पॅटर्न्स आणि ज्योतिष : एक शक्यता ?

सोत्रि's picture
सोत्रि in काथ्याकूट
23 Jul 2012 - 10:23 pm
गाभा: 

नुकताच व्यवस्थापकीय प्रशिक्षणाचा, कंपनीने आखलेला (कंपनीचे पैसे खर्च करून) 'उद्याचे नेतृत्व (Tomorrows Leadership)' हा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. फारच माहितीवर्धक आणि ज्ञानप्रबोधक असा अभ्यासक्रम होता. एकंदरीत कंपनीतील बर्‍याच नवीनं सहकार्‍यांची भेट होऊन त्यानिमीत्ताने नवीनं मित्र झाले आणि 'नेटवर्किंग' ह्या कॉर्पोरेट जगतातील एका पर्वाला सुरुवात झाली. असो मुद्दा तो नाही.

ह्या अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे एखाद्याचे 'Organizational Behavior' ओळखणे. त्यातून त्याचा 'नेतृत्वगुण गुणांक' आणि 'नेतृत्वशैली' पडताळणे. त्यासाठी त्या प्रशिक्षण देणार्‍या कंपनीने एक 'डिस्क (DISC) प्रोफाइल' नावाची एक प्रश्नमंजूषा असलेली संगणकप्रणाली तयार केली होती. त्या संगणकप्रणालीत, काम करताना, कामाच्या ठिकाणी उद्भवणार्या वेगेवेगळ्या परिस्थिती, त्यावेळी उद्भवणारे कलह व ते हाताळण्याची पद्धत, कंपनीतील सहकार्‍यांशी आणि सीनियर मॅनेजर्स बरोबर केली जाणारी आपली वागणूक अश्या बर्‍याच विषयांवर, त्या त्या परिस्थितीत तुम्ही आहात असे समजून आणि त्यावेळी कसे वागाल आणि कसे वागणार नाही ह्याची उत्तरे त्या प्रश्नमंजुषेत द्यायची होती. ही प्रश्नमंजूषा ऑब्जेक्टीव्ह प्रकाराची होती. कसे वागाल आणि कसे वागणार नाही ह्यासाठी प्रत्येकी फक्त एक पर्याय सिलेक्ट करायचा. हा, थांबा, तुम्हाला वाटते तेवढी ती प्रश्नमंजूषा सोपी अजिबात नव्हती. कसे वागाल आणि कसे वागणार नाही ह्या उत्तरांच्या पर्यायांमध्ये एक अतिशय थिन लाइन होती. उत्तरे द्यायची अट एकच होती, नैसर्गिकरीत्या जसे वागाल तसाच विचार करून पर्याय निवडायचे, तार्किकदृष्ट्या समर्पक उत्तर काय असेल ते विचार करून पर्याय निवडायचा नाही. पण ते पर्याय असे खत्रुड होते की नैसर्गिक उबळ येऊनच पर्याय निवडला जायचा. खूप विचारपूर्वक ती प्रश्नमंजूषा तयार केल्याचे जाणवत होते. त्यामुळे मग जरा सीरियस होऊन उत्तरे दिली. त्यानंतर १-२ दिवसांनी त्याचा निकाल लागून प्रत्येकाचे डिस्क (DISC) प्रोफाइल कळणार होते. D - Dominance, I - Influence, S - Steadiness आणि C – Conscientiousness ह्यावर आधारित ते प्रोफाइल असणार होते.

त्या निकालाचे एक ईमेल १-२ दिवसांनी आले, पण मुख्य कामात व्यस्त असल्याने त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. प्रशिक्षणाच्या पुढच्या कार्यशाळेत गेल्यावर सर्वांची चर्चा चालू होती आपापल्या डिस्क प्रोफाइलवर. एक नवीनच झालेला बंगाली मित्र, पार्था, एकदम उत्साहात माझ्याजवळ आला आणि माझे प्रोफाइल काय आले ते विचारू लागला. माझी एकदम फाफलली कारण मी ते मेल बघितलेच नव्हते. त्याला तसे सांगितल्यावर, “अरे, मेल चेक कर ना बाबा” असे म्हणत माझ्या मागेच उभा राहिला. माझ्यापेक्षा जास्त उत्साहाने तो माझे प्रोफाइल बघण्यासाठी का बरे उतावीळ झाला आहे ते मला कळेना. त्याला तसे विचारल्यावर एकदम जोरात म्हणाला, “अनबिलीव्हेबल! स्साला, उस प्रोफाइल मे एकदम कुंडली लिखा है यार हर एक का”. च्यायला, हे बंगाली सगळेच काळ्या जादूच्या प्रभावाखाली असतात की काय असा विचार चमकून गेला आणि त्यावर हसत हसत मी माझे प्रोफाइल उघडले आणि माझी मतीच गुंग झाली. अगदी आरशात प्रतिबिंब दाखवावे तसे त्या प्रोफाइलमध्ये माझे सर्व 'गुण' उधळलेले होते. माझी निर्णयक्षमता, नेतृत्वशैली, वागणूक, conflict management style, pressure handling capacity अशा अनेक पैलूंवर प्रत्येकी अर्धे पान असे विवेचन होते. अगदी कुंडलीत जसे ग्रहमान मांडलेले असते अगदी तसेच, वेगवेगळ्या आलेखांसकट, तंतोतंत खरे. मी चाटच पडलो. त्या प्रशिक्षण देणार्‍या बाबाला (हो, त्याला आता 'बाबा' म्हणणेच भाग होते) पकडून हे असे कसे काय होऊ शकते ते विचारले. त्याने मग वेगवेगळे १५-२० डिस्क पॅटर्न्स आहेत आणि आम्ही दिलेल्या उत्तरांच्या आधारे (ठराविक निर्णयक्षमतेमुळे) आम्ही कोणत्या पॅटर्न्स मध्ये मोडतो ते ठरवले जाते असे सांगितले. हे सर्व मी अतिशय सोप्या भाषेत आता इथे सांगतोय प्रत्यक्षात त्याने खूपच क्लिष्ट आणि तांत्रिक भाषेत ते समजावून सांगितले. पण मुख्य गाभा हाच की 'पॅटर्न्स'.

ती कार्यशाळा संपल्यावर बसने घरी येता येता ह्या पॅटर्न्स वर विचार करायला वेळ मिळाला. प्रत्येक क्षेत्रात हे पॅटर्न्स असतात. स्थापत्यशास्त्रात आर्किटेक्चरशी निगडित अनेक पॅटर्न्स आहेत त्यांच्याद्वारे मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारती बांधताना त्यांची फार मदत होते. संगणक प्रणाली तयार करताना 'पॅटर्न्स' हा एक बझवर्ड झालेला आहे. डिझाइन पॅटर्न्स, सॉफ्टवेअर अर्किटेक्चरल पॅटर्न्स, UI पॅटर्न्स असे शेकड्याने पॅटर्न्स आहेत. तर हे पॅटर्न्स म्हणजे काय? तर आमच्या संगणक क्षेत्रात त्याला 'In software engineering, a design pattern is a general reusable solution to a commonly occurring problem within a given context' असे म्हटले जाते. तर विकिपीडियानुसार पॅटर्न म्हणजे, Pattern is a type of theme of recurring events or objects. The elements of a pattern repeat in a predictable manner. Patterns can be based on a template or model which generates pattern elements, especially if the elements have enough in common for the underlying pattern to be inferred, in which case the things are said to exhibit the unique pattern.

मग अचानक मनामध्ये एक विचार चमकला की जर सर्व क्षेत्रात ह्या पॅटर्न्स नुसार प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स शोधता येऊ शकतात तर आपल्या पूर्वजांनी ह्याच पॅटर्न्स च्या आधारे ज्योतिषशास्त्र विकसित केले नसेल कशावरून? म्हणजे बघा. आपली प्राचीन संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे. आणि त्या काळात खगोलशास्त्रही विकसित झालेले होते. मानवाला मी कोण? आणि माझे ह्या ब्रह्मांडाशी नाते काय? हे प्रश्न पडून त्याचे उत्तरे मिळवणे त्या काळापासूनच चालू झालेले आहे. अवकाशाचे, तार्‍यांचे, ग्रहांचे निरीक्षण करून त्याच्या नोंदी घेणे त्यावेळेपासूनच सुरू झाले असणार. त्या ओघातच पुढे वेगवेगळ्या ग्रहांच्या स्थिती आणि त्याचे मानवजातींवर होणारे परिणाम यांच्याही नोंदी ठेवणे सुरू झाले असावे. आता ह्या नोंदी घेणे आणि जपून ठेवणे वर्षानुवर्षे (शेकडो) चालले असणार. त्यामुळे त्यातले पॅटर्न्स ओळखणे कठीण नाही. मग पुढे त्या पॅटर्न्स च्या नोंदी घेणे चालू होऊन त्यांतूनच पुढे ठोकताळे बांधणार्‍या होराशास्त्राचा जन्म झाला असावा. पुढे ह्या नोंदींचे प्रमाण वाढले जाऊन आणि त्यानुसार बांधण्यात आलेले होरे खरे होण्याचे प्रमाण वाढून त्यांतूनच ज्योतिषशास्त्राचा जन्म झाला असावा का?

त्याही पुढे, सर्व विश्वाची उत्पत्ती ही 'बिग बॅंग' ने झाली. त्यापासूनच हे चराचर निर्माण झाले. सर्व विश्व एका अनामिक शक्तीने एकत्र बांधलेले आहे. एक विशिष्ट परस्परसंबंध आणि एक तोल आहे ह्या सर्व ग्रह-तार्‍यांचा एकमेकांबरोबर. ते एकमेकांवर परिणाम करू शकतात. मग आपणही ह्याच 'बिग बॅंग' ची निर्मिती आहोत तर मग त्यांचा आपल्यावर परिणाम होणे का शक्य नाही? किंवा जो एक ताळमेळ ह्या ग्रह-तार्‍यांचा एकमेकांशी आहे आणि त्यामुळे हा विश्वाचा डोलारा उभा आहे, आपणही का त्याचा भाग नाही? किंवा त्या ताळमेळाशी आपला का संबंध असू नये?

जर ज्योतिषशास्त्राकडे, पॅटर्न्स आणि आपणही ह्या 'बिग बॅंग' ची निर्मिती आणि पर्यायाने ब्रह्मांडाचा एक पूरक भाग ह्या अँगलने जर बघितले तर ज्योतिषशास्त्र फक्त एक थोतांड आहे 'न मानण्यास' वाव असू शकतो. मी काही ह्या विषयातला जाणकार नाही. काहीतरी विचार मनात आले, जे विस्कळीत असण्याची शक्यताच जास्त आहे. पण जाणकारांनी ह्यावर आपापली मते व्यक्त केली तर चर्चा घडून ज्ञानात भर पडावी हाच हेतू आहे ह्या लेखामागे.

प्रतिक्रिया

रेवती's picture

23 Jul 2012 - 10:44 pm | रेवती

चांगला चर्चाविषय.
लेखन आवडले.
माझ्या वडीलांचा जोतिषावर विश्वास नसल्याने बरेच वर्षांपूर्वी मित्राशी झालेल्या एका चर्चेमुळे हे एक शास्त्र आहे असा दृष्टिकोन ठेवून त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यांना पत्रिका करणे, पाहणे, अमूक एका घरात तमूक ग्रह असे काहिसे शिकताना पाहिले होते. ते सगळे येत असले तरी अजूनही त्यांचा जोतिषावर पूर्ण विश्वास नाही. ते स्वत: बरेच धार्मिक असल्याने मला ते 'विश्वास नसणे' अजूनही बुचकळ्यात पाडते. त्यावर मी कितपत विश्वास ठेवावा याबद्दल अजून द्विधा मनस्थिती आहे.
जमल्यास चर्चा वाचीन.

अर्धवटराव's picture

23 Jul 2012 - 10:45 pm | अर्धवटराव

ज्योतिष्य ( "शास्त्र" मुद्दाम वगळलं ) हे पॅटर्न रिकग्नीशच आहे. कुठल्याही ऑब्जेक्ट ची आजची स्थिती रिव्हर्स गिअर मारुन बिग बँग पर्यंत मागे नेता येते हे ही सत्य. प्रत्येक सजीव / निर्जीव शरीर हे ब्रह्मांडावर आणि ब्रह्मांड त्या शरिरावर परिणाम करते या बाबतीत हि कोणाचे दुमत नसावे.
ज्योतिष्याच्या बाबतीत काहि मुख्य आक्षेप म्हणजे:
१) ते प्रॉबॅबिलेटी थेअरी वर आधारीत आहे हे मान्य करण्याऐवजी ति काळ्या दगडावरची रेघ मानणे
२) या प्रॉबॅबिलिटीच्या इक्वेशनमध्ये नेमके कुठले पॅरॅमिटर्स घ्यावे व का घ्यावे याबद्दलच्या नीरक्षीर माहितीचा अभाव
२) शरीर सृष्टीवर आणि सृष्टी शरीरावर जे काहि परिणाम करते त्यात हस्तक्षेप करता येण्याबद्दलचे दावे
३) सजीवांचा "जीवंतपणा" या सर्व भानगडीत किती कशी भुमिका निभावतो या बद्दलचा गोंधळ (हा गोंधळ कधिच निस्तरणार नाहि हे सांगायला कुणी ज्योतिष लागत नाहि ;) )

सोत्री भाय, आपकी कुंडली भेज देना...मिपा स्टाईलने या धाग्याचा गुंता कधी होणार याचं नेमकं भाकित करावं म्हणतो :D

अर्धवटराव

१) ते प्रॉबॅबिलेटी थेअरी वर आधारीत आहे हे मान्य करण्याऐवजी ति काळ्या दगडावरची रेघ मानणे
२) या प्रॉबॅबिलिटीच्या इक्वेशनमध्ये नेमके कुठले पॅरॅमिटर्स घ्यावे व का घ्यावे याबद्दलच्या नीरक्षीर माहितीचा अभाव

प्रॉबॅबिलिटी थिअरीला प्लीज बदनाम करू नका हो साहेब. कार्ल पीअरसन, प्रशांतचंद्र महालानोबिस, आर ए फिशर वैग्रे लोक एकदम ओरडल्यागत वाटलं ;) बेयेशियन तर राहूदेच, साध्या फ्रीक्वेंटिस्ट प्रॉबॅबिलिटी थिअरीच्या स्टॅटिस्टिकल चाळणीत तरी ज्योतिष बसते की नाही कोण जाणे - माझ्या माहितीत तरी असा निष्कर्ष स्टॅटिस्टिकल आधारावरती कोणी काढल्याचे माहिती नाही. जे पुसट रेफ्रन्स आठवतात ते स्टॅटवाल्यांनी ज्योतिषाची ठासल्याचेच. निव्वळ एंपिरिकल ठोकताळे म्हणजे प्रॉबॅबिलेटी थेअरी नव्हे . पार लाप्लेस आणि गॉसच्या काळापासून विकसित होत आलेले आणि कोल्मोगोरोव साहेबांनी शिस्त लावलेले ते एक अतिशय शिस्तबद्ध शास्त्र आणि एक कला आहे. तिचा गैरवापर लै म्हंजे लै होतो, पण ते एक साऊंड शास्त्र आहे.

ज्योतिषाची व्यवस्थित मारलेली इथे बघा. त्यावरची टीका इथे बघा. दोन्हींमधील साधकबाधक काय ते सवडीने वाचून कधीतरी चर्चिता येईल, सध्या संदर्भ देऊन गप्प बसतो, म्ह. काडी सारतो ;)

तुमचा मुद्दा पटला, पण विशिष्ट वा़क्यांवरचा आक्षेप समजून घ्याल अशी अपेक्षा आहे :)

अवांतरः हे असले प्रयोग नाडीबद्दल कोणी केले तर मजा येईल.

स्वानन्द's picture

24 Jul 2012 - 2:11 am | स्वानन्द

>>अवांतरः हे असले प्रयोग नाडीबद्दल कोणी केले तर मजा येईल.
नक्कीच मजा येईल. नाडीपट्टीमध्ये भूतकाळ आणि व्यक्तीची माहिती तंतोतंत असते हा अनुभव आहे. भविष्यकधनाबद्दल आत्ताच सांगता येणार नाही.
पण यु.जी. कृष्णमुर्तींच्या दोन्ही नाडीवाचनाचे दुवे पाहिले असता नक्कीच आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.

यु.जी. कृष्णमुर्तींच्या दोन्ही नाडीवाचनाचे दुवे कोणते?

अर्धवटराव's picture

24 Jul 2012 - 2:25 am | अर्धवटराव

बरं... प्रॉबॅबिलिटी थेअरी न म्हणता शक्यतांचा सिद्धांत म्हणुया :) ( तसंही "प्रॉबॅबिलिटी थेअरी" टंकायला खुप कष्ट पडतात;) ). इथे शक्यतांचा विचार या साठी कि जे काहि ग्रह, नक्षत्र, जन्मस्थान, वेळ (भास नसेल तर) वगैरे घटक मांडले जातात त्यातला कुठला घटक किती अचुकतेने पकडण्यात आला आहे हे कुंडली बनवणार्‍याला किती पेंग आली आहे, सुईण किती पैसे घेणार आहे, अपत्याचं स्वागत करायला घरची मंडळी किती उत्सुक आहेत या सर्व बाबींवर अवलंबुन असते.

अर्धवटराव

इथे शक्यतांचा विचार या साठी कि जे काहि ग्रह, नक्षत्र, जन्मस्थान, वेळ (भास नसेल तर) वगैरे घटक मांडले जातात त्यातला कुठला घटक किती अचुकतेने पकडण्यात आला आहे हे

कुंडली बनवणार्‍याला किती पेंग आली आहे, सुईण किती पैसे घेणार आहे, अपत्याचं स्वागत करायला घरची मंडळी किती उत्सुक आहेत या सर्व बाबींवर अवलंबुन असते.

लै भारी!!

चित्रगुप्त's picture

24 Jul 2012 - 12:17 pm | चित्रगुप्त

कुंडली बनवणार्‍याला किती पेंग आली आहे, सुईण किती पैसे घेणार आहे, ... या सर्व गो ष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत. हल्ली इस्पितळात नेमकी वेळ नोंदवली जाते, आणि कुंडली संगणकावर अचूक बनवली जाते.
बाकी भविष्य जाणणे हा वेगळा विषय झाला. अगदी अचूक वेळ व कुंडली असेल तर त्यावरून वर्तवलेले भविष्य अचूक असते का ?

बाकी भविष्य जाणणे हा वेगळा विषय झाला. अगदी अचूक वेळ व कुंडली असेल तर त्यावरून वर्तवलेले भविष्य अचूक असते का ?

हे महत्वाचे.

अर्धवटराव's picture

24 Jul 2012 - 8:26 pm | अर्धवटराव

संगणकावर डाटा फीड करणारे देखील माणसं असतात, आणि हॉस्पीटलच्या अचुक वेळ नोंदणीविषयी मी १०० % सहमत नाहि.
राहिला भाग, कि जर कुंडली अचुक बनवली असेल तर भविष्य अचुक वर्तवता येते का... तर उत्तर आहे " हो...बर्‍याच अंशी." परत, १००% अचुक का नाहि... तर त्याची कारणं पहिल्या प्रतिसादात दिली आहेत.

बाय द वे... कुंडली वगैरे न बघताहि अचुक भविष्य सांगता येते ;)

अर्धवटराव

मन१'s picture

24 Jul 2012 - 11:20 am | मन१

"तुम्ही असे आहात" असे म्हणून कुणाचेही ध्यान वळवून घेता येते. त्यानुसार वाटेल ते सांगता येते ह्या आशयाचा एक गविंचा धागा होता. माझ्या वाचखूणांत आहे.
ज्योतिष हा एव्हरग्रीन जालिय विषय आहे. त्यामुळे चालु द्यात.
बरीचशी माहिती खालील लिंकांवर मिळेलः-
http://mr.upakram.org/node/806
http://mr.upakram.org/node/992
http://mr.upakram.org/node/947
http://mr.upakram.org/node/945
http://mr.upakram.org/node/814
http://mr.upakram.org/node/1065
http://mr.upakram.org/node/843
http://mr.upakram.org/node/955
http://mr.upakram.org/node/991
ह्या सिरिजचा भाग नसलेला अजून एक धागा http://mr.upakram.org/node/465.
हल्ली दोन्ही सर्वसाधारणपणे तेच तेच मुद्दे येताना दिसताहेत. रंगमंचावर नवीन अभिनेत्यांनी जुनीच गाजलेली पात्रे वठवत रहावीत आणि जुन्यांनी संन्यास घ्यावा तसे काहीसे. अभिनेते गाजतात, जातात, पात्रे कायम तीच, तिथेच असतात.

आत्मशून्य's picture

24 Jul 2012 - 12:47 pm | आत्मशून्य

अभिनेते गाजतात, जातात, पात्रे कायम तीच, तिथेच असतात.

मस्त.

कापूसकोन्ड्या's picture

24 Jul 2012 - 9:53 am | कापूसकोन्ड्या

प्रिय सोत्रीजी
१) एका नव्या विषयाला हात घातल्याबद्दल स्वागत. चर्चा विषत अवघड आहे.पॅटर्न्स ज्याला आपण traits म्हणतो ते बदलू शकतात. (शिक्षण, वाचन, सहवास, वगैरे) भविष्य पहताना याचा विचार केला जातो का? फक्त ग्रह स्थिती पाहीली जाते ना?
२) डिस्क बद्दल अधिक माहीती (म्हणजेच लिन्का, आणि काही चकटफू मटेरियल) देता येते का पहा.

हा घ्या एक छोटा नमुना

अन्या दातार's picture

24 Jul 2012 - 12:40 pm | अन्या दातार

सोत्रि, काही घोळ होतोय का? मुळात डिस्क स्ववभव ओळखण्यासाठी वापरले जात, भविष्
सांगण्यासाठी नव्हे.
ज्योतिषात गवर्निंग फॅक्टर बरेच असल्याने असे ट्रेट्स प्रचंड निघतील. त्यामुळे वर्गीकरण अवघड आहे.
त्याहीपेक्षा अवघड, ते लक्षात ठेवणं ;-)

सोत्रि's picture

25 Jul 2012 - 9:19 pm | सोत्रि

काही घोळ होतोय का? मुळात डिस्क स्ववभव ओळखण्यासाठी वापरले जात, भविष्य सांगण्यासाठी नव्हे.

करेक्ट. डिस्क आणि भविष्य यांचा संबंध कुठे जोडला आहे?

मुळ मुद्दा होता तो म्हणजे पॅटर्न्स आणि प्रोबॅबिलिटी यांची सांगड घातली तर ज्योतिष हे ह्या सांगडीचा एक प्रकार असू शकतो असे मानण्यास वाव आहे इतकाच होता.

- (घोळ घातलाय का असा विचार करणारा) सोकाजी

आत्मशून्य's picture

24 Jul 2012 - 12:33 pm | आत्मशून्य

'डिस्क (DISC) प्रोफाइल' नावाची एक प्रश्नमंजूषा असलेली संगणकप्रणाली तयार केली होती.

कोठे मिळेल ही डिस्क ? बाकी गणितीय ज्योतीष हे थोतांड आहे अस्च अनुभवाला येतं. बाकी हा प्रकार नाडी-पट्टी प्रश्नमंजुषेवरुन तर ढापलेला ;) (आधारीत) नाही ? कॉलीग ओक काका फॉर डिटेल्स.

मन१'s picture

24 Jul 2012 - 6:27 pm | मन१

अगदि अगदि ढोबळ मानानं सांगायचं झालं तर सोकोबांनी दिलेली टेस्ट म्हणजे ह्या धर्तीवरचं निरिक्षण असू शकतं:-
"एखाद्यानं अनावधानानंही चूक केल्यावर हा माणूस रागावतो. चूक प्रथमच झाली असेल, अनवधानानं झाली ह्यास तो महत्व देत नाही असे दिसते. तस्मात् हा माणूस थोडा रागीट आहे."
म्हणजे, त्याच माणसाची एका ठिकाणची कृती किंवा त्याच माणसाचे एखाद्या घटनेबद्दलचे विचार ऐकल्यावर तो माणूस स्वभावाने कसा ह्याचा तर्क लावता येतो.
इथं निरिक्षण कुठल्या ऑब्जेक्टचं होतं? सोकोबांचं.
स्वभावबद्दलचे तर्क कुणाबद्दल वर्तवले गेलेत ? सोकोबांच्या.

आता सांगा, सोकोबा मुंबैत रागावतात तेव्हा नासकीवाडीमधील शिरपतरावांच्या बैलाला बुळकांड्या लागतात असा पॅटर्न कुणी शोधलाय का? तसला तर्क कुणी लावलाय का? थट्टा म्हणून नाही; एक उदाहरण देतो ते लक्षात घ्या.

शिरपतराव, गणपतराव, बाळंभट अशा नासक्यावाडीतील सर्व ग्रामस्थांच्या बैलांच्या रोगाचा अभ्यासच करायचा ठरवला आणि त्याचा त्याचा सोकोबांच्या अगदि व्हिस्की,रम पिण्याशीच प्याटर्न शोधायचा म्हटला तर अशक्य नाही. कुठे ना कुठे एक प्याटर्न नक्कीच सापडेल.
म्हणजे असं बघा:- सोकोबांनी जेव्हा पारले ऐवजी ब्रिटानियाची बिस्किटे खाल्ली तेव्हा इतर कुणास काही झाले नाही, पण म्हाद्याची गाय कालावधी; बरोब्बर तीन ते चार महिन्याच्या कालावधीत. म्हणजे सोकोबांचे बिस्किट हे गाय व्याण्याचे pre indicator आहे. असा तर्क निघू शकतो.
अशा गोष्टींना तर्कशास्त्रात fuzzy pattern म्हणतात म्हणे. असे का घडते?

इथं निरिक्षण कुठल्या ऑब्जेक्टचं होतं? सोकोबांचं.
निरिक्षणे/तर्क कुणाबद्दल वर्तवले गेलेत ? नासक्यावाडीतल्या पशूंचे.

ज्योतिषात काय होतं?
निरिक्षण कुठल्या ऑब्जेक्टचं होतं? :- खगोलीय व काल्पनिक वस्तू
भविष्य्/स्वभाव जाणण्याचे दावे कुणाचे केले जातात? :- व्यक्तींचे

बिंग बँगपूर्वी जग जोडले गेले होते, ह्या बिंदूपासून पुढे अनेक ठिकाणी स्यूडोसायन्स जन्म घेते. कथा, मिथके रचली जातात.
मुद्दाम रचली जातात असे नव्हे, काही बारीकसे तर्क आपल्याला तिकडे घेउन जातात. सगळेच बरोबर असतील असे नाही.

पत्रिका, ज्योतिष ह्याबद्दल ज्याला जे हवे ते करायचे स्वातंत्र्य आहेच, किंवा काहीही वाचण्यापूर्वी बहुतांश सर्वच जण आपली भूमिका घट्ट पकडूनच वाचायला बसणार हे सत्य आहे. प्रथमपासूनच ज्यांचा विश्वास आहे, त्यांनी तो कायम ठेवण्यास हरकत नाही, माझी हरकत असेल तरीही ती फाट्यावर मारत ते ठेवणार आहेतच, फक्त वरील तर्कानुसार नव्याने त्या गोष्टीला जे सिरियसली घेउ शकतात, त्यांनी मी दिलेल्या तर्कावर एकदा अवश्य विचार करुन पहावा. विश्वास ठेवायचा तर सोकोबांचा तर्क बाजूला ठेउन "असे घडते,असे होते, कसे होते ते माहीत नाही" अशी भूमिका निदान प्रामाणिक म्हणता यावी.

वरती मीच म्हटल्याप्रमाणं वाद अगणित चालणार आहे, मी फक्त पुन्हा एक भूमिका करुन पाहिली इतकच.
आता पुन्हा दर्शकाच्या भूमिकेत शिरत आहे. (प्रतिसादात "मी,माझे तर्क" असले शब्द पुनः पुनः आल्याबद्दल क्षमस्व. )

अन्या दातार's picture

24 Jul 2012 - 9:14 pm | अन्या दातार

Correlation does not imply causality. :-)

बॅटमॅन's picture

24 Jul 2012 - 9:27 pm | बॅटमॅन

हेच म्हणणार होतो! मनातले बोलल्याबद्दल धन्यवाद. स्टॅटिस्टीकल मेथड्स कॉजल बर्‍याच अंशी नसतात, त्यामुळे ज्युडिआ पर्ल यांना खास कॉजल अ‍ॅनॅलिसिस साठी शोधलेल्या कॅल्क्युलससाठी कंप्यूटर सायन्समधील सर्वोच्च असे ट्यूरिंग अ‍ॅवॉर्ड मिळाले आहे. पाकमध्ये निर्घृण हत्या झालेला पत्रकार डॅनियल पर्ल हा त्यांचा मुलगा होय.

सुहास..'s picture

30 Jul 2012 - 1:24 pm | सुहास..

Correlation does not imply causality. >>

राईट !! आता हेच तुझ्या सही बरोबर कनेक्ट कर :)

अर्धवटराव's picture

24 Jul 2012 - 9:42 pm | अर्धवटराव

आय डाऊट.
पण तुम्ही म्हणताय तसं जर दोन अगदी भिन्न घटना एकमेकांपरत्वे वारंवार घडतात, अगदी न चुकता... तर त्यांचा एकमेकांशी संबंध नसला तरी ते एखाद्या तिसर्‍याच कॉमन धाग्याने बांधलेले असणार हे निश्चित.

अर्धवटराव

मन१'s picture

25 Jul 2012 - 12:05 pm | मन१

राहवले नाही आणि धाग्यावर परतलो.
पण तुम्ही म्हणताय तसं जर दोन अगदी भिन्न घटना एकमेकांपरत्वे वारंवार घडतात, अगदी न चुकता
असा दावा फलज्योतिष समर्थक करतात. घडणार्‍या गोष्टी पुरेशा वारंवारतेने घडतात हा त्यांचा निष्कर्ष आहे की निरिक्षण?
सांख्य्किकी विदा ते उप्लब्ध करुन द्यायला तयार नाहीत. जे प्रयोग करायला तयार आहेत, त्यांना असा दावा करणार्‍यांचे कधीही सहकार्य मिळत नाही. हे असेच होते,घडते वगैरे त्यांचे दावे असतात.
भंपक विज्ञानवाद्यांची तोंडे त्यांनी एकदाची बंद करावीत अशी माझीही इच्छा आहे.
साधारणतः तीसेक पत्रिका दाखवून त्यावर काही भाष्य ह्यांना करायला सांगितले, तर फारसे कुणीही पुढे आले नाहीत.
अंनिस वगैरे फ्लॅश वळवोन घ्यायला असे प्रयोग करते, सनसनीखेज बक्षिसेही जाहिर होतात, पण आजवर कुणीही ते सिद्ध केलेले नाही. "ते होतेच, ते होणारच्,तसेच असते ते, तुमच्या आकलनाच्या पलीकडे आहे हे मान्य करा" असे म्हणत आपली भूमिका घट्ट धरून ठेवली जाते. पण सांख्यिकीतत्वावरसुद्धा त्या घटना सिद्ध करण्याइतका विदा कुणीही दाखवत नाही. वर मी दिलेल्या लिंका एकदा तरी पहाव्यात.

... तर त्यांचा एकमेकांशी संबंध नसला तरी ते एखाद्या तिसर्‍याच कॉमन धाग्याने बांधलेले असणार हे निश्चित.
किती फ्रिक्वेन्सी असेल तर असे म्हणता येइल? विदा गोळा केलाय का?
शास्त्र डेव्हलप झालं त्या काळात असा विदा विश्लेषण(data analysis) इतक्या मोठ्या प्रमाणावर होणं शक्य होतं का?(तेव्हाची साधनं लक्षात घेता, तेव्हाची शिक्षित, नोंद ठेवणार्‍यांची आणि त्यांचे आपसातील कम्युनिकेशनची यंत्रणा लक्षात घेता.)
अवांतरः- गविंचा मी उल्लेख केलेला धाग http://www.misalpav.com/node/18754 ह्यासंदर्भात आठवला.

अर्धवटराव's picture

25 Jul 2012 - 6:21 pm | अर्धवटराव

>>राहवले नाही आणि धाग्यावर परतलो.
-- मला माहित होतं :)

>>पण तुम्ही म्हणताय तसं जर दोन अगदी भिन्न घटना एकमेकांपरत्वे वारंवार घडतात, अगदी न चुकता
असा दावा फलज्योतिष समर्थक करतात. घडणार्‍या गोष्टी पुरेशा वारंवारतेने घडतात हा त्यांचा निष्कर्ष आहे की निरिक्षण?
-- मी हा दावा फलज्योतिषाच्या कॉण्टेक्स्ट ने नाहि केला... तुम्ही जी सोत्रींची दारु आणि बैलांची थेअरी मांडली त्यावर ते विवेचन आहे. मी स्वतः जोतिष्याचा विद्यार्थी नाहि.

>>सांख्य्किकी विदा ते उप्लब्ध करुन द्यायला तयार नाहीत. जे प्रयोग करायला तयार आहेत, त्यांना असा दावा करणार्‍यांचे कधीही सहकार्य मिळत नाही. हे असेच होते,घडते वगैरे त्यांचे दावे असतात.
-- आय एम नॉट सर्प्राईझ्ड टु हिअर दॅट

>>भंपक विज्ञानवाद्यांची तोंडे त्यांनी एकदाची बंद करावीत अशी माझीही इच्छा आहे.
-- बस्स गाढवाला शिंग फुटु देत... म्हणजे हे झालेच म्हणुन समजा

>>साधारणतः तीसेक पत्रिका दाखवून त्यावर काही भाष्य ह्यांना करायला सांगितले, तर फारसे कुणीही पुढे आले नाहीत.
-- त्यात काहि नविन नाहि.

>>अंनिस वगैरे फ्लॅश वळवोन घ्यायला असे प्रयोग करते, सनसनीखेज बक्षिसेही जाहिर होतात, पण आजवर कुणीही ते सिद्ध केलेले नाही. "ते होतेच, ते होणारच्,तसेच असते ते, तुमच्या आकलनाच्या पलीकडे आहे हे मान्य करा" असे म्हणत आपली भूमिका घट्ट धरून ठेवली जाते. पण सांख्यिकीतत्वावरसुद्धा त्या घटना सिद्ध करण्याइतका विदा कुणीही दाखवत नाही. वर मी दिलेल्या लिंका एकदा तरी पहाव्यात.
-- अनिस, सांखिकी, त्यांना अक्कल शिकवणारे जोतिषी... या सर्व भानगडीत न पडलेलं बरं

>>... तर त्यांचा एकमेकांशी संबंध नसला तरी ते एखाद्या तिसर्‍याच कॉमन धाग्याने बांधलेले असणार हे निश्चित.
किती फ्रिक्वेन्सी असेल तर असे म्हणता येइल? विदा गोळा केलाय का?
-- हा भाग विदा चा नाहि तर्काचा आहे. दोन कठपुतळ्या स्टेजवर भिन्न ठिकाणि नाचतात पण त्यांना बांधुन ठेवणारा दांडा एकच असतो...

>>शास्त्र डेव्हलप झालं त्या काळात असा विदा विश्लेषण(data analysis) इतक्या मोठ्या प्रमाणावर होणं शक्य होतं का?(तेव्हाची साधनं लक्षात घेता, तेव्हाची शिक्षित, नोंद ठेवणार्‍यांची आणि त्यांचे आपसातील कम्युनिकेशनची यंत्रणा लक्षात घेता.)
-- "त्या काळी" आरोग्य नियमन, युद्ध, रत्नपारख वगैरे अनेक शास्त्र निर्माण झाली. विदाची लिमीटेशन त्यांना नाहि जाणवली . जोतिष यापासुन अगदी भिन्न आहे, मान्य. "त्या"काळात शास्त्र डेव्हलप करायची पद्धत वेगळी असावी एव्हढाच मुद्दा.
जोतिष "शास्त्र" आहे का नाहि, ते का, कसं कोणि सिद्ध करायचं... माहित नाहि. पण वैयक्तीक आणि इतर बर्‍याच लोकांचे अनुभव बघुन जोतिष डोंबार्‍याचा खेळ नाहि हे निश्चित.

अर्धवटराव

मराठे's picture

24 Jul 2012 - 10:08 pm | मराठे

सयुक्तिक प्रतिसाद!
ज्योतिषवाल्यांकडून वारंवार केला जाणारा आणखी एक युक्तीवाद म्हणजे 'चंद्राच्या आकर्षणामुळे पृथ्वीवर / समुद्रावर फरक पडू शकतो तर मानवावरही पडणारच!' ... असो.

ज्योतिषवाल्यांकडून वारंवार केला जाणारा आणखी एक युक्तीवाद म्हणजे 'चंद्राच्या आकर्षणामुळे पृथ्वीवर / समुद्रावर फरक पडू शकतो तर मानवावरही पडणारच!' ... असो.

ज्योतिष्याला दहावीचे भौतिक पुस्तक वाचायला द्या उत्तर मिळेल.

न्युटनच्या नियमानुसार कोणत्याही दोन वस्तुंमध्ये आकर्षण असते.

चंद्र- पृथ्वी यातील आकर्षण सूत्राने काढा.

आता त्याच सूत्रात एका माणसाचे वजन ७० किलो घालून उत्तर काढा उत्तर मिळेल.

किंवा ७० किलो च्या दोन माणसातील एकमेकापासून एक फुटावर असताना किती बल असते, हे सूत्राने काढा. उत्तर मिळेल.

मन१'s picture

26 Jul 2012 - 12:06 pm | मन१

इतके हुच्च नको. इथे सोप्या भाषेत सांगतो.(इथं कुणी झाट गणितं करत बसणार नाहीत. अगदि करुन दाखवली तरीही वाचनार ह्यांनाथेट निष्कर्ष वाचायला आवडाते पब्लिकला.)
प्लुटो, नेपच्यून ह्यांच्यापेक्षाही अधिक गुरुत्वाकर्षण तुमच्यावर पडतं ते तुमच्या शेजारून गेलेल्या बसगाडीचं.
तेही ध्यानात घ्या म्हणावं.
बरोबर का?

एखाद्या दिवशी जर प्लुटो आणि नेपच्युन यांच्या युतीचे गुरुत्वीय बल जास्त असेल तर त्या बसगाडीच्या बलाचा परिणाम वाढून अपघात संभवतो :-)

आता फक्त त्या युतीच्या बलाचे पॅटर्न्स माहिती असले की त्याचे भाकित करता येउ शकते ;-)

-(बसगाडीपासून लांब रहाणारा) सोकाजी

मृगनयनी's picture

7 Sep 2012 - 7:21 pm | मृगनयनी


त्याही पुढे, सर्व विश्वाची उत्पत्ती ही 'बिग बॅंग' ने झाली. त्यापासूनच हे चराचर निर्माण झाले. सर्व विश्व एका अनामिक शक्तीने एकत्र बांधलेले आहे. एक विशिष्ट परस्परसंबंध आणि एक तोल आहे ह्या सर्व ग्रह-तार्‍यांचा एकमेकांबरोबर. ते एकमेकांवर परिणाम करू शकतात. मग आपणही ह्याच 'बिग बॅंग' ची निर्मिती आहोत तर मग त्यांचा आपल्यावर परिणाम होणे का शक्य नाही? किंवा जो एक ताळमेळ ह्या ग्रह-तार्‍यांचा एकमेकांशी आहे आणि त्यामुळे हा विश्वाचा डोलारा उभा आहे, आपणही का त्याचा भाग नाही? किंवा त्या ताळमेळाशी आपला का संबंध असू नये?

अप्रतिम!!!! सोत्रि'जी... असा विचार करणारे लोक जगात खूपच कमी आहेत.....

नाडी-पट्टी, नाडीग्रन्थ.. हे एका प्रकारच्या जोतिषविद्येचे प्रगल्भ पॅटर्नच आहेत!!!..

छान लेख सोत्रि'जी..... :)

सोत्रि's picture

25 Jul 2012 - 8:39 pm | सोत्रि

मनोबा,

उदाहरणे विचार करायला लावणारी आहेत, पण तो विचार म्हणजे 'सोकोबा मुंबैत रागावतात तेव्हा नासकीवाडीमधील शिरपतरावांच्या बैलाला बुळकांड्या लागतात' हा पॅटर्न आहे का? आणि असलाच हा पॅटर्न तर जनरालाइज (सर्वसामन्यीकरण ?) करता येण्याजोगा आहे का? म्हणजे जर हे असे वर्षानुवर्षे (शेकडो, हजारो) घडत असेल तर मान्य करता येईल की सोकोबा रागवाला की बैलाला बुळकांड्या लागतात.

- (पुणेकर व सध्या चेन्नैत राहणारा सोकोबा मुबैत रागावतो ह्यातला पॅटर्न शोधणारा) सोकाजी

नगरीनिरंजन's picture

25 Jul 2012 - 10:44 am | नगरीनिरंजन

छान चर्चा. बॅटमॅन साहेबांचे प्रतिसाद आवडले.
पॅटर्न कशातही शोधता येतो या मनोबांच्या मताशी सहमत आणि बादरायण परस्परसंबंध (Spurious Correlation) दाखवून काहीही भन्नाट भाकिते करणे कोणालाही शक्य आहे.
पण ज्योतिषशास्त्रात (शास्त्र?!) असा बादरायण संबंध दाखवण्याचेही कष्ट घेतलेले नाहीत. त्यामुळे ही वागणूकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांची तुलना अस्थानी आहे.

मन यांच्या प्रतिसादांशी सहमत.

सोकाजी .. होय. भविष्य / ज्योतिष हा अगदी याच प्रोसेसने चालणारा प्रकार आहे. ज्याला भविष्य सागायचं त्याच्याकडूनच आधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रश्नांची उत्तरं जमा करायची आणि त्यांना अत्यंत उत्तम रितीने मांडून प्रेझेंट करायचं हेच तर आहे भविष्यकथन.

बाकी कॉर्पोरेट ट्रेनिंग या प्रकाराविषयी काय बोलावं.. ?

तुम्ही कसे आहात हे सांगणारे अन भारावून टाकणारे जोहॅरी विंडोज, तमका ट्रायँगल, ढमका स्क्वेअर, किंवा अशा डिस्क, ब्रिस्क, टॅन, कोन सारख्या असंख्य पद्धती ट्रेनिंगमधे वापरल्या जातात.

बाकी काही असो. चार पॅरामीटर्स मात्र यात अत्यावश्यक असतात. (खांदा देण्यासाठी असतात तसे).. याचं मुख्य कारण म्हणजे सर्व गुंत्यानंतर शेवटी एक्स आणि वाय अ‍ॅक्सिस वर ते चार पॉईंट मारुन त्याचे चार क्वाड्रंट दाखवणं अत्यावश्यक असतं. यामुळे तुम्ही कोणत्या क्वाड्रंटमधे आहात किंवा तत्सम रिझल्ट देता येतो.

ही चार तत्वं दोन दोन च्या परस्परविरोधी जुड्यांमधे असतात. त्यात बॅलन्स आहे किंवा नाही हेही म्हणता येतं.

मी आत्तापावेतो अटेंड केलेल्या वीसेक ट्रेनिंग्जमधे याचे इतके व्हेरियंट बघितले आहेत की आता हमखास येणारी ती नतद्रष्ट प्रश्नावली भरायला घेतानाच यात कोणते चार खांदे आणि क्वाड्रंट असणार आहेत हे शोधून मनोरंजन मिळवतो...

अ‍ॅग्रेसिव्ह-सबमिसिव्ह : आउटवार्ड-इनवर्ड

इमोशनल-रॅशनल : अ‍ॅबस्ट्रॅक्ट-कॅल्क्युलेटिव्ह

लॉजिकल -इमोशनल : एक्स्ट्रोव्हर्ट-इंट्रोव्हर्ट

अशा रितीने अ‍ॅग्रेसिव्ह-इनवर्ड (ए आय ) सबमिसिव्ह -आउटवर्ड (ए ओ) वगैरे वगैरे अनेक पर्सन्यालिटी टाईप्स बनवता येतात.. मग आयला मी ए एस एस आहे होय... मला वाटलंच होतं असं म्हणता येतं..

असो.. गमतीचा भाग सोडा.. तुम्ही ट्रेनिंगमधून काही मिळवता आहात याचा आनंद झाला..

मुद्दा इंटरेस्टिंग आहे. पण भविष्याबाबत जे रुढ आहे ते म्हणजे मन१ने म्हटल्याप्रमाणे एका विषयाचा डेटा जमवून दुसर्‍याविषयी निष्कर्ष असा प्रकार प्रथमदर्शनी वाटेल..

जाई.'s picture

25 Jul 2012 - 1:59 pm | जाई.

गविँशी पूर्णत सहमत

धंदेवाइक ज्योतिष्यांबद्दल काही बोलायचे नाहिये, पण माझ्या परिचयातील एक वृद्ध गृहस्थ (तसे कुणाला ठाऊकही नाही, की ते ज्योतीष जाणतात) अगदी तंतोतंत भविष्य वर्तवतात (माझा स्वतःचा अनुभव) पैसे वगैरे अजिबात घेत नाहीत... अशी उदाहरणे बघून वाटते, की हा नुस्ताच अनुमानधपक्याचा प्रकार नसावा.

नितिन थत्ते's picture

25 Jul 2012 - 4:02 pm | नितिन थत्ते

लेखावरून आणि मनोबांच्या प्रतिसादावरून तो व्हिस्की+पाणी, रम+पाणी, व्होडका + पाणी चा ज्योग आठवला.

रणजित चितळे's picture

25 Jul 2012 - 6:28 pm | रणजित चितळे

टाईम प्लिज

वाचतो आहे. देईन प्रतिसाद लवकर. विषय छान आहे.

JAGOMOHANPYARE's picture

25 Jul 2012 - 7:05 pm | JAGOMOHANPYARE

जेंव्हा http://www.misalpav.com/node/22353 अशा घटना घडतात, तेंव्हा सगळ्यांच्या पत्रिकेत एकाच प्रकारचा संकटयोग लिहिलेला असतो का?

तसे असेल, तर भुकंप, पूर हे नुस्ते गावातल्या लोकांच्या पत्रिका बघून का सांगता येत नाही?

माझ्या आयुष्यात देव धर्म कर्मविपाक भविष्य आणि तत्सम गोष्टी नव्हत्या.. तेंव्हा मी सुखात होतो.. नंतर फ्यामिली प्रॉब्लेम सुरु झाले म्हणून कुंडली एकाला दाखवली. त्याने भरपूर दक्षिणा घेतली, कसले यंत्र दिले, १४ वा अध्याय वाचायला सांगितला.. तुझे सगळे भले होईल असे सांगितले.. त्यानंतर पंधरा दिवसात मला अपघात झाला आणि पाय मोडला. अजून लंगडतो आहे आणि भले व्हायची वाट पहात आहे.. तेंव्हापासून या सगळ्या गोष्टींचा पुन्हा नाद सोडून दिला.

अर्धवटराव's picture

25 Jul 2012 - 8:17 pm | अर्धवटराव

जग्गु दादा, "त्या" उपायाने तुमचा पाय मोडला आणि या टांगमोडीच्या दु:खाने तुम्हाला ओरिजनल प्रॉब्लेम विसरायला लावले काय?... काय पण उपाय केला शास्त्रिबुवांनी =))

अर्धवटराव

JAGOMOHANPYARE's picture

25 Jul 2012 - 7:15 pm | JAGOMOHANPYARE

लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू
रेखा उघडी पडली

देवा तुझ्याबी घरचा
झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने
तयहात रे फाटला

बापा नको मारू थापा
असो खऱ्या असो खोट्या
नाही नशीब नशीब
तयहाताच्या रेघोट्या

अरे नशीब नशीब
लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे
ते बी फिरत राह्यले

राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब
काय सान्गे पंचागन

नको नको रे ज्योतिषा
नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये
माझ्या दारी नको येऊ

बहिणाबाई चौधरी

मन१'s picture

25 Jul 2012 - 8:20 pm | मन१

बेहद्द भावल्या ओळी. बहिणाआईला नमस्कार.

अमोल केळकर's picture

26 Jul 2012 - 11:32 am | अमोल केळकर

जबरदस्त !!

अमोल केळकर

अमोल केळकर's picture

26 Jul 2012 - 11:27 am | अमोल केळकर

छान :)

अमोल केळकर

अन्या दातार's picture

26 Jul 2012 - 1:42 pm | अन्या दातार

चर्चा भरकटवू नये ही विनंती.
ज्योतिषात काही पॅटर्न्स असतात का/ असावेत का हा मूळ विषय आहे.त्याघद्दल बोलल्यास बरे.

आत्मशून्य's picture

30 Jul 2012 - 1:08 pm | आत्मशून्य

ओर डिएने स्तृक्चर दिफाइन ऑर डिलींग बेहेविअर अँद वी कॅन नॉट एक्सिड ऑर गो बीयाँड इट एव्हर इन ओर लाइफ. एट दी सेम टाइम सुराउंडींग अल्सो इन्फ्लुएंन्स इट टु प्रोडुस ऑल्टीमेत रिझल्त दॅट वि डिफाइन अ‍ॅझ ऑर फुटुरे... एफ देर एनी चान्स (ओर प्याटर्न) दॅट प्रोव्ह दी कोनेक्शन बिटवीन सच पॅटर्न एंड ऑर डेने स्तृक्चर, देन विथ हेल्प ओफ सुपर कॉम इट पॉसेबल तू दिफाइन प्याटर्न एंड अँड बिहेवर दॅट डिफाइनींग दि एव्हरीबडीज (ओर इंडीविज्युअल्स)अल्टीमेट फ्युटर. सो फॉ एग्जांपल इफ योर डिएने डीफाइन यु टु दोन बेलीव्ह इन टाइम... इट्स इजी टु प्रेडीक्ट बेस्ड ओन सराउंडी व्हाट काइंड ऑफ मेस यु विल क्रिएट (इट्स जस्टन एग्जामपल...) आय फेल्ट इट्स अ काइंड ओफ शरलॉक होम्स स्टफ.