कॅरमलाईज्ड चिकन

गणपा's picture
गणपा in पाककृती
19 Oct 2011 - 6:52 pm

कालच विजुभौंनी एक खरड केली होती की नॉन व्हेज मध्ये गोड पदार्थ नसतात का? तर त्यांच्या या शंकेच निरसन करण्यासाठी म्हटल आपणच आधी एखादा पदार्थ बनवुन पहावा. झाला बरा तर मग कळवाव.
तस चिकन मटण म्हटलं की ते जर झणझणीत, मसालेदार नसेल तर मी फारसा त्याच्या वाटे जात नाही.

मी मधात घोळवुन रोस्ट केलेली कोंबडी नुसती बघितली आहे. पण ती चाखायची तेव्हा हिंमत झाली नव्हती. चिकन आणि ते ही गोड??? नोऽऽऽऽऽ वे.
पुढेमागे जालावर फिरताना, काही टिव्ही वरचे कुकिंगचे कार्यक्रम पहाताना त्यात फळांच्या रसात मुरवुन वा शिजवताना फळांचे रस वापरुन केलेले काही नॉनव्हेज पदार्थही पाहिलेही. पण वाट वाकडी करुन तिथे जाण्याच धैर्य कधी झालं नाही.

पण आज विजुभौंच्या निमित्ताने मुद्दाम वाट वाकडी केली आहे. नेहमीच्या झणझणीत चिकन पेक्षा जरा वेगळी चव. तुमच्या चिल्लर्पार्टीला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

दोन पदार्थ आहेत. एकात बेकन (डुक्कराच मांस) वापरलय तर एकात केवळ चिकन.

साहित्य :

१/२ किलो बोनलेस चिकन. १ इंचाचे तुकडे केलेल.

१/४ ते २/३ वाटी ब्राउन शुगर. (चॉललेटी रंगाची साखर.)
१ चमचा आल पेस्ट.
१ चमचा लसुण पेस्ट.
२ चमचे भरड वाटलेली लाल मिर्ची किंवा चीली फ्लेक्स.
१ चमचा ऑलिव्हच तेल.
१/२ कप पाणी.

कृती :

चिकनला ओलिव्हच तेल, आल-लसुण पेस्ट आणि लालतिखट लावुन १५-२० मिनिटं मुरत ठेवाव.

नॉनस्टिकच्या कढईत साखर आणि १/४ कप पाणी टाकुन एक उकळी आणावी.

पाकाला उकळी आली की त्यात उरलेल १/४ कप पाणी आणि मुरवलेल चिकन टाकुन एकत्र करुन घ्याव.
वरुन एखाद झाकण ठेवुन एक वाफ काढावी.
वाफ काढुन झाल्यावर झाकण काढुन, आच मंद करुन, उरलेल पाणी आटु द्याव.

गरमा गरमच असतानाच वाढाव.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
दुसरा प्रकार : (बेकन वापरुन.)

साहित्यः

३०० ग्रॅम बोनलेस चिकन. १ इंची तुकडे केलेल.

१/२ वाटी ब्राउन शुगर.
२ मोठे चमचे पेपरीका / नसल्यास लाल तिखटही चालेल.
२ चमचे ऑलिव्ह तेल.

बेकन.

कृती :

चिकनच्या तुकडयांना ऑलिव्हच तेल, साखर आणि पेपरिका मध्ये घोळवुन घ्याव.
१५- २० मिनिटे मुरत ठेवाव.

बेकनच्या पट्ट्यांनाही याच मिश्रणाचा लेप द्यावा.

एका पट्टीचे मधोमध कापुन २ तुकडे करावे. चिकनचा एक तुकडा मध्ये ठेवुन रोल करावा आणि आधारासाठी टुथपीकने टोचुन ठेवाव.

बेकिंग ट्रेला अ‍ॅल्युमिनियची शीट लावुन वरुन तेलाच बोट फिरवाव. त्यात हे रोल्स रचुन ओव्हनमध्ये २००° C वर ३० ते ४० मिनिटे शिजवावे. मध्ये एकदा वर खाली करावे.

या तर मग हाणायला बेकन चिकन.

प्रतिक्रिया

वा मस्तच... दुसरी पाकृ कास्त आवडली. अशीच पाकृ इथल्या एका friend कडे खाली होती. तिने खजुरमधे चीज भरले होते आणि ते खजुर बेकन मधे रोल करुन बेक केले. अप्रतिम लागत होते.

प्रभो's picture

19 Oct 2011 - 7:39 pm | प्रभो

मस्त रे...
आंबट-गोडसर चिकन मधे ऑरेंज चिकन पण मस्त लागतं. :)

सानिकास्वप्निल's picture

19 Oct 2011 - 8:51 pm | सानिकास्वप्निल

कॅरमलाईज्ड चिकन मस्तचं दिसत आहे.. नक्की करून बघेन :)
स्टार्टर साठी उत्तम पर्याय आहे :)
बेकन खात नसल्यामुळे ते नाही करता येणार ....

आत्मशून्य's picture

19 Oct 2011 - 8:59 pm | आत्मशून्य

कॅरामल चिकन ? _/\_

धनंजय's picture

19 Oct 2011 - 9:14 pm | धनंजय

छान.

(येथे "कॅरमलाइझ्ड" ऐवजी "ग्लेझ्ड" शब्द वापरला तर कसा वाटेल?)

मागे एकदा पोर्कचॉपना संत्रे+सालींचा मुरंब्या(मार्मालेड(+थोडे मीठ-मिरे)मध्ये मुरवले होते आणि संत्र्यांचे पातळ काप वर रचून ओव्हनमध्ये भाजले होते. छान लागले होते. चिनी स्वीट-अँड-सावर चिकनही पुष्कळदा आवडते.

पक्या's picture

19 Oct 2011 - 9:19 pm | पक्या

वा मस्त. फोटो पण उत्तम . ब्राऊन शुगर ला पर्याय गुळाचा असू शकेल काय?

अवांतरः मागे मी एका अमेरिकन मासिकात संक्रातीच्या तिळगूळाची रेसिपी पाहिली होती. नाव अर्थात वेगळे होते..सेसमी सिड्स ब्रिटल की कुकी असे कायसे असावे. तिळ्गूळ वड्यांचीच रेसिपी होती. फक्त गूळाऐवजी ब्राऊन शुगर त्यात वापरलेली होती. ब्राऊन शुगर म्हणजेच गूळाची पावडर असते काय?

ब्राऊन शुगर ला पर्याय गुळाचा असू शकेल काय?

खर सांगायच तर मला या बद्दल कल्पना नाही.

नैसर्गीक ब्राउन शुगर ही उसापासुन बनवातात.
पण व्यावसायीक उत्पादनकर्ते साध्या साखरेत मोलसीस (molasses) मिसळुन ब्राउन शुगर बनवतात.

गणपा, मला वाटते ब्राऊन शुगर ही पांढर्‍या साखरेप्रमाणे पूर्णपणे स्वच्छ्/शुद्ध केलेली नसते, त्यामुळे त्यात मळीचा काही अंश राहतो आणि त्यामुळेच रंग ब्राऊन असतो. वरुन मोलॅसेस मिसळत असतील असे वाटत नाही.

(काकवीप्रेमी) रंगा

सध्या व्यावसायिक काकवी मिसळतात. गणपा यांच्या माहितीसारखीच माझी माहिती आहे.
(पारंपरिक पद्धत तुम्ही म्हणता तशी आहे. विकिपेडिया सांगतो :
http://en.wikipedia.org/wiki/Brown_sugar
It is either an unrefined or partially refined soft sugar consisting of sugar crystals with some residual molasses content, or it is produced by the addition of molasses to refined white sugar.)

चतुरंग's picture

19 Oct 2011 - 11:29 pm | चतुरंग

काकवी देखील मिसळतात हे माहीत नव्हते. धन्यवाद!

-रंगा

जाई.'s picture

19 Oct 2011 - 10:27 pm | जाई.

वेगळाच प्रकार आहे

पैसा's picture

19 Oct 2011 - 11:39 pm | पैसा

काय रे, हा पदार्थ......न घा क क (पुढचं लिहायलाच हवं का?)

सुहास झेले's picture

20 Oct 2011 - 3:00 am | सुहास झेले

अजुन काय बोलू... गणपा तुस्सी ग्रेट हो !!

फोटू बघायला आले आहे. बेकन हा प्रकार जेंव्हा माहीत नव्हता तेंव्हा चुकून काहीतरी बेक्ड पदार्थ असावा म्हणून आणला होता ते आठवले.

ऋषिकेश's picture

20 Oct 2011 - 8:58 am | ऋषिकेश

गणपा यांच्या पाककलेबरोबर नवनवे पदार्थ करण्याच्या उत्साहापुढे शिरसाष्टांग!!!
ते इथे टंकण्याचा उत्साह असाच राहुदे ही इच्छा! :)

विसोबा खेचर's picture

20 Oct 2011 - 9:28 am | विसोबा खेचर

.............!!!!!!!!!!!!

क्राईममास्तर गोगो's picture

20 Oct 2011 - 2:18 pm | क्राईममास्तर गोगो

थाई जेवणात संत्राच्या पाकात केलेल चिकन असते. तेही सुंदर लागते. त्यामुळे क‍ॅरेमलाईज्ड चिकन ला +१.

कच्ची कैरी's picture

20 Oct 2011 - 7:28 pm | कच्ची कैरी

पहिली पाकृ.जास्त,आवडली ,ट्राय करायला आवडेल.

धमाल मुलगा's picture

20 Oct 2011 - 7:36 pm | धमाल मुलगा

आज्याबात आवडलेलं नाही!

गणपा कपूर ह्यांचं सातत्य आणि जिद्द ह्याला सलाम! पण हे पदार्थ काय झेपेनात ब्वॉ.
आम्ही पडलो तिच्यायला साधी गावाकडची गावंढळ मान्सं! आम्हाला आपलं तांबडा अन पांढरा रस्सा माहिती..शेकोटीवर भाजलेलं मटन म्हायती...आमची चव तशीच घडली. गोडाचं वशाट खायच्या कल्पनेनंच पोटात भ्याव दाटून आलं गाऽऽ.....

पण ते फोटू, आणि ती स्टाईल...त्येच्याबद्दल बोलायला आमच्याकडं कवाबी सबुद नस्तोयाच! :)

गोडाचं वशाट खायच्या कल्पनेनंच पोटात भ्याव दाटून आलं गाऽऽ.....

बनीवताना माझ्या प्वटातबी गोळा आल्ताच की. ;)
पन माघारी जवा पयला तुकडा त्वंडात सारला तेवा येकाच टायमाला ग्वाड आन् टिखट याचा असा काय संगम झाला की ज्याच नाव ते. :)

धमाल मुलगा's picture

20 Oct 2011 - 8:33 pm | धमाल मुलगा

आसंय का?
आता तुमच्यावं आंधळा इश्वास हैच्च आमचा, तं ह्ये मान्य करायलाच हवं! मंग तुमचा आन्भव जमेला धरतो आन, घ्येतोच येकडाव द्येवाचं नाव! :)

इंटरनेटस्नेही's picture

27 Oct 2011 - 10:54 pm | इंटरनेटस्नेही

खल्लास पाकृ!

इंटरनेटस्नेही's picture

27 Oct 2011 - 10:54 pm | इंटरनेटस्नेही

खल्लास पाकृ!