पावभाजी साठी साहित्यः
१. बटाटे,फुलगोबी,हिरवे वाटाणे,फरसबी,सिमला मिर्ची,
(एकुण इन्ग्रेडीएंट्स मध्ये बटाटे साधारण ४०%,फुलगोबी ३०%,हिरवे वटाणे १०%,फरसबी १०%, सिमला मिर्ची १०%)
२. १ मोठा कांदा,
३. १ मोठा टोमॅटो,
४. ४-५ लसुण पाकळ्या,१/२ इंच आले,
५. २ मोठे चमचे तेल,
६. १ मोठा चमचा रेडीमेड पावभाजी मसाला,
७. हळद (१/४ टीस्पुन),
८. तिखट,मीठ (चवीनुसार),
९. बटर,
१०. पाव,
११. कोथींबीर
पावभाजी ची कृती:
१. फुलगोबी,फरसबी,सिमला मिर्ची चिरुन घ्या. हिरवे वाटाणे सोलुन घ्या. बटाटे सोलुन चिरुन घ्या.
२. या सगळ्या चिरलेल्या भाज्या कुकर ला लाऊन शिजवुन घ्या (साधारण ४ शिट्ट्या - मध्यम आचेवर).
३. कांदा, टोमॅटो चिरुन घ्या. आले-लसुण पेस्ट करुन घ्या. माझ्याकडे मिक्सर नसल्याने मी आलं-लसुण किसुन घेतलंय.
४. एका कढईत तेल तापायला ठेवा. तेल तापल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकुन तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता.
५. त्यात आलं-लसुण पेस्ट टाकुन पेस्ट हलकी ब्राउन होईपर्यंत परता.
६. टोमॅटो टाकुन परता.
७. थोडे तेल सुटायला लागले की हळद्,तिखट्,मीठ,पावभाजी मसाला टाकुन परता.
८. कुकर मध्ये शिजवलेल्या भाज्या रवी वापरुन स्मॅश करुन घ्या.
९. कढईतल्या मसाल्यांना तेल सुटायला लागले की त्यात स्मॅश केलेल्या भाज्या टाकुन चांगले परतुन घ्या.
१०. भाजी पाचेक मिनीटे शिजली की कोथींबीर आणि १ टीस्पुन बटर टाकुन आणखी २ मिनीटे शिजवा आणि भाजी तयार!
११. आता एक पॅन थोडा गरम करुन घ्या. पावाला मधुन चाकुने कापुन,दोन्ही बाजुंनी बटर लाऊन पॅनमध्ये मस्त खरपुस भाजुन घ्या.
१२. गरम गरम पावभाजी थोडं बटर टाकुन,बारीक चिरलेला कांदा,लिंबु आणी पावांसोबत पेश करा :)
(कोथींबीर संपल्यामुळे ती 'सजावटी' मध्ये मिसींग आहे :-( )
आईस्क्रीम लस्सी साठी साहित्यः
१. घट्ट दही-१ मोठे चमचे,
२. साखर -४ टीस्पुन, मीठ - चिमुटभर,
३. वॅनिला आईस्क्रीम
कृती:
१. दही,साखर,मीठ ब्लेंडर मध्ये पाचेक मिनीटे घुसळुन घ्या.
२. सर्व्ह करताना एका ग्लास मध्ये लस्सी ओतुन वरुन वॅनिला आईस्क्रीम टाका.
शुभेछा :)
प्रतिक्रिया
2 Sep 2012 - 2:32 am | शुचि
सुरेख मस्त!!! खूप आवडली पाकृ व फोटो.
2 Sep 2012 - 5:25 am | प्रचेतस
काय अत्याचार चाललेत राव पहाटे पहाटे.
2 Sep 2012 - 6:25 am | बहुगुणी
काँबिनेशन कसं लागेल माहित नाही, पण लस्सीही इंटरेस्टिंग वाटते आहे, धन्यवाद!
2 Sep 2012 - 6:41 am | तुषार काळभोर
पण एवढ्या सुंदर पाककॄती मध्ये 'फुलगोबी' व 'सिमला मिर्ची' हे शब्द सारखे खड्यासारखा मध्ये मध्ये येत होते.
2 Sep 2012 - 6:45 am | तुषार काळभोर
आईसक्रीम लस्सी एकदम जीवघेणी आहे :-D
2 Sep 2012 - 7:00 am | रेवती
अशी पावभाजी आयती करून मिळाली तर किती बरं वाटेल. ;) तुम्हाला पाव जास्त भाजलेले आवडत नाहीत का? तरीही छान दिसतायत.
लस्सी चांगली दिसतिये पण एकच प्याला ;) लस्सीसाठी पाच मिनिटं घुस़ळण जास्त नाही का वाटत? की वेळ ही अंदाजे दिली आहे?
2 Sep 2012 - 9:53 am | मदनबाण
छान... :)
2 Sep 2012 - 11:04 am | सुहास झेले
पावभाजी पेक्षा लस्सी हिट आहे ;)
2 Sep 2012 - 1:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच भारी.
-दिलीप बिरुटे
2 Sep 2012 - 1:43 pm | जाई.
सुपर्ब
2 Sep 2012 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा
2 Sep 2012 - 2:59 pm | खडीसाखर
सर्वांच्या उत्स्फुर्त प्रतिसादांकरिता धन्यवाद :)
@रेवती ताई : हो हो, लस्सी घुस़ळण्याची वेळ अंदाजेच दिलेली आहे ;-)
2 Sep 2012 - 3:03 pm | पैसा
मिक्सर नसल्याने अडून न बसता केलेली पावभजी छान झालीय! दोन्हीचे फोटो एकदम झक्कास!
2 Sep 2012 - 4:05 pm | कच्ची कैरी
लस्सी बघुन तोंडाला पाणी सुटले
2 Sep 2012 - 4:08 pm | सानिकास्वप्निल
दोन्ही पाककृती छान झाल्या आहेत :)
लस्सी जास्त आवडल्या गेली आहे :)
2 Sep 2012 - 4:15 pm | भरत कुलकर्णी
दोन्ही (की तिनही) पाकृ छान आहेत वादच नाही,
पण तिनही पदार्थ वेगवेगळे असतांना उगाचच एकत्र दिलेत म्हणून एकच पाकृ गणली जावू शकत नाही.
2 Sep 2012 - 5:33 pm | गणपा
मिपावर स्वागत.
लस्सी जास्त आवडली.
तुमच्या पोतडीतल्या अन्य पाककृत्याही येउंदेत. :)
2 Sep 2012 - 5:42 pm | प्रास
तुम्ही नवीन असलात तरी आमची नेहमीचीच प्रतिक्रिया, धागा पाहिला. तूर्तास....
3 Sep 2012 - 9:08 am | डावखुरा
भुक भडकवली..
3 Sep 2012 - 11:23 am | चावटमेला
लस्सी छानच दिसतीये. ह्या वीकांताला ट्राय केली जाईल..
4 Sep 2012 - 10:22 am | इरसाल
ह्या लस्सीला आमच्याकडे "घमंडी लस्सी " म्हणतात.
5 Sep 2012 - 6:13 pm | सुमीत भातखंडे
ऑल टाइम फेवरिट..
30 Sep 2012 - 4:07 am | मैत्र
दोन वेळा करून पाहिली..बेष्ट झाली पावभाजी. आत्तापर्यंतची सगळ्यात उत्तम जमलेली पाव भाजी होती माझी..
फक्त भाज्यांचं प्रमाण पेठकर काकांच्या या पावभाजीचं (http://www.misalpav.com/node/816) घेतलं..
खूप धन्यवाद!
30 Sep 2012 - 1:05 pm | दादा कोंडके
पण पावभाजीमध्ये चमचाभर सुक्या बोंबलाची पूड टाकली नाही तर त्याला 'ती' चव येत नाही.