रुदाली - गझल ...

suralesandip's picture
suralesandip in जे न देखे रवी...
9 Jun 2008 - 10:51 pm

श्रावणी कोठून आली ही वावटळ
वाळवंटी स्वैर झाली ही वावटळ

का फ़ुलांनी सजविले खोटेच मजला
भावली मज आज आली ही वावटळ

वादळाने बांधली कधिची सोयरी
वीज बनुनी आज व्याली ही वावटळ

आजही होते इरादे साधेच रे
सांडली का आज प्याली ही वावटळ

नेहमी तू भग्न, आता का रंगली
रंग माझे आज ल्याली ही वावटळ

'दीप' विझला, थांबला झंझावात ही
आज का झाली 'रुदाली' ही वावटळ

--शब्दसखा!

रुदाली म्हणजे, एखाद्याच्या मृत्युवर पैसे देउन रडण्यासाठी बोलवीलेली स्त्री .

गझल

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Jun 2008 - 8:39 am | विसोबा खेचर

वा! सुंदर गझल...

वादळाने बांधली कधिची सोयरी
वीज बनुनी आज व्याली ही वावटळ

'दीप' विझला, थांबला झंझावात ही
आज का झाली 'रुदाली' ही वावटळ

ह्या ओळी फार आवडल्या!

पुलेशु...

तात्या.

नीलकांत's picture

10 Jun 2008 - 5:31 am | नीलकांत

चाचणी प्रतिक्रिया आहे.