काही रेखाचित्रे

सोत्रि's picture
सोत्रि in कलादालन
30 Sep 2011 - 8:14 pm

मी लहानपणी आगाशीला (विरारला) रहायचो, आमच्या शाळेजवळ. शाळेत दिवाळीत 'रंगायन' ह्या एका ग्रुपकडुन रांगोळी प्रदर्शन भरवले जायचे. रंगायनची सगळी मंडळी माझ्या आजुबाजुलाच रहाणारी. त्यांच्यात चालणार्‍या चावट गप्पागोष्टींमुळे आणि वात्रटपणाच्या बालसुलभ आकर्षणामुळे बर्‍याचवेळा रात्री रात्रभर त्यांच्यात बसायचो. नकळत त्यांची कला बघायची संधी मिळायची.

एके दिवशी काय वाटले काय माहित त्यांच्याप्रमाणे एका चित्रावर ग्रिड काढुन पेन्सिल स्केच बनवले. मग झपाटल्याप्रमाणे 1-2 महिने कहीबाही रेखाटत गेलो. बस त्यानंतर पुढे काही नाही

तर ही त्यावेळी अचानक आलेल्या उर्मीत काढलेली काही रेखाचित्रे:

कलारेखाटन

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

30 Sep 2011 - 8:21 pm | माझीही शॅम्पेन

ह्म्म्म !

चतुरंग's picture

30 Sep 2011 - 8:25 pm | चतुरंग

सोक्या, तुझी कॉकटेलं करण्याची सवय ह्या चित्रांपासूनच सुरु झालेली दिसते! ;)

(सुभाषबाबू बरेचसे कै. नारायण सुर्व्यांसारखे दिसताहेत! ;) )

-चित्ररंग

हो रे रंगा!

चित्रकलेचा काहीही आगापिछा नसताना अचानक काढलेली रेखाचित्रे आहेत ही!
ते सुभाषचंद्र बोसांचे रेखाचित्र काढायचा प्रयत्न होता हे कळले हेही नसे थोडके :lol: :) :lol:

- (चित्ररंग बनण्याचा क्षीण प्रयत्न केलेला) सोकाजी

मृत्युन्जय's picture

30 Sep 2011 - 8:48 pm | मृत्युन्जय

चित्रे कोणाची आहे हे कळते आहे. माहिती असलेल्या व्यक्तींशी रिलेट न करता बघितली तर चित्र नक्कीच चांगली आहेत. थोदा अजुन प्रयत्न केला असता तर उत्ताम चित्रकार म्हणुन नावाला येउ शकला असतात. पण ही चित्रे देखील चांगली आहेत

नाव न लिहिता चित्रे कोणाचि आहेत हे कळाले हे खुप झाले, माझे त्या वयातले असे सर्व प्रयत्न आज माडर्न आर्ट म्हणुनच खपले असते,

असो, रेखाचित्रं छान आहेत.

पक्या's picture

1 Oct 2011 - 3:25 am | पक्या

चांगला प्रयत्न.

सावरकर चिमणरावांसारखे दिसत आहेत. त्यामुळे ते चित्र पाहून हसू आले.

प्रचेतस's picture

1 Oct 2011 - 8:37 am | प्रचेतस

सोकाजीराव उत्तम प्रयत्न. विशेषतः पांचजन्य फुंकणाराश्रीकृष्ण आणि पहिल्या बाजीरावाची रेखाचित्रे तर सुरेखच जमली आहेत.
पण नंतर मग ती कला कोमेजून का बरे टाकलीत.

सुहास झेले's picture

1 Oct 2011 - 10:29 am | सुहास झेले

चांगला प्रयत्न सोकाजीराव... प्रयत्न सुरु ठेवा, एकदम कुशल व्हाल :) :)

प्रभाकर पेठकर's picture

1 Oct 2011 - 2:42 pm | प्रभाकर पेठकर

हे 'मिर्कल' म्हणजे काय? ते चित्र कोणाचे आहे. ओळखता नाही आले.

चित्रे नक्कीच छान आहेत

मिरॅकल हे किशोरकुमार आहेत(बरोबर ना)

पहिले नाना पाटेकर का ?

राही's picture

3 Oct 2011 - 4:47 pm | राही

की मंगेश पाडगावकर?

राही's picture

3 Oct 2011 - 4:48 pm | राही

की मंगेश पाडगावकर?(त्यांच्या तरुणपणीचे आणि धागाकर्त्याच्या लहानपणीचे).

कानडाऊ योगेशु's picture

24 Oct 2011 - 2:02 pm | कानडाऊ योगेशु

पाडगावकर फ्रेंच कट दाढी ठेवतात.चित्रात कोरीव दाढी आहे.त्यामुळे ते चित्र नाना पाटेकरचेच आहे.

आशु जोग's picture

3 Oct 2011 - 11:20 pm | आशु जोग

नानाच असणार. तीक्ष्ण डोळे

विवेक वि's picture

24 Oct 2011 - 1:07 pm | विवेक वि

mi pa var sudha chorane chalu zale ase mala vatate
karan he photo facebook var mi load kele hote

nished

वाहीदा's picture

26 Oct 2011 - 12:10 am | वाहीदा

हे विवेक काय म्हणत आहेत त्याकडे लक्ष आहे का ?

विवेक,

ही सर्व रेखाचित्रे मी स्वत: रेखाटली आहेत. माझी स्वाक्षरीही आहे प्रत्येक रेखाचित्रावर.
चोरीचा आरोप व निषेध व्यक्त करायच्या आधि व्यनितुन संपर्क साधून खुलासा केला असतात तर जास्त सयुक्तिक झाले असते आणि तुमच्या नावाला शोभलेही असते.

आपण अपलोड केलेल्या फोटोंचा उगम काय आहे?
आपण कोणाचे फोटो म्हणुन ते फेसबुक अपलोड केलेत ?

माझ्या परवानगीशिवाय हे फोटो फेसबुकवर अपलोड केले म्हणुन कॉपीराइट कायद्यानुसार आपल्यावर कारवाइ का करू नये ह्याचा खुलासा केलात तर बरे होइल.

- (ओरि'गि'नल* आणि संतप्त) सोकाजी :angry:

* ह्या शब्दासाठी पराशी संपर्क साधावा

हे भांडण खरं म्हणायचं का

राखी का स्वयंवर
बिग बॉसपूर्वी असतात अशी भाडानं

३ इडियटपूर्वीही चेतन भगत, अमीरखान असेच भांडण भांडण खेळले होते

रीझल्ट - ३ इडियट सॉल्लिड हीट

विवेक वि's picture

19 Nov 2011 - 3:01 pm | विवेक वि

मला हिरेखाट्णे मित्राने पाथवली आहेत त्या मुळे मला असे वाटले

तसदि बद्द्ल माफी असावी

विवेक वि