व्हेज राइस

Pearl's picture
Pearl in पाककृती
21 Mar 2012 - 6:49 am

व्हेज पुलाव किंवा बिर्याणी करायचा कंटाळा आला असेल तर हे सोपं वर्जन करून पहा. किंवा संध्याकाळी हलका आहार घ्यायचा असेल तर जेवण्यासाठी चांगला ऑप्शन.

साहित्यः
तेल, हिंग, जिरे, हिरव्या मिरच्या १-२, (फ्लॉवर, गाजर, श्रावण घेवड्याच्या शेंगा) या भाज्यांचे काप, मटार, स्वीटकॉर्न, भरपूर (उभा चिरलेला कांदा), तांदूळ, मीठ, बटर किंवा तूप, काजू, लिंबूरस

कृती:
१) एका कुकरमध्ये तेल घेऊन तेल तापले की हिंग-जिर्‍याची फोडणी करून घ्या. त्यात काजू घालून परता. मग १-२ मिरच्यांचे तुकडे घाला. आता त्यात भरपूर कांदा घाला. कांदा चांगला परतून घ्या.
२) मग त्यात सगळ्या भाज्या (फ्लॉवर, गाजर, श्रावण घेवड्याच्या शेंगा,मटार, स्वीटकॉर्न) घालून चांगले परता. तांदूळ धुवून घेऊन त्यात घाला. चांगले परता. आता थोडे तूप/बटर घालून परता.
३) आता त्यात पाणी, चवीनुसार मीठ, ३-४ थेंब लिंबाचा रस घाला. (लिंबाच्या रसामुळे भात छान पांढरा स्वच्छ दिसतो असं ऐकल आहे, म्हणून मी घालते.) फोडणीत मिरची घालायची विसरल्यास आता घातली तरी चालेल.
४) आता कुकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या करा. मस्त वाफाळता व्हेज राइस तयार.
५) (उभा चिरलेला) कांदा, त्याला तेल लावून मायक्रोवेवमध्ये अंदाजे २-३ मिनिटे ठेवून क्रिस्पी करून घ्या.
हा कांदा व्हेज राइसवर घाला.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

21 Mar 2012 - 8:02 am | प्राजु

यातच कसलासा मसाला (पुलाव, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, किंवा खडा मसाला ) घातला की झाला पुलाव, खिचडी/खिचडा.. !

पैसा's picture

21 Mar 2012 - 8:47 am | पैसा

सोपा आणि पोटभरीचा शिवाय हेल्दी प्रकार! प्राजू म्हणते तसं थोडा थोडा फरक करून खूप प्रकार करता येतील.

खादाड's picture

21 Mar 2012 - 11:07 am | खादाड

स्वीटकॉर्न मस्त दिसतायत !!

मृगनयनी's picture

21 Mar 2012 - 12:59 pm | मृगनयनी

मन भरलं!!!! थॅन्क्स पर्ल!!! :)

सानिकास्वप्निल's picture

21 Mar 2012 - 5:14 pm | सानिकास्वप्निल

छान दिसतोय व्हेज राइस :)

फोटू छान. भाताबरोबर दाल फ्राय आहे काय?
क्रिस्पी कांदा तेवढा दिसत नाहिये.
मावेमध्ये शेंगदाणे तळल्यागत कसे करायचे ते चांगलेच सरावाचे झाले आहे पण कांदा कसा बुवा करायचा?

रेवती ताई,
>>कांदा कसा बुवा करायचा?>>
एका माय्क्रोवेवेबल (मी शक्यतो ग्लास प्लेट वापरते.) प्लेटमध्ये उभा चिरलेला कांदा घेऊन त्यावर १-२ चमचे तेल घालून ते हाताने सगळ्या कांद्याला नीट लावायचे आणि कांदा पसरून ठेवायचा. आणि ३०-३० सेकंद मावे करून पहायचे. माझ्या ९०० वॅट मावेमध्ये साधारण २ ते ३ मिनिटे लागतात. त्यानंतर छान क्रिस्पी कांदा तयार होतो.

अच्छा! करून पाहीन. धन्यवाद.

भातवर धरलेली वाफही छान टिपली आहे. :)
पानं वाढायला घ्या, आलोच हात पाय धुवून.

प्रभाकर पेठकर's picture

22 Mar 2012 - 1:39 am | प्रभाकर पेठकर

ह्यात खडा मसाला आणि पावडर मसाला घालून छान पुलाव होतो.
आमच्या घरी ह्याला झटपट पुलाव किंवा 'कुकर पुलाव' म्हणायची पद्धत आहे.

आपली पाककृतीही मस्त आहे. सोबतच्या बाऊल मध्ये काय आहे?

अभिनंदन.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Mar 2012 - 10:42 am | परिकथेतील राजकुमार

आवडल्या गेल्या आहे.

चला आता इकडे श्रावण घेवडा शोधणे आले.