
राम राम मंडळी, एका छोट्याश्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा पाककृती विभागात हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे. :)
साहित्य : अळंबी (मश्रुम्स) ,

सारणासाठी : क्रीम चीज, लहान कांदे / पाती कांदा, २-३ लसुण पाकळ्या, चवी नुसार लाल तिखट, काळीमिरी पुड. (कांद्याची आणि लसणाची पुड मिळाली तर उत्तम.)
आवरणासाठी: मैदा, पावाचा चुरा (ब्रेडक्रम्स्), १ अंडे. चवी नुसार मीठ
(ही पाककृती अंड न घालताही करता येईल. ;) अंड्या ऐवजी कॉर्नस्टार्च पाण्यात विरघळुन वापरता येईल.)

तळण्यासाठी तेल.
कृती :

फ्लेवर्ड चीज मिळालं तर उत्तम. पण नाही मिळालं तर मग लहान कांदे आणि लसुण बारीक चिरुन घ्यावे.
चीजमध्ये कांदा, लसुण, लाल तिखटं, काळीमिरी पुड टाकुन एकजीव करुन घ्याव.

अळंबीचे देठ काढुन, स्वच्छ धुवुन आणि पुसुन घ्यावी. पोकळी मध्ये चीजच सारण भरावं.

ब्रेडक्रम्स् , फेटलेलं अंड , मैदा यांच्यात चवी नुसार मीठ घालुन तयार ठेवावं.

सारण भरलेली अळंबी अनुक्रमे मैदा, अंड, ब्रेडक्रम्स्, परत अंड आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळुन घ्यावी.
तेल तापवुन त्यात आवरणात घोळवलेल्या अळंब्या मंद आचेवर खरपुस तळुन घ्याव्या.
चटणी सॉस सोबत गरमागरमच वाढावं.

.

.
प्रतिक्रिया
खतरा....फोटु/पाकु
खतरनाक!
भारी!
+१
In reply to भारी! by सहज
वरतुन दुसरा फोटो
+१
In reply to वरतुन दुसरा फोटो by jaypal
सुहास ऑनलाईन कसा?
In reply to +१ by सुहास झेले
jaypal
In reply to वरतुन दुसरा फोटो by jaypal
वाह....
गणपाभौचा विजय असो...
मला मश्रुम आवडत नाहीत दुसरा
पियुषा ताईंशी दोन्ही बाबतीत सहमत
In reply to मला मश्रुम आवडत नाहीत दुसरा by पियुशा
पियुशा.
In reply to मला मश्रुम आवडत नाहीत दुसरा by पियुशा
@ चिं.काबादवे तुला
In reply to पियुशा. by चिंतामणी
मस्त!
गणपादेवा! धन्य आहेस!
करणार करणार!! खाणार खाणार !!!
जबर्या.. गणपाशेटने बर्याच
शॉलिट्ट ! मी मश्रुमची भाजी
वाह! वेलकम बॅक
कालच तर मशरुम-सोयाबीन भाजी
पाकृ आणि फोटूनं अगदी मजा
ब्रेक के बाद
लै लै लै म्हणजे लै जबराट लागत
जबर्या...
जबरा
गणपा 'एकटा' (बॅचलर) झाला...!
ग्रेटच. ही पाकृ मश्रुमशिवाय
व्वा व्वा... गणपाभौ...येक
झक्कास. मस्तं. मी तर एकदम
फोटो
पास......
हलकट शिरोमणी !!
गणपाशेठ, हा धागा मी उघडून
खतरनाक... करुन पहावी लागेल
लय भारी गणपाभौ
झक्कास!! सजावटीसाठी वापरलेला
रंगाचा पदार्थ ती लसणाची चटणी
In reply to झक्कास!! सजावटीसाठी वापरलेला by बाळ सप्रे
गणपा- धडाक्यात पुनरागमन केलेस रे.
गणपा साहेब, पहिल्याप्रथम अभिनंदन परत आलात त्याबद्दल.
आमच्या गावात कांदा, बटाटा ,
झकास
नाही या पाकृतीत खायचा रंग
In reply to झकास by रोहन कुळकर्णी
धन्यवाद गणपाभौ!