प्रश्न !

मदनबाण's picture
मदनबाण in जे न देखे रवी...
24 Feb 2013 - 1:16 am

मेणबत्या पेटवणार्‍यांनो तुम्ही

हातात मशाल कधी धरणार ?

चिमुरड्यांवर होणारे बलात्कार

अजुन किती काळ पाहणार ?

स्फोटात लोक हल्ली रोजच मरतात,ती ब्रेकिंग न्युज असते

आपण त्यात तसे मेलो नाही,यातच का आपण धन्यता मानणार ?

भ्रष्टाचाराने संपुर्ण देश आपला गांजला असा

राजकारण्यांच्या पंगतीत आता धुतला तांदुळ शोधणार कसा ?

देशाच्या सिमेवर जवानांची क्रुरपणे मुंडकी छाटली जातात

तरी सुद्धा आपण त्यांना फक्त इशारेच देत राहणार ?

मंगळावर यान पाठवायचे म्हणुन मिशन आखणार

पण गरिबाला घास देण्यासाठी प्रयत्न कधी करणार ?

कोट्यावधींच्या देशात आता माणसाला नाही किंमत

चार जण जसे जगातात तसे तुम्हीपण का जगणार ?

जगतली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणे आपल्या देशात नांदते

मग मुठभर लोक मेंढ्यांना हाकत आहेत, असे मला का वाटते ?

मदनबाण.....

समाज

प्रतिक्रिया

अग्निकोल्हा's picture

26 Feb 2013 - 5:50 am | अग्निकोल्हा

.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Feb 2013 - 8:34 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मै अखबार के तीसरे पन्ने पर
हररोज जब देखता हूँ
मरनेवालोंकी तस्बीरे
कुछ देर मै धुंडता रहता हूँ
मेरीभी तस्बीर है क्या?
बेहिस हुवा हूँ अब
एहसास नहीं होता के साँस आती है, जाती है
चलाती भी है के नहीं
अखबार के पाहिले पन्नेपर बस
एहदाद की गिनता हु
गिनती ही देखता हु
आज के दिन फिर कितने मरे
आजका "स्कोर" क्या है ।
बेहिस हूवा हूँ अब
एहसास नहीं होता के साँस है की नहीं
चलाती भी है के नहीं
खून देख कर टाप के दूर
हो जाता हूँ
9:11 की गाडी पकडनी है
मै ऐसा बेहिस हूवा हूँ !
एहसास नहीं होता के साँस है की नहीं
चलाती भी है के नहीं
-- गुलज़ार

पण एक आहे......आपण आधी स्वतः ला बदलायला हवे .......जग आपण नाही बदलू शकत ...
आपण सुशिक्षित ,,मोठे शिकलेले ,,,भरपूर पगाराची नोकरी असलेले ....आणि याविषयांवर खूप चर्चा करणारे .........पण बरेच जण आपल्यातले office मध्ये साधी medical bills सुद्धा fake submit करतात ....का ? केवळ १०% tax वाचावा म्हणून .........आणि अण्णा हजारे यांना support करायला जातात ..........आणि वर तोंड करून विचारतात ...तुम्ही नाही येणार का ? म्हणून ....हे सगळं असंय !!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2013 - 5:22 pm | अत्रुप्त आत्मा

.पण बरेच जण आपल्यातले office मध्ये साधी medical bills सुद्धा fake submit करतात ....का ? केवळ १०% tax वाचावा म्हणून .....>>> ++++++११११११

सस्नेह's picture

26 Feb 2013 - 1:53 pm | सस्नेह

हेच प्रश्न पडतात आम्हालाही !
मग काय करूया म्हणता ?

मदनबाण's picture

26 Feb 2013 - 4:45 pm | मदनबाण

@फिझा
ज्या भावना माझ्या मनात आल्या त्या तशाच उतरवल्या... प्रतिसाद देउन प्रश्न सुटले असते तर सर्वच मराठी आणि इतर फोरम्स्ना पारितोषिके मिळाली देखील असती,हेच टिव्हीवर प्राईम टाईम मधे दाखवण्याच्या डिबेट बद्धल देखील म्हणता येउ शकेल.
बाकी सध्या फॉर्म सी भरलेला दिसतोय तुम्ही... नाही, खोटे मेडिकलबिल दाखवण्याचा मुद्दा लिहला आहे म्हणुन तसे वाटते...पण आपण आपल्या राजकारण्यांना असे जाब विचारतो का ? अगदी ताजं उदाहरण द्यायचे झाले तर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी २ वर्षांत प्राप्तिकर विवरणपत्रेही दाखल केलेली नाहीत,तेव्हा हेच इनकम टॅक्स्वाले कुठे होते? हेच जर सामान्य व्यक्ती असेल तर त्याला अशी सवलत मिळेल का हो ?वीज बिलाची थकबाकी असो वा टेलिफोनचे बिल्,सामान्य माणसाच्या बाबतीत लाईन लगेच कट होते,हीच कार्य तत्परता मंत्री-संत्री लोकां बद्धल दाखवता का येत नाही ?
असो...

ऋषिकेश's picture

26 Feb 2013 - 4:53 pm | ऋषिकेश

कविता फारच भाबडी वाटली.