चीझ चीली टोस्ट आणी चीझ अॅंड क्रॅकर्स
साहित्य चीझ चीली टोस्ट:
५-६ ब्रेड स्लाईसेस (जास्त ही घेऊ शकता )
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
२-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ लाल भोपळी मिरची बारीक चिरलेली (कुठल्याही रंगाची घेऊ शकता )
बारीक चिरलेली कोथिंबीर
किसलेले चीझ आवडीप्रमाणे (मी मॉझ्झरेला वापरले आहे, आपल्या आवडीप्रमाणे कुठले ही चीझ घेऊ शकता)
१/२ टीस्पून काळीमिरीपूड
१/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स
पाकृ:
एका भांड्यात चीझ, कांदा, भोपळी मिरची, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर सगळे एकत्र करुन घेणे. (मी मीठ वेगळे घातले नाही कारण चीझमध्ये मीठ असतं)
ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण नीट लावून घ्यावे. त्यावर थोडी काळीमिरीपूड व ड्राईड हर्ब्स भुरभुरावे.
२०० डीग्री सें वर प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये तयार ब्रेड स्लाईस ठेवून ८-१० मिनिटे भाजवे. (ओव्हन नसल्यास तव्यावर किंवा ग्रील पॅनवर ही भाजु शकता.)
टोस्ट तयार झाले की त्रिकोणी आकारात कापून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.
साहित्य चीझ अॅंड क्रॅकर्स :
१०-१२ क्रॅकर्स बिस्किटे (हे नाही मिळाल्यास मोनॅको बिस्किटांचा वापर करु शकता)
तयार हिरवी चटणी ( ओला नारळ + थोडा जास्त पुदिना + कोथिंबीर + हि.मिरच्या + मीठ + लिंबाचा रस + चवीपुरती साखर एकत्र करून चटणी तयार करावी )
चेरी टोमॅटो मधून कापून दोन भाग करणे
चीझ चे तुकडे (मी चेडर चीझ वापरले आहे )
१/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स
पाकृ:
क्रॅकर्स बिस्किटांवर थोडी हिरवी चटणी लावावी.
त्यावर चीझ चे तुकडे लावावे व अर्धा चेरी टोमॅटो लावावा. त्यावर थोडे ड्राईड हर्ब्स भुरभुरावे.
चीझ चीली टोस्ट आणी चीझ अॅंड क्रॅकर्स तयार आहे :) मस्त चहासोबत हे तुम्ही खाऊ शकता, कुठल्याही पार्टीसाठी, लहान मुलांसाठी / मोठ्यांसाठी झटपट खाऊ बनवू शकता :)

वाचन
12456
प्रतिक्रिया
47