तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है !

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in जनातलं, मनातलं
4 Aug 2012 - 12:39 pm

आभाळ भरुन येतं. काळेकुट्ट ढग चहूबाजूंनी घेरुन टाकतात. कधी अचानक हलका वाहणारा वारा उग्र रुप धारण करतो तर कधी स्तब्ध बनून कोंडून टाकतो. वार्‍याने तोंडावर सगळीकडे पसरलेले काळेभोर केस सावरणारी ती अशीच दिसायची. मग मी हलकेच तिला काहीतरी चिडवायचो. बघता बघता तिचे डोळे भरुन यायचे. कधी कधी शिडकावा पण व्हायचा. माझी त्या शिडकाव्यात भिजायची लगबग पाहून ती खुदकन हसायची. श्रावणात उनपावसाचा खेळ कसा असतो हे तेव्हा मला कळलं. भादव्याचं ऊन अजून लांब होतं. चिंब धारांनी भिजणं चालू होतं.

तिची आणि माझी पहिली भेट सुद्धा पावसातलीच. तसं तिला मी पहात होतो. ती मला पहात होती. कधी तरी एका रस्त्यावर नजर भेट होत होती. परिचय नव्हता. करुन घ्यावासा वाटत होता पण धीर होत नव्हता. एक दिवस जोरदार पावसाचा मारा छत्रीवर झेलत मी चालत होतो. कोपर्‍यावर एका बंगल्याच्या आडोशाने ती अंग चोरत उभी होती. तिच्याकडे पाहिले. तिने सुद्धा नजर मिळवली. काय झाले कळले नाही. मी रस्त्याच्या कडेला होत छत्री थोडी बाजूला सरकवली. पटकन ती छत्रीत आली आणि आम्ही चालू लागलो. सुरवातीला असलेला पावलांचा वेगळा ताल केव्हा एकताल झाला ते कळलेच नाही. जणू जन्मांतरीची भेट व्हावी अन सगळं काही परिचित असावं तसंच.

तिच्या सोबत घालवलेला हर एक क्षण रोमरोमात भिनून गेला. तिच्याबरोबर हळु हळू माझा मी बदलत होतो. स्वभावाचे टोकदार कंगोरे कदाचित कमी होत होते. तु बदलला आहेस असं मित्र म्हणत तेव्हा मी हसून उडवून लावायचो. पण एकंदरीत जग कसं सुंदर वाटायला लागलं होतं. सगळं काही तेच होतं. माझी नजर बदलली होती. तेच आकाश, तेच ढग, तीच नदी, तेच तळे, तोच गाव, तेच रस्ते, सर्व काही तेच. पण आता सर्व हवेहवेसे आणि नवेनवेसे वाटत होतं. चर्चा वादविवाद यांचा कंटाळा आला होता. बास ! ती आहे आणि मी आहे. याशिवाय बाकी काही नको.

कधी कधी मनात विचार यायचा ती नव्हती तेव्हा कसं होतं आयुष्य ! आणि आता ती आहे तेव्हा त्या आयुष्यात काय कमी होतं त्याची जाणीव होत होती. उगाच भटकणं, तंद्री लावून विचारात गुरफटणं, अकारण दारु पिणं, सिगारेटी फुंकणं अचानक कमी झालं. का कोण जाणे तिने कधी हे करु नको ते करु नको असं म्हटलं नाही, पण बदल झाला.

असंच आयुष्य एकमेकांना साथ देत जगायचं ही शपथ घेतली होती. शपथ मोडण्याचा कधी प्रसंग आलाच नाही. हातात हात मिसळून आयुष्यातील सुख दु:खांना सामोरं जायचं ठरवलं खरं. पण माझ्या आयुष्यातील दु:खांचा जाब विचारायला आणि रदबदली करुन सुख मिळावं म्हणून याचना करायला नक्षत्रांच्या गावाला न सांगता निघून गेली. लख्ख चांदणं पडलं की त्या चांदण्यामधे तिचा चेहरा दिसतो. तेच ते हलके स्मित आणि केव्हाही झर झर वाहू लागतील असे टपोरे डोळे. त्यांच्याकडे पहातांना उरातील क्षोम झाकावाच लागतो तरी तिला ते कळतंच आणि एक अश्रू सर्रकन तिच्या गालावरुन ओघळतोच. चमचम करत विझून जातो.

काळेकुट्ट ढग भरुन येतात तेव्हा तिच्या काळ्याभोर केसांची आठवण येते. मन पुन्हा पुन्हा बावरतं आणि जिकडे तिकडे तिचाच भास होऊ लागतो. तिच्याशिवाय जगणं भाग आहे पण तिच्याशिवाय जगणं अवघड आहे. सुरेल महफिल चालू असतांना अचानक तंबोर्‍याच्या तारा तुटाव्या आणि सगळं शांत शांत व्हावं. कोपर्‍यातल्या घड्याळाचा टीक टीक जीवघेणा आवाज येत रहावा आणि गायकाने महफिलीतून निघून जावे. अभागी श्रोत्याच्या नशीबी फक्त रिकामा रंगमंच आणि लोंबकणार्‍या तारांचा तंबोरा पहाण्याचे भाग्य असावे.

आयुष्यात सर्व काही मनासारखं होत नाही पण जे झाले त्याची आठवण गोंजारत जगणे भाग असते. जेव्हा जेव्हा आठवणींचा पूर व्याकूळ करतो तेव्हा दोन्ही हात वर करत एखाद्या डोंगराच्या माथ्यावर उभे राहून फक्त हेच सुर येतात "तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है , जहाँ भी जाऊ ये लगता हैं तेरी महफ़िल है "

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

स्वप्नाळू's picture

4 Aug 2012 - 12:51 pm | स्वप्नाळू

अप्रतिम...

कॉमन मॅन's picture

4 Aug 2012 - 1:02 pm | कॉमन मॅन

अतिशय सुरेख प्रकटन...

sneharani's picture

4 Aug 2012 - 1:37 pm | sneharani

जबरदस्त....एकदम सुंदर!!

शैलेन्द्र's picture

4 Aug 2012 - 5:49 pm | शैलेन्द्र

+१

मूकवाचक's picture

6 Aug 2012 - 4:28 pm | मूकवाचक

+१

टिवटिव's picture

4 Aug 2012 - 2:05 pm | टिवटिव

खुप छान...

कवितानागेश's picture

4 Aug 2012 - 2:46 pm | कवितानागेश

:)

पैसा's picture

4 Aug 2012 - 5:54 pm | पैसा

खूप म्हणजे खूपच आवडलं. मरेपर्यंत कधीतरी इतकं रोमँटिक होता येईल का असं वाटून गेलं क्षणभर!

मन१'s picture

7 Feb 2013 - 4:21 pm | मन१

त्यापेक्षा ह्या रोमँटिसिझम मधून बाहेर कधी पडलो तर बरं होइल असं वाटायला लागलय.

छान
शेवटचा पँरा आवडला

सुहास..'s picture

5 Aug 2012 - 12:38 am | सुहास..

हं .. अजून एक !

जेनी...'s picture

5 Aug 2012 - 2:51 am | जेनी...

:)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2012 - 11:36 am | परिकथेतील राजकुमार

कधितरी मुखवटा उतरतो आणी खरा नाना बाहेर येतो.

किसन शिंदे's picture

5 Aug 2012 - 12:19 pm | किसन शिंदे

आवडलं! :)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2012 - 3:43 pm | अत्रुप्त आत्मा

पक पक पक's picture

5 Aug 2012 - 3:56 pm | पक पक पक

मस्त ...... :)

मिहिर's picture

5 Aug 2012 - 7:52 pm | मिहिर

आवडलं!

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Aug 2012 - 10:45 pm | बिपिन कार्यकर्ते

:)

जयनीत's picture

6 Aug 2012 - 3:13 am | जयनीत

आवडलं.

सुनील's picture

6 Aug 2012 - 5:21 am | सुनील

सुरेख आणि हळुवार मुक्तक. आवडलं.

स्पंदना's picture

6 Aug 2012 - 5:52 am | स्पंदना

रडवलस बघ सकाळी सकाळी.

प्रभो's picture

6 Aug 2012 - 4:15 pm | प्रभो

नान्या, भारी!!
:)

प्रीत-मोहर's picture

6 Aug 2012 - 4:17 pm | प्रीत-मोहर

लै भारी नान्या!!

विजुभाऊ's picture

6 Aug 2012 - 4:28 pm | विजुभाऊ

त्या नान्याला धरुन बदडा रे कोणीतरी.......... आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एकदम सेंटी केलं

चैतन्य दीक्षित's picture

6 Aug 2012 - 4:35 pm | चैतन्य दीक्षित

हळुवार प्रकटन.
शेवटचा पॅरा खरंच अप्रतिम उतरलाय.
सालं असलं काही वाचलं की वाटतं 'आपल्याला का नाय सुचत असं काही लिहायला'

अक्षया's picture

6 Aug 2012 - 4:45 pm | अक्षया

सुरेख लिहिले आहे..:)

श्रावण मोडक's picture

6 Aug 2012 - 4:59 pm | श्रावण मोडक

!

तू नहीं तो जिन्दगी में, और क्या रह जाएगा ?? ...
दूर तक तनहाईंयों का सिलसिला रह जाएगा !

दर्द की सारी तहे और सारे गुजरे हादसे...
सब धुवां हो जायेंगे, एक वाकिया रह जाएगा !

यूँ भी होगा वो मुझे दिल से भूला देगा मगर,
ये भी होगा खुद उसी में एक खला रह जाएगा !

दायरे इनकार के, इकरार की सरगोशियाँ ....
ये अगर टूटे कभी, तो फासला रह जाएगा !

Nana is back into his own form ! :-) प्रकटन आवडले !!

प्राजक्ता पवार's picture

6 Aug 2012 - 6:15 pm | प्राजक्ता पवार

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2012 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, असं तकलिफ होणारं काहुन लिव्हतो रे बाबा. :)

-दिलीप बिरुटे

मन१'s picture

7 Aug 2012 - 7:32 pm | मन१

नान्याच्याच जुन्या लेखांच्या धाटणीचं आहे.

हर एक फूल किसी याद सा मेहेकता ह्ये
हर एक फूल किसी याद सा मेहेकता ह्ये...
तेरे खयाल से जागी हुइ फिजाये ह्ये
ये सिर्फ पेड ह्ये या प्यार कि दुवाये ह्ये
तु पास हो के नहि फिरभी तु मुकाबिल ह्ये
जहा भी जाऊ ये लगता ह्ये तेरी मेहेफिल ह्ये !!

तु इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल ह्ये !!

बॅटमॅन's picture

8 Aug 2012 - 11:26 pm | बॅटमॅन

ह्ये ह्ये ह्ये :P

हासिनी's picture

7 Feb 2013 - 1:40 pm | हासिनी

मस्त मुक्तक!!
:)

मृत्युन्जय's picture

7 Feb 2013 - 2:09 pm | मृत्युन्जय

काटा आला वाचताना. प्रेमभंगाचे दु:ख भोगलेले असल्याशिवाय असे लिहिताच येणार नाही हो. बहुत गहरी चोट खायी लगता है.

मन१'s picture

7 Feb 2013 - 2:15 pm | मन१

आशस्याशी सहमात.
फक्त "दु:ख" ह्या शब्दाऐवजी "अनुभव" हा शब्द अधिक इष्ट वाटतो.

विलासिनि's picture

7 Feb 2013 - 3:11 pm | विलासिनि

दु:खी मनाच्या व्याकूळ स्थितीचा स्पर्ष जाणवला तुमच्या लिखाणातून.

चिगो's picture

7 Feb 2013 - 4:11 pm | चिगो

अप्रतिम..

सुरेल महफिल चालू असतांना अचानक तंबोर्‍याच्या तारा तुटाव्या आणि सगळं शांत शांत व्हावं. कोपर्‍यातल्या घड्याळाचा टीक टीक जीवघेणा आवाज येत रहावा आणि गायकाने महफिलीतून निघून जावे. अभागी श्रोत्याच्या नशीबी फक्त रिकामा रंगमंच आणि लोंबकणार्‍या तारांचा तंबोरा पहाण्याचे भाग्य असावे.

.. :-(

पुन्हा एकदा, जिंकलंस नाना..
(नानांचा फ्यान) चिगो..

अभ्या..'s picture

8 Feb 2013 - 1:56 am | अभ्या..

सुरेख लिहिलात नाना. एकदम आवडून गेले.
कधीतरी आपल्या गविंनी म्हणल्याप्रमाणे एखादे गाणे साँग ऑफ द डे होते.
हे तर साँग ऑफ द इयर्स झालेले.
त्यामुळेच..

अप्रतिम लेख... लेख वाचून भूतकाळात गेल्यासारख वाटलं....
काही वेळ प्रतिक्रिया द्यायचं देखील भान नव्हत...
भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आठवला ......

नाहीरती इष्कात होता, दर्द आम्हाला हवा
पाकळ्यांचे काय, त्यांचा गंध आम्हा हवा||

उपास's picture

8 Feb 2013 - 9:59 am | उपास

तू का लिहितॉस असं.. तू मोकळा होतोस पण आम्हाला हळवं करुन जातोस त्याचं काय!
पाडगावकरांची 'तेव्हाची ती फुलं..' आठवली, उगाचंच!

विजुभाऊ's picture

2 Sep 2014 - 8:09 pm | विजुभाऊ

नान्या किधर है रे तू?
बुकमार्क करून ठेवलेला हा लेख उघडायचे धाडस होत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2014 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जिथे असशील तेथून नाना परत ये.... तुझा चेंगटपणा आवडत नसला तरी कधी तरी मनापासून लिहिलेले लेख आवडायचे रे....

-दिलीप बिरुटे
(नाना चेंगट उर्फ़ अवलिया उर्फ़ मारकुटे यांच्या चांगल्या लेखनाचा पंखा)

मदनबाण's picture

4 Sep 2014 - 12:17 pm | मदनबाण

वरील संपूर्ण प्रतिसादाशी संपूर्णपणे सहमत !

जाता जाता :- इजुभाउंना खोदकामाची आलेली लहर परत एकदा लक्षात आली आहे, हा खोदलेला कितवा लेख म्हणावा ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way
{We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com

कवितानागेश's picture

4 Sep 2014 - 12:38 pm | कवितानागेश

वर काढल्यापासून ५व्यांदा वाचतेय.

अनुप ढेरे's picture

4 Sep 2014 - 1:30 pm | अनुप ढेरे

या आयडी ला पंख लावलेत का ही देखील आत्महत्या? 'अवलिया'सारखी?

प्यारे१'s picture

4 Sep 2014 - 1:47 pm | प्यारे१

:) खरंच माहिती नाही का?

इनिगोय's picture

4 Sep 2014 - 12:07 pm | इनिगोय

जाने कहां गये वो दिन..
मिपावर एकेक सुंदर रत्नं आहेत. विजुभाऊ आभार, या रत्नावरची धूळ झटकल्याबद्दल.

बॅटमॅन's picture

4 Sep 2014 - 12:12 pm | बॅटमॅन

काय शिंची कटकट आहे! उगीच सेंटी केलं.