धरणी माय....

अमितसांगली's picture
अमितसांगली in जे न देखे रवी...
29 Mar 2012 - 6:05 pm

कत्तल करुनी वृक्षांची, अनाथ केले भू-मातेला,
जंगले बांधूनी सिमेंटची, वाकुल्या दाखविल्या निसर्गाला,
चक्र असेच दौडले तर,
भविष्यातील पिढी विचारेल, हिरवळ म्हणजे काय.....??
नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...??

डोस पाजूनी रासायनिक खतांचे, शोषण केले मातीच्या गुणधर्मांचे
हव्यास धरुनी अति -उत्पनांचे, दिवस दाखविले वान्झत्वाचे
चक्र असेच दौडले तर,
भविष्यातील पिढी विचारेल, सुपीकता म्हणजे काय.....??
नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...??

विवस्त्र करुनी निसर्गाला, हिंस्रपणे ओरबाडले
वरून धूर काढला तर खालून पाणी उपसले
उत्सर्जन करुनी विषारी वायूंचे , ओझोनचे काळीज फाडले
चटके देऊनी मातेला, उपकारांचे पांग फेडले
चक्र असेच दौडले तर,
भविष्यातील पिढी विचारेल, निसर्ग संपत्ती म्हणजे काय.....??
नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...??

विचार सर्वांनी हवा करायला,
आळा घालूया वाढती लोकसंख्या व प्रदूषणाला,
सुरुवात करू स्वतापासून ,मग लागेल समाजही बदलायला
चक्र हे थांबविण्यासाठी
कामाला लागू झटकून हात अन पाय
नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...??

विडंबन वाचायला आवडेल .........

करुणसाहित्यिक

प्रतिक्रिया

अमितसांगली साहेब, एक विचार करायला लावणारी कविता लिहिली आहेत.

भविष्यातील पिढी विचारेल, हिरवळ म्हणजे काय.....??
अस म्हणुन प्रत्येक कडव्या मध्ये तुम्हि अस विचारल आहे कधी सुपिकता तर कधि निसर्ग संपत्ती म्हणुन .

निव्वळ अप्रतिम लाजवाब कविता आहे ही.

पैसा's picture

29 Mar 2012 - 7:37 pm | पैसा

लेखाच्या ऐवजी कविता लिहायची कल्पना आवडली. पण तुम्हाला विडंबन वाचायला आवडेल तर अत्रुप्त आत्मा याना लिंक द्यायचीत ना, ते काण्ट्र्याक त्यांच्याकडे आहे! :D

गणामास्तर's picture

29 Mar 2012 - 10:58 pm | गणामास्तर

अप्रतिम कविता.

निसर्गा बद्दल वाटणारी कळकळ, पर्यावरणाच्या र्‍हासा बद्दल समाजाची कमालीची अनास्था, भविष्यातील पिढी समोरील प्रश्न आणि वाढती लोकसंख्या ई. भावना कवितेच्या माध्यमातून अत्यंत सुरेख पद्धतीने मांडल्या आहेत आपण.

येथील काही दुष्ट लोक तुमच्या कवितेचे बीभत्स विडंबन करायची शक्यता नाकारता येत नाही, पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पु.ले.शु.

मूकवाचक's picture

30 Mar 2012 - 10:20 am | मूकवाचक

पुलेशु

(विडंबकांनी 'दे माय धरणी ठाय' करून सोडू नये यासाठी टाकलेली तळटीपही आवडली )

अग्यावेताळ's picture

30 Mar 2012 - 10:25 am | अग्यावेताळ

मिपाचे टोप्या उडवू ज्येष्ठ विडम्बनकार अत्रुप्त यांच्या विडम्बानाच्या प्रति़क्षेत.

चौकटराजा's picture

30 Mar 2012 - 11:10 am | चौकटराजा

अमित साहेब ,
\/
||
O
/ \

साष्टांग नमकाराची ही खूण जमली आहे का ?

मदनबाण's picture

31 Mar 2012 - 12:06 pm | मदनबाण

हा व्हिडीयो आठवला...