नागपंचमी-पुरणाची दिंडं व तांदुळाची खीर

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
4 Aug 2011 - 9:06 pm

पुरणाची दिंडं माझ्या माहेरी नागपंचमी ला नैवेद्याला बनवतात :)

साहित्य दिंडः
१ वाटी चणाडाळ स्वच्छ धुवून, कुकरला शिजवून घेणे व त्याचे पाणी निथळून घेणे.
१ वाटी चिरलेला गुळ
१ टीस्पून वेलचीपूड
३/४ टीस्पून जायफळ्पूड
२ वाटया गव्हाचे पीठ, चवीपुरते मीठ, व २-३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून कणीक मळून घेणे.

पाकृ:

शिजवून घेतलेली चणाडाळ चांगली डावाने घोटून घेणे.

.

त्यात १ वाटी चिरलेला गुळ घालणे व सगळे एकत्र करणे.

.

मिश्रण आधी पातळ होईल , मग हळू-हळू घट्ट होऊ लागेल.

.

त्यात आता वेलचीपूड व जायफळ्पूड घालून नीट मिक्स करणे.

.

कणकेची छोटी पुरी लाटून त्यावर १ टेस्पून शिजवलेले पुरण ठेवावे व दोन्ही बाजुने पुरीची घडी घालावी.

.

.

मग उरलेल्या दोन्ही बाजूंची घडी एकमेकावर घालावी. दिंडंचा आकार चौकोनी असा असला पाहीजे.

.

सर्व तयार केलेले दिंडं उकडण्यासाठी मोदकपात्रात ,कुकर किंवा मोठ्या भांड्यात ठेवावे.

.

तयार झाले की साजुक तुपाबरोबर खायला द्यावे.

ही खीर माझ्या सासरी बनवली जाते. ही जरा वेगळ्या प्रकारे बनते व खायला देताना पानोळीबरोबर दिली जाते (पानोळी- उकडलेली चपाती)

साहित्य तांदुळाची खीर:

१ लि.दुध
एक हलकी मुठ बासमती तांदुळ
३/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून चारोळ्या
१/२ टीस्पून जायफळपूड

दुध उकळत ठेवावे.
तांदुळ स्वच्छ धुवून निथळत ठेवावे.

.

पाणी पूर्ण निघून गेले की पॅनमध्ये कोरडेच खमंग भाजून घ्यावे.

.

भाजलेले तांदुळ पूर्ण गार झाल्यावर मिक्सरवर कणीदार वाटून घेणे.

.

वाटलेल्या तांदळावर जरासा पाण्याचा हबका मारावा व दुधाला उकळी आली की त्यात तांदुळ घालावे.

.

तांदुळ शिजला की त्यात साखर घालावी व ती विरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे.

.

चारोळ्या व जायफळपूड घालावी. जायफळीचा छान सुवास येतो ह्या खीराला. (ह्या खीरीमध्ये सुका-मेवा व वेलचीपूड घालत नाही )

.

गरमा-गरम पुरणाची दिंडं व तांदुळाची खीर तयार :)

.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

4 Aug 2011 - 10:19 pm | प्राजु

खपले!!

तू आणि तुझ्या पाकृ..!! ___/\___

मस्तच ग... पुरणाचे दिंड पहिल्यांदाच बघितले... मस्त दिसतायत... करायला पाहिजे एकदा....

मयुरा गुप्ते's picture

4 Aug 2011 - 10:52 pm | मयुरा गुप्ते

आज संध्याकाळी घरी गेल्यावर करायचा प्लॅन आता पूर्ण करावाच लागणार असं दिसतयं.....

एवढ्या बारक्याव्यासह सचित्र दिंड एकदम सुंदर!! हॅप्पी श्रावण!

-मयुरा.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2011 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटचा फोटो काय टाकलाय...!खल्लास....!येकदम टेबल टॉप

कौशी's picture

4 Aug 2011 - 11:31 pm | कौशी

सानिका,छान रेसिपी...
माझ्या आईकडे खीर नेहमी अशीच बनते..

सस्व्तै, तुम्ही दाखवलेली चार अन अजुन तीन तसलीच दिंडं आताच खाउन बसलोय,. गरम गरम दिडामध्ये बोटानं खळगा करायचा त्यात तुप भरायचं अन गपकन पाणिपुरी सारखं खायचं, जाम भारी चटका बसतो.

अवांतर - आहे बाबा प्लॅस्टिकचा डाव / उलथणं आहे अजुन शाबुत, कसं बरं वाट्लं मला.

अनामिक's picture

5 Aug 2011 - 1:10 am | अनामिक

काहीजण दिंडं म्हणतात तर काहीजण 'कडबू', आम्ही कडबू म्हणतो. शिवाय माझ्या घरी हे कडबू तळलेले आणि करंजीच्या आकाराचे असतात. वर ५० फक्त म्हणतोय त्याचप्रमाणे ह्या कडबूमधे एक बोटानं खळगा करायचा त्यात तुप भरायचं अन गपकन खायचं... काय भारी लागतं!

निवेदिता-ताई's picture

5 Aug 2011 - 12:46 pm | निवेदिता-ताई

छानच जमलीयेत दिंड.....

कच्ची कैरी's picture

5 Aug 2011 - 12:59 pm | कच्ची कैरी

अर्रे व्वा सोप्पे आहेत करायला !करुन बघायला हवे .

पियुशा's picture

5 Aug 2011 - 1:04 pm | पियुशा

+१
हेच म्हणते :)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2011 - 6:39 pm | परिकथेतील राजकुमार

वास पण भारी सूटलाय.

अवांतर :- ते तुमचे नाव एका कडेला घेता येईल का फटूच्या ?

प्यारे१'s picture

6 Aug 2011 - 2:28 pm | प्यारे१

>>>>गरमा-गरम पुरणाची दिंडं, तांदुळाची खीर आणि 'सानिका एन' खायला तयार असे हवे होते वाक्य.

सौन्दर्य's picture

6 Aug 2011 - 8:37 am | सौन्दर्य

आमच्या लहानपणी आमची आजी दिंडं बनवायची ती अजुन आठवतात. अगदी साजूक तुपात बुचकाळून आम्ही सर्व भावंडे ति खायचो. लग्न झाल्यावर मी एकदा दिंडं बनवून बायकोला दाखवली, तिला 'दिंडं' हा प्रकार माहीत नव्हता. कणकेच्या पीठात पुरण उकडून खायचे तिला फारसे भावले नाही, पण आमच्या मुलाला तो प्रकार फार आवडला. आज तो विस वर्षाचा आहे, आणि ह्या नागपंचमीला त्यानेच आठवण करुन दिली, म्हणून जवळ जवळ १० ते १२ वर्षांनी परत एकदा दिंडं बनवली व आम्ही सर्वांनी अगदी मिटक्या मारत खाल्ली. आम्ही बनवलेल्या दिंडीं चे चित्र पाठवायचे होते पण ते अपलोड करू शकलो नाही.

मि आत्तापर्यंत दिंडीं (अनेक वचन बरोबर आहे का ?) विषयी कोणी बोलताना ऐकले नव्हते त्या मुळे आज मिपा वर सचित्र दिंडीं पाहील्या आणि मन परत एकदा भूतकाळात आजी जवळ पोहोचले.

बाय द वे, दिंडीं हा प्रकार मूळता: कोणाचा आहे हे कळल्यास ज्ञानात भर पडेल.

आत्ता पर्यंत दिंडं तुपाबरोबर खाल्ले आहेत, पण तादूंळाची खीर बघून तोंडाला पाणी सुटले आहे, तेव्हा उद्याच्या शनिवारी ' मी खीर खाल्ली तर बूड घागरी' चा प्रयोग आहे. जमेल त्यांनी जमेल तसे यावे.

सौन्दर्य

सौन्दर्य's picture

6 Aug 2011 - 11:16 am | सौन्दर्य

अगदी सानिका सारखी नसली तरी खाण्यालायक झालेल्या 'दिंडं' चे फोटो खाली देत आहे.

सानिकास्वप्निल's picture

6 Aug 2011 - 5:21 pm | सानिकास्वप्निल

खुपच सुंदर फोटो आहे..मस्तच :)

पंगा's picture

7 Aug 2011 - 12:07 am | पंगा

अगदी सानिका सारखी नसली तरी खाण्यालायक

सानिकातै खाण्यालायक आहेत याची कल्पना नव्हती.

- (वॉनाबी नरभक्षक) पंगा.

पल्लवी's picture

8 Aug 2011 - 4:18 pm | पल्लवी

मस्त मस्त मस्त मस्त !