खेकडा भजी:
या भजांच्या वेड्यावाकड्या आकारामुळे याला खेकडा भजी म्हणत असावेत . जितका सोपा तितकाच लाजवाब प्रकार
सहज बनवता येइल असा ;)
एखाद्या सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी वाफाळत्या चहाबरोबर जर गरमागरम कुरकुरी भजी असतील तर ...... " शाम बन जायेगी " ;)
चला मग लागा तयारीला ,
साहित्य : ३ कांदे उभे पातळ चिरलेले , ओवा १ छोटा चमचा ,जीर एक छोटा चमचा , लाल तिखट १ चमचा ( तुम्हाला झेपेल तेव्हढ ), मीठ चवीनुसार ,बारीक चिरलेली कोथिंबीर ,अर्धा चमचा धणेपूड ,खाण्याचा सोडा चुटकी भर , बेसन
कृती : एका पातेल्यात कांदा ,मीठ ,लाल तिखट घेऊन छान मिक्स करून घ्या , ह्या मिश्रणात पाणी अजिबात वापरायच नाही
मिश्रण १०-१५ मिनिट झाकून ठेवा .
मिठामुळ कांद्याला पाणी सुटेल ,त्यातच मावेल तितक बेसन घालून ही भजी बनवायची म्हणूनच बेसनाच प्रमाण दिलेलं नाही.
मिश्रण थोड ओलसर झाल की त्यात बेसन ,ओवा ,कोथिंबीर ,जीर धणेपूड अन खाता सोडा घालून पुन्हा एकवार छान मिक्स करून घ्या .जेव्हढ मिश्रण घट्ट तेव्हढी भजी कुरकुरीत बनतील
भजी गरम तेलात डीप फ्राय करून घ्या डार्क लालसर होईपर्यंत ,गरम गरम असतानाच सॉस ,तळलेल्या मिरच्या बरोबर सर्व करा
प्रतिक्रिया
4 Dec 2011 - 11:24 am | अन्या दातार
४ भांडी उधार (तेही घरमालकाकडून) आणुन केलेल्या भजी आठवल्या.
हा सगळा उपद्व्याप रात्री जेवण झाल्यानंतर केला होता. :D
बॅचलर लोकांनी केलेला कुठलाही पदार्थ चांगलाच असतो कारण त्याचे सगळे परीणाम-दुष्परीणाम हे त्यांनाच माहिती असतात. ;)
लगे रहो पियुशाकाकू
4 Dec 2011 - 12:55 pm | सानिकास्वप्निल
कांदा भजी म्हणजे आपला आवडता प्रकार सोबत आलं-वेलची चहा अहाहा मस्तचं :)
भजीच्या मिश्रणात सोडा न घालता २-३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घातल्यास भजी छान कुरकुरीत होतात...
4 Dec 2011 - 1:19 pm | अन्या दातार
घातल्यास भजी अजुनच कुरकुरीत होतील नै? ;)
4 Dec 2011 - 1:06 pm | पियुशा
भजीच्या मिश्रणात सोडा न घालता २-३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घातल्यास भजी छान कुरकुरीत होतात...
धन्यु ग :)
पुढ्ल्या वेळी तु सान्गितल्याप्रमाने करुन बघेन नक्की :)
( बाकी पनीरच्या रेसेपिच काय झाल? आहे ना लक्षात? ;) )
4 Dec 2011 - 1:39 pm | सानिकास्वप्निल
पनीरची पाकृ लवकरच देण्यात येईल :)
4 Dec 2011 - 1:42 pm | सूड
चमचाभर धने, थोडी मिरी आणि बडीशेप भरड कुटून घालायचं. म्हणजे कांद्यात बाकी काही मसाला न घालता मीठ आणि ही धने-मिरी-बडिशेपेचं कुट घालून मुरत ठेवायचं, कांद्याला पाणी सुटलं की त्याच्या अंगच्या पाण्यात भिजेल एवढं डाळीचं पीठ आणि मग लाल तिखट वैगरे घालायचं- इति संजीव कपूर.
असे भजी फर्मास होतात- इति मी ;)
हेही भजी दिसतायत बर्यापैकी, प्रगतीसाठी अजून वाव आहे.
4 Dec 2011 - 1:46 pm | पिंगू
मायला पुढच्या विकांती भजी तयार ठेव.. मी येतो हादडायला... :D
- पिंगू
4 Dec 2011 - 1:52 pm | JAGOMOHANPYARE
छान
4 Dec 2011 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा
हीच खेकडाभजी केलेली/खाल्लेली(ही) आहेत..आणी इतरत्र खाल्लेल्या चवी जिभेवर आहेत... एक/दोन ठिकाण शेअर करावी म्हणतो---मजुर अड्ड्यावरच्या तुकारामवुबांच्या गाडिवरची,,,कधिच न विसरणारी चव.आणी दुसरी सिंहगडावर देवटाक्या अलिकडे मिळणारी-आपल्या बाळूचा ढाबा वरची...हाय हाय हाय...जन्नत जन्नत जन्नत.
4 Dec 2011 - 3:36 pm | प्रभाकर पेठकर
बॅचलर्स भजी???? तीव्र शब्दात निषेध.
संसारात गटांगळ्या खाणार्या आमच्या सारख्यांच्या आयुष्यात एवढेही सुख नसावे??
आज बंडखोरी घोषित करून टाकतोच भज्यांचा एक फर्मास घाणा.
4 Dec 2011 - 3:38 pm | पियुशा
संसारात गटांगळ्या खाणार्या आमच्या सारख्यांच्या आयुष्यात एवढेही सुख नसावे??
____/\_____ ;)
4 Dec 2011 - 3:42 pm | गणपा
याच्यात थोडी कलावं (शुध्द मराठीत ऑईस्टर) टाकली की जी चव येते.
यंव रे यंव.
4 Dec 2011 - 3:47 pm | किचेन
भजी एकदम भारी दिसतीये.कलर एकदम सुंदर.हि भजी+चहा+पाउस = एक मस्त संध्याकाळ!
पियू आमची सुगरण आहे हो!दर वीकेंडला काहीतरी नवीन करते.
पण बचलर भजी का?मीही हि भजी करते.कशीही झाली तरी माझा बचलर न राहिलेला नवरा ती गुमान खातो.
4 Dec 2011 - 3:51 pm | गणपा
बचलर ???
अहो निदान धाग्याच्या नावावरून तरी कॉपी पेस्ट करायचत.
की तुम्हाला तुमची अशीच ओळख जपायची आहे.
आमच्या 'चुचूतैं' सारखी?
मनीच्या बाता: गण्या ही चुचुच तर नाही ना?
5 Dec 2011 - 1:46 am | मोहनराव
<<मनीच्या बाता: गण्या ही चुचुच तर नाही ना?>>
ही मनी कोण्? ;) हिला कशाला पाहिजेत चौकशा?
5 Dec 2011 - 10:48 pm | किचेन
कृपया थोडे दिवस माझ्या (अ)शुध्लेखानाकडे दुर्लक्ष करा.माझे प्रयत्न चालू आहेत.तो पर्यंत मी नवीन धागा देखील काढणार नाही.
मी मीच आहे दुसरी कोणी नाही.कृपया माझ्यामध्ये कोणी अतृप्त आत्म्याने प्रवेश केलाय किवा मी दुहेरी व्यक्तिमत्वाची शिकार आहे असे कृपया समजू नाही.
5 Dec 2011 - 11:38 pm | अत्रुप्त आत्मा
प्र-वेष :-)
4 Dec 2011 - 3:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शीर्षकावरुन खेकड्यांच्या टांगांना बेसनपीठ लावून तेलात तळून काढलेल्या
कुरकुरीत खेकडे भज्यांची पाकृती आहे की काय असे वाटले होते.
बाकी, कांदे भजे भारीच लागतात.
-दिलीप बिरुटे
4 Dec 2011 - 4:01 pm | जाई.
अरे व्वा
झकास
4 Dec 2011 - 8:10 pm | कच्चा पापड पक्क...
हि भजी बघुन मोरगावची भजी आठवली...
5 Dec 2011 - 12:13 am | सुहास झेले
जबरा !!!
5 Dec 2011 - 1:50 am | मोहनराव
हो अगदी सोपा प्रकार आहे. मी करुन पाहिला आहे. बाहेर पाऊस पडत असताना हातात वाफाळलेला चहा घेउन खेकडा भजी खाण्यासारखं स्वर्गसुख नाही.
(बॅचलर पाककृती करणारा) मोहनराव
5 Dec 2011 - 5:05 am | रेवती
ही भजी आयती समोर आली तर ठीक नाहीतर निम्मा उत्साह करण्यातच संपतो.
कांदा कितीही चिरला तरी ऐनवेळी कमी पडतो.;)
सगळ्या चवी बरोबर घातल्या तरी पावसाळी वातावरण नसले तर काहीतरी कमतरता जाणवते.
5 Dec 2011 - 10:09 am | प्रभाकर पेठकर
>>>>ही भजी आयती समोर आली तर ठीक नाहीतर निम्मा उत्साह करण्यातच संपतो.
अगदी खरं आहे. म्हणून तर उपहारगृहे चालतात.
>>>>कांदा कितीही चिरला तरी ऐनवेळी कमी पडतो.
हे, भजी झक्कास झाल्याचे द्योतक मानावे. अशाने कष्ट जास्त पडले तरी मानसिक समाधान अवर्णनिय असते. सुगृहिणी सर्व भजी एकदम पुढे करीत नाहीत. थोडीशीच देऊन 'जेवण आहे हं मागाहून' असा गोड दम भरतात. तरीही , कोणी निर्लज्यपणे मागीतलीच तर आधीच मागे ठेवलेली वाढताना 'ही आता शेवटची हं. किती खातोस रे चांगले लागले म्हणून? भजी प्रकृतीला हानिकारकच असतात. फक्त थोडीशी चवी पुरतीच खायची.' असे म्हणून खाणार्याचा, खाण्याचा उत्साह कमी करून टाकायचा. म्हणजे पुरतात केलेली भजी.
>>>>सगळ्या चवी बरोबर घातल्या तरी पावसाळी वातावरण नसले तर काहीतरी कमतरता जाणवते.
अरेरे! अगदीच वाईट प्रसंग. शॉवरचा पर्याय कसा वाटतो?? ह. घ्या.
5 Dec 2011 - 9:10 pm | रेवती
शॉवर? हा हा हा.
5 Dec 2011 - 8:27 am | श्रद्धा१२३
मस्त बाहेर पाऊस पडत असताना हातात वाफाळलेला चहा घेउन खेकडा भजी खाण्यासारखं सुख नाही.
5 Dec 2011 - 8:57 am | चिंतामणी
>>>>मिश्रण थोड ओलसर झाल की त्यात बेसन ,ओवा ,कोथिंबीर ,जीर धणेपूड अन खाता सोडा घालून पुन्हा एकवार छान मिक्स करून घ्या
नको नको. या पध्दतीने भिजवल्यावर सोड्याची जरूरी नाही. सोडा घातल्यास खूप तेल पितात भजी.
मोहन घालायचीसुद्धा जरूरी नाही.
बाकी "बॅचलर" हे नावात टाकण्याचे प्रयोजन काय???????8) 8-) :cool:
5 Dec 2011 - 10:22 am | पियुशा
बॅचलर" हे नावात टाकण्याचे प्रयोजन काय
काही नै ओ ;)
बॅचलर लोकाना सहज बनवता येतील म्हनुन "बॅचलर"भजी ' ;)
5 Dec 2011 - 10:52 am | ५० फक्त
असंय होय, मला वाटलं की ही भजी बॅचलरांसारखी कुरकुरीत आणि कडक असतात म्हणुन.
बॅचलर - खेकडा भजी - कुरकुरीत
विवाहीत १- २ वर्षे - मिरची भजी
विवाहीत ३-५ वर्षे - बटाटा भजी
विवाहित ५+ वर्षे - घोसावळ्यांच्या भज्यांसारखे पचपचीत
असलं काही आहे का काय ? असो, हुरड्याबरोबर चांगली लागत असतीला ना ओ ही भजी ? म्हणजे तेंव्हा पाउस नसतो म्हणुन विचारलं.
अवांतर - एका फोटोत ती दोन चाकं तळली आहेत ती काय चक्री भजी आहेत काय ?
5 Dec 2011 - 10:59 pm | चिंतामणी
बॅचलर - खेकडा भजी - कुरकुरीत
विवाहीत १- २ वर्षे - मिरची भजी
विवाहीत ३-५ वर्षे - बटाटा भजी
विवाहित ५+ वर्षे - घोसावळ्यांच्या भज्यांसारखे पचपचीत
हर्षद, तुझ्या लग्नाला किती वर्षे झाली????;) ;-) :wink:
असो.
हे विश्लेशण लै भारी रे.
पुढच्या वर्षांचे काय?????????
5 Dec 2011 - 11:14 pm | गणपा
त्यांनी नक्कीच घोसावळ्यांच्या भज्या चाखायला सुरवात केली असणार.
हो की नै हो ५०राव. ;)
6 Dec 2011 - 12:39 am | प्रभाकर पेठकर
त्यांनी भजी हे 'रुपक' वापरले असावे.
6 Dec 2011 - 11:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हीहीही !!!!
6 Dec 2011 - 11:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हीहीही !!!!
5 Dec 2011 - 10:59 am | स्पा
वा पियुषा क्या जिलब..
अर्र
क्या भजी डाली हे :)
5 Dec 2011 - 11:25 am | पियुशा
@ स्पावडया
वा पियुषा क्या जिलब..
हम्म्..............तुझ्या बोलण्याचा रोख कळ्तो आहे मला,पण मी बरोब्बर १ आठ्वडयानतर रेसेपी टाकली आहे :)
5 Dec 2011 - 11:35 am | ५० फक्त
म्हणजे भजी शिळी होती म्हणायची, अरेरे काय हा अन्याव.
5 Dec 2011 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार
छानच आहेत हो खेकडा भजी.
अंमळ अशक्त दिसत आहेत, पण चकण्याला ह्यासारखा पदार्थ नाही.
कृपया ह्या प्रतिसादावरती उपप्रतिसाद दिला नाहीत तरी चालेल :) प्लेटमधल्या भज्यांपेक्षा आपल्या उपप्रतिसादांची भजी जास्ती झाली आहेत. अर्थात स्वतःच्या धाग्याचा मित्रपरिवाराबरोबर खरडफळा करायचा असल्यास काही हरकत नाही, आणि मूळात आम्हाला अधिकार देखील नाही.
बाकी चालू द्या....
5 Dec 2011 - 1:17 pm | प्रकाश१११
भजि म्हणजे माझा जिव की प्राण. खेकडा भजि मालवणला खाल्ली होती.
एकदम टॉप.
5 Dec 2011 - 3:28 pm | स्मिता.
भजी एकदम मस्त दिसतायेत गं पियु!
खूप दिवसाता खाल्ली नाहियेत. आता करीन...
5 Dec 2011 - 3:35 pm | विशाखा राऊत
अरे वाह मस्त
5 Dec 2011 - 3:44 pm | प्यारे१
>>>बॅचलर लोकाना सहज बनवता येतील म्हनुन "बॅचलर"भजी '
बॅचलर लोकांना ही भजी खाऊ घालून 'सहज बनवता' येते?
पिवडे, हल्ली पोह्यांऐवजी खेकडा भजी असतात का तुमच्याकडं?
7 Dec 2011 - 9:40 am | इरसाल
मस्त पियुषा.
अशीच भजी म्हणजे कांदाभजीपाव, कल्याण स्टेशन च्या बाहेर येवून रस्ता ओलांडून उजव्याबाजूला ५ वे कि ७ वे दुकान, तितकी भारी भजी मी आतापर्यंत कुठे खाल्लेली नाही. जबरदस्त कुरकुरीत, खमंग आणि टेस्टी.सगळी भजी पाव खावून संपताना शेवटी एक भजी वेगळी ठेवायचो. पाणी पिल्यानंतर निघताना खायची, जेणेकरून ती चव जास्तवेळ तोंडात राहावी म्हणून.
हा कालचा प्रकार.................


12 Dec 2011 - 12:45 pm | पियुशा
अरे व्वा ईरसाल
एका भज्याचा आकार पक्का खेकड्यासारखाच आहे
नाव सार्थक केलेत तुम्ही खेकडा भजिन्च ;)
11 Dec 2011 - 3:27 pm | फोलपट
जालीम, घातक, खतरनाक फोटू. अन तोडांला धरण बांधायला लागणार रे.
19 Dec 2011 - 4:39 pm | स्वातीविशु
वा..वा...खेकडा भजीची पाक्रु खुपच छान आहे. मागच्या शनिवारी आमच्या हापिसात कुणीतरी अशीच भजी आणली होती. त्याबरोबर हिरवी मिरची, आले, लसूणची चटनी......मस्त...... पुन्हा आठ्वण झाली......