नमस्कार.. आजच्या भागात आपण polygonal lasso टूल चा एक उपयोग पाहणार आहोत
polygonal lasso हे टूल.. selection साठी वापरल जात , इखाद्या फोटो वरचा आपण आपल्याला हवा तो भाग आपण या टूल ने सिलेक्ट करू शकतो
फोकसिंग ...
फोटोग्राफी मधला अत्यंत महत्वाचा भाग .. फोकसिंग मुळे फोटो खूप उठून दिसतो.. आपल्याला हव ते ऑब्जेक्ट आपण SLR कॅम ने सिलेक्ट करू शकतो.
इवन डीजीकॅम मध्ये ऑटो focus ची सोय असते..
पण तरीही जर आपल्याला तसा इफेक्ट हवा असेल तर फोटोशॉप दिमतीला आहेच ...
मला हवी तशी इमेज सापडत नव्हती.. म्हणून मी माझ्याच फोन च केलेलं "3d rendar " वापरतोय ,
नेहमी प्रमाणे इमेज चा एक layer बनवला
त्यावर gaussian blur फिल्टर दिला
आता डाव्या बाजूच्या टूल panel मधून polygonal lasso tool घ्या
संपूर्ण मोबिल व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या
आणि सिलेक्ट झालेला भाग सरळ डिलीट मारून टाका
झालं काम तमाम :)
प्रतिक्रिया
4 May 2012 - 11:23 am | कुंदन
मस्त रे मन्या फेणे.
लै भारी लेखमाला लिहित आहेस.
पुलेशु
4 May 2012 - 12:27 pm | चौकटराजा
मन्या भाउ, सगळ्याना पार्श्वभूमी( आईच्या भाषेत background) मस्त पणे डिफोकस करायला जमत नाही किंवा कॅमेर्याचा मर्यादा आड येतात याना ही आयडीयेची कल्पना मस्त दिली आहेस .पण एखादे फुलपाखरू फोकस करून फुले डिफोकस केल्याचे उदाहरण अधिक चांगले ठरले असते.
पुभाशु
4 May 2012 - 12:29 pm | स्पा
तेच सांगतोय ना.. तसा फोटोच सापडत नव्हता ,.....
5 May 2012 - 11:54 am | स्पा
.
4 May 2012 - 12:43 pm | प्रचेतस
लै भारी रे मन्या.
अजून काही टूल्सची ओळख करून दे.
4 May 2012 - 12:52 pm | गणपा
भ्रमणध्वनीची पार्श्वभुमी (टेबलाचा रंग) काळपट असल्याने बदल म्हणावा तसा उठुन दिसत नाही.
गुर्जी पुढल्या भागात ते 'पेन टूल' कस वापरायचे तो धडा घ्या. :)
4 May 2012 - 1:00 pm | सूड
अतिशय सुंदर लेख, मातृभाषेचा योग्य तेवढाच केलेला वापर आवडला.
panel मधून polygonal lasso tool घ्या
त्यावर gaussian blur फिल्टर दिला
याचं विनाकारण मराठी भाषांतर न केल्याबद्दल आभार. मराठीचा वापर हवा मान्य, पण ज्यांच्यासाठी लिहीलंय त्यांच्या डोक्यावरुन जाणार असेल तर समजेल अशा भाषेत लिहीणं केव्हाही योग्य.
4 May 2012 - 1:18 pm | चौकटराजा
चौ रा ची उलीशीक कला - प्रथम लॅसो नंतर गॉसीयन ब्लर .
4 May 2012 - 1:24 pm | प्रचेतस
आमचीही उलीशीक कला - कुठलंही टूल किंवा ब्लर न वापरता.
4 May 2012 - 2:47 pm | प्यारे१
मन्या भाड्या (हे प्रेमानं बरं) शिक जरा काहीतरी.
शिक ह्या चिंचवडवासीयांकडनं.... क्लास घेतोय क्लास!
काही येतं तरी का करायला? बघ जरा वर. कसलं भारी फुलवलंय ते!
4 May 2012 - 2:54 pm | स्पा
येस.. मी यापुढे चौरा काकां कडूनच शिकेन म्हणतो.. आणि पुढचे क्लास काकाच घेतील असे जाहीर करतो :)
4 May 2012 - 2:58 pm | चौकटराजा
मग धडा पहिला मनु,
गॉसीयन ब्लर म्हणजे गाववाल्यानी केलेले ब्लर !
मोशन ब्लर म्हणजे जास्त मोशन झाले की डोळ्यासमोर सारं भुरकट दिसायला लागतं ते ब्लर !
4 May 2012 - 3:06 pm | सूड
छानच रे वल्ली !! तुझ्याकडे शिकायला येईन म्हणतो.
4 May 2012 - 7:52 pm | अन्या दातार
काहीही प्रक्रिया न करता फक्त लेन्सने केलेला फोकस.
कॅमेरा: कॅनन ५०० डी (डीएसएलआर)
5 May 2012 - 10:24 am | प्रचेतस
कॅनन ५०० डी (डीएसएलआर) मी वापरणार
मी ही हुच्चभ्रू होणार.
5 May 2012 - 10:25 am | चौकटराजा
वल्ली व आपले उदाहरण मस्तच आहे पण धागा फोटोग्राफी नसून फोटोशॉप चा डिफोकस मधे उपयोग काय ? असा आहे. फोटोशॉप हा एक प्रकारे पोस्ट प्रॉडक्शन चा भाग आहे. खरे तर फोकस साठी फोटोशॉपचा फारसा उपयोग होत नाही ब्लरच्या साह्याने डिफोकस साठी होतो. अनशार्पे वापरून अगदी अल्प प्रमाणात फोकसिंग सुधारता येते. पण एकूण फोटोतील विषय फोकस न होणे या सर्वात गंभीर अपराधच ठरतो.त्याला कोणताच विडीओ एडीटर फारशी मदत करू शकत नाही. ही माझी माहिती चूक असल्यास मास्तर मन्या गुर्जी मला छडी मारतीलच.
6 May 2012 - 2:20 pm | मोदक
गौरीचे हात
हे काय आहे ते माहीत नाही..

हे पण..
6 May 2012 - 2:37 pm | अन्या दातार
<चौरा मोड ऑन>
पहिल्या फोटोत तुमचे लक्ष कुणा दुसर्याच्या (दुसरीच्या) हाताकडे असावे असे वाटते. नक्की काय फोकस करायचे आहे ते कळलेले तरी नसावे बहुदा. इथे फोटोशॉप वापरुन थोडी बॅकग्राऊंड ब्लर करता येईल व फोटो उच्च दर्जाचा बनवता येईल.
दुसर्या फोटोत एकापेक्षा अधिक जागा फोकस झाल्यात. उजवीकडचा काटा फोटोत रुततोय.
तिसर्या फोटोत गवतावर का फोकस केले आहे? गवत फोकस करायचे असेल तर त्याची जागा चुकलीये असे नमूद करतो.
<चौरा मोड ऑफ>
(अश्याच चुका करत शिकत असणारा) अन्या
6 May 2012 - 2:54 pm | मोदक
अबे ३ X झूम मधून आणखी काय अपेक्षा करणार..
म्हणून तुझ्या चार आण्याच्या पुढे माझे पाच पैसे असे लिहिले आहे. :-)
आणि हो.. गौरीच्या हातात दिसणारा लाईट फ्लॅशचा नाहीये.. ते फूल तसेच असते..
6 May 2012 - 2:55 pm | प्रचेतस
अबे, इथे झूमचा काय संबंध?
हे काय लांबचे फोटू थोडेच आहेत?
6 May 2012 - 3:16 pm | मोदक
अरे ते फूल लैच गचपणात होतं.. फोटो साठी थोडे झूम करावे लागले.. :-(
त्यामुळे फसला वाटते...
तू क्लास कधी सुरू करतो आहेस..?
6 May 2012 - 3:33 pm | प्रचेतस
मी वर्ग घेत नाही, माझे प्रकाशचित्रउपकरण पण साधेच आहे, मला प्रकाशचित्रदुकान पण येत नाही.
वर्गांसाठी श्री. चौराकाका यांचेकडे नोंदणी करावी.
7 May 2012 - 10:09 am | चौकटराजा
पण प्रकाशचित्रदुकानाची शिकवणी लावायची असेल तर प्रकाशचित्र दुकानाचे मदत पान मात्र नरेंद्र बुवा गोळे यांचेच असेल अशी पूर्वअट अर्जात घालणेत आलेली आहे.
वि सू - यापेक्षा चिंचवड ठाकुर्ली त्रैमासिक पास " सहन" करता येईल ना !
7 May 2012 - 10:20 am | प्रचेतस
'मदत' आणि 'अर्ज' हे फारसी शब्द असल्याने वरील सूचना फाट्यावर मारण्यात आली आहे.
7 May 2012 - 10:24 am | चौकटराजा
मराठी भाषेच्या बखरीत डोकावल्यास तिच्यावर पोरतुगीज , फारसी, अरबी, कन्नड गुजराती यांचा प्रभाव जाणवेल. मला वाटते बखर हा शब्दच तर फारसी नाही ना ?
7 May 2012 - 10:36 am | प्रचेतस
मराठी भाषेच्या सध्याच्या स्वरूपाकडे पाहिल्यास तिच्यावर इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज भाषांचाही प्रभाव जाणवेल.
स्वतः कृष्णाजी अनंत सभासद व्हाईसरॉयचा उल्लेख विजरई असा करतो.
विजरई हा शब्द मूळ मराठी नाही ना हो काका?
7 May 2012 - 10:30 am | स्पा
'मदत' आणि 'अर्ज' हे फारसी शब्द असल्याने वरील सूचना फाट्यावर मारण्यात आली आहे.
तुमच्या मताचा आदर आहे
--धर्मेंद्र मसल्स चे गोळे
7 May 2012 - 10:18 am | चौकटराजा
इथे फोटोशॉप वापरुन थोडी बॅकग्राऊंड ब्लर करता येईल व फोटो उच्च दर्जाचा बनवता येईल.
तो हुच्च आहे अशी बतावणी करता येईल.
6 May 2012 - 6:33 pm | यकु
मोदका, गौरीच्या हाताचा पहिला फोटो आवडला रे.
गुलाबी पाकळ्यांतून फाकलेली कोटी चंद्र दिव्य प्रभा क्लास!
4 May 2012 - 1:41 pm | sagarpdy
शेवटचा फोटो पाहून इन्जीनीअरिन्ग च्या प्रोजेक्ट ची आठवण आली. आम्ही त्यात चित्राचा हवा तो भाग स्पष्ट ठेवून बाकी ब्लूर केला होता (चित्राला जागा कमी लागावी म्हणून).
चालू द्या.
4 May 2012 - 2:25 pm | यकु
पहिल्या आणि दुसर्या फोटोत भांड्यावरचे प्रतिबिंब धुसर झाल्याने बराच फरक जाणवतोय.
तेव्हा स्पाजी, भावना फोचल्या. :p
फुडचा भाग लवकर टाका.
4 May 2012 - 2:38 pm | गवि
उत्तम , अत्यंत उपयुक्त..
लगे रहो मन्याबापू...
4 May 2012 - 2:45 pm | मुक्त विहारि
गाववाले, अजून येवू देत...
4 May 2012 - 2:49 pm | sneharani
मस्त रे, येऊ दे पुढचा धडा!
:)
4 May 2012 - 3:05 pm | स्मिता.
अजून एक छान माहिती दिलीस. आणखी येवू दे.
4 May 2012 - 3:58 pm | परिकथेतील राजकुमार
छान माहिती देत आहेस रे स्पा. :)
फक्त पुढच्या वेळी फोटोशॉप हे सॉफ्टवेअर ज्यांनी जन्माला घातले असे काही धुरिणी मिपावरती आहेत, त्यांना दाखवून मग इथे लेख प्रकाशित करत जा. तसेच तुझ्या लेखनात काही आंग्ल भाषेतील शब्द सतत डोकावताना दिसतात. त्यात त्वरित सुधारणा आवश्यक आहे हे ध्यानात घे.
5 May 2012 - 3:14 pm | चौकटराजा
>पुढच्या वेळी फोटोशॉप हे सॉफ्टवेअर ज्यांनी जन्माला घातले असे काही धुरिणी मिपावरती आहेत,
याचा अर्थ थॉमस नॉल मराठी शिकला की काय पुष्पा सराफ कडून ?
4 May 2012 - 4:41 pm | प्रशांत
छानच रे मण्या
पुढचा भाग लवकरच येवू देत
4 May 2012 - 7:21 pm | पैसा
पुढचा भाग लवकर दे!
4 May 2012 - 8:51 pm | अत्रुप्त आत्मा
सर्वात अधी
मन्या मला तुझ्याकडून हे खास शिकायला लागणार,माझ्या फुलांच्या रांगोळ्यांच्या फोटूंना काय बहार आणता येइल नै..?
4 May 2012 - 10:14 pm | नंदन
लेख हो, मनोबा. बाकी पराशी बाडिस!
फोकसवरून हा क्यामेरा आठवला - https://www.lytro.com/learn
5 May 2012 - 7:09 am | ५० फक्त
मा.श्री.स्पाजी, मागच्या धड्यांपेक्षा थोडा कमी प्रतीचा आहे हा धडा, तुम्हाला जे शिकवायचे आहे ते तुम्ही दिलेल्या छायाचित्रांवरुन समजत नाही.
5 May 2012 - 12:08 pm | सौरभ उप्स
वा चान फोटोशोप न येनार्यान्साठी हे उत्तम प्रशिक्षण आहे, उदाहार्नासठी आमचा फोटो वापरल्याबद्दल धन्यवाद.......
5 May 2012 - 12:09 pm | स्पा
सौरभ काका.. तुम्ही लिहा कि आता.. तुम्ही आमचे गुरु
5 May 2012 - 3:03 pm | अमृत
एक्दम मस्त... आपल्याला तुमची ही मालिका आवडलेली आहे हे पहिल्या भागातच बोललो आहे... अजुन येउ द्या स्वागत आहे...
अवांतर - सोबतच जर तुमच्या त्या भयकथा परत सुरु करू शकाल तर सोने पे सुहागा
अमृत
5 May 2012 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा
@अवांतर - सोबतच जर तुमच्या त्या भयकथा परत सुरु करू शकाल तर सोने पे सुहागा >>> +1
च.चा. मोड ऑन>>> लिही ना गं परत भयकथा... मनुकडी<<<च.चा. मोड ऑफ ;-)
5 May 2012 - 3:20 pm | स्पा
काय गुर्जी आज भारी लाडात आला आहात
एकच प्रतिसाद ३ ३ वेळा लिहित आहात
अवांतर : झेंडा उंच रहे हमारा
5 May 2012 - 6:44 pm | अत्रुप्त आत्मा
ए...ते मोबॉइल वर असल्यामुळे चुकुन पडलेत...
आणी वाक्य माझं असलं,तरी लाडाच्या आत तुझा लाडिक च.चा. हाय ना..? ;-)
अ-वांतर- गेंडा धष्टपुष्ट रहे हमारा :-p
6 May 2012 - 10:09 pm | मदनबाण
हा माझा एक प्रयत्न... सॉफ्टवेयर न-वापरता. :)
कॅमेरा:--- निकॉन पी-१००
7 May 2012 - 10:15 am | चौकटराजा
चौ रा मोड ऑन
धागा बाजूला राहून कॅमेरा डिफोकसचे पेव फुटले. अंकीय- प्रकाशचित्र- यंत्रात मृदुमाल असतोच की !
चौ रा मोड ऑफ
चित्र सुंदर आहे !
16 Sep 2013 - 10:41 pm | रॉजरमूर
खूप चांगली माहिती दिलीत पण फ़क़्त ३ भागात का आवरली फोटोशॉप ची शिकवणी ?
16 Sep 2013 - 11:51 pm | चित्रगुप्त
व्हय व्हय त्येच म्हंतो आमिबी. शिकवणी चालू ठेवा हो गुर्जी.
18 Sep 2013 - 8:12 pm | पाषाणभेद
फारच छान अभ्यासमालिका.
मला एक शंका आहे.
तुम्ही म्हणतात: "आणि सिलेक्ट झालेला भाग सरळ डिलीट मारून टाका"
लासो टुल वापरून सिलेक्ट केलेला मोबाइल जर डिलीट मारला तर त्या सुचनेखालच्या शेवटच्या फोटोत तो मोबाईल दिसायला नको होता. तरीही तो मोबाईल दिसत आहे, असे का?
before/ after असे दोन्ही फोटो दिलेत तर लवकर समजेल.
20 Sep 2013 - 12:50 am | चित्रगुप्त
पाभे: दोन लेयर्स आहेत त्यापैकी वरचा अंधुक करून त्यातला मोबाईल डिलीट केला तर त्याजागी खालच्या थरातला स्पष्ट मोबाईल दिसू लागेल.
मोबाईल स्पष्ट पण इतर भाग अंधुक होईल.
शेवटी 'फ्लॅटन इमेज' करून जेपीजी फॉर्म्याटात सेव्ह करणे.
मलासे वाटते मोबाईल सिलेक्ट करताना खालच्या मूळ थरातील करायचा आणि डिलीट करताना वरच्या थरातून.
ठीक लिहिले ना स्पाभौ ?
22 Sep 2013 - 10:01 pm | पाषाणभेद
शंकासमाधान झाले नाही. आधी म्हटल्याप्रमाणे before / after असले काही देता येईल काय?
>>> दोन लेयर्स आहेत त्यापैकी वरचा अंधुक करून त्यातला मोबाईल डिलीट केला तर त्याजागी खालच्या थरातला स्पष्ट मोबाईल दिसू लागेल.
दोन्ही लेअर्स मध्ये मोबाईल सेम अँगलमध्ये आहे. असे असेल तर दोन लेअर्स घेण्यात काय फायदा? दुसर्या लेअर मध्ये काहीतरी बदल करून नविन लेअर मध्ये तिसरा बदल केलेला फोन असायला हवा होता जेणेकरून आमच्यासारख्या मंदांना समजेल.
(हा प्रतिसाद दुसरीकडे टाईप करून येथे पेस्टवत आहे. मिपावरचे गमभनचे मॉड्युल गंडले आहे काय?)
20 Sep 2013 - 6:25 am | स्पा
चि.गु.
20 Sep 2013 - 6:53 pm | यशोधन वाळिंबे
मायबोलीतुन फोटोशॉप