मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चीझ चीली टोस्ट आणी चीझ अ‍ॅंड क्रॅकर्स

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्य चीझ चीली टोस्ट: ५-६ ब्रेड स्लाईसेस (जास्त ही घेऊ शकता ) १ छोटा कांदा बारीक चिरलेला २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या १ लाल भोपळी मिरची बारीक चिरलेली (कुठल्याही रंगाची घेऊ शकता ) बारीक चिरलेली कोथिंबीर किसलेले चीझ आवडीप्रमाणे (मी मॉझ्झरेला वापरले आहे, आपल्या आवडीप्रमाणे कुठले ही चीझ घेऊ शकता) १/२ टीस्पून काळीमिरीपूड १/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स . पाकृ: एका भांड्यात चीझ, कांदा, भोपळी मिरची, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर सगळे एकत्र करुन घेणे. (मी मीठ वेगळे घातले नाही कारण चीझमध्ये मीठ असतं) . ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण नीट लावून घ्यावे. त्यावर थोडी काळीमिरीपूड व ड्राईड हर्ब्स भुरभुरावे. . २०० डीग्री सें वर प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये तयार ब्रेड स्लाईस ठेवून ८-१० मिनिटे भाजवे. (ओव्हन नसल्यास तव्यावर किंवा ग्रील पॅनवर ही भाजु शकता.) टोस्ट तयार झाले की त्रिकोणी आकारात कापून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे. . साहित्य चीझ अ‍ॅंड क्रॅकर्स : १०-१२ क्रॅकर्स बिस्किटे (हे नाही मिळाल्यास मोनॅको बिस्किटांचा वापर करु शकता) तयार हिरवी चटणी ( ओला नारळ + थोडा जास्त पुदिना + कोथिंबीर + हि.मिरच्या + मीठ + लिंबाचा रस + चवीपुरती साखर एकत्र करून चटणी तयार करावी ) चेरी टोमॅटो मधून कापून दोन भाग करणे चीझ चे तुकडे (मी चेडर चीझ वापरले आहे ) १/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स . पाकृ: क्रॅकर्स बिस्किटांवर थोडी हिरवी चटणी लावावी. . त्यावर चीझ चे तुकडे लावावे व अर्धा चेरी टोमॅटो लावावा. त्यावर थोडे ड्राईड हर्ब्स भुरभुरावे. . चीझ चीली टोस्ट आणी चीझ अ‍ॅंड क्रॅकर्स तयार आहे :) मस्त चहासोबत हे तुम्ही खाऊ शकता, कुठल्याही पार्टीसाठी, लहान मुलांसाठी / मोठ्यांसाठी झटपट खाऊ बनवू शकता :) .

वाचन 12455 प्रतिक्रिया 0