फूड प्रोसेसर कोणता घ्यावा?

एमी's picture
एमी in काथ्याकूट
6 Jun 2012 - 11:30 am
गाभा: 

कणिक मळणे आणि मिक्सर हे फंक्शन्स नीट चालावे.
बाकी ज्युसर चॉपर चा फारसा वापर होणार नाही.
मोटर चांगली हवी.
माउथशट, नापतोल वर बरेच रिव्ह्यू वाचले. ओळखीतल्यांना विचारले.
त्यांनी सांगतले केनस्टार, फिलीप्स.
डी मार्ट, बीग बाझार मधे फक्त बजाज, उषा, महाराजा चे एक एक मॉडेल आहे.
केनस्टार, उषा चा रिव्ह्यू चांगला नाही.
फिलीप्स7625 कसा आहे? जार २ च आहेत त्यात पण मला कणिक मळणे आणि मिक्सर च हवाय.
मिपाकर मदत करु शकतील का?

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

6 Jun 2012 - 11:34 am | मृत्युन्जय

अर्री फूड प्रोसेसर साठी कसले धागे टाकताय उद्या टोस्टरसाठी एक धागा टाकाल हे काय टीव्ही व्यापर जर्नल आहे काय?

मिपाकर मदत करतील का ? हा काय प्रश्न झाला ?
मिपाकर सदैव तुम्हाला तुमच्या लहान-सहान प्रॉब्लेम मध्ये मदत करायला / सल्ले द्यायला नेहमी तत्पर असतील.
पुढे भविष्यातही काही छोटे-मोठे ,घाउक - किरकोळ विकत घ्यावेसे वाटले तर अगदी निसंकोच विचारा .

" बाकी आम्ही फुड प्रोसेसर वापरत नाही " ;)
पण फिलिप्स अन Inalsa Wonder Maxie हे दोन छान ऑपशन आहेत .

मिपाकर मदत करतील का ? हा काय प्रश्न झाला ?

अगदी हेच म्हण्तो....
पाव्हण बाई तुम्ही प्रोसेसर घेण्या पेक्शा स्वयंपाकाला बाई ठेवा .म्हण्जे तुम्हाला सोफ्यात बसुन टिव्हि पण बघता येइल अन यजमानांची पण चांगल्य जेवणाची ;) होइल..

विसुनाना's picture

6 Jun 2012 - 11:40 am | विसुनाना

हा काय धागा काढण्यासारखा विषय आहे का? आणि लिहीतानाही काहीही काळजी घेतलेली नाही.
उगाच काहीही लिहायचे काय?
अवांतर :
'जार २ च आहेत त्यात' या शब्दांचा मराठीत काय अर्थ होतो ते आठवून हसू आले.

मृत्युन्जय's picture

6 Jun 2012 - 12:01 pm | मृत्युन्जय

'जार २ च आहेत त्यात' या शब्दांचा मराठीत काय अर्थ होतो ते आठवून हसू आले.

:) मूळ शब्द फारसी आहे बहुधा. वाक्यरचनेतली गम्मत आधी लक्षात नाही आली. तुम्ही सांगितल्यावर मलाही हसू आले. :)

श्रावण मोडक's picture

6 Jun 2012 - 3:17 pm | श्रावण मोडक

आता 'फुड प्रोसेसर' म्हटलं की 'जार' येणारच. ;-)

jaypal's picture

6 Jun 2012 - 11:43 am | jaypal

काय झाल? ते सांगा की पावन

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jun 2012 - 11:55 am | परिकथेतील राजकुमार

तुमच्या ऐपतीत बसेल तो घ्या.

बाकी प्रोसेसर मधले तुमचे एकूण ज्ञान बघता, सध्या सेकंड हँडच घ्या आधी.

आदिजोशी's picture

6 Jun 2012 - 12:23 pm | आदिजोशी

नवलेखकांना नाउमेद करणार्‍या पर्‍याचा जाहीर निषेध निषेध निषेध. आज प्रोसेसर ह्या किरकोळ विषयाचा धागा काढला.
त्याला मिळणार्‍या प्रतिसादांतून प्रेरणा घेऊन पुढे अख्ख्या जगात खळबळ माजवणारा 'अणूबाँब कोणता घ्यावा' हा धागा लेखक काढेल तेव्हा कुठे तोंड लपवत फिरशील नराधमा?

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jun 2012 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार

अ‍ॅड्या लेका माझ्या येवढ्या माहितीपूर्ण आणि आस्थेने भरलेल्या प्रतिसादा विषयी असे उदगार तू काढलेसच कसे ?

तुमच्या ऐपतीत बसेल तो घ्या.

म्हणजे उगाच ऋण काढून सण साजरे करू नका. EMI च्या मागे लागू नका. असा किती व्यावहारीक सल्ला दिला आहे बघ मी.

बाकी प्रोसेसर मधले तुमचे एकूण ज्ञान बघता, सध्या सेकंड हँडच घ्या आधी.

म्हणजे आधी जुना प्रोसेसर घ्या, त्याच्याशी काय ते खेळ करा. एकदा का थोडे ज्ञान आले की मग नवीन घ्या. हा देखील किती काळजीपूर्वक सल्ला दिला आहे बघ रे.

आणि राहिला मुद्दा अणुबॉंबचा, तर आत्ताशीक ते सोफ्यावरून उठून किचेन मध्ये आले आहेत. घराबाहेर जाऊन आणुबाँब चाचणी करेपर्यंत त्यांना अजून बरेच यक्षप्रश्न पडायचे बाकी आहेत.

करा गम्मत गरिबाची ..
बिच्चारं पावनं :(

टवाळ कार्टा's picture

6 Jun 2012 - 7:22 pm | टवाळ कार्टा

अलेले उगी उगी :P

बलं तु म्हन्तोश म्हनुन मी उगी उगी :P

टवाळ कार्टा's picture

6 Jun 2012 - 8:11 pm | टवाळ कार्टा

आता बट्टी :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Jun 2012 - 8:44 pm | निनाद मुक्काम प...

जरा स्थिर स्थावर होऊ दे त्यांना
मग जुने स्कोर बघ कसे नव्या दमाने ...
हा दु आयडी असला तर मग बघायला नकोच

श्रीरंग_जोशी's picture

6 Jun 2012 - 7:28 pm | श्रीरंग_जोशी

अहो मिपावरील नव्या सदस्यांच्या अंगी मिपा बाणा (अंगावर आले तर शिंगावर घ्या) यावा यासाठीचे ते विशेष प्रयत्न आहेत असे आम्ही मानतो.

Singer कंपनी चा मी ८ वर्ष वापरत आहे.चांगला आहे.रोनाल्ड चा पण खुप चांगला आहे. पण एक suggestion:-फक्त कणिक मळण्या साठी food processor कश्याला घेता?कणिक मळुन झाल्यावर ते भांडे धुवायचा व्याप असतो.मग कंटाळुन बरेच जण हातानीच कणिक मळतात.त्यात बाकी पण खुप attachments असतात.जर खरच त्याचे maximum utilisation करणार असाल तरच घ्या.नाही तर उगीचच जागा खुप अडते सगळे attachments ठेवायला.
जर बाकी काही उपयोग करणार नसाल तर साधा mixer/grinder घ्या.

एमी's picture

6 Jun 2012 - 1:12 pm | एमी

(mobile varun pratisad det aahe)
kanik maltana haat (wrist) sujatoy.tya mule foodprocessor havay.
Navin brand suchwalya baddal dhanyawad :-)

तिमा's picture

6 Jun 2012 - 1:35 pm | तिमा

फुड प्रोसेसर अजिबात घेऊ नये. बहुतेक प्रोसेसर्स मधे दोन पाती खालून एका बेल्टने जोडलेली असतात. मोटर एकच असते. एकाचे लॉक नीट लागेनासे झाले की दुसराही चालत नाही. वापरल्यानंतर स्वच्छ करणे हा एक ताप असतो. तेवढ्या वेळेत हाताने कणीक मळून होते.

निवेदिता-ताई's picture

7 Jun 2012 - 8:33 am | निवेदिता-ताई

सहमत आहे......

माझ्याकडे महाराजाचा फुड प्रोसेसर होता, पण असेच झाले, मी विकुन टाकला, आता हातानेच कणीक मळते

विजुभाऊ's picture

6 Jun 2012 - 12:31 pm | विजुभाऊ

टारझन ८२ मॉडेल फारच छान आहे.
त्यात कणीक तिंबणे , खिमा करणे , भुगा करणे वगैरे सर्व ऑप्शन मस्त आहेत.
अ‍ॅडीशनल "जार" ( फार्सी अर्थ घेतला तरी चालेल) नसला तरी चालतो.
भरपूर पॉवरफुल्ल असलेल्या या मॉडेलचे पॉवर कंझंप्शन थोडे जास्त आहे. शिवाय जागा इतरांपेक्षा जास्त लागते अर्थात त्याबद्दल मोडेलची स्वतःची काही तक्रार नाहिय्ये.

बाळ सप्रे's picture

6 Jun 2012 - 12:36 pm | बाळ सप्रे

इनाल्सा एकदम भिक्कार आहे. वर्षभरात ४-५ वेळा बंद पडला. प्लॅस्टीक जार तडकला. सर्व्हिसच्या नावाने बोंब आहे.
केनवूड चांगला आहे..

एमी's picture

6 Jun 2012 - 1:16 pm | एमी

:-)

चिरोटा's picture

6 Jun 2012 - 1:31 pm | चिरोटा

टिपिकल मिपा प्रतिसाद-
१) फुकट खायला बोलवणार असाल तर सांगतो.
२)फूड प्रोसेसर घेताना तो नीट पारखून घेणे.तो खूप जुना तर नाही ना हे बघणे.
३)फिलिप्स, बजाज्,उषा ह्या प्रसिद्ध ब्रॅन्डपैकी घेतलेला बरा.
४)बजाजची सर्वीस चांगली आहे. एकदा १५ पाहुणे आले होते. डाळीचे मिश्रण बनवताना प्रोसेसर बिघडला. फोन केल्यावर बजाजचा माणूस तात्काळ हजर झाला आणि प्रोसेसर २० मिनिटात दुरुस्त केला.
५) हल्ली चिनी बनावटीचे फूड प्रोसेसर बाजारात आहेत. त्यापासून सावधान. मित्राने एकदा घेतला होता. दोन दिवसात खराब झाला.
६)फूड प्रोसेसर घेताय का? वा वा. कुठचाही घ्या. पण आम्हाला जेवायला बोलवा.
७)आपण फूड प्रोसेसर विकत घेवू शकतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न.
८)वेळेचे भान ठेवलेत आणि कामाची नीट आखणी केलीत तर फूड प्रोसेसरची तशी गरज भासणार नाही.शेवटी जेवणारा जेवणाची चव बघणार्.काय ?
९)आईने,मावशीने,आजीने,काकूने,बायकोने हाताने बनवलेल्या जेवणाची चव फूड प्रोसेसरला नाही.

जो तुमच्या सोफासेट ला शोभुन दिसेल तोच घ्या ;-)

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2012 - 2:01 pm | संजय क्षीरसागर

आला प्रश्न की टाक पोस्ट! जस्ट डायल म्हणून लोकल सर्च इंजीन आहे २२२२ २२२२ त्यांना हे प्रश्न विचारा. उद्या कामवाली कुठे मिळेल? असा प्रश्न पडायचा

चिरोटा's picture

6 Jun 2012 - 2:26 pm | चिरोटा

नीट बघा की राव-
माउथशट, नापतोल वर बरेच रिव्ह्यू वाचले. ओळखीतल्यांना विचारले.त्यांनी सांगतले केनस्टार, फिलीप्स.
डी मार्ट, बीग बाझार मधे फक्त बजाज, उषा, महाराजा चे एक एक मॉडेल आहे.
केनस्टार, उषा चा रिव्ह्यू चांगला नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jun 2012 - 1:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाहुणे अशा चौकशीसाठी कृपया तुम्ही खरडफळ्याचा वापर करावा असे वाटते.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

6 Jun 2012 - 1:40 pm | कुंदन

अतिशय संयत प्रतिसाद.

सहज's picture

6 Jun 2012 - 1:50 pm | सहज

कणीक छान होते. मशीन टिकाउ आहे.
ब्राउन मल्टीक्वीक ५ किचन मशीन

पैसा's picture

6 Jun 2012 - 1:59 pm | पैसा

तुम्हाला मिक्सरची जास्त गरज आहे ना? मग मिक्सर घ्या आणि कणीक मळण्यासाठी साधारण पुरणयंत्रासारखं हँडलवालं एक भांडं Dough Maker चार पाचशे रुपयांना मिळतं ते घ्या. (पण ते विजेवर चालणार नसतं हो, तुम्हालाच गरगर फिरवावं लागेल.) स्वस्तात काम झालं.

Disclaimer: Dough Maker माझ्याकडे नाहीये. मी फक्त फुकटचा सल्ला देतेय!

घ्या तुमच आपलं काही तरीच.
अगो पैसा ताय त्यांच्या हाताला कणिक तिंबुन सुज येतेय म्हणुन तर ते स्वयंचलित यंत्र मागतायत तर तु त्यांना पुरण यंत्र विकायला निघालीस. आता हाताला पीळ पडले तर सोडवणार कोण?

कणिक तिंबून हाताला सूज येतेय म्हणतायेत बिचारे/ बिचार्‍या. तर येवढे मिपावरचे बल्लवाचार्य तुम्ही त्यात संपादक, मग दोनचार डोसे, घावन, धिरडी, थालीपीटाच्या रेशिप्या द्या की राव !! ;) म्हणजे फूड प्रोसेसरचा खर्च वाचेल त्यांचा.

(पण ते विजेवर चालणार नसतं हो, तुम्हालाच गरगर फिरवावं लागेल.) - हो तेवढीच उर्जाबचत सुद्धा होईल.

सविता००१'s picture

6 Jun 2012 - 3:02 pm | सविता००१

रोनाल्डचा खूप छान आहे. एकतर वापरायला सोपा आहे. आणि मलातरी गेल्या चार वर्षांमध्ये काहीही प्रॉब्लेम आला नाहीये. पण माझ्या बहिणीकडून कळाले की त्यांची आफ्टर सेल्स सर्विसही तितकीच चांगली आहे. :)

चौकटराजा's picture

6 Jun 2012 - 4:57 pm | चौकटराजा

हल्केच घ्या या विनंतीने - माझा जुना फूडप्रोसेसर विकणे आहे. तो चालू झाला की मस्त
संगीतानुभव येतो. खाणे व गाणे एकाच प्रोसेस मधे . बघा इच्यार करूनशान ......

संपत's picture

6 Jun 2012 - 6:55 pm | संपत

हा धागा येऊन एवढा वेळ झाला तरी अजून विडम्बन कसे आले नाही?

टवाळ कार्टा's picture

6 Jun 2012 - 7:20 pm | टवाळ कार्टा

वेगळ्या विडंबनाची गरज आहे का? :P

श्रीरंग_जोशी's picture

6 Jun 2012 - 7:21 pm | श्रीरंग_जोशी

तुम्ही सांगितलेल्या गरजांना रोटी - मेकर नावाचे यंत्र अधिक सोयीचे ठरेल असे वाटते.

जेव्हा मी स्वतः स्वयंपाक करण्यास सुरुवात केली होती तेव्हा काही जणांनी हा सल्ला दिला होता. तथापि 'पोळ्या करून देणाऱ्या बाई' यांची सेवा घेणे हेच सर्वोत्तम हा सल्ला जाणकारांकडून मिळाला व तोच मी मानला.

जेनी...'s picture

6 Jun 2012 - 7:24 pm | जेनी...

तुम्ही ' पोळ्या करुन देनार्‍या बाईचा 'सल्ला मानता आणि लोकाना रोटी मेकर घ्ययचा सल्ला देता ..
कमाल है राव तुमची तर ......

श्रीरंग_जोशी's picture

6 Jun 2012 - 7:33 pm | श्रीरंग_जोशी

सल्ला जाणकारांचा होता असे लिहिले आहे.

धागाकर्ते चिकित्सक आहेतच, ते योग्य तोच निर्णय घेतील व आपल्या अनुभवाचे बोल मिपाकरांना सांगतीलच...

शैलेन्द्र's picture

6 Jun 2012 - 7:50 pm | शैलेन्द्र

दगडी चांगला असतो..

तिनशे रुपायात मिळतो.. आमची वडारीन १०० रुपयात (दर वर्षाची ए एम सी ), प्रोसेसरचे ओव्हरऑयलींग करायला येते.

रोनाल्ड फुप्रोचा अनुभव चांगला आहे. मला नाही, आईला. अनेक वर्षे.
माझ्याकडे हॅमिल्टनचा होता. दोन वर्षांच्या अतिवापरानंतर मोडला.
त्यात कणिक तिंबणे, भाज्या चिरणे, किसणीची आट्याचमेंट लावून गाजर, काकडी, मुळा, बीटरूट किसणे अशी कामे रोज होत असत. माझा हात दुखणे थांबले (अर्थातच फुप्रो हे औषध नव्हे). आता अगदी छोटुकला फुप्रो असतो तो आणलाय. कधितरी वापरते.

जेनी...'s picture

6 Jun 2012 - 8:05 pm | जेनी...

फुप्रो कि जय हो :D

कवितानागेश's picture

7 Jun 2012 - 8:28 am | कवितानागेश

कितीही प्रयत्न केला तरी फूड प्रोसेसरमध्ये कणिक सैल मळली जाते.
त्यामुळे आणला तरी काही उपयोग होत नाही असा स्वानुभव आहे. बाईच ठेवा.

प्यारे१'s picture

7 Jun 2012 - 10:19 am | प्यारे१

>>>बाईच ठेवा.

आँ???????
एका स्त्रीने स्त्रीलाच वस्तू म्हणून संबोधलेलं पाहून ड्वाळे पाणावले. कुणी काय प्रतिक्रिया द्यावी हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. फक्त एक निरीक्षण नोंदवले. ;)

-प्यारलिया (प्यारे चेंगट) :)

कवितानागेश's picture

7 Jun 2012 - 12:06 pm | कवितानागेश

च्यायला. :D
कुणीतरी नोकरमाणूस पोळ्या करायला ठेवा असे म्हणायचय रे बाबा.
कारण कणीक मळायला यंत्र वापरले तरी पोळ्या लाटून पण हात दुखणारच.

मोदक's picture

7 Jun 2012 - 12:07 pm | मोदक

५०.

सगळ्यात महागडा घ्या... टिकाऊ व उत्तम!! हाय काय नाय काय!!

अविनाशकुलकर्णी's picture

7 Jun 2012 - 10:07 pm | अविनाशकुलकर्णी

या वरुन एक आठवले..एक मैत्रीण दुस~या मैत्रीणीला सल्ला विचारत असते.....

कपडे साफ धुतले जात नाहित काय करावे? कुठला साबण ,वाशिंग मशिन वापरावे?
माझे सगळे करुन झाले पण खर सांगु का? नव~याला पर्याय नाहि..

इनिगोय's picture

9 Jun 2012 - 8:07 pm | इनिगोय

shift+R असा टाईप करा.

सुनील's picture

7 Jun 2012 - 10:36 pm | सुनील

घेतला का फूड प्रोसेसर?

पर्नल नेने मराठे's picture

9 Jun 2012 - 6:42 pm | पर्नल नेने मराठे

केनस्टार वापरतेय गेले ५ वर्शे, पावभाजीच्या भाज्या, पाले भाज्या चिरायला छान उपयोग होतोय, कणिक पण छान भिजवता येते. मात्र नाजुक हाताळायला लागतोय, भान्डी फारच नाजुक आहेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2012 - 2:42 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत... पावभाजी फारच छान होते! ;)

कौतिक राव's picture

10 Jun 2012 - 4:04 am | कौतिक राव

कशाला उगा नाही त्या भान्गडीत पडता?? ते फुड्प्रोसेसर धुण म्हण्जे ताप असतो डोक्याला..

भरत कुलकर्णी's picture

10 Jun 2012 - 4:12 am | भरत कुलकर्णी

फुडप्रोसेसर फार मोठा होतो. तो धुवायलाही कटकट आहेच.
पण तुमचा हात दुखत असल्याने मायक्रोप्रोसेसर घ्यायला काही हरकत नाही. इंटेलचा चांगला आहे पण महाग असतो. त्यांचे मॉडेल क्झिऑन वैगेरे हाय लेवलची आहेत. त्यांचा आयटम घरच्यासाठी बरा आहे.
त्यापेक्षा एएमडी चा घ्यावा. मध्यम किंमतीत आहे. अ‍ॅथलॉन बर्‍याच जणांकडे असावा.

शिल्पा ब's picture

10 Jun 2012 - 4:50 am | शिल्पा ब

इतका आटापिटा करण्यापेक्षा पोळ्या करायला बाई लावा. तिलाच भाजी पण करायला सांगा.

त्यापेक्षा एक बल्लवाचार्य लावा म्हनाव..

भडकमकर मास्तर's picture

10 Jun 2012 - 5:05 pm | भडकमकर मास्तर

एकच सल्ला राहिला होता तोही देतो..
एखादे लग्न केले की पोळ्या करायचा प्रश्न मिटेल