साहित्यः
ओट्स २ वाट्या
पिस्ता, बदाम, खारीक, आक्रोड, शेंगदाणे यांचे जाडसर कूट १ वाटी
वेलची पूड १/४ चहाचा चमचा
चिरलेला गूळ २ वाट्या
पाणी २ चहाचे चमचे
साजुक तूप १ चहाचा चमचा
पिस्ता बदाम काप सजावटीसाठी
कृति
१ तव्यावर मंद आचेवर ओट्स हलके भाजुन, एका भांड्यात काढ्न घ्यावे.
२ पिस्ता, बदाम, खारीक, आक्रोड व शेंगदाणे यांचे जाड्सर कूट ओट्समध्ये मिसळावे.
३ वेलची पूड वरील मिश्रणात मिसळुन घ्यावी.
४ पॅनमध्ये गूळ, पाणी व तूप एकत्र करुन मध्यम आचेवर ठेवावा व सतत ढवळत राहावे.
५ गूळ विरघळून उकळी येऊ लागल्यावर आंच कमी करुन एक दोन मिनिटे ढवळत राहावे.
६ गॅसवरील पॅन खाली उतरवून त्यात तयार केलेले ओट्स चे मिश्रण घालावे व ते दोन मिनिटे ढवळावे.
७ घट्टसर गोळा झाल्यावर तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण थापावे.
८ सजावटीसाठी वर पिस्ता-बदाम काप लावावेत.
९ मिश्रणाचा गरम पणा थोडा कमी झाल्यावर वड्या आखुन घ्याव्यात.
१० मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.
(दिलेल्या प्रमाणात साहित्य घेतल्यास फोटोतील आकाराच्या २० वड्या होतात)
प्रतिक्रिया
7 Oct 2012 - 1:51 pm | प्रचेतस
फोटो बघूनच जीव खल्लास.
बाकी ह्या वड्या अंमळ जास्तच पौष्टिक आहेत.
7 Oct 2012 - 2:01 pm | प्रभाकर पेठकर
वा..वा.. पौष्टीक चैन.
7 Oct 2012 - 2:20 pm | यशोधरा
अरे काय छळवाद आहे हा पाकृंचा विभाग!
7 Oct 2012 - 2:25 pm | दादा कोंडके
मस्तच!
7 Oct 2012 - 2:51 pm | पियुशा
फोटो झक्कास आलेला आहे , झटपट पौष्टिक वड्या आवडल्या :)
7 Oct 2012 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है....! टपालानं मागवायचे ठरले तर किती खर्च येईल :)
-दिलीप बिरुटे
7 Oct 2012 - 3:09 pm | अत्रुप्त आत्मा
फोटू पाहुनी जीवच गेला... आणी दिवाळीची हवाही लागली :-)
7 Oct 2012 - 5:29 pm | गणपा
लै भारी.
पटकन उचलुन घ्याव्याश्या वाटतायत वड्या.
7 Oct 2012 - 10:54 pm | सानिकास्वप्निल
छानच :)
7 Oct 2012 - 11:27 pm | जाई.
वाह !!!!!!!!
7 Oct 2012 - 11:46 pm | रेवती
अरे वा!! पौष्टीक असल्याने खाताना वाईटही वाटणार नाही हो न्युटनताई.
फोटू गोड आलाय.
8 Oct 2012 - 6:46 am | स्पंदना
हो फोटो गोड आहेच अन घरात ओटस पण आहेत. करुनच बघते आता.
8 Oct 2012 - 11:01 am | स्वाती दिनेश
ओटसच्या वड्या छान दिसत आहेत,
स्वाती
8 Oct 2012 - 2:57 pm | ज्योति प्रकाश
ओट्स मिळत नसल्यास दुसरे काय वापरता येईल?
8 Oct 2012 - 3:14 pm | खादाड
वड्या छानच असतील :)
8 Oct 2012 - 3:40 pm | सूड
वड्या आवडल्या पण किती दिवस टिकतात ? का करायच्या नि खायच्या सरळ ? रेशिपीत आय मीन गूळ कढवताना पाणी घातलंय म्हणून विचारलं.
8 Oct 2012 - 9:48 pm | नूतन
सर्वांचे आभार.
ह्या वड्या प्रयोग म्हणुन केल्या होत्या. पण बर्या झाल्या म्हणुन शेअर केल्या.
या वड्या आठ दिवस टिकायला हरकत नाही, पण तितके दिवस शिल्लक राहील्या तर..
24 Oct 2012 - 1:31 am | नक्षत्र
खरच खुप छान आहेत..