साहित्य-
२ वाट्या वरीचे तांदूळ, ४ वाट्या आधणाचे पाणी, ३-४ हिरव्या मिरच्या, १ मध्यम बटाटा,पाउण ते १ वाटी दाण्याचे कूट, २ चमचे तूप,जिरे,मीठ,साखर,ओले खोबरे, कोथिंबिर
कृती-
वरीचे तांदूळ कोरडेच तांबूस भाजून घ्या. आचेवरुन खाली काढा.त्यात आधणाचे पाणी घालून साधारण अर्धा ते पाउण तास झाकून ठेवा.आता हे आचेवर ठेवायचे नाहीत.तांदूळ अधून मधून ढवळा. वरी पाणी शोषून घेतील आणि मोकळे होऊ लागतील.
एका कढईत तूप जिर्याची फोडणी करा, त्यात हिरव्या मिरच्या आणि बटाटे चिरुन घाला.बटाटा शिजत आला की त्यात मघाचचे वरीचे तांदूळ घाला ,दाण्याचे कूट, ओले खोबरे आणि कोथिंबिर घाला.चवीनुसार मीठ आणि साखर घाला. चांगले ढवळा. झाकण ठेवून वाफा येऊ द्यात.
खायला देताना ओले खोबरे व कोथिंबिरीने सजवा. हवे असल्यास लिंबाची फोड द्या.
(फोटो मधील उपम्यात खोबरे व कोथिंबिर दोन्ही घातलेले नाहीये.)
प्रतिक्रिया
19 Oct 2012 - 7:42 pm | स्वाती दिनेश
बरेच जण नवरात्रींचे उपास करतात, म्हणून ही उपासाची पाकृ
19 Oct 2012 - 7:59 pm | कवितानागेश
आधणाचे पाणी घतल्यावर गॅस चालू ठेवायचा की बंद?
19 Oct 2012 - 8:36 pm | स्वाती दिनेश
माऊ,
आधणपाणी घालायच्या आधीच गॅस बंद करायचा.
तसे आता पाकृत अपडेटवले आहे.
19 Oct 2012 - 8:15 pm | रेवती
पाकृ आवडली. मला फक्त बटाटा घातलेले वर्याचे तांदूळ आवडतात पण आमच्याकडे त्यात बटाट्याबरोबर थोडी भेंडी आणि ताकही घातले जाते एवढाच फरक. बाकी हा प्रकार उपासाच्या दिवशी पोटभरीचा आहे म्हणून आवडतो.
19 Oct 2012 - 8:37 pm | पैसा
चांगलीच आहे पाकृ. पण उपासाला नाही तर अशीच केली तर कांदा घालून जास्त चांगली लागेल का?
19 Oct 2012 - 8:53 pm | रामदास
लौंगा घालाव्या का ?
मी वरीच्या तांदळाचा गोड उपमा (शिरा) करतो (म्हंजे करवून घेतो) त्यात लवंगा टाकतो.
19 Oct 2012 - 9:04 pm | जाई.
ऊपासाच्या पदार्थाचा आणखी एक चॉईस!!!!!!!!!!
19 Oct 2012 - 9:28 pm | सस्नेह
आता उपासालापण पोट भरून खाता येईल. तेही लो कॅलरी.
20 Oct 2012 - 2:02 am | प्रभाकर पेठकर
मसाल्याची भगर म्हणतात तीही अशीच असते. बाकी ती, जीरं-तुपाच्या फोडणीवर वरी घालून परतून त्यात पाणी आणि दाण्याचा कुट, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वगैरे घालून शिजवतात. ती मोकळी नसते पण मस्त मौ आणि चविष्ट लागते.
20 Oct 2012 - 2:09 am | गणपा
आता ईथे वरीचे तांदुळ कुठे शोधायचे?
बर सापडलेच तर उपास करणे मस्ट आहे काय? ;)
20 Oct 2012 - 2:26 am | जेनी...
मिळतात कि ....एव्हरेस्ट किंवा पटेल मध्ये ;)
20 Oct 2012 - 2:26 am | पिवळा डांबिस
"फास्ट्न सोर्जेरैस कुकन"
आम्ही उपास करत नसल्याने हा पदार्थ खाण्याची शक्यता नाही. तेंव्हा म्हंटलं याला एक जर्मन नांव सुचवून स्वातीबाईची परंपरा कायम राखावी...
तेव्हढंच आमचं छोटसं कॉन्ट्रिब्यूशन!!!!
:)
20 Oct 2012 - 1:01 pm | RUPALI POYEKAR
मस्तच कारण साबुदाणा विषयी चेपुवर पुढिल वाचल्यामुळे उपवासाला काहि खाण्याची इच्छाच नव्हती त्यामुळे धन्यवाद
हे खरे आहे का त्याबद्द्ल मला सांगावे? कदाचित खोटहि असु शकते.....
क्या आप जानते हैं साबूदाने की असलियत को ??
आमतौर पर साबूदाना शाकाहार कहा जाता है और व्रत, उपवास में इसका काफी प्रयोग होता है। लेकिन शाकाहार होने के बावजूद भी साबूदाना पवित्र नहीं है। क्या आप इस सच्चाई को जानते हैं ? साबूदाना किसी पेड़ पर नहीं ऊगता । यह कासावा या टैपियोका नामक कन्द से बनाया जाता है । कासावा वैसे तो दक्षिण अमेरिकी पौधा है लेकिन अब भारत में यह तमिलनाडु,केरल, आन्ध्रप्रदेश और कर्नाटक...में भी उगाया जाता है । केरल में इस पौधे को “कप्पा” कहा जाता है । इस कन्द में भरपूर स्टार्च होता है । यह सच है कि साबूदाना (Tapioca) कसावा के गूदे से बनाया जाता है परंतु इसकी निर्माण विधि इतनी अपवित्र है कि इसे शाकाहार एवं स्वास्थ्यप्रद नहीं कहा जा सकता। साबूदाना बनाने के लिए सबसे पहले कसावा को खुले मैदान में बनी कुण्डियों में डाला जाता है तथा रसायनों की सहायता से उन्हें लम्बे समय तक गलाया, सड़ाया जाता है। इस प्रकार सड़ने से तैयार हुआ गूदा महीनों तक खुले आसमान के नीचे पड़ा रहता है। रात में कुण्डियों को गर्मी देने के लिए उनके आस-पास बड़े-बड़े बल्ब जलाये जाते हैं। इससे बल्ब के आस-पास उड़ने वाले कई छोटे मोटे जहरीले जीव भी इन कुण्डियों में गिर कर मर जाते हैं।
दूसरी ओर इस गूदे में पानी डाला जाता है जिससे उसमें सफेद रंग के करोड़ों लम्बे कृमि पैदा हो जाते हैं। इसके बाद इस गूदे को मजदूरों के पैरों तले रौंदा जाता है। इस प्रक्रिया में गूदे में गिरे हुए कीट पतंग तथा सफेद कृमि भी उसी में समा जाते हैं। यह प्रक्रिया कई बार दोहरायी जाती है। और फिर उनमें से प्राप्त स्टार्च को धूप में सुखाया जाता है । जब यह पदार्थ लेईनुमा हो जाता है तो मशीनों की सहायता से इसे छन्नियों पर डालकर गोलियाँ बनाई जाती हैं ,ठीक उसी तरह जैसे की बून्दी छानी जाती है ।
इन गोलियों को फिर नारियल का तेल लगी कढ़ाही में भूना जाता है और अंत में गर्म हवा से सुखाया जाता है । और मोती जैसे चमकीले दाने बनाकर साबूदाने का नाम रूप दिया जाता है
बस साबूदाना तैयार । फिर इन्हे आकार ,चमक, सफेदी के आधार पर अलग अलग छाँट लिया जाता है और बाज़ार में पहुंचा दिया जाता है । परंतु इस चमक के पीछे कितनी अपवित्रता छिपी है वह सभी को दिखायी नहीं देती।
तो चलिये उपवास के दिनों में ( उपवास करें न करें यह अलग बात हैं ) साबूदाने की स्वादिष्ट खिचड़ी ,या खीर या बर्फी खाते हुए साबूदाने की निर्माण प्रक्रिया को याद कीजिये और मित्रों से शेयर कीजिये ।
20 Oct 2012 - 9:47 pm | जेनी...
:(
21 Oct 2012 - 7:41 pm | सहज
चला आता उपास करणे आले!