साफसफाई एक समृद्ध प्रयत्न

लिखाळ's picture
लिखाळ in जे न देखे रवी...
23 Feb 2012 - 7:32 pm

घरातील अडगळ झटकताना उडालेली सुवर्णधूळ, झगमगून
टाकत खिडकीपुढला आसमंत, गुदमरवून
टाकत फुप्फुसाकाश, कोंडला
अनंत प्राचीन श्वास, ढकलत कासावीस प्राण.

सूर्यशक्तीचे तेजान्न घेऊन
उधळणारी हिरण्यधूळ, विखुरते
घनमेघांकृतीतून
होऊदे तुझा तेजोभंग येताच
कल्लोळ्हुंकार व्हॅक्यूम क्लीनरचा.

हे वेड्या व्हॅक्यूमक्लीनरा,
सुवर्णधूळरूपी अन्न घराच्या कानाकोपर्‍यामध्ये विखुरले आहे,
ते तुला खाता येत नाही, कारण
आता वीज गेली आहे.

--लिखाळचंद्र

अद्भुतरसवावरमुक्तक

प्रतिक्रिया

एका दमात लिंगाण्‍याच्या शिखरावर चढून कड्यावरुन धप्पकन खाली पडल्यासारखं वाटलं.

असुर's picture

23 Feb 2012 - 8:46 pm | असुर

लिखाळकाका इज ब्याक!!! :-)
अब तो मजा आयेंगाच!!!

--असुर

वपाडाव's picture

23 Feb 2012 - 8:57 pm | वपाडाव

मी आज दुपारी त्यांना 'लै दिसापासुन आपलं लिखाण नाही' असं लिहायला गेलो असता त्यांची कविता बोर्डावर दिसली... म्हटलं बरं झालं खरड लिहिण्याच्या आत कविता दिसली...

अन्या दातार's picture

23 Feb 2012 - 9:09 pm | अन्या दातार

येल्कम ब्याक लिखाळ. इतके दिवस काय लेखणीत शाई भरत होता कि पेन्सिलीला टोक काढत होता??

मस्त झालेय काव्य

अत्रुप्त आत्मा's picture

23 Feb 2012 - 10:13 pm | अत्रुप्त आत्मा

खत्री...येकदम

धनंजय's picture

23 Feb 2012 - 10:54 pm | धनंजय

वेल्कम बॅक.

कवितेच्या पहिल्या कडव्यात एका अत्यंत बारकाईने पाहिलेल्या क्षुल्लक प्रतिमेचा वापर करुन मनातील फक्त उत्कटता कसल्याही अर्थाशिवाय व्यक्त करण्याचे कौशल्य दिसून येते. असे म्हणायला वाव आहे कारण झगमगून टाकत, गुदमरवून टाकत अशी विचीत्र शब्दरचना आणि त्यापुढे प्राचीन श्वास ही प्रतिमा आणि नंतर गुदमरलेले फुफ्कुसाकाश, कासावीस प्राण या प्रतिमांतून, अनंत प्राचीन श्वासातून, एवढंच काय कासावीस प्राण ढकलण्‍याच्या ओढगस्तीतूनही तीच अर्थहिन उत्कटता सुस्पष्‍टपणे व्यक्त झाली आहे.

दुसर्‍या कडव्यात पुन्हा एका क्षुल्लकशा दृश्‍यातून प्रचंड लखलखते चित्र उभे केले आहे आणि हे कडवे फक्त एक निरर्थक लखलखते दृश्‍य उभे करुन विझते. त्यापेक्षा जास्त त्यात काहीही नाही. सोनेरी सूर्यप्रकाशानं धूळीचं नाजूक धुकं चमचमत आहे आणि ते ढगांच्या रुपात तरंगताना विस्कळत-तयार होत आहे. आणि हे लखलखते धुके व्हॅक्युम क्लीनरचा भोवरा फिरुन जवळ येताच त्याला ते कृष्‍णवि‍वर तार्‍याला खाते तसे खाऊन टाकणार आहे. ही प्रचंड मोठी प्रतिमा आहे.

तिसरं कडवं अत्यंत साधं, बोधप्रद आणि तरीही त्याच्या तोंडवळ्यावरुन थोडसं वेडसर वाटू शकेल असं एक झकास कडवं आहे. या कडव्यातून वरील परिच्छेदात दिलेली प्रचंड प्रतिमा उभं रहाण्यास कारणीभूत असलेली व्हॅक्युम क्लीनर ही तेवढीच क्षुद्र प्रतिमा एक प्रचंड नैसर्गिक, कशानंही व्यक्त होणार नाही अशी हताशा व्यक्त करते. कारण त्या व्हॅक्युम क्लीनरला तो धुळीच्या प्रचंड मोठ्या प्रतिमेचा तेजोभंग करता येणार नाही.. कारण वीज ऑलरेडीच गेलेली आहे.

या अशा विचीत्र वाटणार्‍या रचनेतून शब्दांचा अर्थवाहकतेसाठीचा फोलपणा प्रचंड प्रभावी प्रकारे व्यक्त करण्यात क‍वी यशस्वी झाला आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Feb 2012 - 10:49 am | मिसळलेला काव्यप्रेमी

:)

विसोबा खेचर's picture

24 Feb 2012 - 11:10 am | विसोबा खेचर

जबरा..! :)

श्रावण मोडक's picture

24 Feb 2012 - 11:19 am | श्रावण मोडक

डॉक्टर, डॉक्टर, प्रा.ही झालात का हो?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Feb 2012 - 12:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळात डॉक्टरच झाला का अशी शंका आहे. झाला असशील तर असा धूळ झटकण्याचा नादानपणा का करतो आहेस?

तुझी शब्दांची वही हरवली का रे?

इन्दुसुता's picture

24 Feb 2012 - 9:26 pm | इन्दुसुता

विचार करायला लावणारी कविता ....

आवडली.

प्रशांत उदय मनोहर's picture

26 Feb 2012 - 4:39 pm | प्रशांत उदय मनोहर

निःशब्द

लिखाळ's picture

26 Feb 2012 - 11:12 pm | लिखाळ

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
दोन दिवस धूळीने श्वास कोडला होता त्यामुळे प्रतिसाद द्यायला आलो नाही. आता बरे आहे.

यशवंत एकनाथ यांनी उधळलेल्या धुळीकणांवर लगेच भाष्य केल्याने समिक्षकावकाश सुद्धा कोंदून गेले. फारच मस्त.
मराठीमधल्या दोन प्रसिद्ध पुस्तकांच्या सुरवातीच्या काही ओळी वाचून या कवितेची स्फूर्ती आली हे जाणकारांच्या ध्यानात आलेच असेल. असो .

वरील कविते सारखे अनेक धुलीकण उधळतात. खिडकीपुढले आसमंत व्यापतात, प्रकाशामुळे थोडावेळ चमकतात आणि शेवटी व्हॅक्यूमक्लिनरच्या कुशीत विसावतात, त्यांचे थर साठतात. असाच एक नवा थर साठणार इतकेच, :)

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2012 - 12:09 am | पिवळा डांबिस

हे वेड्या व्हॅक्यूमक्लीनरा,
सुवर्णधूळरूपी अन्न घराच्या कानाकोपर्‍यामध्ये विखुरले आहे,
ते तुला खाता येत नाही, कारण
आता वीज गेली आहे.
अरे अरे!!!
तुम्ही असं करा....
झाडू-कटका करायला एक बाई ठेवा!
घरही साफ होईल...
आणि कदाचित...
तुमची गेलेली वीजही परत येईल!!!!!!!
:)

पुनरागमनाबद्दल अभिनंदन!

कवितानागेश's picture

27 Feb 2012 - 12:47 pm | कवितानागेश

च्यायला. :D