उपासाचा उपमा
साहित्य-
२ वाट्या वरीचे तांदूळ, ४ वाट्या आधणाचे पाणी, ३-४ हिरव्या मिरच्या, १ मध्यम बटाटा,पाउण ते १ वाटी दाण्याचे कूट, २ चमचे तूप,जिरे,मीठ,साखर,ओले खोबरे, कोथिंबिर
कृती-
वरीचे तांदूळ कोरडेच तांबूस भाजून घ्या. आचेवरुन खाली काढा.त्यात आधणाचे पाणी घालून साधारण अर्धा ते पाउण तास झाकून ठेवा.आता हे आचेवर ठेवायचे नाहीत.तांदूळ अधून मधून ढवळा. वरी पाणी शोषून घेतील आणि मोकळे होऊ लागतील.
एका कढईत तूप जिर्याची फोडणी करा, त्यात हिरव्या मिरच्या आणि बटाटे चिरुन घाला.बटाटा शिजत आला की त्यात मघाचचे वरीचे तांदूळ घाला ,दाण्याचे कूट, ओले खोबरे आणि कोथिंबिर घाला.चवीनुसार मीठ आणि साखर घाला. चांगले ढवळा. झाकण ठेवून वाफा येऊ द्यात.
खायला देताना ओले खोबरे व कोथिंबिरीने सजवा. हवे असल्यास लिंबाची फोड द्या.
(फोटो मधील उपम्यात खोबरे व कोथिंबिर दोन्ही घातलेले नाहीये.)
वाचने
8237
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
बरेच जण नवरात्रींचे उपास
आधणाचे पाणी घतल्यावर गॅस चालू
In reply to आधणाचे पाणी घतल्यावर गॅस चालू by कवितानागेश
बंद..
पाकृ आवडली. मला फक्त बटाटा
उपास करायला पाहिजे आता!
दोन चार
मस्त!!
बरं झालं.
मसाला भगर.
आता ईथे वरीचे तांदुळ कुठे
In reply to आता ईथे वरीचे तांदुळ कुठे by गणपा
मिळतात कि ....एव्हरेस्ट किंवा
जर्मन नांव कुठाय
मस्तच
In reply to मस्तच by RUPALI POYEKAR
(No subject)
ह्म्म