तडफड

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
1 Jul 2012 - 4:47 pm

मंदीर मशीद मठांच्या समोर लागलेली लांबच लांब रांग भक्तांची
लगबग, तगमग आणि लसलस, तिथल्या त्या दलालांची

त्यांनी मांडलेला तो भक्तीचा बाजार
त्यांच्या भोवती गर्दी करणारे लाचार

पापाच्या ओ़झ्यातुन मुक्त होण्या साठी त्यांची चाललेली केवीलवाणी धडपड
श्रध्देच्या पार चिंधड्या होउन जातात मनाची होते तडफड

कधीकधी किळस वाटते या सगळ्याची,
किव येते मला माझी स्वतःची

खरोखर का देव देवळात रहातो, पेटीतल्या दक्षीणेला भाळतो
आणि नवसाला देखील पावतो, देव खरच असा असतो?
या विचाराने मी मात्र भांबावतो.

जनतेला खुलेआम लुटणारे, निर्लज्ज व्यापारी, पुढारी, नोकरशहा, कारखानदार
पोलीस तर होतेच पण सैनिकही म्हणे आजकाल करतात भ्रष्टाचार

कुणावर विश्वास ठेवावा हेच समजेनासे होते.
मन विषण्ण आणि डोके सुन्न होते

कोणीतरी कसाब येतो दणादण गोळ्या चालवतो
तर कोणी थेट संसदेवर हल्ला करतो

देशाच्या आत्मसन्मानाची लक्तरे वेशीला टांगली जातात
महासत्तेचे नारे मात्र गल्लोगल्ली दिले जातात

लोकशाही पध्दतीने केलेल्या आंदोलनावरही पांढरी गिधाडे तुटुन पडतात
आंदोलनाच्या पध्द्तशीर पणे चिंधड्या उडवल्या जातात

भ्रष्टाचार, नफेखोरी, महागाई, बेशीस्त यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
जबाबदार नागरीक मात्र महागायक, महाविजेता शोधण्या मधे दंग आहेत

आजुबाजुला काय चालले आहे याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही
जे घडतय त्यावर कॄती करणे सोडाच विचार करणेही आम्हाला मान्य नाही

डोळ्यांवर झापडे आणि कानांमधे बोळे घालुन आम्ही बघायच ऐकायच टाळत आहोत
मुर्दाड पणाच्याही पलीकडचेही भयाण मुर्दाड आम्ही आता झालो आहोत.

श्रीराम,कॄष्ण, परशुराम, महिषासुर मर्दीनी आज असायला हवी होती
शिवाजी, राणाप्रताप यांची खरेतर आजच्या घडीला जास्त गरज होती

आज देव खरोखर असायला हवा होता असे मनात सारखे वाटते
आजकाल फार एकटं, असहाय्य, निराधार झाल्यासारखे होते

मग कधी तरी वाचलेला तुकोबारायाचा अभंग आठवतो...........

पायाला जाला नारु | तेथे बांधला कापुरु|
तिथे बिबव्याचे काम | अधमासि तो अधम ||
रुसला गुलाम | धनी करतो सलाम |
तेथे चाकराचे काम | अधमासी तो अधम ||
रुसली घरची दासी | धनी समजावी तियेसी |
तेथे बटकीचे काम | अधमासी तो अधम ||
देव्हार्‍यावरी विंचु आला | देव-पुजा नावडे त्याला |
तेथे पैजाराचे काम | अधमासी तो अधम ||
तुका म्हणे जाती | जाती साठी खाती माती ||

आता हातावर हात धरुन स्वस्थ बसुन चालणार नाही
चाबुक हाती घेतल्या शिवाय परीस्थीती बदलणार नाही

लावत ठीगळे लंगोटीला, बुवा हसतो गुढ जगाला

पैजारबुवा,

वीररसजीवनमान

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Jul 2012 - 6:16 pm | प्रचेतस

कविता जमली नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2012 - 6:23 pm | अत्रुप्त आत्मा

संजय क्षीरसागर's picture

1 Jul 2012 - 11:14 pm | संजय क्षीरसागर

कवितेचं जाऊं द्या, पण एकेक स्मायली कहर असते!

पक पक पक's picture

1 Jul 2012 - 9:39 pm | पक पक पक

हे काय आहे.... :sad: :sad: :sad: :sad:

स्पंदना's picture

2 Jul 2012 - 6:59 pm | स्पंदना

अतिशय आलेला राग अन हताशपणा