सठीयाय गयी सजनवा हमार

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
19 Feb 2013 - 9:57 pm

तसे मला चित्रपट खूप आवडतात. त्यामूळेच का होईन आयुष्यात एकदा तरी एखादी लव स्टोरी का काय म्हणतात ना तस घडावी असे वाटते.

म्हणजे अश्याच एका रोमँटीक सकाळी जाग यावी ती सुर्यकीरणे का काय ते आंगावर पडून, मस्त आळोखे पिळोखे देत जाग व्हाव. अंगभर गोड लहरी पसराव्यात अंगभर आन्हिक आटपून उंडरायला बाहेर पडाव. रस्त्यावर चीट पाखरू नसाव (चीट नसल तरी चालेल पाखरू मात्र असाव) समोर च्या रस्त्यावरून माझी गुलबकावली एका हाताने गवताच्या काड्या चघळत व दुसर्‍या हाताने केसाची शेपटी घोळवत येत असावी. मध्येच वाटेत तिने एखाद सुंदर फूल तोडाव नाहीतर एखाद्या मांजराची मिशी ओढत याव. कुण्या एका म्हातार्‍याला किंवा म्हातारीला रस्ता ओलांडून द्यावा. आणि अचानक माझी आणिक माझ्या गुलबकावलीची नजरा नजर व्हावी आणि प्रेम फुलाव , बहराव इत्यादी इत्यादी (तुम्ही काय ते समजून घ्यालच)

पण चित्रपटातल्या गोष्टी चित्रपटात असतात.

प्रत्यक्षात मी आमच्या एका खोलीतल्या घराच्या पोटमाळ्यावर झोपतो. त्यामूळे अगदी दुपार पर्यंत मला सुर्य दर्शन होत नाही. पण सुर्या आणि किरण ही माझी दोन भाचर अंगावर कोसळतात त्यामुळे सुर्यकिरण आंगावर न पडता प्रत्यक्ष सुर्यच आंगावर येऊन कोसळतोय का काय अश्या अनूभूतीत मला जाग येते. भाचरांना झटकून आळोखे पिळोखे दिल्यावर एक हात भिंतीवर आणि दुसरा हात छतावर आपटतो त्यामूळे गोड लहरी न पसरता विद्युत लहरी पसरतात अगदी कोपरा पासून ढोपरा पर्यंत. मग ताँड घासून, बदाबदा पाणी ओतून गदागदा आंग घासून, मी यशवंतराव झिंगुर्डे उंडरायला बाहेर पडतो. माझ नाव यशवंतराव असल तरी माझ कुठचही प्रतिष्ठान नाही , अगदी साधी प्रतिष्ठाही नाही. स्वतःला यशवंतराव म्हणणारा मी एकटाच. दुरचे मित्र मला यशवंत्या म्हणतात. जवळचे मित्र मला यश्या म्हणतात आणि घरचे मला यश्या गाढवा म्हणतात, आणि गाढव माझा अनूल्लेख करतात.

तशी मला संगीताची आवड आहे. मागे मी 'अभिमन्यूज गिटार' ह्या क्लास मध्ये गिटार शिकण्यास गेलो होतो. अभिमन्यूसरांनी मला गिटार कशी धरावी ते सांगून आणि सहा तारांतला फरक समजावून आणिक नोटेशंस समजावून मला वाजविण्यास दिली. माझा कॉन्फिडंस तसा वाढलेला. मी अति-उत्साहात म्हणालो यादोकी बारात मधल 'चुरा लिया है तुमने जो दिल तो' वाजवणार.तो म्हणाला वाजव. मी दोन मिनीट शांतता पाळली तस तो त्या झनक झनक पायल बाजे मधल्या संध्या सारख म्हणाला 'रुक क्यु गये बजावो ना' मी लगेच महिपालाच्या भुमिकेत शिरलो आणि त्याला विचारल 'चु' कुठून वाजवायचा. तसा तो पहिला स्तब्ध झाला, मग शांत झाला मग हतबुद्ध झाला आणिक मग त्याने माझी बारात अभिमन्यू क्लासेस च्या बाहेर काढली.

असो पाल्हाळ खुप झाल तर मी असाच एकदा भटकायला बाहेर पडलो. थोड्यावेळ उंडरल्यावर समोर बघतो तर काय. माझी स्वप्नातली गुल्बकावली प्रत्यक्ष्यात समोर उभी होती. ती कुठेतरी शुन्यात बघत होती. थोडया जवळ जाऊन बघीतल तर ती शुन्यात बघत नसून माझ्याकडेच बघत होती. माझ्याकडे बघून ती मंदशी हसली. मी ही मंद हसलो. दोघांचे ' हसले आधी कुणी तू का मी , तू का मी ' आळवून झाल्यावर ती माझ्या जवल आली आणि म्हणाली तू अमूक अमूक कॉलेजात शिकतोस का. तर म्हणलो हो. (वास्तविक त्या कॉलेज मध्ये मी शिकत नव्हतो पण कॉलेजा बाहेरील पानपट्टीवर मी कुचाळक्या करीत उभा असायचो.) ती म्हणाली मी पण त्याच कॉलेजातली.

मी प्रिती साबणे मला सगळे पी झेड म्हणतात. तसा मी म्हणालो मी यशवंत झिंगुर्डे मला सगळे वाय झेड (मी जीभ चावली)आम्ही स्वतःचे हात स्वतःत गुंतवून भटकायला बाहेर पडलो. तसा समोरन एक कुत्रा जोरजोरात भुंकत आमच्या आंगावर आला. गुलबकावली किंचाळली. मी लगेच माझ्या तोंडातली किंचाळी दाबून ठेवली. मला कुत्र्यांची फार भिती वाटते हो. थोडावेल आमच्यावर भुंकून तो कुत्रा आमच्या वाटेतन दूर झाला आणि क्षमाशील दृष्टीने आमच्या कडे बघू लागला. मग शेपटी हलवू लागला. कदाचित ह्या वर्षी अधिक भाद्रपद लागल्यामुळे खुशीत असवा. शक्य असत तर त्याने शीळ वाजवून मला डोळा मारला असता.

आम्ही भटकत भटकत रुपम चित्रपट गृहाकडे आलो. आपण चित्रपट बघायचा का गुलबकावली विचारती झाली. मी खिश्यातल्या पैशांचा अंदाज घेतला आणि हो म्हणालो. समोर एका स्क्रीन वर बॅटन बॅटन मॅन असा काहीसा मारधाडीचा ईंग्रजी चित्रपट लागलेला. पण त्यातले सर्व कलाकार भारतीय होते. मी गुल्बकावलीला सांगितल मला ईंग्रजी चित्रपट आवडत नाहीत. तशी ती खदा खदा हसायला लागली आणि म्हणाली ईंग्रजी कुठाय हिंदी चित्रपट आहे जुना गाजलेला ' बातो बातो मे' मी ओशाळा का काय तो झालो.

दुसर्‍या स्क्रीनवर कुठलासा मैथीली का भोजपूरी चित्रपट लागलेला. चित्रपटाच नाव होत ' सठीयाय गयी सजनवा हमार' मला नावाची मोठी गम्मत वाटली. व्याकरणाच अगदी शिक्रण झालेल होत.सजनवा जर पुरुष असेल तर गयी कस काय गया असायला पाहीजे ना. सगळीच गम्मत.

चित्रपटाच पोष्टर सुद्धा गमतीदार होत . पोस्टर वर जवळ जवळ प्रत्येक पात्राच्या नाका तोंडाला रक्त लागलेल होत. प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर खुनशी भाव होते. ज्या पात्राच्या नाका तोंडाला रक्त लागलेल नव्हत ती चित्रपटाची हीरवीन होती. आणि ती कसर तीने लाल भडक लीपस्टीक फासून भरून काढली होती.

चित्रपटगृहाच्या तीकिट खिडकीवर एक त्या चित्रपटातूनच उचलून आणलेल्या पात्रासारखा एक मनुष्य बसला होता. तो नाक पुड्यात बोट घालून घालून टेलीफोन (डायल वाला) फिरवत होता आणि फावल्या वेळात (त्याच हाताने) तिकीट फाडत होता. आमचा नंबर आल्यावर तो उठून गेला. कदाचित त्याला इच्छीत टेलीफोन नंबर लागला असावा. जाऊन तो बुकींग फुल्ल ची पाटी घेऊन आला आणि खिडकी बंद केली. अरेच्या हे भोजपुरी चित्रपट बरे हाऊस फुल्ल होतात आमचे मराठी चित्रपट मात्र काही अपवाद वगळता व्यवसाय करत नाहीत. बातो बातो मे सांगायच तर ' बातो बातो मे' आधिच सुरू झालेला त्यामुळे त्याचे तिकीट मिळायचा प्रश्नच नव्हता.

आम्ही चित्रपटाच्या बाहेर एका चहाच्या टपरी वर आलो आणि मस्त पैकी चहा आणिक वर नान कटाई आणिक खारी खाल्ली आणिक सरळ बागेत जाऊन बसलो. बागेत शाळेतला एक मस्तवाल कार्टा तळहात हलवत शी शी अस काहीस म्हणत आला. मला वाटल ही बाग त्या साठीच वापरतात का काय. पण आमच्या जवळ येऊन तो ' शी शी शी शीला शीला की जवानी' आस काहीस ओरडून गेला आणिक माझी मात्र 'कोनशीला' झाली.

बागेत थोड्यावेळ गप्पा करून आम्ही दोघ निघालो ते परत भेटण्याचा वायदा करून. घरी परत आलो तर सुर्या आणि किरण माझी भाचर कुठल्याच्या चॅनेलवर गाण बघत होती आणि जोडीला नाचत होती गाण होत ' सठीयाय गयी सजनवा हमार, रेशम का कुर्ता ओर होठ लाल लाल'

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 Feb 2013 - 10:07 pm | पैसा

मर गई रे रामा! =))

धन्या's picture

19 Feb 2013 - 10:14 pm | धन्या

बेक्कार हसतोय राव. :)

अभ्या..'s picture

19 Feb 2013 - 10:20 pm | अभ्या..

मस्तच लिहिलाय निबंध.
पैकीच्या पैकी मार्क

रेवती's picture

19 Feb 2013 - 10:26 pm | रेवती

हॅ हॅ हॅ.
मजेदार.

मन१'s picture

19 Feb 2013 - 10:51 pm | मन१

भारिच

संजय क्षीरसागर's picture

19 Feb 2013 - 10:57 pm | संजय क्षीरसागर

कदाचित ह्या वर्षी अधिक भाद्रपद लागल्यामुळे खुशीत असवा

या वाक्याला प्रचंड टाळ्या!

आदूबाळ's picture

19 Feb 2013 - 11:30 pm | आदूबाळ

माझ्यापण! मीही हेच वाक्य चोप्य केलं होतं पस्ते करण्यासाठी.

सुजित पवार's picture

20 Feb 2013 - 1:21 am | सुजित पवार

+१

अविनाश पांढरकर's picture

21 Feb 2013 - 11:00 am | अविनाश पांढरकर

ज्या पात्राच्या नाका तोंडाला रक्त लागलेल नव्हत ती चित्रपटाची हीरवीन होती. आणि ती कसर तीने लाल भडक लीपस्टीक फासून भरून काढली होती.

हयालासुधा +१

यसवायजी's picture

21 Feb 2013 - 11:12 am | यसवायजी

+१

बॅटमॅन's picture

19 Feb 2013 - 11:07 pm | बॅटमॅन

अगायायायायाया..........

माणलं तुमाला राव!!!! _/\_

सूड's picture

19 Feb 2013 - 11:09 pm | सूड

मस्तच !!

कवितानागेश's picture

19 Feb 2013 - 11:13 pm | कवितानागेश

:)

तुमचा अभिषेक's picture

19 Feb 2013 - 11:15 pm | तुमचा अभिषेक

नॉन ईस्टॉप नुईन सेन्स कोमेडी.. :)

चित्रगुप्त's picture

19 Feb 2013 - 11:30 pm | चित्रगुप्त

एकदा तरी एकादा भोजपुरी सिनेमा बघावा, ही इच्छा या धाग्यामुळे प्रबळली आहे.
c

a

j

नानबा's picture

20 Feb 2013 - 11:20 am | नानबा

हे पण बघा..
as

=)) =))

आणिक आणिक ... आणिक वाचायचय ... =))

भारीच लिवलय .. ते बॅटन बॅटन मॅन वाचुन क्षणभर मलाहि वाटलं
हा कोण्चा पिच्चर बे ?? .. =))

सस्नेह's picture

20 Feb 2013 - 12:26 pm | सस्नेह

..लै भारी..!
aa

स्मिता.'s picture

21 Feb 2013 - 7:23 pm | स्मिता.

ते बॅटन बॅटन मॅन म्हणजे हाय पॉईंट आहे.

आता लेखणी सबळच ठेवा हो लेखकसाहेब.

आनन्दिता's picture

20 Feb 2013 - 1:17 am | आनन्दिता

आईग्ग्ग्ग हसुन हसुन पुरेवाट झाली..

:)) :))
भाद्रपदाचा उल्लेख एकदम खल्लास आहे !

अर्धवटराव's picture

20 Feb 2013 - 1:43 am | अर्धवटराव

अस्वल झक मारेल इतक्या गुदगुल्या झाल्या =))
शेवट इतका आवरता का घेतला हो?

अर्धवटराव

मूखदुर्बळ आयडी असेल घेतलेला, पण लेखणी जबराट ताकदवान आहे.

मुक्त विहारि's picture

20 Feb 2013 - 8:19 am | मुक्त विहारि

झक्कास..

भन्नाट... हसून हसून हैराण.... :)) :))

रमेश आठवले's picture

20 Feb 2013 - 9:05 am | रमेश आठवले

ई हमार गाना सुनियेगा जी
http://www.youtube.com/watch?v=jKU2e-C-1m0
प्रभा अत्रे यांची मिश्र पिलू कजरी
सैया बीन सुनी नगरीया हमार

तिमा's picture

20 Feb 2013 - 10:36 am | तिमा

छान लिहिलंय, तुम्ही कसले हो मुखदुर्बळ , तुम्ही तर मुखचौबळ!

'बॅटन बॅटन' फार आवडलं.

स्पा's picture

20 Feb 2013 - 10:39 am | स्पा

=))

अक्षया's picture

20 Feb 2013 - 11:16 am | अक्षया

:)

मृत्युन्जय's picture

20 Feb 2013 - 12:13 pm | मृत्युन्जय

मेलो आहे पुर्ण. खपलो. च्यामारी महान लेख लिहिला आहे. सालं हापिसात बसलेलो असल्याने नीट हसताही येत नाही आहे.

सविता००१'s picture

20 Feb 2013 - 12:48 pm | सविता००१

उच्च लिहिलय. धमाल आली वाचताना. ह्सून ह्सून पुरेवाट :)

मूखदूर्बळ's picture

20 Feb 2013 - 2:09 pm | मूखदूर्बळ

धन्यवाद दोस्तहो :)

मूखदूर्बळ's picture

21 Feb 2013 - 1:49 pm | मूखदूर्बळ

परत एकदा धन्यवाद :)

चावटमेला's picture

21 Feb 2013 - 1:58 pm | चावटमेला

पोट धरून हसतोय :)

सोत्रि's picture

21 Feb 2013 - 2:30 pm | सोत्रि

खुपच बहारदार लेखनशैली, लेख खुपच भावला.

-( सजनवा) सोकाजी

चिगो's picture

21 Feb 2013 - 3:32 pm | चिगो

आणि त्याला विचारल 'चु' कुठून वाजवायचा.

कदाचित ह्या वर्षी अधिक भाद्रपद लागल्यामुळे खुशीत असवा.

समोर एका स्क्रीन वर बॅटन बॅटन मॅन असा काहीसा मारधाडीचा ईंग्रजी चित्रपट लागलेला. पण त्यातले सर्व कलाकार भारतीय होते.

बागेत शाळेतला एक मस्तवाल कार्टा तळहात हलवत शी शी अस काहीस म्हणत आला. मला वाटल ही बाग त्या साठीच वापरतात का काय.

ही वाक्ये म्हण्जे कहर आहेत.. लै दिसांनी असं जबराट इनोदी लिखाण वाचलं, राव.. येऊ द्यात धडाक्यात..

खबो जाप's picture

21 Feb 2013 - 9:20 pm | खबो जाप

हॅ हॅ हॅ ..... हॅ हॅ हॅ .... हॅ हॅ हॅ हॅ ........

राघव's picture

22 Feb 2013 - 6:41 pm | राघव

वारलोय. :)

इशा१२३'s picture

21 Feb 2013 - 5:30 pm | इशा१२३

कसेतरी हसु आवरले आहे.आता परत उसळायच्या आत प्रतिसाद टंकावा..धमालच लिखाण..

अनन्न्या's picture

21 Feb 2013 - 6:31 pm | अनन्न्या

+१११

पक पक पक's picture

21 Feb 2013 - 6:50 pm | पक पक पक

लै लै भारी... :)

नीलकांत's picture

21 Feb 2013 - 6:59 pm | नीलकांत

छान लिहीले आहे. एकदम मस्त !

nishant's picture

21 Feb 2013 - 7:16 pm | nishant

मस्त!!

बॅटन बॅटन मॅन म्हंजे आमचंच नाव वाटलं पैल्यांदा, मंग पुन्यांदी वाचलो. काय जब्राट लेखन तिच्या आयला &*^%###!!!!

खबो जाप's picture

21 Feb 2013 - 9:20 pm | खबो जाप

हॅ हॅ हॅ ..... हॅ हॅ हॅ .... हॅ हॅ हॅ हॅ
साला ऑफिस मधेच हसायला लागलो,
सगळे जिलबी जिलबी वाले टीम मेम्बर्स विचित्र नजरेने बघत यान्ना चे यान्ना चे करत होते
( सध्या चेन्नई मध्ये आहे ना )

हारुन शेख's picture

21 Feb 2013 - 9:37 pm | हारुन शेख

छान खुसखुशीत लिखाण मस्त.

हरेश मोरे's picture

22 Feb 2013 - 2:32 pm | हरेश मोरे

मस्त लि़खाण. अजुन ह्सु आवरत नाहि.

किसन शिंदे's picture

22 Feb 2013 - 4:34 pm | किसन शिंदे

जबराट लेखन! =))

शिर्षकावरून वाटलं एखाद्या भोजपुरी चित्रपटाचं परीक्षण असावं. विनोदी पंचेस खासंच.

छान लिहीताय, असंच लेखन आणखीही येवू द्या.

सुमीत भातखंडे's picture

22 Feb 2013 - 4:58 pm | सुमीत भातखंडे

बॅटन बॅटन मॅन...:))

michmadhura's picture

22 Feb 2013 - 5:15 pm | michmadhura

भन्नाट विनोदी लेख.

प्यारे१'s picture

22 Feb 2013 - 5:40 pm | प्यारे१

खॅखॅखॅ.... चु कुठून वाजवायचा पासून हसायला सुरुवात केली ते लेख वाचून संपल्यावर अजून हसतोय. (तुम्ही कुठल्या संस्थळावर सुपरस्टार म्हनून ओळखले जात नाहीत का?)

सानिकास्वप्निल's picture

22 Feb 2013 - 5:54 pm | सानिकास्वप्निल

बॅटन बॅटन +१
=))

वेताळ's picture

22 Feb 2013 - 6:33 pm | वेताळ

लै हसवलस

मूखदूर्बळ's picture

22 Feb 2013 - 10:08 pm | मूखदूर्बळ

आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद दोस्तहो :)

लौंगी मिरची's picture

22 Feb 2013 - 11:47 pm | लौंगी मिरची

खळखळुन हसवणारा लेख .
छान लेखन .

चित्रगुप्त's picture

15 May 2013 - 7:19 am | चित्रगुप्त

हा लेख पुन्हा एकदा वाचला, परिणामी:
http://misalpav.com/node/24801

इनिगोय's picture

15 May 2013 - 10:59 am | इनिगोय

चु कुठून वाजवायचा..

एकदम हुच्च! :))

मी-सौरभ's picture

17 May 2013 - 7:32 pm | मी-सौरभ

मस्त
विंकांताची सुंदर सुरवात करणारा लेख

मंदार कात्रे's picture

14 Nov 2013 - 11:38 am | मंदार कात्रे

लै भारी !

बाब्बो कं लिवलय , लै बेक्कार हसले हापिसात :)

लॉरी टांगटूंगकर's picture

14 Nov 2013 - 5:16 pm | लॉरी टांगटूंगकर

=)) =))

कुठे गेलात हो मूखदूर्बळपंत, लिहीते व्हा पुन्हा.

चांदणे संदीप's picture

19 Dec 2022 - 12:19 pm | चांदणे संदीप

मिपासागरातून हे दिव्य रत्न उपसून बाहेर काढल्याबद्दल.
तुफान हसतोय.

मूर्खदुर्बळ उर्फ यशवंतराव झिंगुर्डे उर्फ वाय झेड यांना एक कडक मिपासलाम! :)

सं - दी - प