चीझ चीली टोस्ट आणी चीझ अ‍ॅंड क्रॅकर्स

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
25 Apr 2012 - 12:44 pm

साहित्य चीझ चीली टोस्ट:

५-६ ब्रेड स्लाईसेस (जास्त ही घेऊ शकता )
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
२-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ लाल भोपळी मिरची बारीक चिरलेली (कुठल्याही रंगाची घेऊ शकता )
बारीक चिरलेली कोथिंबीर
किसलेले चीझ आवडीप्रमाणे (मी मॉझ्झरेला वापरले आहे, आपल्या आवडीप्रमाणे कुठले ही चीझ घेऊ शकता)
१/२ टीस्पून काळीमिरीपूड
१/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स

.

पाकृ:

एका भांड्यात चीझ, कांदा, भोपळी मिरची, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर सगळे एकत्र करुन घेणे. (मी मीठ वेगळे घातले नाही कारण चीझमध्ये मीठ असतं)

.

ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण नीट लावून घ्यावे. त्यावर थोडी काळीमिरीपूड व ड्राईड हर्ब्स भुरभुरावे.

.

२०० डीग्री सें वर प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये तयार ब्रेड स्लाईस ठेवून ८-१० मिनिटे भाजवे. (ओव्हन नसल्यास तव्यावर किंवा ग्रील पॅनवर ही भाजु शकता.)
टोस्ट तयार झाले की त्रिकोणी आकारात कापून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.

.

साहित्य चीझ अ‍ॅंड क्रॅकर्स :

१०-१२ क्रॅकर्स बिस्किटे (हे नाही मिळाल्यास मोनॅको बिस्किटांचा वापर करु शकता)
तयार हिरवी चटणी ( ओला नारळ + थोडा जास्त पुदिना + कोथिंबीर + हि.मिरच्या + मीठ + लिंबाचा रस + चवीपुरती साखर एकत्र करून चटणी तयार करावी )
चेरी टोमॅटो मधून कापून दोन भाग करणे
चीझ चे तुकडे (मी चेडर चीझ वापरले आहे )
१/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स

.

पाकृ:

क्रॅकर्स बिस्किटांवर थोडी हिरवी चटणी लावावी.

.

त्यावर चीझ चे तुकडे लावावे व अर्धा चेरी टोमॅटो लावावा. त्यावर थोडे ड्राईड हर्ब्स भुरभुरावे.

.

चीझ चीली टोस्ट आणी चीझ अ‍ॅंड क्रॅकर्स तयार आहे :) मस्त चहासोबत हे तुम्ही खाऊ शकता, कुठल्याही पार्टीसाठी, लहान मुलांसाठी / मोठ्यांसाठी झटपट खाऊ बनवू शकता :)

.

प्रतिक्रिया

पियुशा's picture

25 Apr 2012 - 12:50 pm | पियुशा

सॉल्लीड !!! ज.ह्.ब.ह्.रा __/\__
काय ते चीली टोस्ट अन काय ते क्रॅकर्स ,हे कलरफुल्ल फोटु़ बघुनच डॉळ्याचे पारणे फिटले ;)

प्यारे१'s picture

25 Apr 2012 - 12:56 pm | प्यारे१

सानिकास्वप्निल या आयडीला तातडीनं 'निलंबित' करावं असा प्रस्ताव मी मंडळापुढं मांडत आहे...! :)

सोत्रि's picture

25 Apr 2012 - 8:54 pm | सोत्रि

माझे ह्या प्रस्तावाला अनुमोदन!

- (फोटो बघून खपला गेलेला) सोकाजी

परिकथेतील राजकुमार's picture

25 Apr 2012 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.

जबर्‍यादस्त पाकृ.

५० फक्त's picture

25 Apr 2012 - 1:55 pm | ५० फक्त

यावेळी पराभाउंना काहीही हुडकायची गरज नाही म्हणजे आज संध्याकाळी त्यांच्याकडंच जावं, हे करुन खायला, मजा येईल. चालेल ना पराशेट.

बाकी, सानिकाच्या घाग्यावर प्रतिसाद देउन काही फायदा नाही, जेंव्हा तुम्ही पुण्यात याल ना तेंव्हा जाहीर सत्कार करु तुमचा, एवढंच उरलंय आता.

अवांतर - फक्त येताना तो चमचा तेवढा घेउन या, किती दिवस ठेवणार कपाटात ?

प्रसाद प्रसाद's picture

25 Apr 2012 - 12:57 pm | प्रसाद प्रसाद

दोन्ही पदार्थ मस्त!!!! काय हा अत्याचार??????? फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले!!!!!

ड्राईड हर्ब्स म्हणजे नक्की त्यात काय काय येते?

अमृत's picture

25 Apr 2012 - 12:58 pm | अमृत

मास्टर शेफ अवार्ड जाहीर करण्यात येतो आहे.

अमृत

गवि's picture

25 Apr 2012 - 1:10 pm | गवि

चीझ चिली टोस्ट अफलातून आहेत.. करुन पाहणार.

बाकी ते क्रॅकर्स मुळात अत्यंत बेचव आणि कडक असल्याने त्यांचे इतके प्रोसेसिंग करुनही कितपत चव येईल हे पहायला हवे.

त्या ऐवजी खुसखुशीत खारी मॉनॅको म्हणजे एकदम १८० डिग्री बदल होईल चवीत.. :)

प्रास's picture

25 Apr 2012 - 1:16 pm | प्रास

चीझ चिली टोस्ट अफलातून आहेत.. करुन पाहणार.

मी वाचतंय हं, वाचतंय मी......
करून बघ पण मग खाताना माझीही आठवण ठेव बर्का.....
बाकी, आपल्याला क्रीम क्रॅकर लई म्हंजे लईच आवडतं मंग ते चीज क्रॅकर्स, गवि, तू कर नि मी (एकलाच) खातो..... ;-)

बाकी, आपल्याला क्रीम क्रॅकर लई म्हंजे लईच आवडतं

त्या कडाकण्या तुला आवडतात ?

कश्या काय.. म्हणजे, ओन्ली गॉड नोज...

दहा मिनिटं चहात बुडवून ठेवल्या तरी काठिण्यात काही कमी नाही..

सानिकास्वप्निल's picture

25 Apr 2012 - 1:37 pm | सानिकास्वप्निल

मुळात ती क्रॅकर बिस्किटं चहात बुडवून खायची नसतातचं
आणी मला तरी इथे ती खुसखुशीत व पटकत तुटणारी मिळतात त्यामुळे इतका त्रास झाला नाही कधी..
भारतात कुठली मिळतात हे माहीत नाहे :(
तुम्ही मोनॅको वापरुन हे स्नॅक बनवू शकता की :)
धन्यवाद :)

भारतात ब्रिटानियाची मिळतात. आता बेचवपणा लक्षात घेऊन जीरा वगैरे फ्लेवर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पण एकूण इथे तरी ती कडक आणि चवहीन असतात. त्यामुळे मूळ पाकृ उत्तमच आहे, तरी इथे तरी (पक्षी मु.पो. भारत) मोनॅकोच वापरणे जास्त बरे असं वाटतंय.

५० फक्त's picture

25 Apr 2012 - 1:56 pm | ५० फक्त

येस्स ओ गवि, इथं भावी महासत्तेत मोनॅकोच भारी बाकी सगळे बिनमिठाचे आहेत.

चीझ चिली टोस्ट अफलातून आहेत.. करुन पाहणार.

मी वाचतंय हं, वाचतंय मी......

होय दादा ..माफ कर.. मी परत घ्यायला लागलो. माझं चुकलं.. यापुढे चीजच्या तुकड्यालाही स्पर्श करणार नाही.. काय करु.. संध्याकाळ झाली की माझे पाय चीजकडे वळतात..मग पुन्हा पुन्हा मी त्यात ओढला जातो..

कुठल्या चिजकडे ????? ;)

:p

धनुअमिता's picture

25 Apr 2012 - 1:11 pm | धनुअमिता

फोटो तर खुपच छान. दोन्ही पदार्थ मस्त. करुन बघणार.

गणपा's picture

25 Apr 2012 - 1:16 pm | गणपा

शॉल्लेट. :)

मृत्युन्जय's picture

25 Apr 2012 - 1:18 pm | मृत्युन्जय

मला त्या क्रॅकर्स बिस्किंटांबद्दल अजाबात ममत्व नाही आहे. त्यामुळे दुसर्‍या पाकृ बद्दल नो कमेंट्स.

पहिली पाकृ मात्र स्टँडिन ओव्हेशनसाठी पात्र. एवढे कौतुक का तर,. आमच्यासारख्या ढ गोळ्यांनाही जमेलसे वाटते आहे, :)

गवि's picture

25 Apr 2012 - 1:21 pm | गवि

मला त्या क्रॅकर्स बिस्किंटांबद्दल अजाबात ममत्व नाही आहे.

अत्यंत सहमत..

डाएटसाठी मात्र उत्तम आहेत ही बिस्किटं..

१. टणकपणामुळे चावून गिळताना जबड्याचा पुरेपूर व्यायाम = क्यालरी खर्च..
२. एक खाल्ली की खाण्यावरची इच्छा उडून पुढचे खाणे टळते.

सोत्रि's picture

25 Apr 2012 - 8:57 pm | सोत्रि

पहिली पाकृ मात्र स्टँडिन ओव्हेशनसाठी पात्र.

अगदी मनापासून सहमत!

- (हा प्रतिसाद उभा राहून लिहिणारा) सोकाजी :)

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Apr 2012 - 1:19 pm | बिपिन कार्यकर्ते

भयानक! :(

कपिलमुनी's picture

25 Apr 2012 - 1:41 pm | कपिलमुनी

खुप सुंदर प्रेझेंटेशन आणि सहज पण चविष्ठ पाकृ ...

प्रचेतस's picture

25 Apr 2012 - 2:00 pm | प्रचेतस

खल्लास....

स्मिता.'s picture

25 Apr 2012 - 2:19 pm | स्मिता.

कसले जीवघेणे फोटो आहेत गं! खरंच एका दिवशी आम्हा निष्पाप जिवांचा जीव घेशिल.

प्रेरणा पित्रे's picture

25 Apr 2012 - 2:27 pm | प्रेरणा पित्रे

चीझ चीली टोस्ट नक्कि करुन बघणार...

क्रॅकर बिस्किट बद्दल गविंशी सहमत...

इरसाल's picture

25 Apr 2012 - 2:35 pm | इरसाल

जाम म्हणजे जाम भारी.

क्रॅकर बिस्किट बद्दल गविंशी सहमत...एकदा कुर्‍हाडीने तोडण्याचा प्र यत्न केला होता. कुर्‍हाड शिल्लट झालती.:D

अत्रुप्त आत्मा's picture

25 Apr 2012 - 3:27 pm | अत्रुप्त आत्मा

प्रेझेंटेशनास... शि.सा.दंडवत...--^--^--^--
फोटों क्रमांक-३.४.५.६ची आरती करणेत येणार आहे...

तुषार काळभोर's picture

25 Apr 2012 - 3:49 pm | तुषार काळभोर

रविवारच्या चकण्याची!!

सुहास झेले's picture

25 Apr 2012 - 4:15 pm | सुहास झेले

खपल्या गेलो आहे.... !!!!

भडकमकर मास्तर's picture

25 Apr 2012 - 4:54 pm | भडकमकर मास्तर

सुप्पर....

ऋषिकेश's picture

25 Apr 2012 - 5:04 pm | ऋषिकेश

खपलेली व्यक्ती प्रतिसाद देत नसल्याने मी प्रतिसाद देत नाहिये

Pearl's picture

25 Apr 2012 - 5:40 pm | Pearl

सुरेख पा.कृ. दिल्या आहेत. एकदम टेंप्टींग दिसताहेत.
चिज चिली टोस्ट तर फारच सही. करून पाहिन.
घन्यवाद सानिका :)

नेहरिन's picture

25 Apr 2012 - 5:55 pm | नेहरिन

भ ...न्ना....ट

मस्त कलंदर's picture

25 Apr 2012 - 6:20 pm | मस्त कलंदर

पहिली पाकृ एकदम सोप्पीय. विकांताचा बेत ठरला!!

जयवी's picture

25 Apr 2012 - 7:34 pm | जयवी

क्लासिक यार....... कसले कलरफुल फोटो आणि कसली भारी सजावट....... अपुन तो फिदा :)

रेवती's picture

25 Apr 2012 - 7:57 pm | रेवती

आता छान, मस्त, उत्तम असे प्रतिसाद देत बसत नाही.
दोन्ही रेशिप्या करून बघण्यात येतील. फटू आवडले हे सांगत बसत नाही.;)
दरवेळी किती कौतुक करायचे ते!:)
पहिल्या रेशिपीने तर माझा मोठा प्रश्न सोडवलाय.

पैसा's picture

25 Apr 2012 - 8:01 pm | पैसा

रंगीबेरंगी टोस्ट फारच छान दिसतायत! क्रीम क्रॅकर बिस्किटं सॉल्टेड बटर लावून खायचा प्रयोग माझा नवरा आणि मुलगा करत असतात. हे इम्प्रोव्हायझेशन चांगलंच आहे!

सॉल्लीड !!! ज.ह्.ब.ह्.रा, यिप्प्प्प्प्प्पी, जबर्‍यादस्त पाकृसॉल्लीड, शॉल्लेट, खल्लास, कातिल, आयला लय भारी, प्रेझेंटेशनास... शि.सा.दंडवत, खपल्या गेलो आहे, सुप्पर, खपलो, सुरेख पा.कृ., भ ...न्ना....ट, क्लासिक यार, मस्त प्रेझेंटेशन!

फटु आणि पा.कृ.साठी याशीवाय वेगळे काय लिहीणार???

सो कॉपी मार दिया.

निवेदिता-ताई's picture

26 Apr 2012 - 8:51 am | निवेदिता-ताई

झकास....................अत्त्युत्तम..:)

मेघवेडा's picture

26 Apr 2012 - 2:56 pm | मेघवेडा

कमाल फोटोज आहेत!

इरसाल's picture

26 Apr 2012 - 5:31 pm | इरसाल

काहीतरी बोला..........की
तुम्हीपण खपल्या स्वतःची पाकृ बघुन. (कृ. ह. घेणे)

सानिकास्वप्निल's picture

26 Apr 2012 - 5:35 pm | सानिकास्वप्निल

प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे आभार :)

इरसाल's picture

27 Apr 2012 - 10:54 am | इरसाल

आभार.तुम्ही मानलेल्या आभारांबद्दल.

सुहास..'s picture

26 Apr 2012 - 5:43 pm | सुहास..

ख आणि ल्ला आणि स

बस्स! संपलं!!

काय बोलायच बाकी ठेवलंय आता?
करा .. पाकृ करा... द्या इथे... जळजळतोय आम्ही. :)

jaypal's picture

27 Apr 2012 - 10:11 pm | jaypal

बाडीस . :-)

रुस्तम's picture

16 Nov 2012 - 4:31 am | रुस्तम

रेसीपी दिसत नाही. फक्त प्रतिक्रीया दिसत आहेत.