चीज मश्रुम्स


राम राम मंडळी, एका छोट्याश्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा पाककृती विभागात हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे. smiley

साहित्य : अळंबी (मश्रुम्स) ,

सारणासाठी : क्रीम चीज, लहान कांदे / पाती कांदा, २-३ लसुण पाकळ्या, चवी नुसार लाल तिखट, काळीमिरी पुड. (कांद्याची आणि लसणाची पुड मिळाली तर उत्तम.)
आवरणासाठी: मैदा, पावाचा चुरा (ब्रेडक्रम्स्), १ अंडे. चवी नुसार मीठ
(ही पाककृती अंड न घालताही करता येईल. smiley अंड्या ऐवजी कॉर्नस्टार्च पाण्यात विरघळुन वापरता येईल.)

तळण्यासाठी तेल.

कृती :

फ्लेवर्ड चीज मिळालं तर उत्तम. पण नाही मिळालं तर मग लहान कांदे आणि लसुण बारीक चिरुन घ्यावे.
चीजमध्ये कांदा, लसुण, लाल तिखटं, काळीमिरी पुड टाकुन एकजीव करुन घ्याव.

अळंबीचे देठ काढुन, स्वच्छ धुवुन आणि पुसुन घ्यावी. पोकळी मध्ये चीजच सारण भरावं.

ब्रेडक्रम्स् , फेटलेलं अंड , मैदा यांच्यात चवी नुसार मीठ घालुन तयार ठेवावं.

सारण भरलेली अळंबी अनुक्रमे मैदा, अंड, ब्रेडक्रम्स्, परत अंड आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळुन घ्यावी.

तेल तापवुन त्यात आवरणात घोळवलेल्या अळंब्या मंद आचेवर खरपुस तळुन घ्याव्या.

चटणी सॉस सोबत गरमागरमच वाढावं.


.

.

प्रतिक्रिया

रविवार आज चांगला जाणार ह्याची खात्री आहे.

वेताळ

>>काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे.
आणखी कुठे जाणार? smiley

फक्त मश्रूम आणायला हवे आहेत!

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||

चला फुटबॉल मॅचेस बघताना सोय झाली.. smiley

सोबत आईस्क्रीम

सहजरावांशी सहमती.
अर्थात रात्री १२ वाजता असले काही करणे जमणार नाही .... इन्फॅक्ट ह्या जन्मी असले काही करणे जमणार नाही ह्याची खात्री आहे.
शेवटचे २ फोटो मात्र जबर्‍या !

- (फूट्बॉलप्रेमी) छोटा डॉन

रसगुल्ल्या सारखा दिसतो आहे.गंपादादा रेशीपी लै बेश्ट, शेवटच्या फोटो कडे आधाश्या सारखा बघत हा प्रतिसाद टंकतोय. (सोकाजीरावांचे एखादे कॉकटेल, सोबत चिजमश्रुम आणि बाहेर धो धो कोसळणारा पाऊस काय खतरा काँबिनेशन असेल हे)

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

अगदी अगदी.... smileysmiley

____________________________________________________

I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

तू अजून ऑनलाईन काय करतोयेस रे सुहास?
मला वाटले होते आजपासूनच तू (पार्टीच्या अगडबंब बिलाच्या भितीनं) गायब होशील उद्या काय आहे माहिती हाय नव्हं smiley

मी पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

संपुर्ण प्रतिसादाशी सहमत.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

फोटो पाहूनच हे "स्थळ" पसंत पडले आहे,

- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.

अळंबीचं काहीपण द्या हो. आमच्यासारखी गुरं गपगुमान चरत्यात.
लई भारी. जीवाला गार वाटलं smiley

मला मश्रुम आवडत नाहीत smiley
दुसरा काय पर्याय वापरता येइल बरे ?

गणपाभौ तुमच्या पा.क्रु. च्या फोटुसाठी तुम्हाला +१०००००००००

पियुशा......

http://lovelypiyu.blogspot.com

दुसरा काय पर्याय वापरता येइल बरे ?

गणपाभौ तुमच्या पा.क्रु. च्या फोटुसाठी तुम्हाला +१०००००००००

माझा पण +१

सही रे ...सई
मला असं कळलं आहे की इथे सहीला फार महत्व आहे... smiley

खाउन बघ एकदा. शाकाहारी प्रकार आहे.

बादवे तुला पनीरसुद्धा आवडत नसेल. बरोबर????????

आवडत नाही म्हणल्यावर आपल्या पुर्वजांनी तयार केलेल्या म्हणी डोळ्यासमोर यायला लागल्या.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

@ चिं.का
बादवे तुला पनीरसुद्धा आवडत नसेल. बरोबर????????

नै नै नै ......................
हायला चिंका काका पनीर जीव की प्राण आहे आपला smiley

पियुशा......

http://lovelypiyu.blogspot.com

मस्तच दिसत आहेत रे चीज मशरुम्स गणपा,
स्वाती

चीज, तेल, अंडी....डॉक्टरांनी 'नियंत्रणात ठेवा!' म्हणून सांगितले आहेत अश्या कॅटेगरीतले तीन पदार्थ असे अटळपणे सामोरे आणलेस, विकेट पडली ना! आता करून पहाणारच (आणि खाणारच!)

करणार करणार!!
खाणार खाणार !!!

शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥

जबर्‍या..
गणपाशेटने बर्‍याच दिवसांनी पण एकदम खतरनाक चखणा बनवलाय.. smiley
करायचा प्रयत्न करतो पुढच्या वीकांताला. smiley

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

शॉलिट्ट !
मी मश्रुमची भाजी खाल्ली आहे,पण हा प्रकार त्याहुन टेस्टी दिसतोय ! smiley

पदार्थ दिसतोय कसला जबरा smiley
पण मश्रुमची अ‍ॅलर्जी असल्याकारणाने पास smiley
फोटो तर क्या बात smiley

वेलकम बॅक गणपाभौ smiley

***************************************************************
People Who Love To Eat Are Always The Best People - Julia Child
***************************************************************
http://delectable-delicious.blogspot.com/

कालच तर मशरुम-सोयाबीन भाजी हादडली.. आता पुन्हा हा आयटम म्हणजे बहार आहे.. जय गुरुदेव... smiley

- पिंगू

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |

पाकृ आणि फोटूनं अगदी मजा आणलीये.
आज किती दिवसांनी स्वातीताई आणि गणपा यांनी जुने मिपाचे दिवस परत आणले.
धन्यवाद.

झकास रेसिपी. smiley

अमृत

लै लै लै म्हणजे लै जबराट लागत असल,ह्ये मशरूमचं श्टार्टर...

आम्हा गवताळांची सोय केल्याबद्दल धन्यवाद.... smiley

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

खरेतर हा धागा उघडायचा नाही असे ठरवले होते पण....
ज्यासाठी उघडायचा नाही असे ठरवले होते तेच झाले smiley

- ( सध्या रस्सम भाताशिवाय पर्याय नसणारा) सोकाजी

जबरा पाकृ आणि फोटो आहेत. शेवटचे फोटो बघून तर प्रचंड जळजळ झाली.

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

गणपा 'एकटा' (बॅचलर) झाला...! smiley
बिच्चारा!

ही सहानुभूति फोटो पाहून झालेली जळजळ शमवण्याचा एक प्रयत्न आहे हे नम्रपणे लक्षात घ्यावे.

________________________________
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!

ग्रेटच. ही पाकृ मश्रुमशिवाय करता येइल काय? smiley

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

व्वा व्वा... गणपाभौ...येक नंबर!!! आणि वेलकम बॅक.... smiley शिवाय शाकाहारी पाकृने वेलकम बॅक केल्याने खुप आनंद झालाय....

बाकि पाकृ, फोटो बद्दल तर शब्दच अपुरे आहेत... क्या बात!!! असेच येत रहा!!!

------------------------------------------------
मनं वढाय वढाय.....

झक्कास. मस्तं. मी तर एकदम मश्रूमप्रेमी माणूस आहे. smiley खाऊन बघायला पाहीजे.

"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे

फोटो अन् पाकृ. अगदी मस्त.
आता स्वयंपाक घरात गेलाच आहात तर येऊ देत आणखीन पाककृती.
smiley

पास......

हलकट शिरोमणी !! smiley

***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.

गणपाशेठ, हा धागा मी उघडून पाहिला नि वाचला.

याची इथे नोंद करत आहे.

इत्यलम्

:davie: प्रास :davie:

लेखन मुसाफिरी
सांगीतिक आवड

खतरनाक...

करुन पहावी लागेल आता ही रेसिपी.

शाकाहारी माणसांची चंगळच आहे. मांसाहारी लोकांना जसा चिकन लॉलीपॉप असा पर्याय आहे. तशीच शाकाहारी माणसांची मिटक्या मारत खायची चांगलीच सोय केलीस की रे मित्रा तू.. smiley

नेहमीप्रमाणेच सगळे फोटू जबर्‍याच. पण सजावट आणि कलाकुसर अगदी खास गणपा श्टाईलची (कुशल बल्लवाची )

मी पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

झक्कास!!
सजावटीसाठी वापरलेला केशरी रंगाचा पदार्थ काय आहे?

रंगाचा पदार्थ

ती लसणाची चटणी आहे. फ्लॅशमुळे थोडी केशरी दिसतेय. smiley

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

लै भारी रे. चुकलेले (चिज मश्रुम) पोटात घ्यायला तयार आहे. तु पदार्थ नुसते फटुत दाखवतोस.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

गणपा साहेब, पहिल्याप्रथम अभिनंदन परत आलात त्याबद्दल. तुम्ही मिपाचे सचिन तेंडुलकर आहात रेसिपी विभागातले.

आता तुमची रेसिपी एकदम अप्रतिम. वाफाळता चहा , चिज मश्रुम व बाहेर धो धो पाउस व संताजी हे संताजी घोरपडे महाराजांवरची कादंबरी मस्त एकदम मस्त बेत.

निश

आमच्या गावात कांदा, बटाटा , वांगं, भेंडी आणि पालक एवढेच मिळते.... यातलं काय वापरुन करता येईल का?

********************

मश्रुम्स मस्त लाल/केशरी झाले आहेत...फूड कलर वापरला आहेस का?

नाही, रोहन या पाककृतीत खायचा रंग नाही वापरला.
माध्यम ते लहान आचेवर तळल्यास रंग ही चांगला येईल आणि मश्रुम्स शिजतीलही.

धागा वर आलाच आहे तर सर्व खवय्या वाचक आणि प्रतिसादकांचे आभार मानुन घेतो. smiley

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली