काळ कोठडी (भाग -१)

हर्षद आनंदी's picture
हर्षद आनंदी in जनातलं, मनातलं
5 Apr 2012 - 6:41 pm

पांढरा शुभ्र रंग दिलेली चौकोनी खोली,साधारण १० बाय १० ची,पंखाही पांढराच .. टेबल ही पांढरेच, आणि त्या गोळ्याही पांढरया ..आयुष्यातले रंग कसे काढू किथे उडून गेले कळलेच नाही. म्हणून मीच सांगितलं उषेला, खोलीला पांढरा रंग देऊन घे.जीवन रंगहीन झालंय तर खोलीला रंग असून काय उपयोग? पंख्याने पण मान टाकली, आज माझी शेवटची सोबतही संपली.. मगाशी आवाज येत होते, उषा मनधरणी करत होती त्या वायरमनची,पगार नाही आला, उद्या अल्ला की बील भरते, मिस्टर आजारी आहेत, जरा माणुसकी दाखवा. त्याने ऐकले नसेलच.. नुसतेच तिच्याकडे टक लावून बघत असेल हरामखोर, ह्या उशाला पण सांगितलं अनोळखी माणसाशी वाद नको घालत बसू, मला नाही आवडत तिच्याकडे कोणी असे रोखून बघितलेले.आहेच ती सुंदर..लाखात एक,म्हणून काय कोणीही बघत बसावे का? नोकरी करायची म्हणतेय आता.. कसे सांगू हिला, बाहेर लांडगे बसलेत हीचे लचके तोडायला, जरा सुंदर बाई दिसली की सोकावतात साले. बराच वेळ झाला असेल ना आवाज होऊन, आता ही उषा कुठे गेली असेल,ढळढळीट दुपार झालीय .. जेवली असेल का ती? तरी ती सांगत असते, एक घड्याळ लाऊन घ्या, खोलीत.. पण मला आताषिक त्या टकटकची भीती वाटते..... विचार विचार.. नुसते विचार.. अस्वस्थपणे राहुलने कुस बदलन्यासाठी अंग हलवले तसे वाटले त्याला.. राहुलला अर्धांगवात झालाय.. दावी बाजू पूर्ण पणे लुळी पडलीय, बोलताही येत नाहीये बिचाऱ्याला. उजव्या हाताला कायम सलाईन. सगळी जीवनशक्ती डोळ्यात नी कणात साठून राहिलीय.
राहुल साठे राहुलचे आई वडील,राहुलच्या लहानपणीच वारले,काकांनी वाढवला त्याला. काका सडाफटिंग, एक नंबरचा जुगारी. त्याम्हुळे राहुलला सगळ्या गुन्हेगारी क्षेत्राचे बाळकडूच मिळाले. शाळेत घातला काकांनी, म्हणून शिकला. कसाबसा दहावी झाला.पण माणसे हेरण्याची, गोड बोलून काम साधण्यची कला त्याने कधीच आत्मसात केली होती. काकांच्या जुगारी करियरचा फायदा पुतण्याने घेतला,धंदा सुरु केला..चालला ही बऱ्यापैकी. पोरगा सेटल झाला, असे काकाला वाटलं ..
उषा साठे ..उर्फ नीला राहणे. अत्यंत सुंदर, गोरीपान, आखीव-रेखीव बांधा हिला निसर्गाकडून फुकटात मिळाला होता. बाप दारुड्या, आई हिच्या प्रमाणेच सुंदर पण वेश्या, बापाने आईला पळवून आणली होती उत्तरेतून. आता झोपडपट्टीत १०-२० रुपडे टाकले कुणी की बिनदिक्कत दरवाजा बंद करून घ्यायची.नीलाला आपल्याकडे काय आहे ह्याचा साक्षात्कार आठव्या वर्षी झाला, जेव्हा बापानेच तिच्यावर बलाक्तार करण्याचा प्रयत्न केला, आईने मध्ये पासून तिला वाचवले. पण तेव्हापासून नीला मोठी झाली.. आता पोर तिच्या तालावर झुलू लागली. लई पोरांना नादी लावलं बयेनी. ही राहायची राहुलच्याच गल्लीत. राहुल हिला कधीच भाव देत नसे. हीचे सगळे उद्योग तो जाणून होता..
राहुलचा धंदा सेट झाला, बऱ्यापैकी पैसा मिळवू लागला.. तशी निलाची नजर राहुलवर पडली. लग्न केले ह्याच्याशी तर मस्त राणीबनून राहू, ही खुणगाठ तिने मनाशी बांधली. काकाशी सांधणा बांधून ही घरात घुसली, राहुलची सगळी सेवा करू लागली, बाहेरचे धंदे बंद केले.. तसा हळूहळू राहुल विरघळला.. असे सौंदर्य पायाशी लोळण घेत आहे म्हटल्यावर कुठला पुरुष वेडा नाही होणार.. शेवटी नीला उषा साठे बनून घरात कायमची स्थिर झाली.

राहुलच्या डोळ्यासमोरून सगळी चित्रे पळत होती, आठवणी मनात साचून राहिल्या होत्या. भूतकाळाचा चित्रपट पुढे सरकला. लग्नाला वर्ष कसं झालं त्याला कळलेच नाही, उषा घरात आल्यापासून धंदा वाढला, पैसा-अडका प्रचंड मिळू लागला, अप्सरे सारखी बायको दोन हात जोडून घरात उभी होती.. सुख सुख म्हणतात ते सारे काही धबधब्यासारखे वाहत होते. नवीन गाडी घेतली म्हणून दोघे महाबळेश्वरला गेले... मस्तीत संध्याकाळ कधी झाली दोघानांही कळलेच नाही,निघे पर्यंत चांगलाच उशीर झाला होता. जेवताना थोडे मद्यपान झाले असल्याने डोळ्यांवर धुंदी नाचत होती..घाट उतरताना वळताना अंदाज चुकला, आणि गाडी थेट दरीत.कोलांट्या उद्या खात गाडी तळाशी पोचली.. ह्यांना शुध्द आली ती आयसीयूमध्ये. राहुलच्या डोक्याला जबरदस्त मार बसला होता, तर उषाचा पाय मोडला होता. मात्र तिचा चेहरा आश्चर्यकारक रित्या वाचला,साधे खरचटले पण नव्हते तिला. राहुलला अर्धांगवात झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर उषेचा पूर्ण विरस झाला होता, काय स्वप्ने पाहीली होती आणि हातात असा लोळागोळा झालेला राहुलं.. तो काय धंदा करतो हे कुणालाच नीटस माहित नव्हत. व्यवहाराची कल्पना नव्हती. व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे हात वर केले, सगळे काही तपासून पाहीपर्यंत वेळ निघून गेली होती. देणी चुकती करण्यात, बिले भागवण्यात पूर्ण शिल्लक खर्च झाली. आता उपासमारीची वेळ आली. त्याला सर्व दिसत होते, पण तो काहिच करू शकत नव्हता. नुकताच झालेला वायरमनशी वाद, त्याची बरबटलेली नजर तिला नकोसे झाले होते. आईचा मार्ग तिला स्वीकारायचा नव्हता, १२वि पर्यंत का होईना शिकली होती ती. पण हे रूप .. ह्या रूपाच काय करू.. जिकडे जाईल तिकडे लोक फायदा घेऊ बघायचे. पैशाला तोटा नव्हता, पण लग्न झाल्यावर राहुलशी प्रतारणा करणे तिच्या मनाला पटत नव्हते.पोटात भुकेने आगडोंब उसळला होता, ३ दिवस पाण्यावर काढले होते तिने. तांदळाची पेज करून राहुलला भरवत होती. काका कुठे गेले होते, त्यांचा पत्ता नव्हता. नशीब हात धुवून पाठीशी लागल्याची जाणीव तिला होत होती.

अनवधानाने ती बसली होती, ती जागा राहुलच्या खिडकीतून दिसत होती. राहुलने तिला पहिले होते,तिचे भरून आलेले डोळे, गालाची वर् आलेली हाडं, कोमेजलेली काया..त्याने डोळे मिटून घेतले, पण ते रूप काही डोळ्यासमोरून जाईना. आत्ता या क्षणि मरण आले तर कित्ती बरे असे त्याला वाटत होते..असे सहज मागून मरण मिळाले असते तर लोक त्याला कशाल घाबरले असते.. अजून राहुलला जगायचे होते.. वर्षानुवर्षे जगायचे होते.. नियती पुढचा खेळ मांडत होती, साऱ्या सोंगट्या आत्ता जवळ येत होत्या.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिजीत राजवाडे's picture

5 Apr 2012 - 6:52 pm | अभिजीत राजवाडे

नमस्कार,

लेखाची सुरुवात तर छान जमली आहे. आणखी येऊ द्या.

निवेदिता-ताई's picture

5 Apr 2012 - 7:15 pm | निवेदिता-ताई

येउ द्या लवकर पुढील भाग..:)

५० फक्त's picture

5 Apr 2012 - 10:02 pm | ५० फक्त

हा नक्की पहिला की दुसरा ?

असो, जो असेल तो, चांगलं आहे येउ द्या.

निशदे's picture

5 Apr 2012 - 10:27 pm | निशदे

वेग आवडला........येऊ द्यात अजून..

पैसा's picture

5 Apr 2012 - 11:17 pm | पैसा

पहिल्या आणि दुसर्‍या भागाचा एकमेकांशी काही सांधा दिसला नाही. की मला कळाला नाही?