ने मजसी ने परत मातृभूमीला.... सागरा प्राण तळमळला..!

अमृत's picture
अमृत in कलादालन
19 Dec 2011 - 12:08 am

नुकतच काही दिवसांपूर्वी अंदमानला जाण्याचा योग आला. कार्यालयीन काम असल्यामुळे केवळ दोनच दिवस तिथे राहण्याचे ठरले होते (वरून संमती मिळाली होती). कार्यालयातर्फे राहाण्याची व प्रवासाची सोय करण्यात आल्यामुळे तसा निश्चिंत होतो पण तरी एकटेच जावे लागणार म्हणून थोडा नाराजसुध्हा होतो. तिथली भाषा कोणती यावर तीन वेगवेगळे इनपुटस मिळाल्याने आणखीच गोन्धळलो.

तर हैद्राबाद ते चेन्नै १तास आणि तिथुन विमान बदलुन पोर्ट ब्लेअर २तास असा एकूण प्रवास . पोर्ट ब्लेअर करिता चेन्नैवरून केवळ तीनच फ्लाइट्स आहेत; इन्डिअन एअरलाएंस, किंगफिशर आणि जेट. त्यासुद्धा सकाळि १० वाजण्यापूर्वी. पोर्ट ब्लेअरला कोलकात्याहुन सुद्धा जाता येतं. चेन्नैवरून आमच्या विमानात ३० ते ४० जेष्ठ मन्डळि चढलित. सगळ्यांनी पिवळ्या टोप्या घतलेल्या होत्या. त्यांच्या संभाषणारून ते सर्व पुण्याचे असल्याचे कळले.

चहापानानंतर भेजा फ्राय २ बघता बघता थोडि झोप लागली तोच लोकांचा गल़़का आणि कॅमेर्‍याच्या आवाजांनी जाग आली सगळे लोक आपापल्या कॅमेर्‍यातून बाहेरचे फोटो घेत होते. ते दृष्यच तसे विहंगम होते. कुठे निळ्या तर कुठे हिरव्या रंगाचे ते समुद्राचे पाणी त्यात मधुनच एखादे छोटेसे बेट. समुद्राचा तळ स्पष्ट्पणे दिसत होता. माझा कॅमेरा मी बॅगेत ठेउन चेक इन केल्यामूळे मनाचा खूप जळफळाट झाला. त्यावर कडी म्हणजे माझे आसन नेमके विमानाच्या पंखावर मग काय जेव्हा जेव्हा विमान माझ्या बाजूने कलायचे तेव्हा तो नजारा बाघायाला मिळायाचा.

शेवटि एकदाचे विमान वीर सावरकर विमानतळावर उतरले. हे विमानतळ अगदिच लहान आहे. बाहेर हॉटेलची गाडि घ्यायला आलेली होतीच. एक सांगायची गोष्ट म्हणजे पोर्ट ब्लेअरला फिरायाला आटो रिक्षाच वापरा टॅक्सिच्या फंदात पडु नये कारण विमानतळ ते हॉटेल करीता आटो ५० रू घेतो तर टॅक्सी रू.१५०. पोर्ट ब्लेअर अंदमानची राजधानी असूनसुद्धा एका लहान जिल्ह्याच्या ठिकाणाप्रमाणेच आहे. तर हॉटेलला जाऊन फ्रेश झालो नास्ता केला आणि थोडा फिरायाला निघालो पायीच.

जवळच एक संग्रहालय आहे 'समुद्रीका नॅवल मरिन म्युजिअम ' २०रू चे प्रवेश तिकिट आणि कॅमेर्‍याची पास काढून आत गेलो.

प्रवेशद्वारतच एक मोठा सांगाडा ठेवलेला आहे 'निळ्या देवमाश्याचा' त्याच्या आकारावरूनच खरोखरचा देवमासा किती मोठा असावा याचा अंदाज येतो.
.

.

आत संग्रहालयात अंदमान व निकोबार बेटांची रचना, तिथले मूळ निवासी, समुद्री जीवसृष्टी, शिकारिच्या पद्धती, निरनीराळे शंखशिंपले, मत्स्यालय इत्यादींची सचित्र माहिती व प्रत्यक्ष नमुने ठेवलेले आहेत.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

तिथे दीड तास घालवल्यावर साहेबांचा फोन आला त्यामुळे परत नेट कॅफे जवळ करावा लागला. सगळे काम संपेस्तोवर ६ वाजले. हॉटेलला जाऊन विचारणा केल्यावर कळले की सेल्यूलर जेलचा लाईट आणि साउंड शो ६.३०ला असतो पण तो मिळण्याची शक्यता धूसरच होती. ऑटो घेऊन तिथे पोचलो तर दार बंद करण्याची तयारि सुरू होती तसाच तिकिट खिडकिला गेलो व तिकिट घेऊन आत घुसलो. पूढचा एक तास हा शब्दातीतच म्हणावा लागेल. सेल्यूलर जेल म्हणजे हेच ते कुप्रसिद्ध काळ्या पाण्याचं कारागार. खरं सांगतो त्या कार्यक्रमामधिल वर्णनं ऐकून अशृ थंबवणे कठिण झाले होते. नरकयातना म्हणतात त्याची कल्पना तिथे आली.

.

कॅमेरा तात्पूरता गंडला होता म्हणुन काही फोटो नीट आले नाहित. कार्यक्रम संपल्यावरच ठरवले काहिही झाले तरी उद्या परत यायचे दिवसाच्यावेळि म्हणजे कारागाराचा परिसर नीट पहाता येइल.अंदमानला रात्र थोडि लवकरच होते व सोबत कुणीच नव्हते म्हणून एकट्यानी जास्त धाडस करू नये म्हणून मुकाट परत आलो हॉटेलला.
दुसर्‍या दिवशी ऑफिसचे काम उरकता उरकता १२ वाजलेत. लागलीच हॉटेलला फोने करून कुठे जाता येईल याची विचारणा केली असता कळले की एकूण ३ बेटांचा टूर असं पॅकेज असतं वायपर, रॉस आणखी एक. त्यासाठी सकळी ९ वाजता निघावं लागत. मला ऊशिर झाल्यामूळे ते शक्य नव्हते. मग फक्त ऱोस बेटावर जायचे ठरले. राजीव गांधि जलक्रिडा संकुलातून फेरी जातात तिथं पोहोचलो तर सारा शुकशूकाट. तिकीट काढलं व फेरी येइपर्यंत जरा आजुबाजूला फेरफटका मारला.

.

.

हे सुनमी स्मारक. सुनामीच्या विध्वंसात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली. सुनामीच्यावेळी या फेरी कित्येक कीमी दूर आणि उंचावर जाऊन पडल्या होत्या.

शेवटि एकदाची फेरी आली. फेरित मी एकटाच होतो कारण चूकिची वेळ. ते दूर तिथे डोंगरावर दिसतयं ते कारागृह.

.

फेरी प्रमाणेच या बेटावर सुद्धा मी एकटाच होतो. परत प्रवेश तिकिट कॅमेरा पास तयार करून आत गेलो तर तिथं हरिणांचे मुक्त कळप. खुशाल हात लावा त्यांना.

.

या बेटावर गोर्‍या साहेबांचे क्वार्टस होते एके काळि आता फक्त भग्न अवशेष.
.

.

तिथे एक छान स्वछं छोटासा बीचपण आहे परंतु तिथे उतरायच्या पयर्‍या तुटलेल्या असल्याने केवळ फोटोंवरूनच आनंद मानावा लागला.

.

.

.

१ तासाची पायपीट वरून प्रचंड आर्द्रता त्यामूळे येणारा घाम आणि कहर म्हणजे बेटावर जलपानाची काहीच सोय नाही. तस एक छोटं कँटिन आहे पण ते बंद होतं.
२ वाजायला आले होते आणि पोटात कावळे ओरडत होते पण सहन करण्याशिवाय उपाय नव्हता.
तिथून परतीची फेरी घेतली. पण परत येऊन सुद्धा खायला काहिच मिळालं नाही. म्हटलं ठिक आहे एक दिवस असापण.

तिथे जवळच पायर्‍या आहेत कारागृहाला जाण्याकरीता. ५० पायर्‍या असाव्यात पण एक एक पायरी चढताना पायाला कित्येक किलोंच वजन बांधल्या प्रमाणे जाणवत होतं.
शेवटि एकदाचा वर पोचलो आणि ते प्रवेशद्वार पाहिलं ' सेल्यूलर जेल - राष्ट्रिय स्मारक'.

.

.
परत तिकिट काढलं आणि तिथल्या संग्रहालयात दाखल झालो. हे संग्रहालय म्हणजे त्या हुतात्म्यांना आदरांजली आहे ज्यांनी आपलं सर्वस्व या देशासाठी वाहिलं. भींतिंवर चहुबाजुला त्या वीरांच्या तसबिरी आहेत. हजारांवर नक्कीच असतील. ज्यांनी जीव गमावला त्यांची तपशिलवार माहिती इथे बघायला मिळते.

हा कारगृहाचा गणवेश.

.

हा यातना देण्यासाठिचा वेगळा गणवेश.

.

या वेगवेगळ्या शिक्षा.
.

हे सगळं पहाताना आजूबाजूचा आवाज नाहीसा होतो निशब्द व्हायला होतं.

नंतर मुख्य करागारकडे वळलो. तिथे दारातच हे शब्दं.

https://lh4.googleusercontent.com/-HpLif3K5sn4/Tu4pbHzp4LI/AAAAAAAAAE4/q...

थोडं आत गेल्यावर आहे ही स्वातन्त्र्य ज्योती.
.

ही या कारागाराची प्रतिकृती तारामाश्याच्या आकाराची.

.

त्याच्या प्रत्येक बाजूवर तीन मजले व प्रत्येक मजल्यावर ५ बाय ६ च्या आकारच्या २० ते ३० बराकी.

मला ओढ लागून होती ती स्वातंत्र्यवीरांची बराक पाहाण्याची.

जसा जसा पायर्‍या चढू लागलो ह्रूदयाचे ठोके वाढू लागले. सोबतीला लाकडि पायर्‍यांचा आवाज. इथे सुद्धा मी एकटाच होतो. त्या बराकिंसमोरून जाताना कमालिची भिती वाटत होती. सावरकरांची बराक एकदम टोकाला आहे. संपूर्ण कारागारात केवळ याच बराकिवर नावाची पाटि आहे.
.

जोडे बाहेर काढले आणि आत गेलो.
.

भिंतीव सावरकरांचे पेटिंग आणि त्यावर हार माळलेला. आदल्या दिवशी जे मराठी मंडळ माझ्या विमानात होते त्यांच्या हाती मी तो हार पाहिला होता.

.

फोटोपुढे दंडवत घातला आणि थोडा वेळ तिथंच बसलो. माझ्या आयुष्यातील काही अनमोल क्षणांपैकी हा एक.

.

.

त्या लोखंडी दारातून हे जे दिसते आहे ते आहे फाशीघर सावरकरांच्या अगदि दारा पुढे खालिल बाजुस व वरिल झरोक्यातून ऐकू येतो तो दूरवर असलेल्या समुद्राच्या गाजांचा आवाज. (अवांतर - स्वातंत्रवीरांना त्यांचे वडिल बंधु गणेश सुद्धा याच कारागारात आहेत हे तब्बल दोन वर्षानी कळलं).

.

त्यानंतर वर सेन्ट्रल टॉवर मधे गेलो. हा वरून दिसणारा नजारा.

.

खाली गेलो फाशीघर सुद्धा पाहिलं. मग मात्र मनं भरून आलं काहिही करण्याची ईछा राहिली नाही. परत येताना पायीच बाजारपेठेचा चक्कर मारला पण विकत घेण्यायोग्य काहीच वाटलं नाही. जेवणं केलं आणि हॉटेलला परतलो.

हिंदी ही इथली सामान्य बोलीभाषा. अंदमान केंद्रशासित प्रदेश असल्याने इथे मद्य अतिशय स्वस्त दरात मिळतं. तश्या मित्रांच्या खूप फर्माईशी होत्या पण उड्डाण नियमांची माहिती नसल्याने ते विकत घेण्याचा बेत रद्द केला. तसा अंदमानचा टूर हा ३ ते ४ दिवसांचा होउ शकतो पण मला थोड्या मर्यादा असल्याने तो आटोपता घ्यावा लागला.

रात्री बाहेरच मस्तं जेवण करून हॉटेलला परतलो. दुसर्‍या दिवशी सकाळि परत निघयचं होतं.

प्रवासछायाचित्रण

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

19 Dec 2011 - 12:23 am | चिंतामणी

तुला तिथे जाण्याचा योग आला हेच महत्वाचे.

अन्या दातार's picture

19 Dec 2011 - 12:44 am | अन्या दातार

मस्त सफर घडवलीत.

(अंदमान पाहण्याची इच्छा असणारा) अन्या

प्रभाकर पेठकर's picture

19 Dec 2011 - 1:25 am | प्रभाकर पेठकर

भारावलो आहे. चांगली माहीती दिलीत. अंदमानला जरूर भेट दिली पाहिजे. धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Dec 2011 - 1:27 am | अत्रुप्त आत्मा

---^--- आपण घडवलेल्या सफरिला सादर प्रणाम ---^--- या निमित्तानी पु.ल.देशपांडे यांनी आंदमानात गेले असताना दिलेल्या भाषणाची लिंक सावरकर.ओरगनायझेशन वरुन साभार देत आहे...

http://www.savarkar.org/files/u1/PL_Deshpande_on_Savarkar.pdf

प्रचेतस's picture

19 Dec 2011 - 9:15 am | प्रचेतस

सुरेख फोटो व वर्णन.
स्वातंत्र्यवीर सावरकर व तिथल्या अजूनही ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना शतशः प्रणाम.

नितिन थत्ते's picture

19 Dec 2011 - 9:28 am | नितिन थत्ते

सफरीचे मस्त वृत्तांत आणि फोटो.

(स्मारके बर्‍यापैकी मेन्टेन केलेली दिसत आहेत).

हेच म्हनते
मस्त वृत्तांत आणि फोटो. :)

मराठी_माणूस's picture

19 Dec 2011 - 12:07 pm | मराठी_माणूस

सावरकरांनी काय काय भोगले ते बघुन दु:ख झाले.

(अवांतरः तो मणीशंकर त्या कोठडीत एक तरी दीवस काढु शकेल का?)

यशोधरा's picture

19 Dec 2011 - 12:11 pm | यशोधरा

धन्यवाद, स्वातंत्र्यवीर सावरकरांना जिथे कोठडीत ठेवले होते, तेथील फोटो दिल्याबद्दल आपले अनेक आभार.
बाकीचे फोटोही सुरेख आहेत.

फोटो आणि वर्णन - दोन्ही सुरेख

सेल्युलर जेल चे फोटो पाहून- "दिव्यत्वाची जेथ प्रचिती .." असेच वाटले .

गणपा's picture

19 Dec 2011 - 1:08 pm | गणपा

सुरेख शब्दांकनाला तेवढ्याच सुरेख प्रकाशचित्रांची जोड.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Dec 2011 - 1:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

शहारे आणणारे फटू आणि आपले निवेदनही खुपच सुरेख!!
आपणाला शतशः धन्यवाद!!

गवि's picture

19 Dec 2011 - 1:30 pm | गवि

वा... खास...

मेघवेडा's picture

19 Dec 2011 - 4:17 pm | मेघवेडा

खरंच खास! :)

स्वा. सावरकरांबद्दल नेहमीच एक कुतूहल वाटत राहील आहे.अगदी शाळेत असताना गायली जाणारी गाणी....त्यांच्या प्रत्येक शब्दाला सलाम!
मध्ये एकदा हृदयनाथ मंगेशकर स रे ग म प मध्ये आले होते.तो दिवस सावारकारांसाठी राखून ठेवला होता.पंडितजींनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.आपण ऐकत असलेल्या अनेक गाणी सावरकरांनी याच जेलच्या भिंतींवर लिहिली होती.जमेल तसं लिहायचं,पाठ करायचं आणि मग पुसायच.तेव्हा त्या आठवणी ऐकताना डोळ्यातून पाणी येत होत.
फोतोंबद्दल धन्यवाद.इथे जायचा योग केव्हा येईल माहित नाही.पण आयुष्यात एकदा तरी इथे नक्की जाईल.

अमृत's picture

20 Dec 2011 - 9:12 am | अमृत

आपणा सर्वांना धन्यवाद. बर्‍याच गोष्टि लिहायच्या राहून गेल्यात तसेच आणखी छायाचित्रे सुद्धा आहेत पण ते नंतर कधी. स्वातन्त्र्यवीर सावरकर हा मराठी माणसच्या जिव्हाळ्याचा आणि आस्थेचा विषय त्यामूळे मुद्दाम लिहायचा प्रयत्न केला.

सर्वांचे पुनश्च आभार.

आपला
अमृत

" अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती
त्याची महती गणती कोणी ठेवली असेल का?
परी गजेंद्र शुंडे उपटीले, श्रीहरिसाठी नेले,
फूल ते अमर ठेले मोक्षदाते पावन.
अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची "

- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

प्राजु's picture

21 Dec 2011 - 9:20 pm | प्राजु

अतिशय सुंदर!!!
खूपच छान!

विजय_आंग्रे's picture

22 Dec 2011 - 3:39 pm | विजय_आंग्रे

वा... खास...

हरिकथा's picture

23 Dec 2011 - 4:44 pm | हरिकथा

अहो अमृतराव,

तुम्ही तर अंदमानची सफरच घडवून आणलीत.

सावरकर हे आमचे सर्वात आवडते नेते. त्यांचे विचार काळाच्या अनेक दशके पुढे होते. आजही सावरकर कुणाला नीट समजलेत असं म्हणता येत नाही. त्यांनी देशासाठी सोसलेल्या हाल-अपेष्टांना सीमा नाही.

वर दिलेलं पुलंचं भाषणही वाचनीय आहे. या लिंकबद्दल आभारी आहे.

अमृतराव तुम्हालाही धन्यवाद!

पैसा's picture

23 Dec 2011 - 7:35 pm | पैसा

सावरकर राहिले त्या कोठडीचं दर्शन मिळालं. आमच्या रत्नागिरीच्या करंट्या लोकांनी स्वातंत्र्यवीर राहिले ते घर पाडून कॉम्प्लेक्स तयार केलंय. लो. टिळकांचा जन्म झाला ते घर अजून बिल्डरच्या ताब्यात गेलं नाही हे आमचं नशीब!

अमोल खरे's picture

23 Dec 2011 - 7:52 pm | अमोल खरे

सावरकरांच्या कोठडीत जायला मिळालं ह्यासारखे दुसरे भाग्य नाही. इतक्या ग्रेट माणसाचे जिथे वास्तव्य होते त्याच्या कोठडीचे फोटो पाहुन इतकं बरं वाटतं की प्रत्यक्षात भेट दिल्यावर काय होत असेल....... तुम्ही म्हणाल्याप्रमाणे माणुस फक्त नि:शब्द होईल. अजुनही फोटो असल्यास येऊद्या.

कॉमन मॅन's picture

26 Dec 2011 - 5:45 pm | कॉमन मॅन

सहमत..

--कॉ मॅ

राघव's picture

26 Dec 2011 - 11:26 pm | राघव

माहिती अन् फोटोंकरिता मनःपूर्वक धन्यवाद.

राघव