नागपंचमी स्पेशल --- पुरणाचे दिंड ----

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
23 Jul 2012 - 9:04 am

साहित्य -- हरबरा डाळ एक वाटी, गुळ बारीक चिरलेला दीड वाटी, जायफळ पुड एक छोटा चमचा,

पारीसाठी साहित्य -- एक वाटी कणीक...चिमूटभर मिठ घालून घट्ट भिजवुन ठेवणे.

कॄती-- प्रथम डाळ शिजवुन घ्या त्यातले पाणी (कट) काढून घ्या,त्यात गुळ घालून पुरण चांगले तयार करुन घ्या ( पुरण शिजल्याची खूण म्हणजे पुरणात जर उलथने मधोमध उभे राहिले तर झाले) त्यात जायफळ पुड घाला,आता हे पुरण वाटायचे नाही ,तसेच हाटून घ्या......:) पुरण गार करायला ठेवा.

कणकेची पारी लाटून घ्या त्यात एक ते दीड चमचा पुरण भरुन ती पारी चारी बाजुनी दुमडून घ्या, चौकोनी
घडी करुन घ्या, अशे सर्व दिंड बनवा, एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा....नंतर त्यावर चाळणी ठेवुन त्यात हे सर्व कडबु ठेवा, दहा ते पंधरा मिनिटे वाफ़वुन घ्या....
झाले तय्यार पुरणाचे दिंड.....आता खायला घेताना दिंड मधुनच थोडे फ़ोडा व त्यात भरपुर साजुक तुप घालुन गट्ट्म करा....... :p
टीप -- ह्याच्या जोडीला बटाटा भाजी करतात....एक गोड --एक तिखट..

ह आता तुम्ही म्हणाल फ़ोटू कुठाय....आत्ता दुपारी करणार आहे मी दिंड...त्यावेळी फ़ोटो टाकीनच...:)

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

23 Jul 2012 - 9:09 am | सुहास झेले

सहीच... बत्तीस शिराळा इथे खुपच मोठ्या प्रमाणावर पुरणाचे दिंड केली जातात. तीन वर्षापूर्वी गेलो होतो कोल्हापुरात, तेव्हा तिथे जाऊन आलो होतो. तेव्हा सर्वप्रथम खाल्ले होते. अप्रतिम लागतात. फोटोची वाट बघतोय :) :)

मी_आहे_ना's picture

23 Jul 2012 - 9:41 am | मी_आहे_ना

आज माझ्याही डब्यात आहेत 'पुरणाची दिंडं'..आईनी सकाळीच केलीयेत. मला तर आत्ताच भूक लागली.

पियुशा's picture

23 Jul 2012 - 9:45 am | पियुशा

आता हे पुरण वाटायचे नाही ,तसेच हाटून घ्या......
हे काय समजले नाही हाटुन घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे ?

निवेदिता-ताई's picture

23 Jul 2012 - 10:37 am | निवेदिता-ताई

पियु- अग हाटणे म्हणजे पुरणयंत्रातून न काढता रवीने किंवा एखाद्या तांब्याने तळ बाजुने नुसते पुरणावर आपटणे,म्हणजे पुरणातील डाळ ओबडधोबड बारीक होते....:)

मन१'s picture

23 Jul 2012 - 11:13 am | मन१

आलो की दाबून हाणतोच आता दिंडे.........

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2012 - 1:31 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू कुठायत...? :-(

फोटु बघून प्रतिसाद दिल्या जातील.

सानिकास्वप्निल's picture

23 Jul 2012 - 2:01 pm | सानिकास्वप्निल

पुरणाची दिंड माझा आवडता पदार्थ आहे :) फोटो लवकर टाका निवेदिता ताई :)

गेल्या वर्षी मी मिपावर दिंडाची पाकृ दिली होती http://www.misalpav.com/node/18711

निवेदिता-ताई's picture

23 Jul 2012 - 3:02 pm | निवेदिता-ताई

i1

i3

i4

स्पंदना's picture

23 Jul 2012 - 4:25 pm | स्पंदना

हे घ्या पुरणाचे दिंड! जरा शिस्तीत खा ! नाजुक आहेत.

नाना चेंगट's picture

23 Jul 2012 - 6:49 pm | नाना चेंगट

रेवती's picture

23 Jul 2012 - 7:44 pm | रेवती

छान फोटू निवेदिताताई. सानिकाची पाकृही आठवली.
काल परवा अचानक मेंदी काढायला मिळाल्याने खरी नागपंचमी वाटत आहे.

लीलाधर's picture

26 Jul 2012 - 8:51 am | लीलाधर

तो ३ नंबरचा फोटो पाहून तों.पा.सुटले... आवडेश... :)

निवेदिता-ताई's picture

27 Jul 2012 - 7:12 am | निवेदिता-ताई

धन्यवाद सगळ्यांना............. :)