वांगी भात

गणपा's picture
गणपा in पाककृती
2 Sep 2012 - 6:34 pm

काय मंडली काय चाल्लावं? रैवारचं नल्ली बल्ली फोडलावं कं नाय? आज जल्ला आमच्या हतं मार्केट बंद. आन माजा फिरीज पन रोडावलता. त्यात हतं मिपावं एकाव-एक धागेकाडुन, मिपाशी कुक मंडली माजं डोस्कं फिरवुन रायली. जल्ला त्यातला एक पदार्थ घरान अशेल तर शप्पत. फिरीजमन डोकावलं ता एक वांगं तेवरंच भेटलं. आता ह्याचा काय कराचां म्हनुन थोडा डोस्कं खाजवलन. थोडं सामानाची जुलवा जुलवं केली नं ह्यो बग मीनी काय केला तं.

आवरलं असेन तर मंग कसं काय केला त सांगतव. वांगं आवरत नसेन तर इकरुनच कल्टी मारली तरी चालन.

सगल्यान पैलं तर वांगींभात मसाला आना मार्केटान. नय भेटला तरी वांदा नाय. मी सांगतं नं कसा बनवाचा तो..

२ मोठे चमचे चना डाल.
२ मोठे चमचे उडिद डाल.
२ चमचे धने (नसतीन तरं धना पुड)
३-४ लाल सुक्या मिरच्या (त्यावं नसतीन तर लाल तिखटं.)
१ छोटा चमचा मेथी दाने.
१ छोटा चमचा जीर.
१ छोटा चमचा खसखस.
थोडा हिंग.
२-३ वेलच्या.
दालचिनी १ इंच.
३-४ लौंगा

ह्ये जकलं कोरडंस भाजुन घ्याचं. (मिरची नं धने नसतीन तर त्या पावडरी गॅस बंद केल्यावं टाकाच्या.


सगलं गार झाल्यावं मिक्सरान टाकुन पाऊडर करुन घ्याची. (माजी मोठी माय त्यात सुकं खोबरं बी टाकाची. पन मंग तो मसाला जास्त दिस टिकाचा नाय, लगेच वापरावा लागाचा. म्हनून मीनी नाय घात्ला.)

वाटान घाटन झाला तं आता मेन डिशकडे वलु. पैले एक वाटी भात मोकला शीजवून घ्या. तुमाना बासमती आवरत असनं तर तो घ्या पण त्ये काय कंपल्सरी नाय. मीनी तर सादा कोलम घेतला. हा पण भात एकदम सुट्टा झाला पायजे. नाय तर वांग्याची खिचडी खावी लागल.

१ लहान चमचा मोहरी.
१-१ लहान चमचा चना डाल, उडीद दाल. (या दोनी १०-१५ मिनिट पान्यात भिजवाच्या.)
कडीपत्ता
३-४ हिरव्या मिरच्या.
१/२ चमचा हलद.
२ मोठे चमचे सुकं खोबरं.
थोडी चींच (आंबट आवडत असन तर.)
तमाल पत्र.
४-५ चमचे तेल.
मीठ.


येक वांगं. (लहान असतीन तर ५-६.)
१ कांदा बारीक चिरलेला.

सगल्यान पैले कढईत तेल तापवुन घ्यांच.

तेल तापलं की त्यान मोहरी, चनाडाल-उडीदडाल टाकाची. थोडं परतल्यावं त्यात कडीपत्ता मिरची कांदा तमाल पत्र टाकुन परतुन घ्याचं.

वांग्याच्या लहान फोरी करुन घ्याच्या. कांदा गुलाबी झाल्यावं मंग त्यात वांग्याच्या फोरी घालाच्या. थोडावेल शिजल्यावं मंग त्यात हलद घालाची.

वांगं शिजा लागलं की मंग त्यात ३ चमचे वांगी भात मसाला टाकाचा.

५ मिनटानी त्यात सुक खोबरं टाकाचं. आवरत असन तर मंग चींचेचा कोल टाकाचा. (पण चींच, वांग शिजल्या नंतरच टाकं हा बाला, नाय तर मग वांदा व्हाचा.) मीठ टाकांचं.

मसाला नं वांगं शिजलं की मंग त्यात शिजवलेला भात टाकुन एकत्र कराचा. झाकान लावून एक वाफ काराची.

मना तललेला वांग पण लय आवरतं. म्हनुन मग मी ४ वांग्याचे काप पन केले.

मंग कं बगतं कं बाला? येना जेवाला.

प्रतिक्रिया

प्रास's picture

2 Sep 2012 - 6:44 pm | प्रास

मिपाबल्लवाचार्यांनी फारच त्रास दिलाय ब्वॉ आज...
असो.
पुन्हा एकदा
धागा पाहिला.
तूर्तास...

अत्रुप्त आत्मा's picture

2 Sep 2012 - 6:54 pm | अत्रुप्त आत्मा

आज दुपारी एके ठिकाणी दाबुन झालेलं बासुंदिचं जेवण,का कोण जाणे कळेनासं व्हायला लागलय...
कुठेतरी हादडीला जाव लागणार ;)

उगा काहितरीच's picture

2 Sep 2012 - 6:56 pm | उगा काहितरीच

करुन पाहावा लागेल !!!
(वांग आणि भात कसा लागत असेल अशा विचारात असलेला) मराठी अन्ना.

प्यारे१'s picture

2 Sep 2012 - 6:56 pm | प्यारे१

वाईट्ट....!

कौशी's picture

2 Sep 2012 - 7:00 pm | कौशी

जमलाय वांगीभात..आवडला.

सुहास झेले's picture

2 Sep 2012 - 7:12 pm | सुहास झेले

मिपाचे नावाजलेले बल्लव व सुगरणी, ह्यांनी एकदम छळवाद मांडला आहे. हल्ली मिपावर येताना इनोचा पुरेसा स्टॉक जवळ बाळगणे गरजेचे आहे ;)

अवांतर - गणपा रॉक्स :) :)

अरे गेल्या काही दिवसांत मिपावर रोजच जिभेचे (की नजरेचे) चोचले पुरवले जातायत. ;)
पाकृ आवडली. मी वेगळ्या पद्धतीने हा भात करते.
तुझ्या कृतीमध्ये थोडा सौधिंडीयन भास होतोय.
तरी इकडे पाठवून दिल्यास मी तोंडभरून कौतुक करेनच!

तुझी पद्धत पण कळु दे ना आम्हाला. :)

कुरीयरच्या पैश्यात थोडेसे पैसे जोडुन मीच यावं म्हणतो एकदा उसात. ;)

अरे कढई गरम झाल्यावर किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं, मग थोड्या तेलावर मिरी, दालचिनी, लवंगा, धणे, जिरे परतायचे. ते काढून तांदळाच्या प्रमाणात तेल वाढवायचं, त्यात फोडणी नेहमीची, बे लिव्हज् , बडी ईलायची एक किंवा दोन, कढीपत्ता, त्यावर वांग्याच्या फोडी परतून मग अर्धा तास आधी धूवून ठेवलेले तांदूळ व काजू हलक्या हाताने परतायचे. आधणाचे पाणी घालून गोडा मसाला, तिखट, आत्ता परतलेला मसाला बारीक करून व थोडं आंबट ताक. किंचित साखर. भात शिजत आल्यावर बाजूने तूप सोडायचे. वाढताना वरून ओलं खोबरं, कोथिंबीर, तूप.
ही कृती नक्की अशीच असते का हे माहित नाही. थोडी या नातेवाईकानं सांगितलेली तर थोडी दुसर्‍या कोणी. ;) एकदा नवीन लग्न झालेली मुलगी कृती विचारायला लागली की सगळ्या सिनियर बायका आपापल्या कृत्या उत्साहाने सांगतात. तशातला प्रकार. :)

गोंधळी's picture

2 Sep 2012 - 7:24 pm | गोंधळी

मस्त.
रविवार असुनही सगळ्या शाकाहारी पा.क्रु. बघुन आनंद झाला.

सानिकास्वप्निल's picture

2 Sep 2012 - 8:04 pm | सानिकास्वप्निल

आज मिपाकरांची दिवाळी आहे...काय एक-से-एक पाकृ आहेत :)
वांगीभाताचा हा प्रकार खूप आवडल्या गेला आहे
करुन बघणारच :)

पैसा's picture

2 Sep 2012 - 10:08 pm | पैसा

जल्लां, कं लिव्हलां, कं लिव्हलां! लैच आवरला रं बाला!

तुमच्या रेशिपीपरीस लिवायची टाईल आवाडली मना.

कच्ची कैरी's picture

3 Sep 2012 - 8:04 am | कच्ची कैरी

भाषा समजायला थोडा वेळ लागला पण रेसेपी उत्कृष्ट दिसतेय ,नक्कीच करुन बघेल .

भरत कुलकर्णी's picture

3 Sep 2012 - 8:21 am | भरत कुलकर्णी

जबरदस्त. यशस्वी पाकृ.

वांगी आणी भात दोन्हीही आवडत नाहीत... सो पास.

खडीसाखर's picture

3 Sep 2012 - 3:05 pm | खडीसाखर

खुप दिवसांपासुन या पाकाकृती च्या शोधात होते. धन्यावाद! :)
आणि नेहमीप्रमाणेच उत्कृष्ठ सादरीकरण!!

मेघवेडा's picture

3 Sep 2012 - 4:44 pm | मेघवेडा

बल्लवांगीश्वरेश्वराचा विजै असो! मिपाच्या या बाब्याल्या बल्लवाकडून प्युव्वर भेज पाकृ बघून भरून पावलो!

नाना चेंगट's picture

3 Sep 2012 - 4:59 pm | नाना चेंगट

चान चान ;)

स्पंदना's picture

4 Sep 2012 - 6:40 am | स्पंदना

ह्ये नव हाय?
आमी जरा येगळा करताव. पर असो . गणपाश्टाईल म्हणजे भारीच असणार न्हाय का?
सगळ्यात भारी भाषेचा तडका. लय आवडला.

निनाद's picture

4 Sep 2012 - 11:15 am | निनाद

वांगी भात हा प्रकार मी जन्मात खाल्ला नसता
पण गणपाशेटच्या पा कृ ने माझे मन पालटले हो!

भारी...

मदनबाण's picture

4 Sep 2012 - 11:35 am | मदनबाण

बाला,जल्ला किती भारी भारी पदार्थ बनवतोस ! ;)

किसन शिंदे's picture

4 Sep 2012 - 11:48 am | किसन शिंदे

या विकांताला करायला सांगेन; )

sagarpdy's picture

4 Sep 2012 - 12:09 pm | sagarpdy

कोणाला? ;)

इरसाल's picture

4 Sep 2012 - 12:28 pm | इरसाल

लय भारी येक पायाच्या कोंबरीचा तिक्कट भात बनवलाय.
आनि ते तुकरे पन मोप भारी बोल.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2012 - 7:23 pm | परिकथेतील राजकुमार

वाट चुकलेला गणपा गवताळ प्रदेशात परत आलेला बघून भयानक आनंद झाला.

आता जरा आळस सोडून पाकृ संपादन करा आणि वांग्याच्या कापाची पण पाकृ द्या.

कापांची पाककृती फार वेगळी नाही काही.

काप करून ते मीठाच्या पाण्यात थोडावेळ बुडवून ठेवले.
लाल तिखट + आलं लसून वाटण + मीठ + २ चमचे तेल + वांगी भात मसाला* एका भांड्यात एकत्र करून मग ते वांग्याच्या कापांना लावून ठेवले १० मिनिट. आणि नंतर तव्यावर शॅलो फ्राय केले.

*वर त्याची कृती दिली आहेच.

एस's picture

4 Sep 2012 - 9:06 pm | एस

प्रचंड आवडली आहे

जाई.'s picture

4 Sep 2012 - 11:04 pm | जाई.

झकास

प्राध्यापक's picture

5 Sep 2012 - 7:56 pm | प्राध्यापक

गणपाभौ ,लै बेष्ट पाकृ,फोटु न तर जीवच घेतला,पोटातल्या जठर्,आतडे,स्वादुपिंड,प्लिहा(हे कुठ असत माहित नाही) इत्यादी अवयवांनी असहकार पुकारला आहे, हे फोटो पाहील्या वर आता दुर्वांकुर ची थाळी जरी कुणी फुकटात खाउ घालतो म्हणल तरी गिळवणार नाही,आता वांगी भातच पाहीजे.

(तुमच्या पाक्रुंचा आणी वांगी भातचा जबरदस्त फ्यान,)
प्राध्यापक.

स्वाती२'s picture

6 Sep 2012 - 6:02 pm | स्वाती२

ओह! मसाला वेगळा आहे हा. मी नेहमी काळा मसाला घालून करते. आता एकदा असा करुन बघेन. जोडीला पेठकरकाकांच्या कृतीने कढी गोळे!