तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी चा॑गले जमते.

माझे ज्या लोका॑शी छान मैत्री होते त्या लोका॑ची रास मी आवश्य नोद॑वते.
माझी रास कन्या माझ्या नवर्‍याची ही कन्या पण एकाच राशीचे असुन आम्ही अत्य॑त वेगळ्या मता॑चे आहोत आणि माझ्या नवर्‍याच्या मते अशाच जोडप्याचा स॑सार छान होतो.
पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्‍याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही.
लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे.
माझ्या मित्र मैत्रिणी धनु, सि॑ह, आणि तुळ ह्या राशीच्या लोका॑शी माझे छान जमते.
मेष राशीशी अजिबात जमत नाही.

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

माझी गम्मत अशी आहे की, माझ्या सगळ्यात जवळच्या लोकांची रास कन्या आहे.. आई, २ मैत्रीणी वगैरे..
माझं मत , मकर अन कन्याचं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना असे असावे..
बाकीच्या राशींचे माहीत नाही.. कधी नीट पाहीले नाही..

पण मजा असते, राशींवरून स्वभाव्,किंवा जनरल गेस करायला मजा येते..

शीतल, माझी रास ओळख :)

मी करू गेस?

मिथुन किंवा वृषभ??

नै काय :)

:(

मग, तूळ...
किंवा कन्या,मकर्,कर्क्,वृश्चिक्,मीन्,कुंभ.. आणि उरलेल्या ३..आठवत नाहीये.. :(

पोप्पट केलास हं! :)

तूळ असावी.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा तुझ्याशी मी अजुन बोलले नाही तुझी रास कर्क कि॑वा मीन. (नाही तर १२ राशी॑पैकी एक कोणतीही)

ह्म्म्म.... :)

ह्मम्म काय..सांग ना कुठली.. :)

मिथुन, धनु, काहि प्रमाणात मेष वाले यांच्याशी चांगल जमत अस मला वाटतं.
कुंभ वृस्चिक वाल्याशी मध्यम प्रमाणार असाव. कारण तसे फार लोक माझे मित्र नाहियेत.
बाकी राशीच्या लोकासोबत फार नाही सांगता येणार पण कपटी लोकांबरोबर माझ अजिबात जमत नाय.
.................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

कपटी राशी कोणत्या असतात रे?
बाकी तुम्हाला काय वाटतं, शरद उपाध्ये ना कन्या रास फारच आवडते..
मकर वर काहीच कोणी बोलत नाही.. बोलले तर काय, आध्यत्मिक रास !! :(

यशोधरा सा॑ग ना चल भाव खाऊ नको सा॑गुन टाक रास कोणती ते.
नाही तर मिसळ्पाव लागु तुला.

तूळ नै काय!! भाग्यश्री, इनोबाजी शून्य मार्क तुम्हाला, अभ्यास न करता उनाडक्या करायच्या अन मग चुकीची उत्तरं द्यायची??? काय चाललय हे? आँ??? :W
शीतल, पुढच्या वेळी पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे... :)

म्या खेकडा हाय जी... :D

हो, नक्की मी मगाशीच म्हट॑ले माझे धनु, सि॑ह आणि तुळ राशीशी छान जमते. तु तर आपुणकी मैत्रींण हाय न्हव.

रास कुठली ह्याला महत्व नाही पण ती "सात्विक गुण" आहे का हे ज्योतिषशात्रात महत्वाचे समजले जाते ...
[ हा जोक नाही ..]

माझ्या माहितीप्रमाणे "तुळ, कर्क, धनु आणि कुंभ" या राशी सात्विक समजल्या जातात ...
[ हा पण जोक नाही ...]

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

लै भारी डान्या ...

>>बाकी राशीच्या लोकासोबत फार नाही सांगता येणार पण कपटी लोकांबरोबर माझ अजिबात जमत नाय.
हे बर॑ न्हाय का? कपटी . अरे बाप रे.

कर्क रास सगळ्यात चांगली असे शरद उपाध्ये म्हणतात ते मला पटते.

कर्क रास सगळ्यात चांगली असे शरद उपाध्ये म्हणतात ते मला पटते.
काय काका,तुम्हीपण खेकडा दिसताय.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

थँक्यू थँक्यू काका :)
बाकी शरद उपाध्ये हुश्शारच हो अगदी!! कसं बरोब्बर ओळखलं त्यांनी!!
=))

सि॑ह राशीचा पिता असावा आणि कर्क राशीची आई असावी असे म्हणतात.
शरद उपाध्येची पत्नी कर्क राशीची आहे.

तरीच... :)

शरद उपाध्ये साहेब स्वतः सिंह राशीचे असावेत.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

तरीच काय भाग्यश्री .मन मोकळे पणाने बोल. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.

अगं, शरद उपाध्ये म्हणतात ना, की कर्क चांगली.. आता बायकोची रास आहे म्हटल्यावर त्याना म्हणवेच लागणार ना असे.. :) हेहे किडींग..

"कुंभ" राशीचा म्हणजे चक्क "माठ" किंवा "ज्ञानकुंभ" ...
माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ...
[ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...]

पण "कुंभ" रास सगळ्यात चांगली असे "सात्विक बाबा" म्हणतात ...

कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ...
[ लोकांनी ह्या वाक्यावर टिका करण्यासाधी माझी दुसरी रास "सिंह" आहे हे लक्षात घावे ...
सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... ]

अजून कोण आहे आमच्या "राशीचे" व आमच्या "राशीला लागलेले" ???

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

शीतल, भाग्यश्री, इनूभाव चालूंद्या!! आपुन आता भेटू उंद्याच्याला
:))

आपण प्रत्येक राशीची मजा लिहूया का.. म्हणजे उदा..

कन्या राशीचा अतीचिकित्सकपणा.. दाराला कूलुप लावलं कि जवळजवळ लोंबकळुन पाहणार.. आणि मग बाहेर गेले की, आपल्या लोंबकळ्ण्यामुळे तुटले नाही ना कुलुप म्हणून चिंताग्रस्त होणार.. :) शिवाय तो विमानातला जोक..

वृषभ राशीची बाई भाजी आणायला जरी निघाली तरी लग्नाला निघाल्यासारखी तयार होऊन जाईल..

सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत.. :)

अजून आठवतय का कोणाला?

वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे. ;)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

>>वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे
मग माझी "ख्राईस्ट कॅलेंडर" च्या आधारे "वॄषभ रास" असू शकते ...
एकदा चौकशी केली पाहिजे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धार्मिकची काही कल्पना नाही.. म्हणजे रोमँटीकची पण नाहीये.. पण शरद उपाध्ये म्हणतात, रोमँटीक असते..

माझी सन साईन आणि मून साईन दोन्ही मकर.. कॅप्रिकॉर्न.. असं कुणाकुणाच आहे??

माझे दोन्हि हात वर.
एक सुर्य राशीसाठी आणि एक चंद्रराशीसाठी. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

माझी रास वृषभ आहे.
चण्द्र अणि सूर्य रास सुद्धा.
सन साईन प्रमाणे सुद्धा मी वृषभ आहे.
बायकोपुढे पण मी वृषभा सारखा वागत असतो असे आई म्हणते.( म्हणजे सूद्ध मर्‍हाटीत बायकोपुढला नन्दीबैल)
:::::सूद्द नन्दीबैल विजुभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

वृषभ राशीचा नवरा असलेल्या बायका नशिबवान असतात,
सगळी कामे नवराच करतो, त्यामुळे बायका सुखी.

सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत..

असं नाहीये... तो भजी घेउन येईल.. भांडं वर धरून.. म्हणजे लोकांना दिसणार नाही काय आहे ते.. आणि काही न बोलता सरळ निघून जाईल... :)

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

हे जास्त मस्तंय!!

http://bhagyashreee.blogspot.com/

माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ...
[ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...]

बर॑ बाबा राहिले दाताड काढुन हसायचे,
कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ...
किती ही स्वतः बद्दल तारीफ म्हणते मी.
आणि सि॑ह राशीशी आपली तरी मैत्री असते. त्यामुळे सि॑हाला आम्ही भित नाही जो पर्य॑त तो समोर येत नाही तो पर्य॑तच बर॑ का.

"आय ऍम 'मीन'"! ;) :D :B

चतुरंग

तुमच्यात "इन मीन तीन" हा काय प्रकार असतो शेठ ???

मंदबुद्धी कुंभवाला छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग

हेहे !! सहह्ही होती कोटी!!

माझी रास "सिंह" आहे.
छोटा डॉनने म्हंटल्याप्रमाणे ,
"सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... "

अगदि हेच म्हणतो. B)

(साडेसातिग्रस्त)अभिज्ञ. ~X(

(अवांतर-खुद्द तात्यांचि रास "मिथुन" आहे का हो?
माझा तसा अंदाज आहे. :D )

(अवांतर-खुद्द तात्यांचि रास "मिथुन" आहे का हो?

(स्वगत - अनुष्का वहिनींना विचारायला हवं. हैदराबाद ऑफिसला फोन करावा की काय? :? :W )
चतुरंग

आपले एवढं जमतयं कसं !!!
सिंह रास जिंदाबाद ...

पार्ट टाईम सिंहवाला छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मीन रास ही जगाचे गुढ उलघडणारी सात्विक रास.
हे लोक खुप चपळ असतात.

मीन रास ही जगाचे गुढ उलघडणारी सात्विक रास.
म्हंजी आता रंगराव कुठलं गुढ उकलणार हाईत?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल ... मी कुठल्या राशीचा आहे ते आता वेगळं सांगायची गरज आहे का ?;)

ये डॉन तुला नाय हा हसलो (उगाच फुकटात बंदुकीची गोळी कोण खाइल रे ) :D
डोन ने कुंभाच वर्णन बरोब्बर केलय की.

चांगला चाललाय विषय. :)
शरद उपाध्ये धनुवाले आहेत.
कन्या ही खेचण्यासाठीच त्यांच नेहमीच गिर्‍हाईक असत. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

शरद उपाध्ये धनुवाले आहेत.
हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. ;)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. >>>>>>>>>>>
इनोबा अगदी बरोब्बर ऐकल आहेस बघ. :D ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

शरद उपाध्ये धनुवाले आहेत.
हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं

अरे प्रत्येक गोष्टील अपवाद असतात आता त्या॑ची आणि तुझी रास धनु म्हणुन म्ह॑टले. वाईट वाटुन घेऊ नको.

ओळखा पाहु
जर कुंभकर्णाची रास कुंभ होती .....तर.....
***कर्णाची रास कोणती?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

कन्या राशीचे पुरूष खुप चिकित्सक, आणि पारखुन घेतल्या शिवाय विश्वास नाय ठेवणारे असतात.
पण मनात कायम श॑का घेतलेला निर्णय बरोबर की चुक.

ते कपटीपणा हा लोकांमध्ये असतो ते बोल्लो होतो मी. राशीच नाही हा. :)
तात्या नक्कीच मिथुन वाला असणार. तस मी वाचलय कुठेतरी.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

तात्यांची रास मिथुन आहे हे मी पण वाचलय.. कुठे कोण जाणे.. तेच सांगतिल खर काय..

मग आपला मिथून कुठल्या राशीचा असेल रे? :)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

रास मेष ते मीन यापैकी कुठलीच नसुन "चक्रम" नावाची एक वेगळीच १३वी रास आहे. असं माझे जवळचे दोस्त म्हणतात.
त्यामुळं उपाध्ये साहेबांनी सांगितलेले कुठलेच "एखाद्या राशीशी न जुळणे" वगैरे नियम अपुनको लागु नही होते है.
सगळ्याच राशी वाले दोस्त आहेत बुवा आपल्याला.

बाकी जोक्स अपार्ट

माझी रास कन्या .
.......
पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्‍याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही.
लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे.

विश्वास ठेवा अगर नाही; पण हे तंतोतंत मला ही लागु होतयं.
माझीही जन्मरास आहे कन्या.
आणि कर्क लग्न!
आणि पुन्हा तेच कुंडली वर चंद्राचा फारच प्रभाव आहे असं बर्‍याच जणांनी सांगितलयं.
आणि त्यात पुन्हा गुरु-चंद्र का गुरु- मंगळ अशी कसलिशी युती आहे म्हणे कुंडलीत(गूढ ज्ञानास कारक.)
त्यात जोडीला गूढ ज्ञानवाला नेपच्युन का प्लुटो उच्च्चीचा.
(त्यामुळचं माझं व्यवहार ज्ञान मात्र "अगाध" आहे असं तीर्थरुप म्हणत असतात. :-) :-) )

आपलाच,
मनोबा

मनोबाची रास तेरावी आहे!!!! शरद उपाध्येंवर ८९-९० च्या आसपास माहिम पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. दृढ श्रद्धा रोपण समिती नावाच्या कुठल्या तरी समितीने हे प्रकरण काढल होतं. महिला व आर्थिक शोषण संदर्भात.त्यावेळी त्यांचे ज्योतिष वर्ग चालू होते. नंतरच्या काळात त्यांचे राशीचक्र हे कार्यक्रम चालु झाले. ज्योतिष वर्गाला नंतर रामराम ठोकला. पन लै भारी मानुस बरका? बराब्बर मान्सांची नाडी पकाडतयं! पब्लिक मेमेरी इज आल्वेज शॉर्ट हे तत्व
११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातली सगळी गणित बदलली का?
वाचा.
प्रकाश घाटपांडे

तात्या तुमची रास कोणती हे सर्व मि पा करा॑ना जाणुन घ्यायची लै इच्छा आहे. मिथुन असावी असा अ॑दाज मि पा करा॑नी लावला आहे.
तुम्हीच सा॑गा तुमची रास कोणती ते.

अंदाज नाही खात्री आहे.. :)
चुकलं तर सगळ्याना मिसळ माझ्याकडून.. :)
(कोणी जवळ राहात नाही माझ्या, ते बरयं!! )

(कोणी जवळ राहात नाही माझ्या, ते बरयं!! )>>>>>>>>>>.
पुण्ञात कधीतरी येशीलच की. :)
तसहि उत्तर चुकणार नाहिये म्हणा.................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मग चालेल, मग देव करो आणि तुझा अ॑दाज चुको.

तात्यांची रास वृश्चिक असेल....ते बराच वेळ शांत रहातात आणि राग आला तर मात्र सरळ नांगी...

बाय द वे शितल मी पण कन्या आणि सॉलिड चंचल...बर्‍याच वेळा खूप कन्फ्युज्ड असते....
पण प्रचंड चिकित्सक आणि शरद उपाध्येंच्या म्हणण्याप्रमाणे साएंटीस्ट पण झाले गं....

मिथुन आणि कन्या राशीचे लोक प्रच॑ड बुध्दीमान असतात. (राशी स्वामी बुध आहे ना दोन्ही राशी॑चा )
आणि कन्या राशीचे लोक कायम च॑चल ही असतात हे करू का ते करू आणि दोन्ही दगडावर पाय ठेवुन चालणारे.

कसल्या बुद्धीवान आहोत आपण दोघीही.....
चंचल पणा तर ह्या जन्मी नाहीच जाणार माझा...कसली गोंधळलेली असते मी सदानकदा....

अग वरदा तुझे ठिक आहे तु सायटि॑स्ट आहेस तुझी हुशारी जग जाहिर पण मी कन्या राशीची असुन मी त्या राशीला अपवाद आहे.

हुशारी म्हणजे अभ्यासातली असं कोन म्हणतं? व्यवहारचातुर्य असू शकतं कलेत हुशारी असू शकते...अगदी मुलांना सांभाळण्यात सुद्धा हुशारी लागतेच्.....तेव्हा तू माझी हुशार मैत्रीण.....

माझी चंद्ररास तूळ तर लग्नरास वृश्चिक. चंद्र मनाचा कारक तर लग्न तनूचे (रंगरूप,मेंदू(बुद्धी?)). त्यामुळे होराभूषण धोंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे -

  1. मेषेसारखे मागचा पुढचा विचार न करता हे लोक धडक देणार नाहीत, कर्केसारखे अती भावनाप्रधान होऊन जगाने मला कसा त्रास दिला हे रडून रडून सांगणार नाहीत आणि आयुष्यात जी परवड वाट्याला आली त्यावर कविता करत बसणार नाहीत, वृश्चिकेसारखे आपल्या जहरी बोलण्यातून उगाच कोणाला दुखवणार नाहीत, सिंहेसारखे आपण कोणीतरी ’ग्रेट’ आहोत आणि जगाने आपल्या पाया पडावं अशा अविर्भावात वावरणार नाहीत, मिथुनेसारखे कधी कधी बालीश आणि अल्लडपणाने वागणार नाहीत, मीनेसारखे इतरांकडून सहजासहजी फसले जाणार नाहीत.
  2. हे लोक जिथे जातील तिथे सामंजस्य, समतोल राखण्याचा प्रयत्न करतील (जे मी येनकेनप्रकारेण आणि शक्य तेव्हढे करतच असतो ;) ).
  3. ही शुक्राची रास आहे. या राशीत जन्मणारे लोक हे सौंदर्यवान आणि कलासक्त असतात.
  4. राशीतत्वामध्ये या राशीकडे वायुतत्व आलेले आहे. वायुतत्वाची माणसे ही बुध्दीवान असतात. संशोधक वृत्ती असते. ३/७/११ म्हणजे मिथुन, तुला आणि कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत. जगातले अनेक संशोधक या तीन राशींवर जन्मलेले आहेत.या व्यक्ती आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाने, नि:पक्षपाती आचरणाने, विद्वत्तापूर्ण अक्कलहुषारीने, आदर्शवादी स्वभावाने, निर्मळ अंत:स्फूर्तीने जगत असतात. संघर्ष, द्वेष, कपट, अनीती, अप्रामाणिकपणा या गोष्टींना त्यांच्याकडे थारा नसतो. मध्यस्त बनून तडजोड घडवून आणणे हे या लोकांना फार आवडते.

(समतोल)बेसनलाडू

आता माझी लग्नरास वृश्चिक. त्यामुळे -
स्वभावधर्म मंगळाच्या स्वभावासारखा म्हणजे तापट;पण अंत:करण दयाळू (तूळ प्रभाव?) कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील :) मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! :)
(जहरी)बेसनलाडू

कोणत्या राशीच्या लोकांशी पटते किंवा नाही, हे बघितले नाही; पण माझा आजवरचा अनुभव असा की माझे जिवश्चकंठश्च मित्र/आप्तेष्ट - म्हणजे मी ज्यांच्यासाठी काही वाट्टेल ते (!) आणि जे माझ्यासाठी (माझ्या समजुतीप्रमाणे) वाट्टेल ते करू शकतात - तूळ,कुंभ नि मीन राशीचे आहेत. मिथुनेच्या लोकांशी गप्पाटप्पा करायलाही मला (आणि कदाचित माझ्याशी गप्पा मारायला त्यांना) मजा येते. माझी सन् साइन् जेमिनी (मिथुन) असल्याचा किंवा मिथुनेच्या शुक्राचा (शुक्र = तुळेचा स्वामी, तो मिथुनेत) हा परिणाम समजावा काय? :) बाकी राशींचा फारसा अनुभव नाही आला अजून. पाहूया.
(सविस्तर)बेसनलाडू

मस्त सविस्तर राशी लिखाण बेसनलाडु तुमच्चे.

कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलवून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे!

हे तर मी कन्या राशीची आणि कर्क लग्नाची असुन सुध्दा करते.

मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे!
अधोरेखित स्वभावविशेष व्यवहार्य नाही,हे तुम्हीही जाणत असालच शीतलताई :) मलाही ते कळते, पण जेव्हा वागायची पाळी येता तेव्हा कळत असूनही वळत नाही, असे वाटते :D हाच तूळ-वृश्चिक मिक्सचा परिणाम असावा,असा अंदाज आहे ;)
((अ)व्यवहारी)बेसनलाडू

>>मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे!

तात्या, आजकाल मिपावर उपद्रव इतका का वाढला आहे ह्याचे उत्तर मिळाले का? त्या काकाला तू हाकलुन लावलेस पण पुतण्याचे काय?

(सावध) खरा डॉन
बाकीचे क्लॉन...

मेष- साठ वर्षं अपमान लक्षात ठेवणार.
वृषभ-रसास्वाद हेच जीवन
मिथुन-वेगवान विचार. पण खोली कमी.
कर्क-फार जपून बोलाव लागतं. टचकन पाणी डोळ्यात.
सिंह-मोठेपणा द्या. काय वाट्टेल ते मागून घ्या.
कन्या-वि. सू.-ही मुलं झोपली आहेत असं वाटलं तरी झोपलेली नसतात.
तूळ -बायको असेल ह्या राशीची तर संसाराची नैया पार.
वॄश्चीक-कुढणार. विसरणार नाही.
धनू-ह्या घडीला माणूस आहे कि जनावर ते तपासा.
मकर-व्यवहार निपूण.
कुंभ-ज्ञानी ?होय. उपयोग-तुम्हाला माहीत असेल तर करून घ्या.
मीन-अनामीक ताणाची रास.
सर्व शास्त्रींची माफी मागून वर्णने लिहीतो आहे. खरी आहेत ताडून बघा.

मस्त!!!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

उत्तर देईन देईन म्हणेस्तोवर विसरूनच गेलो आणि ५० च्या वर प्रतिसाद गेलेदेखील?! :)

आत्ता भाग्यश्रीने आठवण करून दिली तेव्हा प्रथमच बघितला हा थ्रेड!

असो, भाग्यश्रीची खात्री खरी आहे, माझी रास मिथुनच आहे! :)

आमचे रामदासबुवा म्हणतात त्याप्रमाणे वेगवान विचार परंतु खोली कमी! :(

चालायचंच! सगळ्यांनी जळ्ळं खोल खोल होऊन कसं चालेल? आमच्यासारखे काही उथळ नकोत का? आणि अहो आमच्यासारखे काही उथळ आहेत म्हणूनच तर तुम्हा खोलीवाल्यांचं जळ्ळं कौतुक!

काय रामदासबुवा, खरं की नाय? :)

आपला,
(बोलण्यात वस्ताद!) मिथुनेचा तात्या!

मिथुन .... इथुन तिथुन मिथुन !

माझी पण कन्या रास च आहे. ओफिसच्या मिंटींग मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न माझेच. खुप त्रास होतो, प्रश्न विचारले नाहीत तर, सतत उलटी झालया सारखे वाट्ते.
आणि कोणताही निर्णय घेण्याआधी इतकी म्हाहीती जमवतो, बाकीचे लोक वैतागुन जातात.

मिथुन ,तूळ,कुंभ या तिन्ही राशी एकाच जातकुळीच्या .विचाराचा वेग याच क्रमात घटत जातो.
मिथुनेचे काही गुण.अंकगणित पक्के.आडाखे ,अंदाज ,अचूक असतात.
डे ट्रेडींग , सट्टा यात यशस्वी होतात.
प्रत्येक क्षण जगतात.
अवांतर-मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस?

>मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस?
एक पायरी वर असाल तर तुळ आणि दोन पायर्‍या वर असाल तर कुंभ.. याहून जास्त पायर्‍या वर असाल तर कल्पना नाही बॉ !

सतत सर्वे घेणारे राजे यान्ची रास कोणती असावी?
मला वाटते, कन्या असावी.

मिसळपार्टी 'मला' द्यावी लागणार नाही म्हणून बरं वाटलं.. पण एकत्र जमायची संधी हुकली हे वाईट! असो..

http://bhagyashreee.blogspot.com/

माझी रास ओळखा!!!!!!!!!!!!

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ॠचा तुझी रास तुळ का ग

मला आपला सहजच पडलेला प्रश्न.

जरूर भेटा. (दु.१ ते ४ सोडून)
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी

माझी चन्द्र रास कर्क आहे आणि लग्न रास (ascendant) कन्या आहे. साधारणपणे चन्द्र राशिवरुन मनाचा ठाव घेता येतो, पण स्वभाव विशेष, अथवा behaviora characteristics लग्न राशिवरुनच कळ्तात.

कन्या राशीचे पुरूष खुप चिकित्सक, आणि पारखुन घेतल्या शिवाय विश्वास नाय ठेवणारे असतात.
पण मनात कायम श॑का घेतलेला निर्णय बरोबर की चुक.

बापरे माझ्या हीचे वडील कन्या राशीचे आहेत्.(त्यांच्या मनात अजुन शन्का असावी असे वाटते मला)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

हाताशी पैसे राखून असतात.

राशीचक्र डाउन लोड
http://www.bwtorrents.com/showthread.php?t=131090

मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे.
पण मी म्हणते विषय हा होता की तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी पटते
पण जो तो आपली रासच फक्त सा॑गु लागला बाकी चे गुडा॑ळुन टाकले का ?

>>> मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे.

मलाही :S
:

जाहीर आव्हान!!
माझी रास ओळखून दाखवा!!
-डांबिसकाका

Pages