अशी कशी ही म्हागाई

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
24 Sep 2011 - 6:20 am

अशी कशी ही म्हागाई

अशी कशी ही म्हागाई वाढ वाढ वाढली
माझ्या खर्चाची झोळी हिनं फाडली ||धृ||

नका डाळ तुम्ही म्हणू; नका तांदूळ तुम्ही म्हणू
गहू जोंधळं झालं आहे सोनं जणू;
पाहून बाजरीचे भाव मी पिशवी खुंटीला टांगली ||१||

दह्या दुधाचे भाव कसे वाढता वाढं; शेरभर ताकालाबी धा रूपये लागं
पोरं झालीत वाळून बारीक रोड;
पामतेल डालातुपाविना देवू कशी भाजीला फोडणी? ||२||

राकेल गॅस प्रेटोल डिझल; याबीगर चाक कसं चालंल?
ऐश्टी गाडीबी पैशाविना हालंना;
पेशल रिक्षा कशी करावी? साध्या प्रवासाची सोय नाय आता राह्यली ||३||

संसाराचा कसा ओढावा गाडा; घरखर्च रोज घाली राडा
पगारात मालक घाली खोडा;
अवशीधपान्याविना तब्बेत चांगली नाही राह्यली ||४||

कुनी यावर उपाय सांगा राव; या तेजीचा कमी करा कुनी भाव
आमी गरीब आहो नाही कुनी साव;
रोज सस्ताईची किंमत कमी होत चालली ||५||

तर्‍हा येगळीच बघा शिक्शनाची; शाळा झेडपीची बरी हाय पोरांची
आस तिथं खिचडी मिळण्याची;
चांगली विंग्रजी शाळा पोरांनी नाय कधी पाह्यली ||६||

{{ सांगा कसं जगावं आमी ऐटीत; आडवं केलं म्हागाईनं एका फायटीत
यंदा पोराचं लगीन करावं म्हनतो; दोन इंजीनानं गाडी वढावी म्हनतो
सांगा एखांद्या स्थळी
आय.टी.वाली पोरगी आसल तर चांगली ||७|| }}

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०९/२०११

कविताजीवनमान

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

24 Sep 2011 - 7:55 am | प्रकाश१११

पाषाण भेदा -वा. स्वप्न पुरे करो आपले ही देवाजवळ प्रार्थना
सांगा कसं जगावं आमी आय.टी. त; आडवं केलं म्हागाईनं एका फायटीत
या हिवाळ्यात लगीन करावं म्हनतो; दोन इंजीनानं गाडी वढावी म्हनतो
सांगा एखांद्या स्थळी

अत्रुप्त आत्मा's picture

24 Sep 2011 - 10:08 am | अत्रुप्त आत्मा

@--रोज सस्ताईची किंमत कमी होत चालली--- हे काव्याचे मर्म :-)

@--आय.टी.वाली पोरगी आसल तर चांगली--- हा भ्रम ;-)

शिल्पा ब's picture

24 Sep 2011 - 11:30 am | शिल्पा ब

पाभे, तुमच्या प्रतिभेला सलाम!! वेगवेगळ्या विषयांवरची अर्थपुर्ण गाणी लिहीणे मस्त जमते तुम्हाला..

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2011 - 10:49 am | प्रभाकर पेठकर

पोरं झालीत वाळून बारीक रोड;

तर्‍हा येगळीच बघा शिक्शनाची; शाळा झेडपीची बरी हाय पोरांची
आस तिथं खिचडी मिळण्याची;
चांगली विंग्रजी शाळा पोरांनी नाय कधी पाह्यली

वरील ओळी वाचून कवीचे लग्न झाले आहे असा समज झाला पण कविता संपता संपता....

या हिवाळ्यात लगीन करावं म्हनतो; दोन इंजीनानं गाडी वढावी म्हनतो

ह्या वाक्याने धक्काच दिला.

वरच्या वाक्यात ज्यांच्या बद्दल लिहिलं आहे ती 'पोरं' कोणाची? की कवी दूसर्‍या लग्नाच्या विचारात आहे?

असो. एकूण, महागाईने पिचलेल्या माणसाची व्यथा मनाला भिडणारी आहे.

निवेदिता-ताई's picture

25 Sep 2011 - 6:28 pm | निवेदिता-ताई

:)

पाषाणभेद's picture

26 Sep 2011 - 1:34 am | पाषाणभेद

अरे! चुक झाली, अन मला समजलीही नाही. नजरेला आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
येथल्या समजाप्रमाणे मी ते कडवे टाकले होते. आता त्यात बदल केला आहे.