रेघोटया

रेशा's picture
रेशा in जनातलं, मनातलं
20 May 2012 - 2:05 pm

परवाच एका मित्राशी chat करत असताना तो म्हणाला की "nothing is permanant , मित्र - मैत्रिणी, नाती, त्यांचे संदर्भ सगळच बदलतं जातं, गरजेच्या वेळी आपले आपले म्हणशील ते मित्र-मैत्रिणी जवळ असतीलच असे नाही. म्हणजे ते स्वार्थी आहेत असेही माझे म्हणणे नाही, पण... वेळ, काळ, busy schedule या सगळ्यात ते तुझ्या बरोबरच असतीलच असेही नाही." मी म्हटले, " असे कसे ? माझे मित्र मैत्रिणी आहेत ते, त्यांना नाही जमले touch मध्ये राहायला तर मी राहीन, my friends are special 4 me, i know we all will be in touch" तर म्हणाला, " contacts नाही राहत बये, कळेल तुलाही कळेल 'कालाय तस्मै नमः !', थोडा विचार कर, असे होतेच.जुने जातात, नवीन येतात ..this is life dear :) "

मी सुरुवतीला त्याच्याशी अजिबातच सहमत नव्हते. पण मग विचार केला, लहानपणी माझा एक मित्र होता एकदम best friend आता तो कुठे असतो? काय करतो ? माहीत नाही. एक खूप छान मैत्रीण होती आजीकडे यायची ती तिच्या, मे महिन्याच्या सुट्टीत मीही तिथेच असायचे मग काय छानच गट्टी जमलेली आमची, पण आज ती job करते आणि कधीतरी २-३ वर्षांनी एकदा भेटते. माला तिची आठवण येते का? ohh उत्तर नको असतानाही हेच मिळतेय "नाही " do i miss him or her??? ohh OMG, no,’ खरच नाही !! strange but truth" मग? किती सहज स्विकारतो ना आपण आयुष्यातले बदल!! खूप जण भेटतात, त्यांची आणि आपली life connect होते, कधी कधी नेहमी साठी तर कधी काही क्षणांसाठी! वय वाढते, विषय बदलतात तसे आजूबाजूचे लोक, मित्र -मैत्रिणीही बदलतात, जशी त्यांच्या असण्याची सवय झालेली असते तशी नसण्याचीही जडते (?) किती वरवरची नाती असतात सगळी???

ह्या गतीमान आयुश्यात आपण खरच नाती जगतो का? जपतो का? की, आपले इगोच आपल्याला जास्ती प्रिय असतात??? आपल्या माणसांपेक्षा इगो महत्वाचे कसे आणि कधी होतात? तिने फोन नाही केल मग मी का करायचा? नाही तर नाही, गेली उडत. वेळ आहे कोणाकदे इथे गुंतुन पडायला. का विचर असे बदलत जातात?? समोरच्याला प्रोब्लेम असू शकतात हे समजत नसते का आपल्याला? की समजूनच घ्यायचे नसते?? लग्ना आधी सुंदर सुंदर, घट्ट असणारी मैत्री एकीचे लग्न झाले की लगेच ढिली का पडत जाते??? आपल्या मैत्रिणीची सुख-दुखः आधी आपल्याला हसवतात रडवतात मग नंतर असे काय होते की ते हातातले हात न कळत सुटत जातात ?? कधी सहजपणे तर कधी EGO मुळे, कारण काहीही असले तरी परीणाम एकाच होतो तो म्हणजे, एक नात संपत ... का? कसे? कधी, कोणाचे चुकले? हे न कळताच नात्यात दुरावा येतो ,,, आधी खूप खूप विषय असतात तुझ्या-माझ्यात पण नंतर hi .. , hows u ?? whats up ? ok .. keep in touch और be in touch ... यावर संभाषण संपते. आधी आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा, मग काही महिन्यातून एकदा, या वेगात बोलण्यातले अंतर वाढत जाते. त्या बोलण्यात संवाद मात्र हरवलेला असतो; शिल्लक असते ती औपचारीकता! फक्त चौकशी, मैत्री अजून शिल्लक आहे हे दाखवायची धडपड. हे समजत असते दोघींना, तरीही पाउल पुढे कोणी टाकायचे? हा पश्न उरतो आणि एक अस्पष्ट पडदा तयार होतो दोघीत, नात्याची वीणच सैल होत जाते हळूहळू .

असे कसे? का ? खरच?? ह्या विचित्र मनस्थितीत आणि भरकटलेल्या विचारात असतानाच एक ब्लोग काल वाचण्यात आला त्यातल्या एका ओळीने मनाची मरगळ हे अस्वथपण, उदासीनता सगळेच दूर केले. जाणवले की आयुष्यात प्रत्येकाची एक जागा असते, कोणी दुसरी वक्ती त्याला परीयाय असुच शकत नाही. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही शिकवण्यासाठी , घडवण्यासाठीच येत असतो. :) ते वाक्य होते ....

"माणसं रेघोट्यांसारखी असतात. कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. एक विश्व बनतं." ......

वाह खरच, आज जरी "त्या" दोघी एकमेकींपासून लांब असतील काहीश्या अलिप्त असतील तरी, त्यांच्या रेषा जेव्हा एक-मेकीना छेदल्या तेव्हा एक सुंदर चित्र निर्माण झालेच असेल ना? एका नात्याने तेव्हा आकार घेतलेलाच होता की ! मग त्या क्षणांना जपायचे आणि आजचाच्या अस्वस्थ 'क्षणांत' अडकून रहायचे? ते सुंदर क्षण जपायचे आणि हा अस्वस्थ क्षण .. तोही स्विकारायचा, कारण तोही त्याच नात्याचा एक आकार आहे. काहीसा बोचरा, खुप खूप नकोसा पण आकार आहे, त्याच रेषांतून निर्माण झालेला. हा आकार नीट बघायचा आणि स्विकारायचा, तो सृष्ठीचा एक नियम म्हणुन! ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहेच. गोड किंवा कडू पण शेवट नक्कीच आहे,

मग ठरवले गोड आठवणींना मनात ठेवायचे आणि कडू क्षणांना तिलांजली द्यायची. मग द्रुश्तिकोनच बदलून गेला. मन आणि नजर दोन्हि मोकळे झाले, आणि मग काय एकदम लक्शात आले ... अरे, जो गोड नाही, तो तर शेवटच नाही.
नाही का??? :) :) :) :) so " पिच्चर अभी बाकी ही मेरे दोस्त ..." काय माहीत उद्या परत त्याच रेषा एक-मेकींना अजून एकदा छेदून जाईल, त्याच, नाहीतर वेगळ्या नात्याने पुन्हा एकदा सामोरी येतील !

अश्या बर्‍याच रेषा अजून "रेघोटी"ला छेदून जायच्यात, काही "छेद" देतील, तर काही चित्र बनवतील, काही नेहमीच समांतर चालत राहातील, खूप जवळ असून भेटणार कधीच नाहीत, किंवा काही दिशा बदलून "रेघोटी"ला छेदून जातील कायमच्या आठवणी मागे ठेऊन जातील जेव्हा त्या रेषा आठवतील एक स्मित नक्कीच फुलेल ओठी ... काही रेषा अश्याच कालप्रवाहात हरवून जातील out of sight out of mind सारख्या :)

पण एक चित्र दर वेळी साकारेल, एक आकार दर वेळी बनत जाईल, बनलेला आकार बदलत जाईल, आणि "रेघोटी" स्वतःचा प्रवास सुरूच ठेवेल :) :) तो final आकार बघण्यासाठी वेग-वेगळ्या रस्त्यावर झोकदार वळणे घेत.

थोडक्यात काय yet more to come !!!!!!! .......

जीवनमान

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2012 - 4:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं लेखन मस्त असतं. येत चला लिहित चला.

माणूस वयपरत्वे बदलत जात असतो. आपल्या आवडी निवडी, विचार, दृष्टी असं काय नी किती गोष्टीत सहज बदल झालेला असतो. आपली नोकरी, आपलं कुटुंब, नाती-गोती, आणि फापट पसार्‍यातून जगता जगता आपण आपल्याकडेच पाहिलं तर इतके बदल झालेले असतात की काय आपण हे असे होतो यावर आश्चर्य वाटतं. मग, आपल्यात इतके बदल तर आपल्या मित्रातही तितकेच बदल झालेले असतात, होत असतात. आणि मग आपला मित्र आपल्याला पूर्वीसारखा वाटत नाही. औपचारिकपणा तर नाही ना चाललाय आपल्यात असेही वाटायला लागतं. पण, आयुष्यात येणार्‍या मित्र-मैत्रिणींच्या रेघोट्या चेहरा फूलवतो यात मात्र काही वाद नाही. असो..... खरडायला लागलो आणि खूप मैत्रिणींच्या रेघोट्या डोळ्यासमोर यायला लागल्या.

अवांतर : मागे पेठकरसाहेबांनी एक प्रेमळ सूचना ७.४७ च्या कर्जत ट्रेनच्या वेळेस केली होती, विसरल्या वाटतं :)

-दिलीप बिरुटे

रेशा किती सुंदर लिहीले आहे आपण. १ कराल काय? या ओळी जर इंग्रजीत असतील तर जशाच्या तशा मला व्यनि कराल काय?

प्रभाकर पेठकर's picture

20 May 2012 - 8:03 pm | प्रभाकर पेठकर

अगदी लहानपणापासून आजतागायतच्या आयुष्यात आपल्याला अनेक जणं अनेक निमित्ताने भेटलेले असतात. ते सर्वच मित्र होत नाहीत, होऊ शकत नाहीत. समान व्यसनेषु शीलेषु सख्यम। असं कांहीसं संस्कृत वचन आहे. जिथे जिथे मनाच्या, विचारांच्या तारा व्यवस्थित जुळतात तिथे तिथे मैत्रीचे धागे विणले जातात. नातेसंबंध निर्माण होतो. लहानपणी इतर जबाबदार्‍या काही नसल्याने, निष्पापतेच्या ऐन बहरात असल्याकारणाने भावनांना आणि, पर्यायाने ह्या भावनांना जपणार्‍या प्रत्येक मित्र/मैत्रिणीला, अनन्यसाधारण महत्व असते.
पुढील आयुष्याच्या रहाटगाडग्यात सर्वांच्याच पाठीवर रुक्ष व्यवहार, जबाबदार्‍या, महत्त्वाकांक्षा, कर्तव्य आणि शिष्टाचारांचे बोजे वाढत जातात. ह्या सर्वांत 'भावना' नांवाची संवेदना, हरवत नाही तर, वेगळे रुप घेते. 'भावने'लाही परिपक्वता येते. नाती हरवत नाहीत, विस्मृतीत जात नाहीत तर मनाच्या तळाशी गाडली जातात. एखाद्या प्रसंगाने मनाचा समुद्र ढवळला जातो आणि ही नाती कधी क्षणभराकरता पृष्ठभागावर तरंगुन जातात आणि आपण त्या जुन्या 'आठवणीं'नी सुखावतो. जसे, मित्राशी केलेल्या चर्चे
दरम्यान हा विषय हाताळला गेल्यावर लगेच 'लहानपणी माझा एक मित्र होता एकदम best friend आता तो कुठे असतो' असे म्हणून 'तो'च मित्र का आठवावा? कारण नाते तुटलेले नसते. फक्त मनाच्या तळाशी दबलेले असते.

किती वरवरची नाती असतात सगळी???

सगळीच नाती वरवरची नसतात. काही निव्वळ ओळखी असतात. काही परिचयाचे असतात. काही चुलत नाती असतात, जसे मित्राचा मित्र किंवा मैत्रिणीची मैत्रिण. काही सहचारी, काही सहध्यायी. ह्या ओळखी असतात. (ह्यांच्यातूनही नाती निर्माण होतात) तेंव्हा नाती आणि ओळखी ह्यातील फरक लक्षात घ्यावा, गल्लत करू नये. जिथे भावनिक तारा जुळतात तिथे नाती निर्माण होतात. पण व्यवहारासाठी एकत्र आलेले, परिस्थितीने एकत्र आणलेले, नियतीने एकत्र आणलेले असे सर्व नात्यात रुपांतरीत होत नाहीत. गरज संपली, परिस्थिती बदलली, नियती बदलली की त्या-त्या ओळखी विस्मृतीत जाऊ शकतात.

सुंदर लेख आणि सुंदर प्रतिक्रिया..

मृत्युन्जय's picture

21 May 2012 - 10:58 am | मृत्युन्जय

कारण नाते तुटलेले नसते. फक्त मनाच्या तळाशी दबलेले असते.

नक्कीच. पण मला वाटते त्या नात्यातली आर्तता कमी होत जाते.''काय सुंदर दिवस होते नाही ते' किंवा 'काय उमदा माणूस होता नाही तो' असे वाटत राहते पण त्या माणसाबद्दल वाटत असलेली ओढ कुठेतरी कमी झालेली असते. अर्र्थात काही माणसे आयुष्यभर बरोबर राहतात. सगळ्यांच्याच बाबतीत असे होत नाही.

दादा कोंडके's picture

20 May 2012 - 11:09 pm | दादा कोंडके

वरच्या प्रतिक्रिया वाचून सुद्धा हा लेख वाचून असंच लिहावं असं वाटलं!

रुमानी's picture

21 May 2012 - 12:00 pm | रुमानी

लेखन आवडले!

धन्यवाद

प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनासाठी आभार

७.४४ ची लोकल च्या वेळी दिलेली सुचना लक्शात आहे. पण उत्सर्फुतपणे जे डोक्यात आले ते उतरवले आहे इथे. प्रयत्न करेन अजुन सुधारणा करण्याचा.

अक्षया's picture

21 May 2012 - 5:03 pm | अक्षया

छान लेखन आवडले! :)

सानिकास्वप्निल's picture

22 May 2012 - 9:15 pm | सानिकास्वप्निल

लेख आवडला आहे :)
पुलेशु