व्हेज राइस
व्हेज पुलाव किंवा बिर्याणी करायचा कंटाळा आला असेल तर हे सोपं वर्जन करून पहा. किंवा संध्याकाळी हलका आहार घ्यायचा असेल तर जेवण्यासाठी चांगला ऑप्शन.
साहित्यः
तेल, हिंग, जिरे, हिरव्या मिरच्या १-२, (फ्लॉवर, गाजर, श्रावण घेवड्याच्या शेंगा) या भाज्यांचे काप, मटार, स्वीटकॉर्न, भरपूर (उभा चिरलेला कांदा), तांदूळ, मीठ, बटर किंवा तूप, काजू, लिंबूरस
कृती:
१) एका कुकरमध्ये तेल घेऊन तेल तापले की हिंग-जिर्याची फोडणी करून घ्या. त्यात काजू घालून परता. मग १-२ मिरच्यांचे तुकडे घाला. आता त्यात भरपूर कांदा घाला. कांदा चांगला परतून घ्या.
२) मग त्यात सगळ्या भाज्या (फ्लॉवर, गाजर, श्रावण घेवड्याच्या शेंगा,मटार, स्वीटकॉर्न) घालून चांगले परता. तांदूळ धुवून घेऊन त्यात घाला. चांगले परता. आता थोडे तूप/बटर घालून परता.
३) आता त्यात पाणी, चवीनुसार मीठ, ३-४ थेंब लिंबाचा रस घाला. (लिंबाच्या रसामुळे भात छान पांढरा स्वच्छ दिसतो असं ऐकल आहे, म्हणून मी घालते.) फोडणीत मिरची घालायची विसरल्यास आता घातली तरी चालेल.
४) आता कुकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या करा. मस्त वाफाळता व्हेज राइस तयार.
५) (उभा चिरलेला) कांदा, त्याला तेल लावून मायक्रोवेवमध्ये अंदाजे २-३ मिनिटे ठेवून क्रिस्पी करून घ्या.
हा कांदा व्हेज राइसवर घाला.
वाचने
7890
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
यातच कसलासा मसाला (पुलाव,
छान दिसतोय!
छान :)
In reply to छान :) by खादाड
मन भरलं!!!! थॅन्क्स पर्ल!!!
छान दिसतोय व्हेज राइस
फोटू छान. भाताबरोबर दाल फ्राय
In reply to फोटू छान. भाताबरोबर दाल फ्राय by रेवती
रेवती ताई, >>कांदा कसा बुवा
In reply to रेवती ताई, >>कांदा कसा बुवा by Pearl
अच्छा! करून पाहीन. धन्यवाद.
भातवर धरलेली वाफही छान टिपली
कुकर पुलाव.
खल्लास !