मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फूड प्रोसेसर कोणता घ्यावा?

एमी · · काथ्याकूट
कणिक मळणे आणि मिक्सर हे फंक्शन्स नीट चालावे. बाकी ज्युसर चॉपर चा फारसा वापर होणार नाही. मोटर चांगली हवी. माउथशट, नापतोल वर बरेच रिव्ह्यू वाचले. ओळखीतल्यांना विचारले. त्यांनी सांगतले केनस्टार, फिलीप्स. डी मार्ट, बीग बाझार मधे फक्त बजाज, उषा, महाराजा चे एक एक मॉडेल आहे. केनस्टार, उषा चा रिव्ह्यू चांगला नाही. फिलीप्स7625 कसा आहे? जार २ च आहेत त्यात पण मला कणिक मळणे आणि मिक्सर च हवाय. मिपाकर मदत करु शकतील का?

वाचने 14166 वाचनखूण प्रतिक्रिया 61

पियुशा 06/06/2012 - 11:38
मिपाकर मदत करतील का ? हा काय प्रश्न झाला ? मिपाकर सदैव तुम्हाला तुमच्या लहान-सहान प्रॉब्लेम मध्ये मदत करायला / सल्ले द्यायला नेहमी तत्पर असतील. पुढे भविष्यातही काही छोटे-मोठे ,घाउक - किरकोळ विकत घ्यावेसे वाटले तर अगदी निसंकोच विचारा . " बाकी आम्ही फुड प्रोसेसर वापरत नाही " ;) पण फिलिप्स अन Inalsa Wonder Maxie हे दोन छान ऑपशन आहेत .

In reply to by पियुशा

पक पक पक 06/06/2012 - 20:18
मिपाकर मदत करतील का ? हा काय प्रश्न झाला ? अगदी हेच म्हण्तो.... पाव्हण बाई तुम्ही प्रोसेसर घेण्या पेक्शा स्वयंपाकाला बाई ठेवा .म्हण्जे तुम्हाला सोफ्यात बसुन टिव्हि पण बघता येइल अन यजमानांची पण चांगल्य जेवणाची ;) होइल..

विसुनाना 06/06/2012 - 11:40
हा काय धागा काढण्यासारखा विषय आहे का? आणि लिहीतानाही काहीही काळजी घेतलेली नाही. उगाच काहीही लिहायचे काय? अवांतर : 'जार २ च आहेत त्यात' या शब्दांचा मराठीत काय अर्थ होतो ते आठवून हसू आले.

In reply to by विसुनाना

मृत्युन्जय 06/06/2012 - 12:01
'जार २ च आहेत त्यात' या शब्दांचा मराठीत काय अर्थ होतो ते आठवून हसू आले. :) मूळ शब्द फारसी आहे बहुधा. वाक्यरचनेतली गम्मत आधी लक्षात नाही आली. तुम्ही सांगितल्यावर मलाही हसू आले. :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

आदिजोशी 06/06/2012 - 12:23
नवलेखकांना नाउमेद करणार्‍या पर्‍याचा जाहीर निषेध निषेध निषेध. आज प्रोसेसर ह्या किरकोळ विषयाचा धागा काढला. त्याला मिळणार्‍या प्रतिसादांतून प्रेरणा घेऊन पुढे अख्ख्या जगात खळबळ माजवणारा 'अणूबाँब कोणता घ्यावा' हा धागा लेखक काढेल तेव्हा कुठे तोंड लपवत फिरशील नराधमा?

In reply to by आदिजोशी

अ‍ॅड्या लेका माझ्या येवढ्या माहितीपूर्ण आणि आस्थेने भरलेल्या प्रतिसादा विषयी असे उदगार तू काढलेसच कसे ?
तुमच्या ऐपतीत बसेल तो घ्या.
म्हणजे उगाच ऋण काढून सण साजरे करू नका. EMI च्या मागे लागू नका. असा किती व्यावहारीक सल्ला दिला आहे बघ मी.
बाकी प्रोसेसर मधले तुमचे एकूण ज्ञान बघता, सध्या सेकंड हँडच घ्या आधी.
म्हणजे आधी जुना प्रोसेसर घ्या, त्याच्याशी काय ते खेळ करा. एकदा का थोडे ज्ञान आले की मग नवीन घ्या. हा देखील किती काळजीपूर्वक सल्ला दिला आहे बघ रे. आणि राहिला मुद्दा अणुबॉंबचा, तर आत्ताशीक ते सोफ्यावरून उठून किचेन मध्ये आले आहेत. घराबाहेर जाऊन आणुबाँब चाचणी करेपर्यंत त्यांना अजून बरेच यक्षप्रश्न पडायचे बाकी आहेत.

In reply to by जेनी...

जरा स्थिर स्थावर होऊ दे त्यांना मग जुने स्कोर बघ कसे नव्या दमाने ... हा दु आयडी असला तर मग बघायला नकोच

In reply to by आदिजोशी

अहो मिपावरील नव्या सदस्यांच्या अंगी मिपा बाणा (अंगावर आले तर शिंगावर घ्या) यावा यासाठीचे ते विशेष प्रयत्न आहेत असे आम्ही मानतो.

Maharani 06/06/2012 - 12:31
Singer कंपनी चा मी ८ वर्ष वापरत आहे.चांगला आहे.रोनाल्ड चा पण खुप चांगला आहे. पण एक suggestion:-फक्त कणिक मळण्या साठी food processor कश्याला घेता?कणिक मळुन झाल्यावर ते भांडे धुवायचा व्याप असतो.मग कंटाळुन बरेच जण हातानीच कणिक मळतात.त्यात बाकी पण खुप attachments असतात.जर खरच त्याचे maximum utilisation करणार असाल तरच घ्या.नाही तर उगीचच जागा खुप अडते सगळे attachments ठेवायला. जर बाकी काही उपयोग करणार नसाल तर साधा mixer/grinder घ्या.

In reply to by Maharani

तिमा 06/06/2012 - 13:35
फुड प्रोसेसर अजिबात घेऊ नये. बहुतेक प्रोसेसर्स मधे दोन पाती खालून एका बेल्टने जोडलेली असतात. मोटर एकच असते. एकाचे लॉक नीट लागेनासे झाले की दुसराही चालत नाही. वापरल्यानंतर स्वच्छ करणे हा एक ताप असतो. तेवढ्या वेळेत हाताने कणीक मळून होते.

विजुभाऊ 06/06/2012 - 12:31
टारझन ८२ मॉडेल फारच छान आहे. त्यात कणीक तिंबणे , खिमा करणे , भुगा करणे वगैरे सर्व ऑप्शन मस्त आहेत. अ‍ॅडीशनल "जार" ( फार्सी अर्थ घेतला तरी चालेल) नसला तरी चालतो. भरपूर पॉवरफुल्ल असलेल्या या मॉडेलचे पॉवर कंझंप्शन थोडे जास्त आहे. शिवाय जागा इतरांपेक्षा जास्त लागते अर्थात त्याबद्दल मोडेलची स्वतःची काही तक्रार नाहिय्ये.

चिरोटा 06/06/2012 - 13:31
टिपिकल मिपा प्रतिसाद- १) फुकट खायला बोलवणार असाल तर सांगतो. २)फूड प्रोसेसर घेताना तो नीट पारखून घेणे.तो खूप जुना तर नाही ना हे बघणे. ३)फिलिप्स, बजाज्,उषा ह्या प्रसिद्ध ब्रॅन्डपैकी घेतलेला बरा. ४)बजाजची सर्वीस चांगली आहे. एकदा १५ पाहुणे आले होते. डाळीचे मिश्रण बनवताना प्रोसेसर बिघडला. फोन केल्यावर बजाजचा माणूस तात्काळ हजर झाला आणि प्रोसेसर २० मिनिटात दुरुस्त केला. ५) हल्ली चिनी बनावटीचे फूड प्रोसेसर बाजारात आहेत. त्यापासून सावधान. मित्राने एकदा घेतला होता. दोन दिवसात खराब झाला. ६)फूड प्रोसेसर घेताय का? वा वा. कुठचाही घ्या. पण आम्हाला जेवायला बोलवा. ७)आपण फूड प्रोसेसर विकत घेवू शकतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न. ८)वेळेचे भान ठेवलेत आणि कामाची नीट आखणी केलीत तर फूड प्रोसेसरची तशी गरज भासणार नाही.शेवटी जेवणारा जेवणाची चव बघणार्.काय ? ९)आईने,मावशीने,आजीने,काकूने,बायकोने हाताने बनवलेल्या जेवणाची चव फूड प्रोसेसरला नाही.

In reply to by जोशी 'ले'

आला प्रश्न की टाक पोस्ट! जस्ट डायल म्हणून लोकल सर्च इंजीन आहे २२२२ २२२२ त्यांना हे प्रश्न विचारा. उद्या कामवाली कुठे मिळेल? असा प्रश्न पडायचा

In reply to by संजय क्षीरसागर

चिरोटा 06/06/2012 - 14:26
नीट बघा की राव- माउथशट, नापतोल वर बरेच रिव्ह्यू वाचले. ओळखीतल्यांना विचारले.त्यांनी सांगतले केनस्टार, फिलीप्स. डी मार्ट, बीग बाझार मधे फक्त बजाज, उषा, महाराजा चे एक एक मॉडेल आहे. केनस्टार, उषा चा रिव्ह्यू चांगला नाही.

पैसा 06/06/2012 - 13:59
तुम्हाला मिक्सरची जास्त गरज आहे ना? मग मिक्सर घ्या आणि कणीक मळण्यासाठी साधारण पुरणयंत्रासारखं हँडलवालं एक भांडं Dough Maker चार पाचशे रुपयांना मिळतं ते घ्या. (पण ते विजेवर चालणार नसतं हो, तुम्हालाच गरगर फिरवावं लागेल.) स्वस्तात काम झालं. Disclaimer: Dough Maker माझ्याकडे नाहीये. मी फक्त फुकटचा सल्ला देतेय!

In reply to by पैसा

गणपा 06/06/2012 - 14:17
घ्या तुमच आपलं काही तरीच. अगो पैसा ताय त्यांच्या हाताला कणिक तिंबुन सुज येतेय म्हणुन तर ते स्वयंचलित यंत्र मागतायत तर तु त्यांना पुरण यंत्र विकायला निघालीस. आता हाताला पीळ पडले तर सोडवणार कोण?

In reply to by गणपा

सूड 06/06/2012 - 14:26
कणिक तिंबून हाताला सूज येतेय म्हणतायेत बिचारे/ बिचार्‍या. तर येवढे मिपावरचे बल्लवाचार्य तुम्ही त्यात संपादक, मग दोनचार डोसे, घावन, धिरडी, थालीपीटाच्या रेशिप्या द्या की राव !! ;) म्हणजे फूड प्रोसेसरचा खर्च वाचेल त्यांचा.

सविता००१ 06/06/2012 - 15:02
रोनाल्डचा खूप छान आहे. एकतर वापरायला सोपा आहे. आणि मलातरी गेल्या चार वर्षांमध्ये काहीही प्रॉब्लेम आला नाहीये. पण माझ्या बहिणीकडून कळाले की त्यांची आफ्टर सेल्स सर्विसही तितकीच चांगली आहे. :)

चौकटराजा 06/06/2012 - 16:57
हल्केच घ्या या विनंतीने - माझा जुना फूडप्रोसेसर विकणे आहे. तो चालू झाला की मस्त संगीतानुभव येतो. खाणे व गाणे एकाच प्रोसेस मधे . बघा इच्यार करूनशान ......

संपत 06/06/2012 - 18:55
हा धागा येऊन एवढा वेळ झाला तरी अजून विडम्बन कसे आले नाही?

तुम्ही सांगितलेल्या गरजांना रोटी - मेकर नावाचे यंत्र अधिक सोयीचे ठरेल असे वाटते. जेव्हा मी स्वतः स्वयंपाक करण्यास सुरुवात केली होती तेव्हा काही जणांनी हा सल्ला दिला होता. तथापि 'पोळ्या करून देणाऱ्या बाई' यांची सेवा घेणे हेच सर्वोत्तम हा सल्ला जाणकारांकडून मिळाला व तोच मी मानला.

In reply to by श्रीरंग_जोशी

जेनी... 06/06/2012 - 19:24
तुम्ही ' पोळ्या करुन देनार्‍या बाईचा 'सल्ला मानता आणि लोकाना रोटी मेकर घ्ययचा सल्ला देता .. कमाल है राव तुमची तर ......

In reply to by जेनी...

सल्ला जाणकारांचा होता असे लिहिले आहे. धागाकर्ते चिकित्सक आहेतच, ते योग्य तोच निर्णय घेतील व आपल्या अनुभवाचे बोल मिपाकरांना सांगतीलच...

रेवती 06/06/2012 - 19:59
रोनाल्ड फुप्रोचा अनुभव चांगला आहे. मला नाही, आईला. अनेक वर्षे. माझ्याकडे हॅमिल्टनचा होता. दोन वर्षांच्या अतिवापरानंतर मोडला. त्यात कणिक तिंबणे, भाज्या चिरणे, किसणीची आट्याचमेंट लावून गाजर, काकडी, मुळा, बीटरूट किसणे अशी कामे रोज होत असत. माझा हात दुखणे थांबले (अर्थातच फुप्रो हे औषध नव्हे). आता अगदी छोटुकला फुप्रो असतो तो आणलाय. कधितरी वापरते.

In reply to by कवितानागेश

प्यारे१ 07/06/2012 - 10:19
>>>बाईच ठेवा. आँ??????? एका स्त्रीने स्त्रीलाच वस्तू म्हणून संबोधलेलं पाहून ड्वाळे पाणावले. कुणी काय प्रतिक्रिया द्यावी हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. फक्त एक निरीक्षण नोंदवले. ;) -प्यारलिया (प्यारे चेंगट) :)

In reply to by प्यारे१

कवितानागेश 07/06/2012 - 12:06
च्यायला. :D कुणीतरी नोकरमाणूस पोळ्या करायला ठेवा असे म्हणायचय रे बाबा. कारण कणीक मळायला यंत्र वापरले तरी पोळ्या लाटून पण हात दुखणारच.

या वरुन एक आठवले..एक मैत्रीण दुस~या मैत्रीणीला सल्ला विचारत असते..... कपडे साफ धुतले जात नाहित काय करावे? कुठला साबण ,वाशिंग मशिन वापरावे? माझे सगळे करुन झाले पण खर सांगु का? नव~याला पर्याय नाहि..

केनस्टार वापरतेय गेले ५ वर्शे, पावभाजीच्या भाज्या, पाले भाज्या चिरायला छान उपयोग होतोय, कणिक पण छान भिजवता येते. मात्र नाजुक हाताळायला लागतोय, भान्डी फारच नाजुक आहेत.

फुडप्रोसेसर फार मोठा होतो. तो धुवायलाही कटकट आहेच. पण तुमचा हात दुखत असल्याने मायक्रोप्रोसेसर घ्यायला काही हरकत नाही. इंटेलचा चांगला आहे पण महाग असतो. त्यांचे मॉडेल क्झिऑन वैगेरे हाय लेवलची आहेत. त्यांचा आयटम घरच्यासाठी बरा आहे. त्यापेक्षा एएमडी चा घ्यावा. मध्यम किंमतीत आहे. अ‍ॅथलॉन बर्‍याच जणांकडे असावा.