"संवाद"

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
9 Feb 2013 - 2:23 am

..... आणि "म्हातारबाबा"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चक्र तेथुन उडुन 'उध्दवा'च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले !
.
.
.
अगदी काल परावाची गोष्ट .
ते चार गुरु बंधु निराश होवुन गुरुंसमोर बसलेले ...अवंती नगरीच्या आश्रमात गुढ शांतता भरुन राहिलेली ...गुरुंच्या चेहर्‍यावरही तीच प्रगाढ गुढ मुद्रा...सारे प्रशांत गंभीर वातावरण ...धुपाचा मंद सुवास ... कोणीतरी घनपाठ करतोय...त्याच्या खर्जातले सुर वातावरणाला अजुनच गुढता आणणारे ...
" हे बघा वत्सांनो , मला तुमची आगतिकता समजते ...पण तुम्हाला अजुन तुमचे नशीब शोधायला बाहेर पडला नाहीत .ते स्वतः येवुन तुम्हाला कसे भेटेल ? असो . मी तुम्हा प्रत्येकाला एक एक मोरपीस देतोय ते घेवुन तुम्ही हिमालयाचा मार्ग आक्रामायला लागा .जिथे हे मोरपीस पडेल तिथे तुम्हाला तुमचे नशीब सापडेल ..."शुभं भवतु" !!"
आणि ते हिमालयाचा मार्ग चालायला लागले .गिरीकंदर वनविभुषित मार्ग क्रमुन आता ते हिमालयाच्या पायथ्याशी आले .गंगेच्या अस्पर्शित शुध्द खळाळ्णार्‍या पाण्यासारखाच शुभ्र हिमालय साद देत होता .त्याच्या शिखरावर पडलेली ती सोनेरी किरणे जणु काही ह्या पर्वतराजाच्या सुवर्ण मुकुटा प्रमाणे शोभुन दिसत दिसत होती .अलकनंदेच्या किनारी जेव्हा ते पाणी प्यायला थांबले तेव्हा एकाचे मोरपीस तिथे पडले ...त्याला चांदीची खाण सापडली ......
"मित्रांनो हे इतके पुरे आहे आपण इथेच थांबु "
"मित्रा..तुझे अभिनंदन पण हे झाले तुझे नशीब आम्हाला आमचे नशीब शोधले पाहिजे "
पुढे दुसरे मोरपीस पडले .तिथे सोन्याची खाण सापडली ." मित्रांनो हा तर चमत्कारच ...जय गुरुदेव ...आता आपण थांबुया हावरटपणा नको "
उरलेले दोघे त्याच्याकडे बघुन हसले अन त्यांचे नशीब शोधायला पुढे निघाले तितक्यात तिसरे मोरपीस पण पडले अन तिथे त्याला हिर्‍याची खाण सापडली !
" अहाहा ...गुरुदेव आपल्या कृपेने आम्ही धन्य झालो .आता थांबुया .हिर्‍यापेक्षा जास्त मौल्यवान काय असणार .अतीहाव करणे चांगले नाही उध्दवा ".
.
पण उध्दव थांबला नाही.जणु काही त्याचे नशीब त्याला बोलावत होते.खेचत होते .तो पुढे चालत राहिला .त्याने मंदाकिनी ओलांडली .रामगंगा ओलांडुनही पुढे गेला .स्वर्गारोहिणीचा प्रवास करताना त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले .
' हाच तो मार्ग जिथुन पांडव ...खरेतर फक्त युधिष्ठीर सदेह स्वर्गात गेला'...
खरेच त्याचे नशीब त्याला बोलावत होते .इतक्यात अचानक एक अनपेक्षित दृष्य त्याच्या निदर्शनास आले .त्याला चांगलाच धक्का बसला .
एक म्हातारा .एकटाच उभा .पाठीत वाकलेला .त्याचे पाय जणु काही अनंत काळापासुन जमीनीत रुतुन बसलेले.त्याच्या डोक्यावर एक रथाचे जाडजुड काटेरी फिरते चाक .डोक्यातुन रक्ताचे वाहते ओघळ .अंगातील अंगरखा धुळीने वाललेल्या रक्ताने माखलेला .अन एक असह्य दुर्गंधीने तो प्रदेश भरुन गेलेला .स्वर्गारोहिणी ओलांडल्यावर हे असे नरकसमान दृष्य डोळ्यास पडल्याने उध्दवाचे कुतुहल जागे झाले .ती दुर्गंधी टाळत .नाक मुठीत धरत तो म्हातारबाबा जवळ गेला अन विचारले ..." हे काय म्हातारबाबा ?"
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
..... आणि "म्हातारबाबा"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चाक तेथुन उडुन "उध्दवा"च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले !!

आता म्हातारबाबाचे जमीनीत रुतलेले पाय बाहेर आले अन उध्दवाचे पाय जमीनीत रुतले गेले ...त्याला हलताच येईना तो पार बावरुन गेला ....." हे काय आहे म्हातार बाबा " त्याने रडवेल्या आवाजात टाहो फोडला ,
.
आता म्हातारबाबाच्या चेहर्‍यावर हलकेसे हास्य होते ...इतक्यावर्षांनी ह्या अभिशापातुन मुक्त झाल्याचा आनंद होता ...
"शेवटी तु भेटलासच तर मित्रा... मला विश्वास होता मी या जगात एकटा नसणार ...मी ही असाच माझे नशीब शोधत शोधत इथे आलो अन मलाही अगदी आज जसा तुला हा अभिशाप मिळालाय हावरटपणा बद्दल ...तसाच हा अभिशाप मिळाला ...असो किती वर्ष ही वेदना सहन केली माझे मलाच आठवत नाही ...आता हा भोग तुझ्या माथी....बाकी आता फक्त अशाच एखाद्या वेड्याची वाट पहाणे तुझ्या नशीबात...इथे मरणही येत नाही मित्रा !!

... आता थांबणार आहेसच तर थोड्या गप्पा मारु...कित्येक दिवस बोललोच नाहीये ...शिवाय इतक्या वर्षात जे काही ज्ञान मला प्राप्त झाले ...थोडेफार तुला सांगावे म्हणतो ...मी ही असाच गुरुंनी दिलेले ते मोरपीस घेवुन निघालो ....."

म्हातारबाबा त्याची कहाणी कथन करायला लागला
.
किती तरी वेळ तो एकटाच बडबडत होता ... इकडे उध्दवाच्या डोक्यात अन डोक्यावरचेही चक्र शांत पणे फिरु लागले ... ही अपरिहार्य आगतिकता त्याचे मन हळु हळु स्विकारायला लागले ... अन मग त्याच्या मनाने प्रश्नांच्या गुढ डोहात डुबकी मारली ...

" मित्रा , मी एकटाच बोलणार की तु तुला आत्तापासुनच मौनाची सवय लागली ?? " म्हातारबाबाच्या ह्या प्रश्नाने त्याची तंद्री भंग पावली अन त्यांचा संवाद सुरु झाला ......
.
" हे माझ्याशीच...आपल्याशीच का व्हावं म्हातारबाबा ? आपलच नशीब फुटकं का ? तीन मित्रांना चांदी सोन्याच्या हिर्‍याच्या खाणी लाभल्या ...याही पेक्षा मौल्यवान असे काही तरी सापडेल ह्या आशेने मी आणि आपणही धावत राहिलो अन हातात काय पड्लं ...तर हा शाप ! खरच आपलच नशीब इतकं फुटकं का ??" केविलवाण्या सुरातला उध्दवाचा प्रश्न हिमालयाच्या दरीखोर्‍यातुन प्रतिध्वनीत होवुन नादत राहिला ....

" गडबड करतो आहेस मित्रा .. जरासा विचार कर सोने चांदी हिर्‍यांपेक्षा पेक्षा किती तरी पट मौल्यवान दोन गोष्टी तुला लाभल्या आहेत ....ज्ञानप्राप्तीची संधी आणि एकांत ! ज्ञानापेक्षा काही मौल्यवान मलातरी माहीत नाही ...चांदी सोने हिरे काय शेवटी शुध्द दगड मातीच आहे ना ? काल कोणाची तरी होती आज कोणाची तरी उद्या कोणाची तरी ...वारांगनेप्रमाणे ....पण ज्ञानाचे तसे नाही ते अनंत आहे आणि आज कुणाचे उद्या कोणाचे असे त्याचे नाही एकदा प्राप्त झाले की तद्रुपच होवुन जाशील मी बोलतोय ते आत्ता तुला कळणार नाही पण हळु हळु तुझ्या मनावरचा अज्ञानाचा पडदा हटत जाईल अन तुला ज्योतिस्वरुप ज्ञानाची प्राप्ति होईल ...आणि यासाठी आवशकता आहे फक्त एकांताची तो ही आता तुला मिळेल मित्रा...विचार कर किती लोकांना स्वतः बद्दल विचारकरायला असा एकांत मिळतो ..सगळेच घाण्याच्या बैला सारखे संसाराला सदैव जुंपलेले ....तुज्या त्या मित्रांचे काय रे ...त्या धनाचा उपभोग घेतील अन मरुन जातील त्यांना ज्ञान म्हणजे काय कळणार नाही ...मिळणार तर मुळीच नाही ....तु ज्या मौल्यवान गोष्टीची आशा धरुन इथवर आलास ती नकळत तुझ्या हातात पडली आहे ... स्वप्नी जे जे देखिले ते ते अवघेचि मिळाले ! "

" स्वप्न ...हः स्वप्न पाहणं पाप आहे का रे ? मी स्वप्न पाहिले त्याची ही फळं अन जे अल्प स्वल्प गोष्टीत समाधान मानुन राहिले त्यांना ते ऐहिक सुख ! "

" ह्म्म ..अगदी व्यवस्थित विचार करायला लागलास ...ज्ञानसाधनेच्या साठी मिळालेला एकांत त्या ऐहिक सुखापेक्षा किती सुखद आहे तुला हळु हळु उमजेल ....आणि स्वप्न पाहाणं नक्कीच पाप नाही मित्रा उलट तीच तर गोष्ट आपल्याला पुढे ढकलत राहाते "

" मग महत्वाकांक्षी माणसांच्या नशीबी हे भोग का ?"
" समाज ...समाज मित्रा ... समाज नेहमीच समपातळी राखायचा प्रयत्न करणार ....कोणी पुढे जाणार असेल तर त्याला मागे ओढायचे अस मागे पडणार असेल तर त्याला पुढे ओढायचे हा तर नियम आहे समाजाचा ...एकतर असामान्य माणसाला सामान्यांच्या बंधनात अडकवुन हैराण करायचे .....नाहीतर त्याला देव करुन टाकायचे म्हणजे "त्यांना" चालतं ..आपल्याला नाही म्हणायाला" मोकळे ... आजही तुझ्या पाठीमागे तुला तुझे मित्र एकतर मुर्ख म्हणत असतील नाहीतर देव म्हणत असतील ... "

" मग समाजात एकटं पडणं हे असं असामान्य असंण हे पाप आहे का ?"
" नक्कीच नाही ... फक्त मुर्ख ठरवले जाण्याची तयारी हवी अन चुकुन माकुन देव ठरवला गेलासच तर ते देवपण ..तेही सामान्य भक्तांच्या नियमात बांधलेलं सहन करावं लागेल .. तु असामान्य आहेस ही नक्कीच ज्याला आपण देव ठरवुन देवपणाची ...कर्मकांडाची पुटं वर्षानुवर्ष चढवत आलोय त्या "पुरुषाची" इच्छा आहे ..आपण नक्कीच त्याचे लाडके असणार ."

"मग आपल्या सारख्यांनाच हा शाप का ? ह्या शापाचा नक्की उद्देश काय?? ..."
"शोध स्वतःचा ...बस्स बाकी काही नाही .... आणि हा शाप नाही मित्रा ...आशिर्वाद आहे आशीर्वाद ...हळु हळु पटेल तुला ....फार नशीबवानांना ही संधी मिळते बाकीच्यांची आयुष्य पशुवत खाणे पिणे भोग भोगणे यात कशी संपतात त्यांचे त्यांनाही कळत नाही ..."

"जर भोगच घ्यायचा नसेल तर मग ह्या आयुष्याचा अर्थ काय... ध्येय काय " उध्द्वाच्या उद्वेगाचा हा प्रश्न ऐकुन म्हातारबाबाच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर परत आनंद प्रकट झाला
"शाब्बास मित्रा ..तुला हा प्रश्न पडला... तुझी प्रगती होत आहे ... आता ह्या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्यानेच शोधायचे .... तुला नक्की सापडेल ...तुझ्याकडे आता आख्ख्या जगाचा वेळ आहे !"
" तुला काय उत्तर सापडले म्हातारबाबा ? "
.
.
.

" हः ...आयुष्य ... आयुष्य निरर्थक आहे...काहीच ध्येय नाही... गंतव्य नाही मित्रा...बस्स जगत रहाणे ...बस्स ... काहीच अर्थ नाही ... मी बोलतो ...तु ऐकतो निरर्थक ... ऐहिक सुख उपभोगणे ...हा असा शाप भोगणे ...निरर्थक ... ज्ञान प्राप्ती होणे ...न होणे दोन्ही निरर्थक ...ज्ञान आणि अज्ञान काय रे शेवटी... वृत्तीच ना ... दोन्ही समानच .. मुळातच आपल्या अस्तित्वाला कारणच नाही हे समजुन जगणे अन ते तसे न समजता गुराढोरांसारखे आहे त्यात सुख मानुन अज्ञानात जगणे ....दोन्हीही निरर्थक ....असो...एखादी गोष्ट समजुन करणे हे न समजता करण्या पेक्षा श्रेष्ठ असते हे बोलणे ही निरर्थक.....
.
.
.
म्हातारबाबा बोलता बोलता थांबला ...अन एक अर्थहीन शांतता भरुन राहिली .....
----------------------------------------------------------------------------------------------------

"असो . आता तुला सत्याचे ज्ञान व्हायला सुरवात झाली आहे ......
तुझ्या सारखाच दुसरा कोणीतरी महत्वाकांक्षी... स्वप्नाळु... वेडा कधीना कधीतरी येथे येईल ...तेव्हा हे चाक त्याच्या डोक्यावर जाऊन बसेल ..तेव्हा तु या शापातुन मुक्त होशील अन घरी जावु शकशील ....पण तो पर्यंत तुला हा अभिशाप सहन करावाच लागेल ..." असे बोलुन म्हातारबाबाने उध्दवाकडे पाठ फिरवली अन तो मार्गस्थ झाला ....

इतक्या सगळ्या संवादानंतर निराश झालेल्या उध्दवाच्या चेहर्‍यावर एक कुत्सित हास्याची लहर उमटुन गेली ...

" म्हातार बाबा ...मला इतके ज्ञान दिलेस ...पण बहुतेक इतके वर्षे हे चाक डोक्यावर फिरुन बहुतेक तुझाही मेंदु थोडा झिजलेला दिसतोय...तुला अवंती नगरी कडे जाण्याचा रस्ताही लक्षात राहिलेला दिसत नाहीये ..."

म्हातारबाबा अचानक स्तब्ध झाला ...त्याने मागे वळुन उध्दवाकडे पाहिले ... आता उध्दवाच्या डोक्यावर ते चाक निवांतपणे फिरत होते ...तो त्या ओझ्याने पार वाकुन गेला होता ...रक्ताचे पाच दहा ओघळ त्याच्या चेहर्‍यावर आले होते ...डोळ्यामधे ती निराशा लपवण्याचा प्रयत्न करणारे ते चेहर्‍यावरील कुत्सित हास्य त्याच्या रुपाला जास्तच भयाण करत होते ....जणु काही तोच अनंतकाळापासुन तो अभिशाप भोगत होता ...अगदी थोड्याच वेळा पुर्वी इथे आलेला उध्दव तो हाच ..हे कोणाला सांगुनही पटले नसते ...

म्हातारबाबाने वळुन उद्धवाकडे पाहिले अन त्याच्या चेहर्‍यावर हलकेसे स्मितहास्य उमटले ...डोळ्यात एक वेगळीच चमक आली ...नकळत त्याचा हात त्याच्या फाटलेल्या...रक्ताने ..धुळीने..पसाने..माखलेल्या त्याच्या अंगरख्याच्या खिशात गेला ...त्याने खिशातुन काहीतरी बाहेर काढले अन तो हिमालयशिखराकडे चालायला लागला .
.
.
उध्दवाला म्हातार बाबाच्या त्या वागण्याचा ... त्या स्मितहास्याचा अर्थ लक्षात आला नाही ....
.
फक्त
.
.
त्याची नजर म्हातारबाबाने हातात घट्ट पकडलेल्या "त्या मोरपीसा"वर खिळुन राहीली !

----------------------------------------------------------------------------------------------------------------
(* जालावर इतरत्र पुर्वप्रकाशित)
(** लहानपणी अभ्यासक्रमात असलेल्या " अतिलोभाभिभूतस्य चक्रं भ्रमति मस्तके | " ह्या कथेवर आधारित )

कथाविचार

प्रतिक्रिया

आयुष्य ... आयुष्य निरर्थक आहे...काहीच ध्येय नाही... गंतव्य नाही मित्रा...बस्स जगत रहाणे ...बस्स ... काहीच अर्थ नाही

सुंदर!!!
चांदोबात "असिधरा चक्र" नावाची थोडीशी/किंचीत अशा प्रकारची कथा वाचल्याचे स्मरते.

सस्नेह's picture

10 Feb 2013 - 10:03 pm | सस्नेह

..हो, चांदोबातच वाचली होती ही कथा. तत्वज्ञान थोडे वेगळे होते...

चांगल लिहिताय गिरिजा तुम्ही.

कथा माहित होती पण जो शेवट आहे की," तो म्हातारा हातात ते मोरपीस घेउन चालु लागतो" हा नविन वाटला.

श्रिया's picture

9 Feb 2013 - 9:12 am | श्रिया

छान लिहीले आहे, आवडले.

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Feb 2013 - 9:43 am | श्री गावसेना प्रमुख

छान आहे काकु
फाटकी झोळी अन सोन्याच्या मोहरांची गोष्ट आठवली

पैसा's picture

9 Feb 2013 - 9:56 am | पैसा

एवढी सगळी ज्ञानप्राप्ति झाल्यावरही म्हातारा मोरपीस हातात घेऊन पुढे चालायला लागला, यात माणसाच्या न संपणार्‍या आशा, इच्छा आणि न संपणार्‍या रस्त्यावर सदैव चालत रहाण्याचे नशीब असं काहीसं व्यक्त झालंय. हाच शेवट तार्किक वाटला. तो म्हातारा नगराच्या दिशेने परत फिरला असता, तर त्याचं ज्ञान विफल ठरलं असतं.

पण ती सर्क्युलर झालीये.

मोरपीस हे इच्छेचं रूपक असेल तर वृद्धाकडे मोरपीस आहे म्हणून तो दु:खी आहे. पण मग उद्धावाच्या मोरपीस सोडून देण्यानं कथा संपायला हवी!

प्रसाद गोडबोले's picture

10 Feb 2013 - 11:47 am | प्रसाद गोडबोले

धन्यवाद संजयजी ,

ज्ञानाच्या परमोच्च अवस्थेनंतर , परिपुर्णते नंतर , इच्छा इच्छा राहतच नाहीत , त्या केवल कर्म होवुन जातात ...( मग जी अवस्था प्राप्त होते त्याला समर्थांनी खुप सुंदर वाक्प्रचार वापरलाय - " देह प्रारब्धी टाकणे " )
ते मोरपीस घेवुन पुढे निघालेल्या म्हातार्‍याच्या मनात आता कसलीच आसक्ती नाहीये ... ते मोरपीस घेवुन हिमालयाकडे चालत राहणे हे त्याचे कर्म आहे ...आता तो केवल कर्मासाठी कर्म करत आहे :)

केवल "कर्मासाठी कर्म" ही ज्ञानाची परमोच्च अवस्था... जी की मुक्ती आहे... जी त्या वृध्दाला प्राप्त झाली आहे असे सुचित करायचे होते ..

बहुत काय बोलणें ... " अन्तर्श्तितीचिये खुणा अन्तर्निष्ठचि जाणती "

संजय क्षीरसागर's picture

10 Feb 2013 - 12:55 pm | संजय क्षीरसागर

ज्ञानाच्या परमोच्च अवस्थेनंतर , परिपुर्णते नंतर , इच्छा इच्छा राहतच नाहीत , त्या `केवल कर्म' होवुन जातात.
... ते मोरपीस घेवुन हिमालयाकडे चालत राहणे हे त्याचे कर्म आहे ...आता तो केवल कर्मासाठी कर्म करत आहे.
केवल "कर्मासाठी कर्म" ही ज्ञानाची परमोच्च अवस्था... जी की मुक्ती आहे... जी त्या वृध्दाला प्राप्त झाली आहे असे सुचित करायचे होते ..

फार अनादी प्रश्न आहे!

कर्मासाठी कर्म (किंवा `केवल कर्म') काहीही नांव दिलं तरी त्याचा अर्थ निरिच्छेनं करत राहणं असा आहे. ती ज्ञानप्राप्तीची अवस्था नाही. कृत्यातला आनंद (मग ते कोणतंही असो) ही खरी चित्तदशाये. आणि `कोणतंही असो' ही फोकस्ड स्टेट आहे . ती निरिच्छा नाही,आणि फलाकांक्षारहितताही नाही, टोटल इनवॉल्वमंट आहे.

कृत्याप्रती संपूर्ण एकाग्रता वरकरणी निरिच्छता भासते कारण अवधान फलाऐवजी कृत्याकडे असतं इतकंच.

ज्ञानी फलाप्रती निश्चींत असतो (निरिच्छ नाही) पण ही हॅज अ डेफिनेट डिरेक्शन.

ते मोरपीस घेवुन हिमालयाकडे चालत राहणे हे त्याचे कर्म आहे ...आता तो केवल कर्मासाठी कर्म करत आहे

असा दैववादी किंवा डिरेक्शनलेस नसतो!

असो, मी वादासाठी वाद करतो, स्वतःचं खरं करतो, अहंकारी आहे असा जोरकस मतप्रवाह आहे (आणि आता इथे धुराळा उडण्याची दाट शक्यता आहे) पण अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो :

या निरिच्छ कर्म, केवल कर्म, कर्मासाठी कर्म, फलाकांक्षारहित कर्म वगैरे कल्पनांनी भारतीय मानसिकतेची वाट लावलीये. कृत्याप्रती अनास्था आणि फलाप्रती भ्रष्टाचार अशी स्थिती आहे. हे बदलावं म्हणून प्रतिसाद दिलाय आणि त्या अँगलनं चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.

प्रसाद गोडबोले's picture

10 Feb 2013 - 2:27 pm | प्रसाद गोडबोले

एकं सत विप्रा: बहुधा वदन्ति ||

पुनश्च एकवार धन्यवाद !!

सुदेश's picture

9 Feb 2013 - 11:30 am | सुदेश

छान. मस्त वाटल लहानपणि कथा वाचली होती. पुःच वाचुन लहान पणीच्या आठवणी जाग्या झल्या.

शेवटच्या वाक्यात थोडक्यात वाचलात!

नाना चेंगट's picture

10 Feb 2013 - 11:58 am | नाना चेंगट

मोरपीस पडेल तिथे तुमचे नशीब सापडेल असे गुरुनी सांगितले म्हणून चारी शिष्य निघाले. एकेकाचे मोरपीस जिथे पडले तिथे त्याचे नशीब खुलले. प्रत्येकाचा आपल्या गुरुवर विश्वास होता म्हणून स्वतःचे मोरपीस पडेल तिथेच आपले नशीब असणार या उद्देशाने उरलेले पुढे जात राहिले. उद्धव म्हणूनच पुढे निघाला.

म्हातारबाबाची भेट घडते तेव्हा मोरपीस पडल्याचा उल्लेख नाही. याचाच अर्थ तिथे त्याचे नशीब खुलणार नव्हते. तरीही त्याला त्रास सहन करावा लागला किंवा लागत आहे. त्याचे कारण उद्धवाने म्हातारबाबाला विचारलेला प्रश्न असेल का? आपल्या मार्गात जिथे मोरपीस पडेल तिथे नशीब उघडेल या गुरुवचनाला न जुमानता मधेच मार्गावर थांबून त्याने नको त्या गोष्टीत तोंड घातले असे समजावे का? जगात दु:ख आहे, यातना आहेत, निरर्थक कर्म आहेत त्यांच्या व्यापात आपल्या सर्व आशा आकांक्षा यांची धूळधाण होते आणि एक नैराश्य सर्व मनावर मळभ करुन कशातच स्वारस्य न उरणे असा दृष्टीकोन देत असते ज्यालाच आपण ज्ञान असे संबोधून आपल्याच मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतो. उद्धवाने म्हातारबाबापाशी न थांबता पुढे वाटचाल केली असती तर कदाचित त्याचे नशीब वेगळे खुलले असते का? की म्हातारबाबाने त्याच्या आधीच्या माणसाकडून अशीच पृच्छा करुन ते चक्र डोक्यावर घेतले आणि ते चक्र उद्धवाच्या डोक्यावर गेल्यावर न पडलेले आपले मोरपीस घेऊन नशीब खुलते का ते पहाण्याचा अधूरा प्रयत्न परत चालू केला. हेच भाग्य (वा दुर्भाग्य वा जे काही असेल ते) उद्धवाच्या वाटेला असेल का? मग प्रश्न उभा रहातो चौथ्या मोरपीसाचे प्राक्तन ज्याच्या ललाटी आहे त्याला नशीब खुलण्याचा शाप आहे की नाही? शाप अशासाठी की नशिब खुलले की ज्ञान प्राप्तिचा मार्ग खुंटतो आणि ज्ञान प्राप्ती झाली की नशीब खुलले काय अन न खुलले काय सारखेच !

कथा रोचक आहे.

राही's picture

10 Feb 2013 - 11:39 pm | राही

कथेचे विश्लेशण आवडले.
इथे नशीब म्हणजे डेस्टिनी असा अर्थ घेतला तर आणखी एक बाजू उलगडते.नशीबात जे घडायचे आहे ते घडणारच आहे, भले-बुरे काहीही. मोरपीस हे स्थळकाळ निश्चित करणारे केवळ एक साधन आहे. पहिल्या तिघांना चांदी,सोने हिर्‍याच्या खाणी सापडल्या हा निव्वळ योगायोग.त्याऐवजी तिथे दगडाची रास किंवा राखेचा ढिगाराही सापडू शकला असता.प्रत्येकाचे नशीब वेगळेच असणार.चौघेही एकाच ठिकाणी थांबले नाहीत हे योग्यच झाले.उरलेले तिघे हावेमुळे पुढे चालत राहिले असे नाही.ते निर्लोभी आणि निर्मम असे गुरूचे सच्चे चेले होते.जर ते आसक्त असते तर चांदीच्या,सोन्याच्या,अगदीच नाही तर हिर्‍याच्या खाणीच्या ठिकाणी तरी थांबले असते. त्यांना गुर्वाज्ञा पाळायची होती.पण त्यातला शेवटचा थोडा अडखळला.त्याने गुर्वाज्ञा मोडली.म्हणून त्याचे इप्सित दूर गेले.अर्थात हेही जसे काही ठरलेलेच होते.त्याला हा चक्राचा मधला मुक्काम करावाच लागणार होता.त्याचे पीस पडलेले नव्हते म्हणून त्याचा प्रवासही संपलेला नव्हता. इथे गुरू हा कर्ता किंवा नियंता मानता येईल. तो आपल्या लेकरांच्या हातात कामधेनू/जादूची कांडी/पीस देऊन त्यांना जगात सोडून देतो.'अनेन प्रसविष्यध्वम्,एष वोस्त्विष्टकामधुक'. तुम्ही तुमचे नशीब अजमावा,वाढवा,वर्धिष्णु व्हा. पण हेही एका ठरीव परीघात,ज्याची त्रिज्या आधीच आखलेली असते.ज्याचे पीस पडणार नसते,तो हा परीघ भेदणारा असतो. त्याचा प्रवास,त्याचा शोध संपेल का,त्याचे पीस पडणार आहे का? त्याला आणि आपल्याला,कुणालाच माहीत नाही.

तिमा's picture

10 Feb 2013 - 12:36 pm | तिमा

रोचक आहे. पण सदासर्वदा राजकारणावर वाचायची एवढी संवय झालीये की, ते म्हातारबाबा आणि उध्दव हे कोणी भलतेच वाटले आणि ते चाक म्हणजे कुठले तरी रुपक वाटले.

कवितानागेश's picture

11 Feb 2013 - 12:29 am | कवितानागेश

हीहीही. :)

मनीषा's picture

10 Feb 2013 - 12:50 pm | मनीषा

बोधकथा वाचली .
त्यातून नक्की काय बोध घ्यावा कळत नाहीये. वेगवेगळ्या दृष्टीकोनातून वेगवेगळे बोध होतात.

१ ला बोध :

१) गुरूचे सांगणे जस्सेच्या तस्से ऐकू नये. थोडी स्वतःची बुद्दी बाळगावी. (संदर्भ : उद्ध्व पुढे न जाता आपल्या इतर मित्रांच्या बरोबर थांबला असता तर त्याची आणि त्या चक्राची गाठ पडली नसती.)
२) आपल्याशी संबंधित नसलेल्या बाबतीत उगीचच चौकशा करू नयेत. (त्याने प्रश्न विचारला नसता तर चक्र त्याच्या डोक्यावर आले नसते.)

२ रा बोध

१) गुरूकृपेला नशीबाची साथ असेल तरच चांगले फळ मिळते. ( उद्धवाच्या तीन मित्रांचे नशिब उजळले )
२) गुरूकृपा ही व्यक्तीसापेक्ष असते. ( गुरू हा सर्वज्ञानी आहे असे मानले तर त्यांना उद्धवाच्या वाटेवर काय आहे हे नक्की माहीती असणार, तरी त्यांनी त्याला सावध केले नाही. का ही एक परीक्षा होती? जर असेल तर फक्त उद्धवाची का? बाकी तिघांची परीक्षा का घेतली नाही? )

३ रा बोध
१) जो पर्यंत मोरपीस हातात आहे, तोवर थांबू नये. कारण थांबला तो संपला.

शंका : त्या माणसाच्या हाती देखील एक मोरपीस होते. म्हणजे अशी किती मोराची पीसे वाटली असावीत? हे बेकायदेशीर नाही का? (मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे ना?)

ज्ञानाच्या परमोच्च अवस्थेनंतर , परिपुर्णते नंतर , इच्छा इच्छा राहतच नाहीत , त्या केवल कर्म होवुन जातात ...( मग जी अवस्था प्राप्त होते त्याला समर्थांनी खुप सुंदर वाक्प्रचार वापरलाय - " देह प्रारब्धी टाकणे " )
ते मोरपीस घेवुन पुढे निघालेल्या म्हातार्‍याच्या मनात आता कसलीच आसक्ती नाहीये ... ते मोरपीस घेवुन हिमालयाकडे चालत राहणे हे त्याचे कर्म आहे ...आता तो केवल कर्मासाठी कर्म करत आहे

ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर असे निर्विकार होऊन जगणे असेल तर असे ज्ञान कशासाठी हवे असते?

एक उपशंका : मी इथे इतके प्रश्न विचारले आहे तर ते चक्र माझ्या डोक्यावर सुद्धा येईल का? (भिती वाटते आहे :()

असे ज्ञान कशासाठी हवे असते?

क्या बात है! वर उत्तर दिलंय

एक उपशंका : मी इथे इतके प्रश्न विचारले आहे तर ते चक्र माझ्या डोक्यावर सुद्धा येईल का? (भिती वाटते आहे

नाही, नाही... उत्तर दिल्यानं ते आता माझ्या डोक्यावर फिरायला लागणार आहे!

प्रसाद गोडबोले's picture

10 Feb 2013 - 2:38 pm | प्रसाद गोडबोले

ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर असे निर्विकार होऊन जगणे असेल तर असे ज्ञान कशासाठी हवे असते?

>>> कर्मासाठी कर्म ! ज्ञानासाठी ज्ञान ! (अन त्यानंतर भक्तिसाठी भक्ती !!) आणि ज्ञानप्राप्ति नंतर जगणं निर्विकार नसत हो होवुन जात ... सर्वम शुन्यं शुन्यं हा बौध्द सिध्दांत झाला (जो कदाचित निराशाजनक असेलही कदाचित ) ... वैदिक नव्हे .... इथला "हा' म्हातरा वैदिक विचारसरणीतला आहे हो
" कुर्वन्नेवेह कर्माणि जिजिवेषेत शतःसमा | एवं त्वयि नान्यथोस्ति न कर्म लिप्यते नरे || (ईशा.) अहाहा !!

एक उपशंका : मी इथे इतके प्रश्न विचारले आहे तर ते चक्र माझ्या डोक्यावर सुद्धा येईल का? (भिती वाटते आहे smiley)

Its matter of choice ... do you want it or not ?

( उगाच मोठे मोठे मंत्र लिहिले आहेत ... " अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे ||" )

अधिकार अनाधिकार वगैरे प्रश्न नाहीये.

मला संस्कृत येत नाही त्यामुळे श्लोकांचा अर्थ समजला नाही. अर्थात नम्रतेनं लिहीलंय हे नक्की.
बुद्धाचा शून्यवाद निराशेचा सूर नाही. ती वस्तुस्थिती आहे.

इथला "हा' म्हातरा वैदिक विचारसरणीतला आहे

म्हणजे नक्की काय?

तुम्हाला क्रॉस करत नाही पण :

ज्ञानप्राप्ति नंतर जगणं निर्विकार नसत हो होवुन जात

निर्विकारचा अर्थ अनफेक्टेड आहे, विरक्त नाही.

ज्याला ज्ञान झालं त्याच्या जीवनात एकमेव बदल घडतो : त्याचा सर्व शोध, सर्व साधना संपते.... म्हातार्‍याला आता कुठेही जाण्याची आवश्यकता नाही! म्हणून तर म्हटलय `ही हॅज रिच्ड'. सध्या आहोत ते स्थळ आणि मुक्काम एक झाला. यू हॅव मेट यॉरसेल्फ!

मला वाटतं अध्यात्म रोजचं जगणं आहे. इट इज नॉट समथिंग एक्सेप्शनल ऑर अ ग्रेट अचिववमंट. आगदि साधं, जसं आता इथे चाललेली चर्चा, रोजचं जेवणखाण, घरच्यांबरोबर, मित्रमंडळीत मजेत घालवलेले क्षण, ऑफिसामधे आनंदात केलेलं काम किंवा गृहिणीनं केलेला उत्तम स्वयंपाक...त्यासाठी हिमालय, प्रदीर्घ साधना वगैरेची काही आवश्यकता नाही. आणि टू बी वेरी स्ट्रेट, जर तसं नसेल तर अध्यात्म व्यर्थ आहे.

मनीषाचा प्रतिसाद सर्वात प्रॅक्टीकल आहे.

मन१'s picture

10 Feb 2013 - 4:07 pm | मन१

पंचतम्त्रातली चितपरिचित कथा ही.
पण त्याचं हे इंटरप्रिअटेशन आवडलं. झकासच. पण अर्थातच त्यावरच्या तात्विक चर्चा पकाउ वआटतात मला.
अशा गोष्टी ह्या गद्य कविता म्हणून वाचाव्यात. मला कळलय तेच तुला कळायला हवं असा आग्रह कशाला?
जगाला दीर्घसंभाषी तत्वज्ञान सांगायची हुक्की कशाला?
(अर्थात हे ही माझं मतच. माझं मत तुम्ही पटवून घ्यावं असं मी तरी का म्हणावं म्हणा.)
विशेष आवडलेला भागः-
हः ...आयुष्य ... आयुष्य निरर्थक आहे...काहीच ध्येय नाही... गंतव्य नाही मित्रा...बस्स जगत रहाणे ...बस्स ... काहीच अर्थ नाही ... मी बोलतो ...तु ऐकतो निरर्थक ... ऐहिक सुख उपभोगणे ...हा असा शाप भोगणे ...निरर्थक ... ज्ञान प्राप्ती होणे ...न होणे दोन्ही निरर्थक ...ज्ञान आणि अज्ञान काय रे शेवटी... वृत्तीच ना ... दोन्ही समानच .. मुळातच आपल्या अस्तित्वाला कारणच नाही हे समजुन जगणे अन ते

तसे न समजता गुराढोरांसारखे आहे त्यात सुख मानुन अज्ञानात जगणे ....दोन्हीही निरर्थक ....असो...एखादी गोष्ट समजुन करणे हे न समजता करण्या पेक्षा श्रेष्ठ असते हे बोलणे ही निरर्थक.....
.
ह्याच्च धर्तीवर मला वाटलेलं मी http://www.misalpav.com/node/23613 ह्या माझ्या धाग्यावर लिहिलेलं :-
कशाचच काहीही प्रयोजन नाही. आहे तिथेच थांबण्याचही काही प्रयोजन नाही. कुणाला तरी चालावसं वाटतय, म्हणून तो चालतोय. मग इतरही काही जण चालू लागतात. कशाचेच क्शालाच प्रयोजन नाही.

प्रसाद गोडबोले's picture

10 Feb 2013 - 4:26 pm | प्रसाद गोडबोले

द्विविधोहि वेदोक्तो धर्मः - प्रवृत्तिलक्षण: निवृत्तिलक्षणश्च जगतः स्थितिकारणं | शांकरभाष्य

अर्थात वैदिक धर्म दोन लक्षनांनी युक्त आहे - प्रवृत्तीलक्षण: आणि निव्रुत्तीलक्षण: ... प्रवृत्ती म्हणजे स्व भोवती गोष्टी गोळा करणे आणि निव्रुत्ती म्हणजे हा " स्व" नक्की काय आहे हे समजुन घेण्याकरिता त्याभोवती जमा झालेल्या आणि ह्या नक्कीच "स्व" नाहीत अशा गोष्टीचा त्याग करणे ( नेति नेति )

आता आपण म्हणता
मला वाटतं अध्यात्म रोजचं जगणं आहे. इट इज नॉट समथिंग एक्सेप्शनल ऑर अ ग्रेट अचिववमंट. आगदि साधं, जसं आता इथे चाललेली चर्चा, रोजचं जेवणखाण, घरच्यांबरोबर, मित्रमंडळीत मजेत घालवलेले क्षण, ऑफिसामधे आनंदात केलेलं काम किंवा गृहिणीनं केलेला उत्तम स्वयंपाक...त्यासाठी हिमालय, प्रदीर्घ साधना वगैरेची काही आवश्यकता नाही. आणि टू बी वेरी स्ट्रेट, जर तसं नसेल तर अध्यात्म व्यर्थ आहे.

ह्यावरुन आपण प्रवृत्ती लक्षणाने जात आहात हे स्पष्ट दिसते ... तो म्हातारा निवृत्ती लक्षनाने जात आहे इतकेच ...दोन्ही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत कोणीच कनिष्ठ नाही ... मी वर म्हणलेच आहे की एकं सत विप्रा: बहुधा वदन्ति अर्थात " सत्य एकच आहे फक्त हुशार लोक त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधतात.

मी सहसा बुध्दा विषयी जास्त बोलत नाही ( तो कॉपीरायटेड झालाय म्हणुन )

बाकी अभिनिवेष सोडुन , निव्रुत्ती लक्षणाविषयी तुम्हास जाणुन घेण्याचे इच्छा असल्यास शंकराचार्य (वैदिक)- मंडनमिश्र(मीमाम्सक / कर्मकांडी ) ह्यांच्यातील संवाद पाहणे.

( अवांतर : मागे एकदा जवळपास २-३ वर्षांपुर्वी आपल्या ह्या विषयावर वाद झालेला आहे , तेव्हा पुन्हा पहिले पाढे ५५ नको . बाकी खरडवहीतुन बोलु.
अधिकार नसताना मोठ्ठ्या माणसांचे श्लोक संदभ वापरावे लागत आहेत हे खंत वाटत आहे म्हणुन थांबते
राग नसावा
" जयाचिनि संगे समाधान भंगे |
अहंता अकस्मात येवोनि लागे |
अशे संगतीची जनीं कोन गोडी |
जिये संगतीने मती राम सोडी || श्रीराम ||"

:) )

संजय क्षीरसागर's picture

10 Feb 2013 - 8:12 pm | संजय क्षीरसागर

निवृत्ती म्हणजे हा " स्व" नक्की काय आहे हे समजुन घेण्याकरिता त्याभोवती जमा झालेल्या आणि ह्या नक्कीच "स्व" नाहीत अशा गोष्टीचा त्याग करणे ( नेति नेति )

नेति नेति ही `स्व' गवसण्यासाठी वापरलेली एक पद्धत आहे (ती वृत्ती नाही). तो गवसल्यावर `वृत्ती' (द डिजायर टू डू ऑर हॅव) स्वच्छंदात बदलते, सगळं वैकल्पिक होतं. करण्यावाचून गत्यंतर नाही असं काही रहात नाही.

इथे थांबतो, धन्यवाद!

स्वानन्द's picture

10 Feb 2013 - 8:37 pm | स्वानन्द

संजय,

त्या वृद्धाने मोरपीस उचलून चालत राहणे हे त्याचे स्वच्छंदी वागणे नसू शकते का?

(ही इज स्टील इन सर्च) त्यामुळे त्याला स्वच्छंद गवसलेला नाही.

स्वानन्द's picture

10 Feb 2013 - 8:51 pm | स्वानन्द

मोरपीस इच्छेचं प्रतिक आहे

ओक्के.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Feb 2013 - 9:36 pm | निनाद मुक्काम प...

कथा आवडली
सध्या सासू सुनेच्या डेली सोप च्या काळात दूरदर्शन वर उपनिषद गंगा ही नितांत सुंदर मालिका आली.
एक सुंदर वाक्य ....आपल्या भारत देशाला लाभलेल्या उपनिषदानमधून

जन्मना जायते शुद्र : संस्काराद् द्विज उच्यते । वेदपाठाद्भ् वेद् विप्रः ब्रह्म जानाति ब्रह्मणः ।

जन्मसे हर मनुष्य शुद्र होता है । संस्कारसे वह द्विज होता है । वेदोके अध्ययनसे वह विप्र होता है और जो ब्रह्म को जान लेता है वही ब्राह्मण होता है ।

दूरदर्शन या वाहिनीवरील मालिका "उपनिषद गंगा"
वेळ मिळाल्यास अवश्य पहा ... सगळे भाग उपलब्ध आहेत .

मितान's picture

10 Feb 2013 - 10:15 pm | मितान

लेखन आवडले :)

अग्निकोल्हा's picture

11 Feb 2013 - 1:04 am | अग्निकोल्हा

गडबड करतो आहेस मित्रा .. जरासा विचार कर सोने चांदी हिर्‍यांपेक्षा पेक्षा किती तरी पट मौल्यवान दोन गोष्टी तुला लाभल्या आहेत ....ज्ञानप्राप्तीची संधी आणि एकांत

ज्ञान व अज्ञान या केवळ कल्पनाच नाहित काय ? सोने चांदी हिरे किमान कल्पना तरी नाहित ?

कवितानागेश's picture

11 Feb 2013 - 11:01 pm | कवितानागेश

ज्ञान व अज्ञान या केवळ कल्पनाच नाहित काय ? सोने चांदी हिरे किमान कल्पना तरी नाहित ?>>
नक्की का?

अग्निकोल्हा's picture

12 Feb 2013 - 12:50 am | अग्निकोल्हा

.