कॅरमलाईज्ड चिकन
कालच विजुभौंनी एक खरड केली होती की नॉन व्हेज मध्ये गोड पदार्थ नसतात का? तर त्यांच्या या शंकेच निरसन करण्यासाठी म्हटल आपणच आधी एखादा पदार्थ बनवुन पहावा. झाला बरा तर मग कळवाव.
तस चिकन मटण म्हटलं की ते जर झणझणीत, मसालेदार नसेल तर मी फारसा त्याच्या वाटे जात नाही.
मी मधात घोळवुन रोस्ट केलेली कोंबडी नुसती बघितली आहे. पण ती चाखायची तेव्हा हिंमत झाली नव्हती. चिकन आणि ते ही गोड??? नोऽऽऽऽऽ वे.
पुढेमागे जालावर फिरताना, काही टिव्ही वरचे कुकिंगचे कार्यक्रम पहाताना त्यात फळांच्या रसात मुरवुन वा शिजवताना फळांचे रस वापरुन केलेले काही नॉनव्हेज पदार्थही पाहिलेही. पण वाट वाकडी करुन तिथे जाण्याच धैर्य कधी झालं नाही.
पण आज विजुभौंच्या निमित्ताने मुद्दाम वाट वाकडी केली आहे. नेहमीच्या झणझणीत चिकन पेक्षा जरा वेगळी चव. तुमच्या चिल्लर्पार्टीला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.
दोन पदार्थ आहेत. एकात बेकन (डुक्कराच मांस) वापरलय तर एकात केवळ चिकन.
साहित्य :
१/२ किलो बोनलेस चिकन. १ इंचाचे तुकडे केलेल.
१/४ ते २/३ वाटी ब्राउन शुगर. (चॉललेटी रंगाची साखर.)
१ चमचा आल पेस्ट.
१ चमचा लसुण पेस्ट.
२ चमचे भरड वाटलेली लाल मिर्ची किंवा चीली फ्लेक्स.
१ चमचा ऑलिव्हच तेल.
१/२ कप पाणी.
कृती :
चिकनला ओलिव्हच तेल, आल-लसुण पेस्ट आणि लालतिखट लावुन १५-२० मिनिटं मुरत ठेवाव.
नॉनस्टिकच्या कढईत साखर आणि १/४ कप पाणी टाकुन एक उकळी आणावी.
पाकाला उकळी आली की त्यात उरलेल १/४ कप पाणी आणि मुरवलेल चिकन टाकुन एकत्र करुन घ्याव.
वरुन एखाद झाकण ठेवुन एक वाफ काढावी.
वाफ काढुन झाल्यावर झाकण काढुन, आच मंद करुन, उरलेल पाणी आटु द्याव.
गरमा गरमच असतानाच वाढाव.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
दुसरा प्रकार : (बेकन वापरुन.)
साहित्यः
३०० ग्रॅम बोनलेस चिकन. १ इंची तुकडे केलेल.
१/२ वाटी ब्राउन शुगर.
२ मोठे चमचे पेपरीका / नसल्यास लाल तिखटही चालेल.
२ चमचे ऑलिव्ह तेल.
बेकन.
कृती :
चिकनच्या तुकडयांना ऑलिव्हच तेल, साखर आणि पेपरिका मध्ये घोळवुन घ्याव.
१५- २० मिनिटे मुरत ठेवाव.
बेकनच्या पट्ट्यांनाही याच मिश्रणाचा लेप द्यावा.
एका पट्टीचे मधोमध कापुन २ तुकडे करावे. चिकनचा एक तुकडा मध्ये ठेवुन रोल करावा आणि आधारासाठी टुथपीकने टोचुन ठेवाव.
बेकिंग ट्रेला अॅल्युमिनियची शीट लावुन वरुन तेलाच बोट फिरवाव. त्यात हे रोल्स रचुन ओव्हनमध्ये २००° C वर ३० ते ४० मिनिटे शिजवावे. मध्ये एकदा वर खाली करावे.
या तर मग हाणायला बेकन चिकन.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
दुसरा प्रकार : (बेकन वापरुन.)
साहित्यः
३०० ग्रॅम बोनलेस चिकन. १ इंची तुकडे केलेल.
वाचने
10675
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
वा मस्तच... दुसरी पाकृ कास्त
मस्त रे...
वाह! छानचं
कॅरामल चोकलेट्स माहीत होतं
छान
वा मस्त. फोटो पण उत्तम .
In reply to वा मस्त. फोटो पण उत्तम . by पक्या
ब्राऊन शुगर ला पर्याय गुळाचा
In reply to ब्राऊन शुगर ला पर्याय गुळाचा by गणपा
मोलॅसेस मिसळून की मूळ्ची आहे तशीच ठेवून?
In reply to मोलॅसेस मिसळून की मूळ्ची आहे तशीच ठेवून? by चतुरंग
सध्या व्यावसायिक काकवी मिसळतात
In reply to सध्या व्यावसायिक काकवी मिसळतात by धनंजय
अरेच्या,
वेगळाच प्रकार आहे
फटु छान
_/\_ _/\_ _/\_
फोटू बघायला आले आहे. बेकन हा
उत्साह
.............!!!!!!!!!!!!
थाई जेवणात संत्राच्या पाकात
आवडली !
नो..नाय...नेव्हर!
In reply to नो..नाय...नेव्हर! by धमाल मुलगा
गोडाचं वशाट खायच्या कल्पनेनंच
In reply to गोडाचं वशाट खायच्या कल्पनेनंच by गणपा
आर्रंत्येज्या!
खल्लास पाकृ!
खल्लास पाकृ!