साहित्य :
३ ते ४ मोठे कांदे
बेसन पाव किलो
२-३ मिरच्या चिरुन किंवा मिरची पुड
थोडी कोथिंबीर चिरुन
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
अर्धा चमचा धणे घसपटून किंवा पाव चमचा ओवा किंवा पाव चमचा जिरे (ऑप्शनल)
मिठ
तेल
पाककृती :
प्रथम कांदे उभे चिरुन घ्या. चिरलेल्या कांद्याला थोडे मिठ मिसळा. ५-६ मिनीटांत मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल.
आता कांदा चांगला चुरा व त्यात हिंग, हळद, मिरची किंवा मिरची पुड, कोथिंबीर, ओवा/धणे/जिरे ह्यापैकी एक हवे असल्यास, टाकावे. नंतर त्यात थोडे थोडे बेसन टाकत रहावे.
पाणी आजीबात टाकू नये. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच मिश्रण घटासर होईपर्यंत बेसन टाकावे. अगदी घट्टही करू नये. अंदाजे किंवा पिठाची चव पाहून जर मिठ अजुन हवे असेल तर टाकावे.
एका कढईत तेल चांगले गरम करावे व त्यात चमच्याचे किंवा हाताने खेकडे म्हणजे भजी सोडावी :स्मित: गॅस मंद ठेवावा. म्हणजे खेकडे म्हणजे भजी कुरकुरीत होते व आतुन चांगली शिजते.
मंद गॅसवर उलथापालथ करून भजी कुरकुरीत तळून झाली की ४-५ हिरव्यागार आख्या मिरच्यांना मधुन चिर पाडावी व कढईत टाकून जरा परतून लगेच बाहेर काढावीत. मिरच्यांवर थोडे मिठ चोळायचे आणि कुरकुरीत भजी सोबत ह्या मिरच्या मटकवायच्या.
अधिक टिपा :
धणे, जिर, ओवा ऑप्शनल आहे आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालते. पण टाकल्यास स्वाद येतो. काहीतरी एकच टाकावे.
मला एका हॉटेलवाल्याकडून माहीती मिळाली की तेल थंड असतानाच भजी टाकली की ती चांगली कुरकुरीत होते पण मी अशी रिस्क कधी घेतली नाही. वरील पद्धतीने चांगली कुरकुरीत होते.
प्रतिक्रिया
9 Feb 2012 - 12:54 pm | प्यारे१
मानसिक छळ झाला.... शारिरीक छळामुळे... आता आर्थिक छळ करुन घेऊन बौद्धिक छळाला मागे सारुन भजी खावी लागणार!
- प्यारेप्त आत्मा
9 Feb 2012 - 1:02 pm | जाई.
वॉव
मस्तच. तोंपासू
9 Feb 2012 - 1:02 pm | अन्नू
मला वाटल रेशिपित खेकडा आहे की काय?
9 Feb 2012 - 1:11 pm | गवि
आई ग्ग... निव्वळ त्रास..
9 Feb 2012 - 1:13 pm | गणपा
शवटुन दुसर्या फोटुत त्या भज्यांना तलाच्या कढईत स्वच्छंदीपणे विहार करताना पाहुन हेवा वाटला.
छ्या आता कांदाभजी बेक करणे आले.
9 Feb 2012 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार
डोळ्याचे पारणे फिटल्या गेल्या आहे.
9 Feb 2012 - 1:15 pm | चिंतामणी
शेवटचा फोटो तर खल्लास आहे.
नावाप्रमाणे त्यात
हे नसले तरी चालेल.
9 Feb 2012 - 1:56 pm | उदय के'सागर
आई ग्ग!!!! ....
अत्ताच पोटभर जेवण केलं... तरिही हे फोटो बघुन ह्या अधाशी तोंडाला टपा-टपा पाणी सुटलं....
सध्या थंडी पण (अचानकच) वाढली आहे... तेव्हा अश्या थंडीत ही अशी गरमा-गरम भजी आणि फक्कड (मसाला) चहा... व्वा..ह्यातच स्वर्ग हो !!! :D
BTW जागुतै, good to see you are back and active on Mipa... keep it up! :)
9 Feb 2012 - 11:22 pm | मयुरपिंपळे
हे अगदिच भारी होत.. :)
9 Feb 2012 - 2:06 pm | किसन शिंदे
अगदी काल संध्याकाळीच अशी कुरकूरीत कांदा भजी पोटात ढकलल्या गेली आहे त्यामुळे सध्या तरी नो पोटदुखी! ;)
9 Feb 2012 - 2:10 pm | गवि
ब्लू कोरलात अति उत्तम मिळतात खेकडा भजी... :)
काय रे स्पावड्या??
9 Feb 2012 - 2:10 pm | जागु
सगळ्या खवय्यांचे धन्यवाद.
9 Feb 2012 - 2:14 pm | पिंगू
आताच उदरभरण करुन आलोय.. त्यात भजी.. संध्याकाळी घरी गेल्यावर आईला करायला सांगतो..
- पिंगू
9 Feb 2012 - 2:37 pm | योगप्रभू
कापलेल्या कांद्याला आम्ही मीठ, तिखट आणि थोडी साखरपण घालतो. मग पाणी सुटल्यावर त्यात बेसन कालवतो. लज्जत वाढण्यासाठी ओवा मस्टच.
मिरच्या नुसत्या चीर देऊन तळल्या तर काहींचा तिखटपणा जात नाही आणि खाताना हाय-हाय होते. म्हणून मग आमच्याकडे आधी मिरच्या पाण्यात कडकडी उकळी येईपर्यंत टाकून मऊ करुन घेतात आणि मग पुसून चीर देऊन मीठाचा हात लाऊन तळतात. म्हणजे मग ती मिरची पोटाला बाधत नाही.
9 Feb 2012 - 2:40 pm | इरसाल
उपवासाच्या दिवशी काय हा त्रास.
9 Feb 2012 - 2:42 pm | इरसाल
डआकाटा
9 Feb 2012 - 2:45 pm | जागु
योगप्रभू माझी आई पण चिमुटभर साखर घालते. काहीजण बटाटा किसुन पण घालतात.
इरसाल उपवास भजी खाऊन सोडा.
9 Feb 2012 - 2:47 pm | ५० फक्त
छान आहेत.
अवांतर - हम्म्म्म्म, ही बॅचलर्शिप संपल्यानंतरची वाटतात, कॉलिंग २(गोला)पियुषातै.
9 Feb 2012 - 3:34 pm | पियुशा
@ ५० फक्त
अवांतर - हम्म्म्म्म, ही बॅचलर्शिप संपल्यानंतरची वाटतात,
हम्म....हे बाकी खरे हो ;)
कॉलिंग २(गोला)पियुषातै.
कशाला,कशाला?
हे (गोला) काय आहे विस्कटुण सान्गता का जरा ? ;)
असो भजी मस्तच ,तो .पा .सु. :)
9 Feb 2012 - 5:21 pm | ५० फक्त
अहो ते २( गोला) असं आहे, काही धाग्यात तुमचे फोटो पाहिले म्हणुन ते लिहिलं आहे, एका मराठी गाण्याचं शॉफॉ आहे तो. ओळखा पाहु, मग तुम्हाला पुण्यात आला तर (रणगाडे न घेता) कॉफी पाजु.
9 Feb 2012 - 3:12 pm | रूपाली.नाईक
खल्लास!!!!!!
9 Feb 2012 - 3:18 pm | Mrunalini
मस्तच.... भुक लागली...
9 Feb 2012 - 4:28 pm | Maharani
खतरनाक!! शेवटचा फोटो भारी!!
9 Feb 2012 - 4:44 pm | मिरची
आत्ता खाल्याशिवाय मोक्ष नाही.... मोहन घालण्याची गरज नाही का ?
9 Feb 2012 - 4:47 pm | बिपिन कार्यकर्ते
देवा! जागुताईला सुबुद्धी दे!
9 Feb 2012 - 4:57 pm | सुहास झेले
लई भारी... :) :)
9 Feb 2012 - 6:12 pm | असुर
'अश्शीच भजी पाहिजेत' अशा रिक्वेस्टी केल्यात आताच हायकमांडकडे! घरी गेल्यावर मनसोक्त भजी मिळतील अशी देवाजवळ प्रार्थना करुयात.
बाकी, नुसतेच जीवघेणे फटू टाकून कधीही आमंत्रण न देणार्या जागुतैचा नेहेमीप्रमाणेच णीसेद! हे म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणासारखं झालंय आता.
--असुर
9 Feb 2012 - 8:23 pm | रेवती
शेवटचा फोटू नसता दिला तरी चाललं असतं.;)
भज्यांचा रंग पर्फेक्ट!
आणि ओवा हवाच गं, म्हणजे बाधणार नाहीत.
येत्या विकांताला करावे म्हणते, शाकाहारी खेकडे.
9 Feb 2012 - 9:28 pm | मृगनयनी
जागु.. आय लव यु! :)
9 Feb 2012 - 10:03 pm | निवेदिता-ताई
मस्तच ग जागुतै
9 Feb 2012 - 10:46 pm | टुकुल
अतिशय हेवा वाटतो तुमचा, कशा कशाचा हेवा करु? मासे झाले, हिरव्या भाज्या झाल्या, प्राजक्ताच झाड झाल, कोकणाची सहल पण झाली आणी आता अस चटपटीत.. आता अजुन राहिल तरी काय? :-)
--टुकुल
9 Feb 2012 - 11:53 pm | चतुरंग
खल्लास! शेवटचा फोटू बघून तोंडातलं पाणी आवरता आवरता जिभेचा खेकडा झाला! ;)
खुद के साथ बातां : रंगा, वीकांताची वाट बघणे आले आता! ;)
10 Feb 2012 - 11:32 am | जागु
सगळ्यांचे प्रतिसाद पाहून भारावले, खदा खदा हसले धन्यवद सगळ्यांचे.
10 Feb 2012 - 6:23 pm | स्वाती२
शेवटचा फोटो जीवघेणा!
10 Feb 2012 - 6:23 pm | स्वाती२
शेवटचा फोटो जीवघेणा!
10 Feb 2012 - 6:43 pm | कॉमन मॅन
फारच छान..!
10 Feb 2012 - 7:56 pm | सानिकास्वप्निल
मस्तच गं
कांदा भजी एकदम चटपटीत दिसत आहे :)
11 Feb 2012 - 2:57 am | रोहन कुळकर्णी
अप्रतिम!!
11 Feb 2012 - 12:24 pm | श्यामल
जागु, मस्तच .......
11 Feb 2012 - 5:46 pm | तर्री
ही भजी आरोग्याला घातक असतात (जळजळ / तोपासु इ.) म्हणून धागा वाचला गेलेला नाही.
13 Feb 2012 - 8:31 pm | जयवी
फोटो कातिल !!!!!!!
14 Feb 2012 - 9:19 pm | इष्टुर फाकडा
आज घरी जावून बायकोला प्रेमदिनाचे सरप्राईज देतो :)
14 Feb 2012 - 9:34 pm | मराठे
फोटो बघून डी-हायड्रेट झालोय!
14 Feb 2012 - 9:39 pm | टुकुल
गेल्या रविवारी हि पाक्रु बघुन घरी प्रयत्न केला आणी पुर्णपणे यशस्वी झाला, फुट्टो काढायचा होता, पण भजी तळुन बाहेर पडली कि फस्त होत होती :-)
--टुकुल.
15 Feb 2012 - 1:12 pm | जागु
टुकुल अभिनंदन. फोटो पुढच्यावेळी नक्की टाका.