मॅनेजर लोक आपल्या चमच्याचा नंबर लावण्यासाठी कधी कधी अनाकलनिय कोलांटया उडया मारतात. तसेच एकदा कोण जाणार हे नक्की झाले की तो जाणार्या पहिल्यांदाच त्या देशात जाणार असेल तर व्हिजा ईंटरव्ह्यू नावाचं एक दिव्य जाणार्याला पार पाडावं लागतं.
या सार्या गमती जमती आपण पुढच्या भागात पाहू.
प्रतिक्रिया
26 Feb 2013 - 11:31 pm | राजेश घासकडवी
फार तिरकं तिरकं लिहावं लागू नये म्हणून नवीनच प्रतिसाद देतो आहे रेवती, पिलीयन रायडर, शुचि वगैरे सगळ्यांना.
आईच्या दुधाविषयी अनेकांनी ओथंबून येऊन लिहिलेलं आहे. दोन मुख्य फायदे सांगितले - एक म्हणजे दुधातून ऍंटिबॉडीज जातात. दूध पाजण्याच्या प्रक्रियेतून, आईशी जवळिकीतून मूल अधिक आत्मविश्वासू होतं. हे दोन्ही तत्वतः मान्य आहेत. पण तो किती होतो नक्की परिणाम?

वरील चार्टवरून दिसतं की २५ टक्के अमेरिकन मुलांना जराही आईचं दूध मिळत नाही. किंबहुना पन्नासेक टक्क्यांना ते फारसं मिळत नसावं. भारतीयांमध्ये यापेक्षा बरीच जास्त टक्केवारी आहे असा अंदाज आहे. पण भारतीय हे अमेरिकनांपेक्षा अधिक आत्मविश्वासू आणि अधिक सुधृढ असतात का? म्हणजे अनेक वेगवेगळ्या घटकांतून या दोन गोष्टी ठरतात. मातेचं दूध मिळालं नाही तर त्या दोन गोष्टी मिळणारच नाहीत असं नाही.
बाकी मुद्दा रहातो की त्या बायका एका आनंदाला मुकत आहेत. हेही ठीक, पण ती त्यांची निवड आहे. ऑफशोअरला जाण्याच्या आनंदाला काही बायका मुकतातच की.
27 Feb 2013 - 3:04 am | शुचि
काही व्हेरीएबल्स आहेत जसे नंतरचे डाएट. कदाचित अमेरीकन लोक लहानपणी झालेली आबाळ पुढे झपाट्याने भरुन काढत असतील. अमेरीकन लोकांची पालकांशी अॅटॅचमेंट कमी असते ती यामुळेही असू शकेल. यावर जोवर नीट अभ्यास होत नाही तोवर कोणताही निष्कर्ष काढता येत नाही.
27 Feb 2013 - 4:01 am | राजेश घासकडवी
इतरही व्हेरिएबल्स आहेत हे अगदी बरोबर. किंबहुना तेच मला म्हणायचं होतं, आईचं दूध हा एक आणि एकच निकष लावता कामा नये.
आबाळ हा शब्द मी वापरणार नाही, कारण अमेरिकन मुलं, अगदी काही महिन्यांचीसुद्धा, रोगट दिसत नाहीत. चांगली गुटगुटीतच दिसतात.
हा नवीनच मुद्दा आलेला आहे. आणि आत्मविश्वासाचा मुद्दा निघून गेलेला दिसतो. असो.
मला एवढंच म्हणायचं आहे की मुलाला आईचं दूध आणि सहवास की संसारासाठी तीस लाख रुपयांची बचत पण मुलाला आजी-आजोबा-वडील यांनी सांभाळणं या दोनपैकी कुठचा चॉइस स्वीकारण्याबद्दल कोणाला नावं ठेवू नये.
27 Feb 2013 - 4:26 am | शुचि
सहमत आहे.
27 Feb 2013 - 8:47 am | ५० फक्त
कुठचा चॉइस स्वीकारण्याबद्दल कोणाला नावं ठेवू नये.
दोघांना तर कधीच नाही, एक आपली बायको किंवा नवरा आणि दुसरं म्हणजे ज्यांनं आपल्याला नोकरी देताना आपला इंटरव्ह्यु घेतला होता ती व्यक्ती.
27 Feb 2013 - 9:04 am | शिल्पा ब
१८व्या वर्षीच स्वत:च्या पायावर उभं राहायचं असल्याने आत्मविश्वास नसुन चालणारच नाही. त्याचा अन दुधाचा काय संबंध? आईचं दुध बाळासाठी अत्यावश्यक आहे हेच मेडीकल विश्व सांगत असल्याने तुमच्या चार्टचा उद्देश समजला नाही.
बाकी कोणीही काहीही मुद्दा मांडला की लग्गेच "तुम्ही कसे चुकीचे" हे कुठुन कुठुन डाटा गोळा करुन दाखवायच्या सवयीचे कौतुक वाटते.
असो. धन्या लेखमाला चांगली आहे.
27 Feb 2013 - 9:21 am | पैसा
पण आमचा आणखी आक्षेप पोरांना जन्माला घालून म्हातार्या आईबापांना ती पोरं सांभाळायचं काम लावण्याबद्दलही आहे. आपलं सुख शोधताना दुसर्याला त्रास देणे अन जबाबदार्या ढकलून देणे ही चुकीचीच गोष्ट आहे. त्यात या टेबलांचा आणि आकडेवार्यांचा काय उपयोग?
27 Feb 2013 - 2:33 pm | बॅटमॅन
हे बाकी खरंच आहे. लग्नानंतर आईबापांवर उगा भर कशाला घालायचा? ते आगोदरच खपत असतात, अजून कशाला तरास म्हंतो मी.
27 Feb 2013 - 12:44 pm | सुबोध खरे
स्तनपान हि कटकट वाटणाऱ्या स्त्रियांच्या बद्दल मला काहीच म्हणायचे नाही. पण वैद्यकीय दृष्ट्या काही सत्य विधाने मी आपणापुढे मांडू इच्छितो.
१) मुल जर पहिले ६ महिने पूर्णपणे आईच्या दुधावर वाढले तर त्याची प्रतिकारशक्ती नक्कीच जास्त चांगली वाढते आणी त्याला एलर्जी दमा सारखे रोग निश्चितपणे कमी होतात
२) सुदृढ दिसणे आणी असणे यात फरक आहे. जे मुल पूर्ण आईच्या दुधावर वाढते अशा मुलांमध्ये लठ्ठपणा हा फार कमी प्रमाणात येतो आणि या तुलनेत बाटलीने दुध पिणाऱ्या मुलांमध्ये तो खूप जास्त प्रमाणात दिसतो याचे कारण असे कि आईचे दुध पिण्यासाठी मुलाला चोख्ण्याचे कष्ट करावे लागतात त्यामुळे मुलाचे पोट भेरले कि ते चोखणे बंद करते त्यामुळे अति आहार(overfeeding) आपोआप टाळला जातो. बाटलीने दुध पिणाऱ्या मुलांना तसे करता येत नाही. बाटलीतील दुध गुरुत्वाकर्षणाने खाली उतरले जाते आणि मुल ते गिळायच्या रिफ्लेक्स ने आपोआप पीत राहते.(यात मुलाला कोणताही पर्याय choice राहत नाही) याने अति आहार(overfeeding)होते आणि मुलाच्या शरीरात चरबीच्या पेशी वाढून त्याला लठ्ठपणा (hyperplastic obesity) येतो.
३)मानवी immuno globulin A हि प्राणीजन्य immuno globulin A पेक्षा निराळी असल्याने आईचे सोडून कोणतेही दुसरे दुध दिल्यास आतड्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यास निरुपयोगी ठरतात.त्या मुळे आतड्याचे आजार आणि पाचन शक्तीचे विकार पूर्णपणे आईच्या दुधावर वाढलेल्या मुलामध्ये खूप कमी होतात.
४)प्रत्येक मुल हे आईच्या पोटातून प्रतीकारशक्तीचे गामा ग्लोब्युलीन घेऊन आलेले असते. तेंव्हा आईच्या दुधातील प्रथिने आणि प्रतिजैविके त्याला आपल्या शरीरात सामावून घेणे जास्त सोपे होते.
५) मुलाला दुध पाजण्या मुळे स्तनाग्राला (चेतना मिळाल्याने stimulation ) आईच्या मेंदूत ऑक्सिटोसीन नावाचे संप्रेरक तयार होते ज्यामुळे गर्भाशय आकुंचन पावण्यास मदत होते आणि हे संप्रेरक आपल्याला अतीव आनंदाचा अनुभव देणारे रसायन असल्याने स्त्रियांना खरोखरच हा आनंद मिळतो( हा केवळ मानसिक नाही तर शारीरिक सुद्धा आहे) आणि हे मातृत्वाचे उदात्तीकरण नाही.Recent studies have begun to investigate oxytocin's role in various behaviors, including orgasm, social recognition, pair bonding, anxiety, and maternal behaviors.[2] For this reason, it is sometimes referred to as the "love hormone"The relationship between oxytocin and human sexual response is unclear. At least two uncontrolled studies have found increases in plasma oxytocin at orgasm – in both men and women. wikipedia
६)आईचे दुध कमी पडले हि दुध विकणाऱ्या कंपन्यांची चापलुसी आहे. गायीचे दुध कमी पडले म्हणून वासरू हाडाडले असे आपण फारच क्वचित ऐकले असेल. हा सर्व मानवी मनाचा खेळ आहे. पहिल्या काही दिवसात आईला फक्त काही मिली दुध येते आणि ते मुलाला पुरेसे असते. पण ते पुरे पडत नाही असे एकदा त्या स्त्रीने मनावर घेतले तर आपोआप तिचे दुध कमी होते.(गरीब आयामध्ये असे काही नसल्यामुळे अगदी रस्त्यवर दगड फोडणाऱ्या स्त्रियांची मुले पहिले ६-८ महिने गुटगुटीत असतात)
आईचे दुध पाजण्यात वेळ कोणी आणि किती घालवावा हे प्रत्येक स्त्रीने ठरवावे वैद्यकीय सल्ला वर दिल्याप्रमाणे आहे.तो घ्यावा कि न घ्यावा हा वैयक्तिक प्रश्न आहे.
27 Feb 2013 - 1:11 pm | स्पा
घासकडवी आणि अदितीच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत
27 Feb 2013 - 8:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तर या वैयक्तिक प्रश्नाची कोणी काय उत्तरं दिलेली आहेत यावरून त्यांच्यावर दोषारोपण करणार्यांना काय म्हणायचं हा जीवशास्त्र, वैद्यक, सांख्यिकी आणि अन्य कोणत्याही विज्ञानशाखेचा भाग नाही. हा सामाजिक विज्ञानाचा भाग आहे. आधुनिक जगात, आधुनिक मूल्यव्यवस्थेत याला इतरांबद्दल judgmental होणं असं म्हणतात. आणि ही गोष्ट टाकाऊ समजली जाते.
27 Feb 2013 - 4:59 am | श्रीरंग_जोशी
वर बरीच चर्चा वाचली की लोक लहान मुलांना भारतात त्यांच्या आजी आजोबांकडे सोडून परदेशात नोकरी साठी येतात. मी असे प्रत्यक्ष उदाहरण केवळ एकदाच पाहिले आहे अन त्या जोडप्याने असे केवळ ६ महिन्यांच्या कालावधीकरता केले होते.
बाकी माझ्या ओळखीचे सर्वच लोक मुलांना येथील (अमेरिकेतील) पाळणाघरात ठेवतात जर नवरा बायको दोघेही नोकरी / उच्च शिक्षण करत असतील तर. एखादेवेळी कुणाकडे मुलांचे आजी आजोबा वगैरे आले असल्यास बहुधा घरीच ठेवतात.
एक उदाहरण आठवले. माझा एक सहकारी होता त्याची बायको नोकरी करीत नसली तरी मुलांना जेव्हाही शाळेला मोठी सुटी असेल तर त्यांची रवानगी पाळणाघरात केली जायची. मोठा मुलगा ६ वर्षांचा व धाकटी मुलगी ४ वर्षांची होती. मित्राची बायको मोठी तोर्यात म्हणत असे "आय कान्ट टॉलरेट दिझ कीड्स..."
यासाठी दिवसाला ८० डॉलर्स द्यावे लागत असत. त्यावरून मी गमतीने मित्राला म्हंटले समजा मी यावेळी बाकड्यावर असतो तर मी दिवसाला ४० डॉलर्स मध्ये तुझी मुलं सांभाळली असती अगदी घरगुती फील देऊन :-).
27 Feb 2013 - 8:46 am | ५० फक्त
या निरागस विषयावर कुणी निरागस नाही का मतं मांडायला ?
27 Feb 2013 - 12:24 pm | पिलीयन रायडर
राजेश, अमेरिकेत जे होतं आणि भारतात जे होतं ते केवळ आईचे दुध ह्या एका पॅरेमीटर वर compare केलं जाऊ शकत नाही (हे न कळण्या इतकं दुधखुळं कोणी नाही..!)मुळात कुटुंब पद्धतीच वेगळी आहे.. त्यामुळे मला तुमचा विदा गैरलागु वाटतो..
दुसरं असं की पैसाताई म्हणत आहेत त्या प्रमाणे दुसर्या कोणावर (प्रामु़ख्याने आजी-आजोबां वर)मुलाची जबाबदारि टाकुन जाणे हा स्वार्थीपणा आहे. तुम्ही जे मुद्दे मांडत आहात ते फक्त आईच्या गरजा लक्षात घेउन (तिचे करिअर, तिची स्वप्नं, तिचे निर्णय..) पण एकदा मुलं जन्माला घातलं की आईच्या अशा स्वतंत्र गराजा रहात नसतात.. जसं लग्न झालं की नवरा-बायको हे स्वतंत्र असु शकत नाहीत (असु नयेत..).. आईचे हार्मोन्स कसे स्त्रवत आहेत ह्याच्याशी बाळाला घेणं देणं नसतं.. आईला दुध येत नसलं तरी तिच्या जवळ रहाणे..तिच्या कुशीत झोपणे ह्या त्याच्या "गरजा आणि हक्क" आहेत.. तिच्या सहवासात त्याला सर्वात जास्त सुरक्षित वाटते हे कोणताही चार्ट आणुन सिद्ध करायची मला गरज वाटत नाही..
मुलाच्या रडलं की खाऊ घालणे, शी-शु केली की साफ करणे, किरकिरलं तर समोर खेळणी टाकणे एवढ्याच गरजा नसतात.. त्याच्याशी खेळणे, त्याला फिरायला नेणे, अंगाईगीत म्ह्णुन झोपवणे, स्वतः खाण्याकडे लक्ष देणे..ह्या लहान सहान वाटणार्या (अगदी टिपिकल आईच्या..ओथंबुन आलेल्या भावना वाटतील तुम्हाला..) गोष्टी पण खुप महत्वाच्या असतात. त्या जर पुर्ण करणे पैशा पुढे आई बाबाना महत्वाचे वाटत नसेल तर ह्या जगात दुसर्या कुणालाही (अगदी आजी आजोबाना ही) महत्वाच्या का वाटाव्यात? तुम्ही त्या काळात मिळवलेल्या पैशा बाबत बोलताय.. किती कमावणार?? ३०-४० लाख?? काय करणार त्याचं? एजुन थोडी प्रोपर्टी..शिक्षण.. हेच ना?? म्हणजे ह्या दिसणार्या गरजा तुम्हाला महत्वाच्या वाटत आहेत, पण रात्री दचकुन उठ्लो तर शांत व्हायला आईची कुस हवी हे तुम्हाला महत्वाचं वाटत नाही? ती मानसिक शांतता दिसत नाही म्हणुन महत्वाची नाही का? आणि किती लाखात ती विकत मिळेल आई जवळ नसेल तर?
मला शेवटंच एवढंच म्ह्णायचय की ह्या सगळ्याचा विचार करताना एकदा फक्त तुमच्या आईनी नुसत्या स्पर्शातुन तुम्हाला काय काय दिलय ते आठवा, आणि मग सांगा की काही महिन्याच्या बाळाला एका टुच्च्या संधी साठी (जी परतही मिळु शकते).. आईनी सोडुन जाणं बरोबर की चुक?
* हे सर्व मी तान्हया बाळाबद्दल लिहित आहे...
27 Feb 2013 - 12:45 pm | सुबोध खरे
स्तनपान हि कटकट वाटणाऱ्या स्त्रियांच्या बद्दल मला काहीच म्हणायचे नाही. पण वैद्यकीय दृष्ट्या काही सत्य विधाने मी आपणापुढे मांडू इच्छितो.
१) मुल जर पहिले ६ महिने पूर्णपणे आईच्या दुधावर वाढले तर त्याची प्रतिकारशक्ती नक्कीच जास्त चांगली वाढते आणी त्याला एलर्जी दमा सारखे रोग निश्चितपणे कमी होतात
२) सुदृढ दिसणे आणी असणे यात फरक आहे. जे मुल पूर्ण आईच्या दुधावर वाढते अशा मुलांमध्ये लठ्ठपणा हा फार कमी प्रमाणात येतो आणि या तुलनेत बाटलीने दुध पिणाऱ्या मुलांमध्ये तो खूप जास्त प्रमाणात दिसतो याचे कारण असे कि आईचे दुध पिण्यासाठी मुलाला चोख्ण्याचे कष्ट करावे लागतात त्यामुळे मुलाचे पोट भेरले कि ते चोखणे बंद करते त्यामुळे अति आहार(overfeeding) आपोआप टाळला जातो. बाटलीने दुध पिणाऱ्या मुलांना तसे करता येत नाही. बाटलीतील दुध गुरुत्वाकर्षणाने खाली उतरले जाते आणि मुल ते गिळायच्या रिफ्लेक्स ने आपोआप पीत राहते.(यात मुलाला कोणताही पर्याय choice राहत नाही) याने अति आहार(overfeeding)होते आणि मुलाच्या शरीरात चरबीच्या पेशी वाढून त्याला लठ्ठपणा (hyperplastic obesity) येतो.
३)मानवी immuno globulin A हि प्राणीजन्य immuno globulin A पेक्षा निराळी असल्याने आईचे सोडून कोणतेही दुसरे दुध दिल्यास आतड्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यास निरुपयोगी ठरतात.त्या मुळे आतड्याचे आजार आणि पाचन शक्तीचे विकार पूर्णपणे आईच्या दुधावर वाढलेल्या मुलामध्ये खूप कमी होतात.
४)प्रत्येक मुल हे आईच्या पोटातून प्रतीकारशक्तीचे गामा ग्लोब्युलीन घेऊन आलेले असते. तेंव्हा आईच्या दुधातील प्रथिने आणि प्रतिजैविके त्याला आपल्या शरीरात सामावून घेणे जास्त सोपे होते.
५) मुलाला दुध पाजण्या मुळे स्तनाग्राला (चेतना मिळाल्याने stimulation ) आईच्या मेंदूत ऑक्सिटोसीन नावाचे संप्रेरक तयार होते ज्यामुळे गर्भाशय आकुंचन पावण्यास मदत होते आणि हे संप्रेरक आपल्याला अतीव आनंदाचा अनुभव देणारे रसायन असल्याने स्त्रियांना खरोखरच हा आनंद मिळतो( हा केवळ मानसिक नाही तर शारीरिक सुद्धा आहे) आणि हे मातृत्वाचे उदात्तीकरण नाही.Recent studies have begun to investigate oxytocin's role in various behaviors, including orgasm, social recognition, pair bonding, anxiety, and maternal behaviors.[2] For this reason, it is sometimes referred to as the "love hormone"The relationship between oxytocin and human sexual response is unclear. At least two uncontrolled studies have found increases in plasma oxytocin at orgasm – in both men and women. wikipedia
६)आईचे दुध कमी पडले हि दुध विकणाऱ्या कंपन्यांची चापलुसी आहे. गायीचे दुध कमी पडले म्हणून वासरू हाडाडले असे आपण फारच क्वचित ऐकले असेल. हा सर्व मानवी मनाचा खेळ आहे. पहिल्या काही दिवसात आईला फक्त काही मिली दुध येते आणि ते मुलाला पुरेसे असते. पण ते पुरे पडत नाही असे एकदा त्या स्त्रीने मनावर घेतले तर आपोआप तिचे दुध कमी होते.(गरीब आयामध्ये असे काही नसल्यामुळे अगदी रस्त्यवर दगड फोडणाऱ्या स्त्रियांची मुले पहिले ६-८ महिने गुटगुटीत असतात)
आईचे दुध पाजण्यात वेळ कोणी आणि किती घालवावा हे प्रत्येक स्त्रीने ठरवावे वैद्यकीय सल्ला वर दिल्याप्रमाणे आहे.तो घ्यावा कि न घ्यावा हा वैयक्तिक प्रश्न आहे.
27 Feb 2013 - 1:07 pm | बाबा पाटील
सुबोधसर, समाजाच्या अश्याप्रकारे प्रबोधनाची खरच गरज आहे .
27 Feb 2013 - 8:09 pm | मन१
प्रतिसाद मूळ धाग्याच्या विषयाशी अवांतर आहे. पण ह्याबद्दल संबंधितांकडील प्रतिसाद पाहण्यास मिळाले तर बरे.
27 Feb 2013 - 8:09 pm | मन१
हा सुद्धा प्रतिसाद मूळ धाग्याच्या विषयाशी अवांतर आहे. ण ह्याबद्दल संबंधितांकडील प्रतिसाद पाहण्यास मिळाले तर बरे.
27 Feb 2013 - 6:32 pm | मदनबाण
ऑनसाईटचे गाजर फारच लोभसवाणे वाटते,पण प्रत्येकाला ऑनसाईटचा वेगळा अनुभव येउ शकतो.
ऑनसाईटचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने आयटी क्षेत्रात केला जातो,बर्याच वेळी कंपन्यांना ऑनसाईट कंन्सल्टंट ठेवुन जास्त नफा कमवता येत असतो अश्या वेळी अनेकांची ऑनसाईट यात्रा होते,काही वेळेला नॉलेज ट्रान्सफरसाठी ऑनसाईटला पाठवले जाते,तर काही वेळेला हट्टाला पेटलेल्या एकाद्या नमुन्याला देखील कंपनीत थांबवुन घेण्याकरता ऑनसाईटला पाठविले जाते.
नविन जॉइन झालेल्या मुला/मुलींना ऑनसाईटचे प्रचंड आकर्षण असते...तसेच एका प्रोजेक्टवर बराच काळ काम करणार्यांना देखील एक तरी परदेशवारी घडावी असे वाटते.याची कारणे वरच्या काही प्रतिसादात आलेली आहेत.
परंतु एकदा ऑनसाईटला गेल्यावर हिंदुस्थानात परत येण्यासाठी तळमळणारी आणि परत आल्या नंतर ऑनसाईट म्हंटले की कानावर हात ठेवणारी मंडळी मी पाहिली आहेत्.प्रत्येकाची कारणे,गरज आणि अनुभव या वरुन ऑनसाईट जाणे आवडु शकते किंवा नकोसे होउ शकते.स्वत:च्या भावाच्या लग्नासाठी,किंवा स्वतःच्या लग्नासाठी ऑनसाईटवर असलेल्यांना रजा मिळण्याचे वांदे झालेल्याची उदाहरणे मिळु शकतील. स्वतःचे आई-वडिल यांना त्यांच्या अंतिम क्षणी पाहु न-शकणे/त्यांच्या जवळ असु न-शकणे असे अनेक अनुभव (ऑनसाईट) आयटीवाली मंडळी घेतात.
मला जेव्ह्या माझ्या पहिल्या प्रोजेक्टमधुन बाहेर पडायचे होते,तेव्हा परत एका आठवड्यासाठी ऑनसाईट गाजर दाखवले होते,पण मी त्याला नकार दिला,प्रोजेक्ट मधुन बाहेर पडण्याचा माझा निर्धार कायम ठेवला आणि मग माझी रवानगी बेंचवर करण्यात आली.
ऑनसाईटवर जाणे म्हणजे मज्जा असा अर्थ अनेकांच्या मनात असतो,काही लोकांना खरंच मज्जा करता येते तर काहींसाठी त्यांचे काम हेच ऑनसाईटची मजा ठरते.काही जणांना फक्त काही महिन्यांसाठी पाठवलेले असते मात्र ते काही वर्ष राहुन येतात.पैसा जमा करायला मिळेल या आशेवर काही जण या गाजराच्या प्रलोभनात पडतात्,पण तुम्हाला कोणत्या देशात आणि किती काळ पाठवत आहेत त्यावर सुद्धा तुमच्या गाठीला पैसा किती राहिल हे ठरत असते,याची अनेकांना जाणीव देखील नसते.
अजुन बरचं काही लिहण्या सारखं आहे...पण मी इथेच थांबतो.
जाता जाता :--- माणसा पेक्षा पैसा श्रेष्ठ नसतो,कारण एकवेळ गमावलेला पैसा परत मिळवता देखील येउ शकेल, परंतु गेलेला वेळ आणि व्यक्ती कितीही पैसा ओतुन देखील परत मिळवता येउ शकणार नाही.
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
28 Feb 2013 - 12:43 pm | मैत्र
सहमत आहे. उत्तम प्रतिसाद बाणा!
27 Feb 2013 - 8:17 pm | अधिराज
हाही भाग आवडला. चर्चा रंगतदार चालू आहे.
27 Feb 2013 - 8:55 pm | तुमचा अभिषेक
दोन्ही चर्चा आवडल्या.. :)
27 Feb 2013 - 8:56 pm | सुबोध खरे
-मनोबा साहेब , बराच काळ मी विचार करीत होतो कि मूळ आय टी च्या मुद्द्यात हे विषयांतर योग्य आहे कि नाही परंतु अमेरिकेत फक्त १५ टक्के स्त्रिया पूर्ण स्तनपानावर मुलाला ठेवतात हे पाहून राहवेना चूक गोष्ट अमेरिकन स्त्रियांनी केली तर ती बरोबर होते हे पटत नाही म्हणून हा प्रतिसाद उशिरा का होईना द्यावासा वाटला.
क्षमस्व
27 Feb 2013 - 9:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या मते, अमेरिकेतल्या २५% स्त्रिया स्तनपान देतच नाहीत हा मुद्दा "अमेरिकेत होतं म्हणून आपल्याकडेही व्हावं" एवढा सरधोपट नसून, अमेरिकेत चारातल्या एका मुलाला स्तनपान मिळत नाही तरीही देश प्रगत आहे, मुलं आरोग्यवंत दिसतात, सरकारी आणि बिगरसरकारी आकड्यांमधेही मुलं आरोग्यवंत दिसतात, या मागची कारणं काय असतील, इ. इ. ... असा आहे.
दुसर्या बाजूने आपल्या आधीच्या पिढ्यांनी, स्त्रियांनी पोरांना जेवढा वेळ दिला असेल (चूल आणि मूल या पलिकडे आयुष्यच नाही.) त्यापेक्षा आत्ताच्या पिढीतल्या स्त्रिया/आया फारच कमी वेळ मुलांना देतात. तरीही "आजची पिढी फार स्मार्ट आहे" असं जनरल मत दिसतं. याचा विचारही या प्रश्नांना जोडून करता यावा.
आयटीच्या धाग्यात हे अवांतर निश्चित आहे. पण एका उदाहरणावरून सरसकट "या बायका कशा असतात ना" असा दगड पहिले भिरकवणार्याने अंमळ अधिक जबाबदारी घ्यावी.
27 Feb 2013 - 10:55 pm | शिल्पा ब
<<अमेरिकेत चारातल्या एका मुलाला स्तनपान मिळत नाही तरीही देश प्रगत आहे, मुलं आरोग्यवंत दिसतात, सरकारी आणि बिगरसरकारी आकड्यांमधेही मुलं आरोग्यवंत दिसतात
कै च्या कै...देशाच्या प्रगतीचा मुलांच्या आरोग्याशी फारसा संबंध असेलसं वाटत नाही. ते नोकरशहा अन राजकारणी याचबरोबर नागरीक यांच्या हातात असतं. मुलं आरोग्यवंत दिसणं अन असणं यातला फरक वर सुबोध खर्यांनी दिलाय.
27 Feb 2013 - 9:26 pm | राजेश घासकडवी
आयटीच्या धाग्यावर स्तनपानाविषयीच चर्चा होते आहे, म्हणून शेवटचं, थोडक्यात लिहितो. शेवटी प्रत्येक जण आपापला निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे.
सुबोध खरेंनी मांडलेले बहुतेक मुद्दे मान्य आहेत. स्तनपानाचा फायदा आहेच की. पण तसे अनेक इतर गोष्टींचे फायदे असतात. रोज एक तास व्यायाम करण्याचे फायदेही असेच मांडता येतील. आणि प्रत्येक जण आपापल्या परीने या सगळ्या फायद्यांचा सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला, आपल्या मुलाला कुठच्या गोष्टींतून एकूण फायदा सर्वाधिक होईल या प्रयत्नात प्रत्येक जण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरतो. एक स्ट्रॅटेजी वापरणाराने दुसऱ्याची स्ट्रॅटेजी इतक्या सहजपणे हीन म्हणू नये, इतकंच.
'आईवडिलांवर बोजा टाकू नये' - हेही तत्वतः मान्य असलं, तरी काही आजीआजोबांना तो बोजा वाटत नसेल हेही शक्य आहे. आजीआजोबांनी उतारवयातही नोकरी करण्यापेक्षा काहींना व्हीआरएस घेऊन नातवंड सांभाळण्याबद्दल त्यांच्या मुलीने काही मोबदला दिला तर सगळ्यांचाच फायदा होऊ शकतो.
'मुलाची गरज आणि हक्क' - आईसदृश माया मिळणं मुलासाठी आणि काही प्रमाणात आईसाठी हितकारक आहे. त्याचबरोबर आईच्या करियरचा विकास होणंही आईसाठी आणि काही प्रमाणात मुलासाठी हितकारक आहे. आपल्या जीवनात अशी अनेक परस्परविरोधी हितकारक गोष्टी असतात. आणि आपण काहीतरी सुवर्णमध्य काढतो. जर आजी किंवा वडील ती माया देऊ शकणार असतील, तर काय तोटा आहे? विशेषतः दुसऱ्या बाजूला आईची करीयर आणि तीन वर्षांत तीस लाखांची बचत होत असेल तर?
असो. यापुढे काही लिहिणं म्हणजे पुन्हा तेच तेच बोलणं होईल, तेव्हा थांबवतो.
27 Feb 2013 - 11:14 pm | सुबोध खरे
साहेब माझा मुद्दा एवढाच आहे कि एखाद्या आई ला नोकरीवर जाणे आवश्यक असेल तर तिला आपले दुध निर्जंतुक भांड्यात काढून ठेवता येते. हेच दुध आपण फ्रीज मध्ये ठेवून मुलाला देणे शक्य आहे पण दुध काढून ठेवणे कटकटीचे वाटते म्हणून दुसरेदुध किंवा लैंक्टोजन ( lactogen) देणाऱ्या आया मी पाहतो त्याबद्दल माझे मत होते.
बाकी सामजिक मुद्दे यावरील माझी मते-- प्रत्येकाने स्वतः पुरते पाहावे अशीच आहेत.
वैयक्तिक रित्या स्त्रीने नुसते चूल आणि मुल पाहणे हे माझ्यादृष्टीने राष्ट्राच्या अर्ध्या(५०% ) बुद्धीचा अपव्यय आहे.
27 Feb 2013 - 11:18 pm | नाना चेंगट
मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी !
27 Feb 2013 - 11:25 pm | आजानुकर्ण
प्रयत्ने चर्चेचे कण रगडिता दूधही गळे.
28 Feb 2013 - 4:15 am | टपरी
विषय खूप चांगला आहे आणि त्यावर होणारी चर्चा ही वाचण्या सारखी आहे. ओनसाईट वर गेल्यावर पैशांची बचत होते ह्या प्लस पोइनट सोबत अनेक निगेटिव पोइनट पण आहेत .खरतरं आयुष्यात एकदातरी परदेशात जाता याव हि अनेकांची इच्छा असते आणि बरेचं जण जातातही . दरवर्षी हजारो विद्याथी शिकण्यासाठी जातात. त्यातले बरेचं जण तिथेच स्थानिक होतात.मग हीच संधी जर कंपनीच्या पैशाने मिळत असेल आणि भारतात मिळणाऱ्या पगारा पेक्षा पाचपट जास्त पगार मिळणार असेल तर साहजिकच कुणालाही त्याच आकर्षण वाटणारच.
पण कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचे ते ज्याने त्याने ठरवायचे असते .
28 Feb 2013 - 9:23 am | धन्या
धाग्यावर खुपच अवांतर झाले आहे. अर्थात हरकत नाही म्हणा, या धाग्याच्या निमित्ताने का होईना पण स्तनपान, कृत्रिम शिश्न, हस्तमैथून आदी विषयांवर ससंदर्भ आणि सांगोपांग चर्चा झाली हे उत्तमच.
यामुळे माझाही एक प्रश्न सुटला. पुढच्या भागामध्ये कपडे उतारक करमणूकगृहांबद्दल लिहायचे तर होतेच. या चर्चेमधील मोकळेपणामुळे आता ते अधिक मोकळेपणाने लिहिता येईल.
28 Feb 2013 - 1:09 pm | खबो जाप
शतक झाले आता नवीन भाग येवू द्यात हो ............
:-)
3 Apr 2013 - 1:40 am | श्रीरंग_जोशी
धागा वर आलाच आहे तर धागा ऐन भरात होता तेव्हा लिहायचे राहून गेलेले एक निरिक्षण नोंदवतो.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय मा.त. कंपन्यांचे अमेरिकेतील जे नवे ग्राहक असतात ते इतरांचे बघून ऑफशोअर मॉडेल वापरून बघतात. म्हणजे काही प्रकल्पांची जबाबदारी सदर मा.त. कंपनीच्या भारतातील केंद्राकडे दिली जाते. अर्थात तेथे काम करणार्या टिमचे प्रतिनिधी (ऑनसाईट कोऑर्डिनेटर, एंगेजमेंट मॅनेजर वगैरे) इकडे ग्राहकाच्या कार्यालयात बसून समन्वय साधायचे काम करतात.
बरेचदा असे होते की ऑफशोअर मॉडेलमुळे पैसाही वाचावा व दर्जेदार कामही व्हावे अशी ग्राहकाची अपेक्षा असते. जे ग्राहक जुने असतील वर्षानुवर्षे या मॉडेलद्वारे कामे करवून घेत असतील तिथे या प्रकल्पांच्या यशस्वीतेचे प्रमाण बरेच वरचे असते.
पण बरेचदा नव्या ग्राहकांना ऑफशोअर मॉडेलद्वारे कामाचा पाहिजे तसा दर्जा मिळत नाही. याची कारणे अनेक असू शकतात. त्यापैकी एक महत्वाचे म्हणजे ग्राहकाच्या मा. त. विभागातील जाणकार (सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट) द्वारे महत्वाची माहिती हातचे राखून मा.त. कंपनीच्या समन्वयकांना दिली जाणे. किंवा त्या समन्वयकांचे हि माहिती काढून घेण्याचे कौशल्य कमी पडणे.
अन एकदा का प्रकल्प बोंबलला की ग्राहक लोक पैसे वाचवण्यासाठी वापरलेल्या ऑफशोअर मॉडेलला रामराम ठोकू लागतात. कारण कमी पैसे देवून विकतचे दुखणे कशाला हा त्यांचा सरळ सरळ मुद्दा असतो.
त्याऐवजी मा.त. कंपनीकडे ते विविध तंत्रज्ञानातील कुशल लोकांची मागणी करतात व अर्थातच त्यासाठी बरेच पैसेही मोजतात व कामाचा अपेक्षित असा दर्जा मिळवला जातो.
याचा परिणाम म्हणून अनेक मोठ्या कंपन्यांना अमेरिकेत कुशल माणसे मिळवता मिळवता नाकी नऊ येतात अन तिकडे भारतातील केंद्रांत बाकड्यावर बसणार्यांचे प्रमाण कमालीचे वाढत राहते.
नुकतीच हि बातमी वाचली अन धक्काच बसला.
http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-03-31/job-trends/381628...
शेवटी काय करणार, मजबुरी का नाम अटल बिहारी...:-).
7 Jun 2014 - 12:02 pm | Prajakta२१
चांगली लेखमाला
ऑन साईट ची अजून माहिती घेण्यास आवडेल
माझ्या माहितीत काही जण भारतातून h १ b विसावर इथे येउन मग कंपनी बदलून ग्रीन कार्ड घेतलेले पण आहेत
9 Jun 2014 - 3:06 am | मंदार कात्रे
छान लेख अन उद्बोधक चर्चा !
मिपा रॉक्स!
9 Jun 2014 - 12:12 pm | म्हैस
खरच कैच्या काही . अत्यंत अपवादात्मक असा घडू शकतं . कारण ओफ्फिचे मध्ये आणि apartment मधल्या ऑफिस collegue मध्ये reputation हा factor खूप मोठा असतो . IT कंपन्यांचे नियम खूप कडक असतात . सगळ्या IT कंपन्या employees च्या वागणुकी बद्दल जागरूक असतात .
तुम्ही जे म्हणताय ती परिस्थिती मोठ्या पदांवरच्या व्यक्तींची business टूर , किवा इतर कंपन्यांच्या बाबतीत खरी असू शकेल पण सर्रास अजिबात नाही. गैरसमज काढून टाकावेत .
9 Jun 2014 - 1:25 pm | धन्या
अफवा पसरवण्यात भारतीयांचा कुणीही हात धरु शकणार नाही. :)