कांदा भजी / खेकडा भजी
साहित्य :
३ ते ४ मोठे कांदे
बेसन पाव किलो
२-३ मिरच्या चिरुन किंवा मिरची पुड
थोडी कोथिंबीर चिरुन
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
अर्धा चमचा धणे घसपटून किंवा पाव चमचा ओवा किंवा पाव चमचा जिरे (ऑप्शनल)
मिठ
तेल
पाककृती :
प्रथम कांदे उभे चिरुन घ्या. चिरलेल्या कांद्याला थोडे मिठ मिसळा. ५-६ मिनीटांत मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल.
आता कांदा चांगला चुरा व त्यात हिंग, हळद, मिरची किंवा मिरची पुड, कोथिंबीर, ओवा/धणे/जिरे ह्यापैकी एक हवे असल्यास, टाकावे. नंतर त्यात थोडे थोडे बेसन टाकत रहावे.
पाणी आजीबात टाकू नये. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच मिश्रण घटासर होईपर्यंत बेसन टाकावे. अगदी घट्टही करू नये. अंदाजे किंवा पिठाची चव पाहून जर मिठ अजुन हवे असेल तर टाकावे.
एका कढईत तेल चांगले गरम करावे व त्यात चमच्याचे किंवा हाताने खेकडे म्हणजे भजी सोडावी :स्मित: गॅस मंद ठेवावा. म्हणजे खेकडे म्हणजे भजी कुरकुरीत होते व आतुन चांगली शिजते.
मंद गॅसवर उलथापालथ करून भजी कुरकुरीत तळून झाली की ४-५ हिरव्यागार आख्या मिरच्यांना मधुन चिर पाडावी व कढईत टाकून जरा परतून लगेच बाहेर काढावीत. मिरच्यांवर थोडे मिठ चोळायचे आणि कुरकुरीत भजी सोबत ह्या मिरच्या मटकवायच्या.
अधिक टिपा :
धणे, जिर, ओवा ऑप्शनल आहे आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालते. पण टाकल्यास स्वाद येतो. काहीतरी एकच टाकावे.
मला एका हॉटेलवाल्याकडून माहीती मिळाली की तेल थंड असतानाच भजी टाकली की ती चांगली कुरकुरीत होते पण मी अशी रिस्क कधी घेतली नाही. वरील पद्धतीने चांगली कुरकुरीत होते.
वाचने
16025
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
मानसिक छळ झाला.... शारिरीक
वॉव मस्तच. तोंपासू
अपेक्षाभंग!
आई ग्ग... निव्वळ त्रास..
छ्या
पॉशच !
अग्गागा.
आई ग्ग!!!! .... अत्ताच पोटभर
In reply to आई ग्ग!!!! .... अत्ताच पोटभर by उदय के'सागर
टपा-टपा पाणी सुटलं....
अगदी काल संध्याकाळीच अशी
In reply to अगदी काल संध्याकाळीच अशी by किसन शिंदे
ब्लू कोरलात अति उत्तम मिळतात
सगळ्या खवय्यांचे धन्यवाद.
आताच उदरभरण करुन आलोय.. त्यात
आम्ही किंचित साखरपण घालतो..
उपवासाच्या दिवशी काय हा
डआकाटा
योगप्रभू माझी आई पण चिमुटभर
छान आहेत. अवांतर -
In reply to छान आहेत. अवांतर - by ५० फक्त
@ ५० फक्तअवांतर -
In reply to @ ५० फक्तअवांतर - by पियुशा
अहो ते २( गोला) असं आहे, काही
खल्लास!!!!!!
मस्तच.... भुक लागली...
खतरनाक!!
तोंडाला खरच पाणी सुटल.......
देवा! जागुताईला सुबुद्धी दे!
लई भारी...
'अश्शीच भजी पाहिजेत'
शेवटचा फोटू नसता दिला तरी
जागु.. आय लव यु!
मस्तच ग जागुतै
अतिशय हेवा वाटतो तुमचा, कशा
अग्गं ग्गं!
सगळ्यांचे प्रतिसाद पाहून
शेवटचा फोटो जीवघेणा!
शेवटचा फोटो जीवघेणा!
फारच छान..!
मस्तच गं
अप्रतिम!!
जागु, मस्तच .......
ईतिश्री....
फोटो कातिल !!!!!!!
जबरदस्त !
फोटो बघून डी-हायड्रेट झालोय!
गेल्या रविवारी हि पाक्रु बघुन
टुकुल अभिनंदन. फोटो