तू फक्त उभा राहा

किचेन's picture
किचेन in जनातलं, मनातलं
8 Nov 2011 - 4:08 pm

मित्राच्या लग्नात तिला पहिल्यांदा पाहिलं.पूर्णवेळ स्टेजवर दीपकच्या पाठीमागे. कधी रुमालाने कुंकू नीट कर,कधी मुंडावळ्या बांधायला मदत, कधी हातातल्या गोष्टी मागे पास कर....अशी बरीच काम पुढाकार घेऊन करत होती.कॅमेरामनच लक्ष आपल्याकडे आहे अस दिसलं कि २-४ छान पोझेही द्यायची.मी कॅमेरामन नाही याच राहून राहून वाईट वाटत होत.थोड्यावेळाने मला आता ह्याची बायको थोड्यावेळाने तिला हात धरून मांडवाबाहेर काढते कि काय अशी भीती वाटत होती.कारण वधु पेक्षा तीच जास्त भाव खून जात होती..निळ्या रंगाची वर्कची साडी तिचा जम शोभून दिसत होती!हळदीच्या कार्यक्रमात मांडवातल्या अनेक बायकांनी तिला ' उष्टी हळद लावली कि लग्न लवकर जमत!'म्हणून रंगवाली होती.दुपारची जेवण झाली.लग्न संध्याकाळी होत.

नवर्या मुलाच्या रुममध्ये मध्यावेलेत बाईसाहेब "दादा ,चेहर्याचा हा पिवळा रंग कसा काढू.?इथे डव्ह कुठे मिळेल? " म्हणत नवर्या मुलाच डोक खात होत्या.बिचारीचा चेहरा आता लाल होत आता होता.तिच्या डोळ्यातून पाणी यायच्या आधी मी चान्स घेतला.खरतर हि दिप्याची बहिण आहे हे कळल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी यायायचं बाकी राहील होत.
' इथे जवळच एक दुकान आहे.तिथे मिळेल'
' हो पण मी अशी कशी जाऊ तिथे?'(म्हण्जे तुम्हीच आणून द्याना...तुमचाच पैशांनी)
चायला उगीचच बोललो.कारण त्या दुकानात डव्ह न्हवता.लग्न एव्द्य्हा आडबाजूला होत कि जिथून घेतला त्याने मुळातच महाग असलेल्या डव्ह चे १० रु. जास्त घेतले.
'थन्क यु.' तिने एक गोड स्मैल देत डव्ह हातात घेतला.
मित्राच्या कॅमेराशी खेळता खेळता मी तिचे १०-१२ फोटो काढून घेतले.
दिप्याही हुशार होता.बोलला माझी चुलत बहिण आहे.मी काय बोलू न काय नको अशी अवस्था असताना
'घाबरू नकोस मित्रा.आई मला कालपासून तुझ्याबद्दल विचारात होती.पिनू साठी.सकाळपासून माझी आई,काकू आणि तमाम महिला मंडळ माझ्यापेक्षा तुझ्याकडेच जास्त बघताय.तेव्हा काही वेड वाकड वागू नकोस.आणि हिच्यापासून दोन हात लांब राहा.'
'काय?'- मी
'हो,पत्रिका द्यायला घरी गेलो तेव्हा काकू म्हणत होत्या.तू 12 ला अमेरिकेहून येनाराहेस.लग्नाविषयी टाळाटाळ करतोयस,पण यंदा आला कि उरकून टाकायचं वगैरे.तेव्हाच आईला बोललो आपला पक्या कसा वाटतोय पिनुसाठी?'
आयला..ह्याने तर पार माझी विकेट उडवली होती.
तेवढ्यात ती आली.'आता कशी दिसतीये मी?गेला का हळदीचा रंग?माझा मेक उप बिघडून जाईल नाहीतर.'
'पिनू तसाही तुला कोणी बघणार आहे?आणि तयारी करून घे लवकरच तुझ्याही अंगाला हळद लागणार आहे'-दिप्या
'गप्पच बस!मी नाही लग्नाच्या भानगडीत पडणार.डोक्याला ताप नुसता' अस बोलत ती परत तोंड धुवायला बाथरूम मध्ये निघून गेली!
'पक्या संध्याकाळी काकू पण येणार आहेत.तुमची पत्रिकाही जुलातिये.तुझा हो असेल तर मी घरच्यांना तयार करतो'-दिप्या
'पंकज म्हण, पक्या नको'
'म्हण्जे तू तयार आहेस तर'-दिप्या
'मी अस कधी बोललो?मुळात मला न सांगता तुम्ही पत्रिका कशी काय बघितली?आई देखील मला काहीच बोलली नाही!'
'तुझी काळजी आहे न म्हणून.मीच काकौना सांगितलं होत पक्याला काही सांगू नका म्हणून.नाहीतर तू माझ्या लग्नालाच आला नसताच.'-दिप्या
'तिला माहित आहे का?'
'नाही.जर माहित असत तर ती तुझ्याशी बोललीच नसती!'-दिप्या
'पण ती तयार होईल का लग्नाला'
'होईल, मी तयार करेन तिला.तसा माझ्या आईला आणि काकूला तू पसंत आहेस.संध्याकाळी काका तुझी मुलाखत घेतील.त्यात पास हो म्हण्जे झाल.
२ दिवसांनी जागरण गोंधळ आहे.त्याच्या दुसर्या दिवशी तुझ्या बैठकिच बघू'-dipya
'एवढ्या लवकर?दिप्या तू तर फक्त लग्नाचा मुहूर्त बाकी काढ्याचा ठेवलाय'
'अरे तूझी सुट्टी दोन महिन्यांचीच आहे.त्यातला एक आठवडा गेला.पुढचा एक आठवडा बोलणी करायला जातील.म्हण्जे १५ दिवस गेले.उरलेल्यांपैकी २७,२९ आणि पुढ्या महिन्याच्या ३,७,९,१५ ह्या तारखा मुहूर्ताच्या आहेत.'-दिप्या
मला चक्कर यायचीच बाकी होती.
'तू एवढ सगळ कधी ठरवलं?'
'मी एकता नाही..मी आणि काकू मिळून.तू अडकलास पक्या!तुझ्याही डोक्याला मुंडावळ्या लाताकातायात आता.'
जवळ जवळ दीड तास आमच बोलन चालाल होत.इतक्यात

कथा

प्रतिक्रिया

साबु's picture

8 Nov 2011 - 4:15 pm | साबु

क्रमशः रहिल का काय?

मोहनराव's picture

8 Nov 2011 - 4:21 pm | मोहनराव

हम्म असंच दिसतय!!
'इतक्यात' संगणक तर बंद नाही ना पडला?

हा हा हा हा... एकदम मस्त.. पक्याचा चेहरा डोळ्यासमोर आला.. :D

वपाडाव's picture

8 Nov 2011 - 4:34 pm | वपाडाव

तुम्ही जरा टायपिंगचं मनावर घ्या बघु....
इथे रुळुन जा... मग कथा टाकायला सुरुवात करा....
म्हणजे आम्हाला सोप्या भाषेत वाचायला मिळतील...
बाकी, पकड तर घेतलीच आहे कथेनं...
पुढचा भाग लवकर टाका... (पुभालटा)

स्मिता.'s picture

8 Nov 2011 - 5:09 pm | स्मिता.

हा हा हा... मस्त प्रसंगवर्णन केलंय.
तुझं लेखन आवडतंय. जरा सराव केला की जमेल व्यवस्थित.

मस्त...

ज्योतिषवाले, नाडीवाले आणि आता वधू - वर सुचक मंडळवाले...

ह्याह्याह्या.. ह्या वधूवर सूचक मंडळवाल्याचं कौतुक वाटतयं.

- (उपवर) पिंगू

अन्या दातार's picture

8 Nov 2011 - 6:02 pm | अन्या दातार

नुसतंच कौतुक करत बसु नका आता आणि कंसातला ’उप’ काढून टाकायचे बघा जरा :)

धमाल मुलगा's picture

8 Nov 2011 - 6:07 pm | धमाल मुलगा

काय नशिब आहे बॉ त्या पक्याचं!
मित्राच्या लग्नात ज्या मुलीवर लाईन मारतोय तीची अन ह्याची पत्रिका बित्रिका जुळवून तारखा काढण्यापर्यंत प्रकरण ऑलरेडीच गेलंय.
ही नक्कीच काल्पनिक गोष्ट आहे. ;) नाहीतर काय? एरवी आवडत्या पोरीसाठी किती घोळ घालावे लागतात...काय काय करावं लागतं................... :D

मोहनराव's picture

8 Nov 2011 - 6:17 pm | मोहनराव

पक्याची खरीच मज्जा आहे बुवा!!
लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट आणी लगेच लग्नाची बोलणी चालु?

एरवी आवडत्या पोरीसाठी किती घोळ घालावे लागतात...काय काय करावं लागतं...................

आणि हे सगळं कॉलेज किंवा कामाच्या ठीकाणी पोरगी पटवताना वगैरे ठीक आहे. पण रीतसर पाहून आलेल्या मुलीसाठी आकाश पाताळ एक करावं लागतं हल्ली ;)

स्मिता.'s picture

8 Nov 2011 - 8:41 pm | स्मिता.

हे ऐका अनुभवाचे बोल ;)

काय म्हणता ध.वा.?
अनुभव तरी सांगा.;)

धन्या's picture

8 Nov 2011 - 9:55 pm | धन्या

पण आधी आमचं घोडं गंगेत न्हाऊ दया. त्या आधी नको.
नाहीतर मुलीकडचे मी त्या मुलगी पाहण्याच्या अनुभवावर कुठे लिहिणार नाही असं आधी बाँडपेपरवर लिहून घेतील आणि मगच घराची पायरी चढू देतील. ;)

अन्या दातार's picture

8 Nov 2011 - 10:24 pm | अन्या दातार

संत तात्याबांचा ब्लॉग वाचला नाहीस का रे धन्या?

पुष्करिणी's picture

8 Nov 2011 - 6:11 pm | पुष्करिणी

चांगली कथा आहे, पुढचा भाग लौकर येउदे,

बिचार्‍या पक्याला नाममात्र घटस्फोटित वगैरे करू नका म्हण्जे झालं :)

नम्र विनंती, तुम्ही नविन आहात हे कबुल केलंत आणि सिद्ध झालेलं आहे, शुद्धलेख्ननाच्या चुका मान्य पण शब्दलेखनाच्या चुका करु नका. दुस-या एका धाग्यावर दिलाय तोच प्रतिसाद इथं देतो, अर्थाचा अनर्थ होतो आहे, ते टाळा.

- कारण वधु पेक्षा तीच जास्त भाव खून जात होती.. - खाउन हा शब्द कितीही नॉर्मल चुका करुन खून असा लिहिता येणं अवघड आहे.

बाकी लिखाण मजेशीर, कल्पनाविस्तार आवडला.

रेवती's picture

8 Nov 2011 - 8:17 pm | रेवती

पेशंटशी सहमत.;)

धन्यवाद, कारण इथं सगळेच काही पेशंट नाहीत म्हणुन जरा स्पष्ट लिहिलं एवढंच.

शित्रेउमेश's picture

8 Nov 2011 - 11:58 pm | शित्रेउमेश

मस्त झालिये सुरुवात... पुढचा भाग लवकर येऊ देत....

सुहास झेले's picture

9 Nov 2011 - 10:20 am | सुहास झेले

मायला एकदम जाऊ बाई जोरात.... ;)

पुढचा भाग लवकर येऊ देत... पुलेशु :) :)