नमस्कार मंडळी,
कामानिमित्ताने कुठे कुठे फिरणं होत असतं हे तुम्हाला माहिती आहेच, असाच उडतउडत इकडे मस्कतमधे आठवडाभर येउन पडलो, एक दिवस इकडे जरा स्थिरस्थावर होण्यात गेला, मग नेहेमीप्रमाणे इथे पहायला काय आहे, फिरायला काही आहे का वगैरे शोध चालू झाला, फेसबूकावर ज्योतीतैशी गप्पा मारता मारता, तिने सांगीतले आपले मिपाकर प्रभाकर पेठकरकाका तिकडेच असतात, जमलं तर भेट. बघुया जमलं तर असा विचार करून त्यांना खरड केली नंबर कळवा म्हणून, आणि विसरून गेलो, एक दोन दिवस काही उत्तर नाही,
आज सकाळी सकाळी ज्योतै म्हणाली पेठकर काकांचा आज वाढदिवस आहे, नक्की भेटच, तिनेच त्यांचा मस्कतचा नंबर पण दिला, आज सकाळी त्यांना फोन केला त्यांनी पत्ता समजावून सांगीतला..
आज नक्की जायचंच, कितीही अंतर असेल तरी, असं ठरवून, संध्याकाळी प्रवचन लवकर संपवलं, हॉटेलवर येउन आवरून पत्ता शोधत निघालो, आधी वाटलं टॅक्सी करूया, पण गूगल मॅपवर पत्ता अगदी जवळ दिसत होता, शेजारच्याच एका बेकरीतून छानसा केक घेतला, आणि शोधमोहिमेवर निघालो, मोजून तिसरी बिल्डींग सोडून चौथ्या बिल्डींगवर, मुंबई कॉर्नर अशी पाटी दिसली, 'अवचित उदंड सापडते' म्हणतात ते असे..
पेठकर काका बाहेर गेले होते पण, तिथला मेनू बघुनच "आनंद पोटात माझ्या माईना ग माईना"... हा बघा मेनू..

पहिली ऑर्डर अर्थातच 'मिसळपाव'.. काहीही वर्णन करणार नाही, परत भूक लागेल.. सध्या हा फक्त फोटो बघा..

आणी हा माझा तृप्तात्मा..

मिसळपाव बरोबर कांदा लिंबू शेप्रेट मिळाल्याबरोबर मात्र अक्षरशः डोळे भरून आले... ते फक्त मिसळीच्या तिखटपणामुळेच होते असं नाही..
मिसळ संपतासंपतानाच, पेठकरकाका बाहेरून आले, आणि हॉटेलच्या बाहेर काही प्लॅस्टीकच्या पिशव्या पडलेल्या होत्या त्या उचलून कचरापेटीत टाकायला सुरूवात केली, मी मनोमन ह्या माणसाला नमस्कार केला, हा खरा हॉटेलचा मालक, दार उघडून आत यायच्या आधी, खाली वाकून कचरा काढत होता.. आम्ही श्रमप्रतिष्ठा नुसती बोलायची, काकांनी करून दाखवायची...
आत येउन एक नजर फिरवून काका बाहेर जाउन बसले, आम्ही एकमेकांना पाहिलेलं नव्हतंच, मग मी बाहेर गेलो, ओळख करून घेतली..
माणूस काय मोकळेपणाने हसतो हो.. वाहवा..

मग हॉटेलबाहेर खुर्च्या मांडून मस्त अघळपघळ गप्पा झाल्या, वडीलधारं माणूस इतक्या मोकळेपणानं भेटल्यावर अगदी मनापासून आनंद होतो. कुठले बंध असतात कोण जाणे, गाठी पडतात एवढं खरं..
गप्पा अनंत विषयांवर झाल्या, काकांच्या हॉटेलचा व काकांचा मस्कत मधला प्रवास, पुण्यातलं घर, तत्वज्ञान, अध्यात्म - मिपावरचं आणी बाहेरचं. ;) मिसळीचा रस्सा, संस्कार, निसर्ग आणि बरंच काय काय...
नंतर काकांच्याच हाटेलात त्यांचीच थाळी चमचा घेऊन केक कापण्याचा कार्यक्रम झाला, हा बघा..


नंतर मस्त मसाला चहा घेतला, आणि काकांचा निरोप घेउन निघालो...
बाकी काहीही लिहीवत नाहिये परक्या देशात प्रेमानं चहा पाजणार्या प्रेमळ पेठकर काकांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
आणि ज्योतैचे विषेश आभार..
प्रतिक्रिया
21 Jan 2013 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा
स्वा...........लिड :-)
21 Jan 2013 - 12:31 am | पैसा
मस्त कट्टा झाला थोडक्यात! माझ्या नावाने दोन चमचे मिसळ खाल्लीस की नाही? :D
धन्यवाद वगैरे शिव्या द्याचं काही काम नाही! पेठकर काकांचा वाढदिवस मस्त साजरा झाला अचानक! पेठकर काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पोचवल्यास याबद्दल मिपानेच तुझे आभार मानले पाहिजेत!
21 Jan 2013 - 12:40 am | संजय क्षीरसागर
मजा आली वाचताना
21 Jan 2013 - 10:04 am | मोदक
+१ सहमत.
मजा आली वाचताना, हेच बोल्तो.
पेठकरकाकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. :-)
22 Jan 2013 - 3:00 pm | मूकवाचक
+१
21 Jan 2013 - 12:44 am | नंदन
वाढदिवसाच्या (किंचित विलंबित) शुभेच्छा, पेठकरकाका! त्यांच्या हातच्या चविष्ट खाद्यपदार्थांबद्दल भरभरून बोलणारे पुण्यापासून (क्रॅब सूप) ते थेट सॅन डिएगोपर्यंत (पूर्वाश्रमीचे मस्कतकर) भेटले आहेत, तेव्हा 'तृप्तामा' हे शीर्षक चपखला आहे यात शंका नाही :)
21 Jan 2013 - 2:04 am | दादा कोंडके
फक्त पहिला आणि तिसरा फोटूच दिसतोय.
बाकी पेठकरजींना वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा!
21 Jan 2013 - 3:04 am | स्पंदना
व्वा! विसरायचे नाहीत पेठकरकाका हा वाढदिवस. मिपाकर येव्हढे एकमेकात गुंतलेले आहेत की बस! कुण्या जन्माचे ऋणानुबंध.
21 Jan 2013 - 3:58 am | जेनी...
वाचताना खुप आपलेपणाचा भास झाला ... का कोण जाने .
21 Jan 2013 - 4:01 am | शुचि
छान वृत्तांत. पेठकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा :)
21 Jan 2013 - 5:49 am | रेवती
पेठकरकाकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
कट्टा वृत्तांत आणि फोटू इथे चढवल्याबद्दल तुमचे आभार. ग्रेटच!
21 Jan 2013 - 8:21 am | ५० फक्त
लई भारी, पेठकरकाकांचं पुण्यात यज्ञकर्म होतं तेंव्हा तिथं त्यांना भेटलो होतो त्याची आठवण झाली, अर्थात ते माझे मिपावर्चे 'माज्याशी मयत री कर्ना रका' दिवस होते.
21 Jan 2013 - 8:35 am | लीलाधर
मिपा द ग्रेट ! क्या बात है अर्धवटराव मस्तच झालाय कट्टा व व्रृत्तांत सुद्धा.
21 Jan 2013 - 9:35 am | अर्धवट
'राव' नको हो..
ते वेगळे आहेत, उगाच घोळ नको म्हणून सांगीतलं..
21 Jan 2013 - 9:19 am | नाखु
मि.पा.च्या ऋणानुबंधांना आणि अर्धवटराव यांना..म(स्क्)तच झाला व्रृत्तांत
21 Jan 2013 - 9:31 am | इरसाल
आणी काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
21 Jan 2013 - 9:38 am | अर्धवट
काका सांगत होते,
"इकडे गुज्जू वगैरे लोक आहेत म्हणून जरा कमी तिखट करावी लागते मिसळ, नाहीतर मिसळीनं घाम फोडला नाही तर ती मिसळ कसली.. मी स्वतः भारतात गेल्यावर फक्त मामलेदारची किंवा पुण्यात असेल तर काटाकीर्रर्र ची मिसळ खातो"
"धर्मो रक्षती रक्षितः" म्हणतात ते हेच असावं बहुतेक ;)
21 Jan 2013 - 10:31 am | पिंगू
अर्धवट, धन्यवाद आणि पेठकरकाका, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
- पिंगू
21 Jan 2013 - 10:33 am | श्रिया
क्या बात है! कट्टा आणि वृत्तांत दोन्ही छानच.कट्टयाचे सेलेब्रिटी प्रभाकर पेठकर काकांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
21 Jan 2013 - 10:41 am | टीम गोवा
ह्याप्पीवाला बड्डॅ पेठकर काका :)
21 Jan 2013 - 11:16 am | बॅटमॅन
ह्यापी बड्डे पेठकरकाका!
21 Jan 2013 - 11:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त कट्टा. ह्यापी बड्डे पेठकरसाहेब. :)
-दिलीप बिरुटे
21 Jan 2013 - 11:56 am | सोत्रि
'अर्धवट, पूर्ण वृत्तांताबद्दल धन्यवाद.
पेठकरकाका, वाढदिवसाच्या लेट लतिफ शुभेच्छा!
21 Jan 2013 - 11:59 am | सोत्रि
गुगलच्या क्रोमची टांग, स्वाक्शरी राहिली. ;-)
-(पेठकरकाकांच्या हातची मिसळ चापायची ईच्छा असलेला) सोकाजी
21 Jan 2013 - 12:08 pm | स्पंदना
सार्या लिखाणाची वाट लावत गुगल क्रोम. इन्स्टॉल केल असेल तर पहिला काढुन टाका.माझ्या सगळ्या सिस्टमची वाट लावली अन वर हे एव्हढ्या (वाट्टेल तसल्या[आता मला डेटींग सायटींची काय गरज्?]झायराती) वीट आला हा शब्द बदलुन काव आला असा का वापरला जातो ते समजल.
21 Jan 2013 - 12:25 pm | बॅटमॅन
आणि अशाप्रकारे सोत्रिअण्णांचा स्वाक्षरीशिवायचा प्रतिसाद पहायची इच्छा पूर्ण झाली!!!!
(समाधानी) बॅटमॅन.
21 Jan 2013 - 12:45 pm | सूड
फोटो दिसत नाहीये!!
21 Jan 2013 - 1:07 pm | विलासिनि
पेठकरकाकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
लेख आवडला.
21 Jan 2013 - 1:17 pm | धमाल मुलगा
जियो अर्ध्या!
काकांसाठी ही एक झकास सरप्राईज पार्टी ठरली असेल, नाही? :-)
21 Jan 2013 - 1:52 pm | यशोधरा
पेठकरकाका, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! :) उशीरा देते आहे, पण मनापासून :)
तुम्हांला भेटायचा योग कधी येतो आहे कोणास ठाऊक. लवकर पुण्यात या नायतर मला मस्कतंच तिकिट पाठवा :D
21 Jan 2013 - 6:22 pm | प्रभाकर पेठकर
अत्रुप्त आत्मा, पैसा, संजय क्षीरसागर, मोदक, नंदन, दादा कोंडके, aparna akshay, पूजा पवार, शुचि, रेवती, ५० फक्त, लीलाधर, नाद खुळा, इरसाल, पिंगू, श्रिया, टीम गोवा, बॅटमॅन, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सोत्रि, विलासिनि, धमाल मुलगा, यशोधरा तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
अर्धवटपंत स्वतः भेटणार म्हंटल्यावर उत्साह होताच. आणि प्रत्यक्ष भेटीत आणि बोलाचालीत ते कुठल्याही कोनातून 'अर्धवट' वाटले नाहीत. (लोकं असला आयडी का घेतात देवास ठाऊक. अर्थात, 'तो' असेल तर. बाकी आजकाल कुठली वस्तुस्थिती आणि कुठला भास हेच कळेनासे झाले आहे.) मस्त गप्पाष्ट्क जमले.
बाहेर हवा अत्यंत आल्हाददायक असल्याने आम्ही बाहेर बसलो होतो.मी म्हणालो,'पुन्हा एकेक चहा मारायचा का?' त्यावर एकमत झाले पण अर्धवटपंत म्हणाले आधी आंत या. मग आम्ही हॉटेलात बसलो तर ह्यांनी आधीच आणून ठेवलेला केक टेबलावर ठेवला आणि मला आश्चर्याचा, आनंदाचा गोड धक्काच बसला. खरंच सांगतो. लहानपणी संक्रांतीला केल्या असल्या आणि पोटभरून/मनभरून खाऊन झाल्या असतील तरी वाढदिवसाची माझी फर्माईश 'गुळाच्या पोळ्यांची' असायची.आणि आई आवर्जून गुळाच्या पोळ्या करायची.
कोरे कपडे, चांदीची फुले लावलेला पाट, चांदीचे ताट, चांदीची वाटी, चांदीचे तांब्या भांडे असा शाही थाट असायचा. (बाकी वर्षभर अभ्यासावरून मार खायचो). समोर छान सुगंधी उदबत्त्या लावलेल्या असायच्या आणि मी मनभरेस्तोवर गुळाच्या पोळ्या चापायचो. संध्याकाळी औक्षण व्हायचे रुपया, दोन रुपये मिळायचे. (ते लगेच पैशाच्या पेटीत टाकायचे, साठवायचे, वापरायचे नाहीत. असा दंडक होता).
काल, आयुष्यात प्रथमच, 'केक'वाला बड्डे साजरा झाला. मी गांगरूनच गेलो. आपण केक कापतोय बाकी सर्वजण आपल्याकडे पाहताहेत, टाळ्या वाजवताहेत फार कानकोंडं वाटलं.आणि मन मोहरुनही आले. अर्धवटपंतांना धन्यवाद.
पण,
'वडीलधारं' म्हणून उगाच आम्हाला स्वतःपासून (पक्षी: तरूण पिढीपासून)तोडले त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवितो आहे.(आता, दिसत असेल छायाचित्रात जरा टक्कल आणि सुटलेले पोट म्हणून काय झाले?)
22 Jan 2013 - 12:32 pm | धमाल मुलगा
'केकवाल्या बड्डेचा' पहिलटकर झालात तर काका तुम्ही. :-D
कसा वाटला अनुभव? :-)
स्वगत: काका अर्ध्याला यशेमेसवरुन जोक का पाठवत नाहीत बरं? मग अर्ध्या त्यांना असं वडिलधारं वगैरे म्हणुन त्रास देणार नाही.
21 Jan 2013 - 6:41 pm | स्मिता.
भेटीचा वृत्तांत छान सांगितला आहे. खरंच, कधी न भेटलेल्या लोकांसोबत केवळ मिपा माध्यमातून जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात हे इथे येण्याआधी पटलंच नसतं.
पेठकर काकांना वाढदिवसाच्या (उशीरा दिलेल्या) शुभेच्छा!
21 Jan 2013 - 6:43 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद स्मिता.
21 Jan 2013 - 7:18 pm | चिंतामणी
जीवेत् शरद: शतम् ।
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जन्मदिन की लक्ष लक्ष हार्दिक बधाईयाँ ।
Happy Birthday to you!
अर्धवटराव- मस्कत कट्ट्याचा वृतांत मस्त.
21 Jan 2013 - 7:18 pm | चिंतामणी
जीवेत् शरद: शतम् ।
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जन्मदिन की लक्ष लक्ष हार्दिक बधाईयाँ ।
Happy Birthday to you!
अर्धवटराव- मस्कत कट्ट्याचा वृतांत मस्त.
21 Jan 2013 - 7:36 pm | निनाद मुक्काम प...
आभासी जीवनातून आपल्याला वास्तविक जीवनात असे सुरेख अनुभव येतात ते आपल्या भाव विश्वाचा एक हिस्सा होतात.
मिपाच्या मुळे जगभरातील मराठी माणसांशी संपर्क साधता येतो , अनेक ओळखी होतात त्यांचे रुपांतर गाढ मैत्रीत होते.
पेठकर काकांचा प्रतिसाद , अर्धवट राव ह्यांचा हा वृत्तांत सारेच मनापासून आवडले.
21 Jan 2013 - 7:39 pm | तिमा
तुमचा परिचय मिपावरुन झालाच आहे. 'अर्धवट' चा वृत्तांत आवडला. तुम्हाला वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा!
-- (वडिलधारी) तिमा
21 Jan 2013 - 7:39 pm | किसन शिंदे
पेठकर काका, वाढदिचसाच्या उशीराने हार्दिक शुभेच्छा!!
वृत्तांत मस्त लिहलाय. आणि मिसळपण भारीच दिसतेय आमच्या मामलेदारसारखीच!
भाग्यवान आहेस कारण साक्षात काकांच्या हाॅटेलात मिसळपाव खाता आला तुला.
(पेठकर काका भारतात येण्याची वाट बघणारा) किसना
21 Jan 2013 - 9:01 pm | गणपा
पेठकर काकांना मस्त सरप्राइज. :)
अर्ध्या इथे केव्हा येतोयस रे?
हवं तर मीच केक बनवून ठेवतो. ;)
22 Jan 2013 - 1:53 pm | अर्धवट
फक्त केक होय रे भा*
पुढच्या महिन्यात आहे अफ्रिकेत.. तेव्हा बघू जमलं तर.
21 Jan 2013 - 9:12 pm | नन्दु मुळे
लेख खूपच छान!!
21 Jan 2013 - 9:57 pm | सस्नेह
हॅप्पी बड्डे ओ काका (विलंबाने) !
मला वाटलं आणि एक कट्टा वृत्तांत है काय !
21 Jan 2013 - 10:07 pm | सुनील
छान वाटले वाचून.
पेठकरकाकांना (विलंबीत) हार्दीक शुभेच्छा!
21 Jan 2013 - 10:22 pm | निवेदिता-ताई
छान छान
22 Jan 2013 - 10:10 am | llपुण्याचे पेशवेll
वाह! पेठकरकाका आम्हाला पण फार आवडले होते बुवा. :)
22 Jan 2013 - 11:10 am | अद्द्या
ओळख तर नाहीये आपली ..
पण वाचून लई भारी वाटलं अर्धवट साहेब ..
पेठकर काकांना खूप खूप शुभेच्छा
22 Jan 2013 - 12:45 pm | अनिता ठाकूर
प्रभाकरभाऊ,वाढदिवस छानच साजरा झाला. विशेष वाढदिवसाचा विशेष सोहळा झाला.हे फार छान झाले. एकूणच,पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अनेकानेक आशिर्वाद!!! (Marathi typing is timeconsuming & painful job for me re baba!)
22 Jan 2013 - 1:15 pm | ऋषिकेश
वा! पेठकरकाकांचे अभिष्टचिंतन :)
बाकी आमच्या एका दहिसरकराने मस्कतापर्यंत मारलेली खाद्य-मजल मारलेली बघुन आमच्या कॉलरी उगाच टाईट होतात ;)
22 Jan 2013 - 1:18 pm | सानिकास्वप्निल
पेठकरकाकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
मस्तचं :)
22 Jan 2013 - 1:28 pm | रुमानी
मस्तच झाल हो तुमचा कट्टा ......!
आणि पेठकरकाकाचा वाढदिवसही.
22 Jan 2013 - 1:42 pm | श्रावण मोडक
कवा येताय पुण्यात? धम्या आहेच. डान्या असेल. सोत्रि, पऱ्या आले तर तेही. बिका असेल. अर्ध्या असला तर तोही येईल. आणखी चार सवंगडी येतील. भेटूया... तेव्हा तुमचा वाढदिवस पुन्हा एकदा साजरा करूया.
22 Jan 2013 - 1:59 pm | विसुनाना
पेठकरसाहेब, शुभेच्छांना थोडा उशीर झाला.
यज्ञकर्माची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. विशेषतः मासे आणि सोलकढी!
22 Jan 2013 - 2:02 pm | अर्धवट
काकांबरोबरचे काही संवाद..
22 Jan 2013 - 2:06 pm | यशोधरा
काका, भारी :) हायेतच आमचे काका महान! _/\_
22 Jan 2013 - 2:55 pm | तर्री
आणि फसली तर भले भले असूनही फसते....
मस्त वर्णन !
22 Jan 2013 - 3:06 pm | प्रभाकर पेठकर
चिंतामणी, निनाद मुक्काम पश्चिम जर्मनी , तिरशिंगराव माणूसघाणे, किसन शिंदे, गणपा, स्नेहांकिता, सुनील, निवेदिता-ताई, llपुण्याचे पेशवेll, राव साहेब, अनिता ठाकूर, ऋषिकेश, सानिकास्वप्निल, श्रुती कुलकर्णी, श्रावण मोडक, विसुनाना आणि यशोधरा मनापासून धन्यवाद.
अनिताताई,
सातत्याने प्रयत्न केल्यावर क्षमता आणि कौशल्य दोन्हीतही नक्कीच वृद्धी होईल.
ऋषिकेश,
धन्यवाद. आता तुमची कॉलर मौ पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची विशेष जबाबदारी मस्तकी आली आहे.
श्रावण मोडक,
नक्कीच. आपल्याला काय 'बहाना चाहिए'......भेटण्यासाठी हो!
विसुनाना,
यज्ञकर्मची वेळ चुकली होती. 'स्वाईन फ्लूने' यज्ञकर्माचा घास घेतला. असो. नशिबानेच खो घातला.
आता मस्कतात, आपल्या आशिर्वादाने, ह्या वर्षाअखेर, मालवणी आणि गोवन पाककृतींनी जिव्हालौल्य पुरविणारे उपहारगृह सुरु करायचा मानस आहे.
22 Jan 2013 - 3:13 pm | अभ्या..
श्री पेठकर काका
खरडफळ्यावर आपल्यासाठी केकसहित शुभेच्छा होत्याच पण त्या वाढदिवसाच्या.
आता आपल्या या नवीन उपक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभो ह्याच शुभेच्छा.
(तुम्ही आमच्या मिपाकर म्हणूनसुध्दा कॉलरी मौ पडू देणार नाहीतच याची मनोमन खात्रीच आहे)
22 Jan 2013 - 3:17 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद रे अभिजीत (तूच).
22 Jan 2013 - 3:45 pm | योगप्रभू
ते वरच्या सगळ्या श्रामो, बिका वगैरे मंडळींना 'पुण्यात भेटूया' म्हणताय खरे...
पण मला गेल्या वर्षी हेच आश्वासन दिले होते त्याचे काय? :)
असो. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
22 Jan 2013 - 5:09 pm | येडगावकर
त्याचं काय काका, आम्ही मिपावर आहोत नवे... तेव्हा आपला काही जास्त संपर्क नाय! पण आपल्याला कुणाचा बड्डे असल की लय बरं वाटतं कायकी लोकं पारट्या बिरट्या देण्याचं ठरिवतात नि काही जण द्येत्यात बी... तेव्हा मी काय की तुम्हाला उशीरा का होईना 'हॅप्पी बड्डे' म्हणुन हाटेलातल्या जागेचं रिझवेशन करुन ठेवतो!
22 Jan 2013 - 5:42 pm | मदनबाण
अरे वा ! :) झकास कट्टा अगदी मस्त रंगलेला दिसतो ! :)
काकाश्री तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! :)
22 Jan 2013 - 5:54 pm | प्रभाकर पेठकर
योगप्रभू- धन्यवाद साहेब. तुम्हाला आश्वासन दिल्या नंतर पुण्यात येणे झालेलेच नाही. जेंव्हा होईल तेंव्हा नक्कीच भेटू.
येडगावकर साहेब - धन्यवाद. तुम्ही नवे असल्यासारखे वाटत नाही आहात. पण, संपर्कात राहा, पार्ट्या काय होत राहतील.
मदनबाण - धन्यवाद. कट्टा मस्तंच झाला. माझं भाग्य असेल तर अर्धवटपंतांबरोबर, इथेच, अजून एक कट्टा होईल.
22 Jan 2013 - 6:40 pm | दिपक.कुवेत
दोन्हि छान. पेठकरकाकांना वाढदिवसाच्या (बी लेटेड) आणि नवीन उपक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा!
22 Jan 2013 - 10:16 pm | सुनील
खरड आल्याचे गेल्या काही महिन्यांपासून कळत नाही आहे. मिपा-तंत्रज्ञ लक्ष घलीत आहेत ना?
आज मलाही तोच अनुभव आला म्हणून हा प्रतिसाद.
22 Jan 2013 - 11:06 pm | सखी
वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन काका. आमचा योग कधी येतोय काय माहीत, यज्ञकर्मामध्ये पण यायला मि़ळालं नाही. पुण्यात परत काही सुरु केले तर नक्की कळवा काका.
अर्धवटांचेही आभार इथे फोटुसकट लेख टाकल्याबद्दल.
26 Jan 2013 - 11:03 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद दिपक्.कुवेत आणि सखी.
@सखी,
सध्यातरी तसा काही विचार नाही. पण जेंव्हा कांही करेन तेंव्हा नक्कीच कळवेन सर्वांना.
26 Jan 2013 - 10:11 pm | प्रास
पेठकरकाका, वाढदिवसाच्या (विलंबित) शुभेच्छा, बर्का! :-)