कोथिंबीर झुणका

कुंदन's picture
कुंदन in पाककृती
12 Aug 2011 - 10:48 pm

बरेच मिपा कर पा़कृ पाडत आहेत असे पाहुन मग मी पण म्हटले आपण पण हात धुवुन घेउयात.
साहित्य :
२ मोठे कांदे ( माझ्याकडे १ च होता , म्हणुन मी १ च घेतला)
२ मिरच्या ( हिरव्या)
२ लसुण पाकळ्या ( सोलुन ;-) )
१ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
२ चमचे गोडेतेल्/सुर्यतेल. ( इकडे सुर्यतेल मिळते , म्हणुन मी ते वापरले.)
२ चिमुट मोहोरी

२ लहान गड्ड्या कोथिंबीर , स्वच्छ करुन बारीक कापुन घ्या.

१ वाटी बेसन पीठ

कृती:

कांदे नीट स्वच्छ करुन बारीक कापुन घ्या. लसुणही कापुन घ्या.
गॅस पेटवुन त्यावर कढई ठेवा अन तेल टाका कढईत. तेल चांगले तापले की त्यात मोहोरी टाका. मोहोरी चांगली तडतडली की , कापलेल्या मिरच्या व लसुण टाका. मग त्यात कापलेला कांदा टाका , थोडी धणा-जिरे पुड टाका व नीट मिक्स करा.

वरुन १ चमचा हळद व १ चमचा लाल तिखट टाका , पुन्हा एकदा नीट मिक्स करा आणि कढईवर झाकण ठेवुन द्या.

एक मस्त वाफ आली की मग त्यात कापलेली कोथिंबीर टाका व पुन्हा एकदा नीट मिक्स करा , आणि कढईवर झाकण ठेवुन द्या. एकदा कढईतले मिश्रणावर पाण्याचा थोडा हबका मारा.
अधुन मधुन झाकण काढुन नीट हलवुन घ्या कढईतले मिश्रण.

एक मस्त वाफ आली की मग त्यात बेसन पीठ भुरभुरुन टाका व नीट मिक्स करा , आणि कढईवर झाकण ठेवुन द्या. एकदा कढईतले मिश्रणावर पाण्याचा थोडा हबका मारा.

एक - दोन वेळा मस्त दणदणीत वाफ काढा , झुणका तयार आहे.

गरमा गरम पोळी बरोबर झुणका चापा.

पोळीची पा़कृ पुढच्या भागात देईन.

प्रतिक्रिया

शेखर's picture

12 Aug 2011 - 10:50 pm | शेखर

फोटु कुठे आहेत?

कुंदन's picture

12 Aug 2011 - 11:04 pm | कुंदन

फोटु पिकासावर आहेत रे शेखर अण्णा.

इंटरनेटस्नेही's picture

12 Aug 2011 - 11:17 pm | इंटरनेटस्नेही

.

पैसा's picture

12 Aug 2011 - 11:12 pm | पैसा

कुंद्या, भारतात येशील तेव्हा आणखी काय करणारेस आधीच सांगून ठेव! ;)

("पोळीची पाकृ पुढच्या भागात देण्यात येईल" हा वैधानिक इशारा असल्यामुळे क्रमशः असल्याची खात्री झाली आहे!)

इंटरनेटस्नेही's picture

12 Aug 2011 - 11:09 pm | इंटरनेटस्नेही

उत्तम! तोंडाला पाणी सुटले..
.

.

.

.
एक डाऊट: ही पाककृती अंडे घालुन कशी करता येईल?

साती's picture

14 Aug 2011 - 1:52 am | साती

एक डाऊट: ही पाककृती अंडे घालुन कशी करता येईल?

किती वेळा तोच शिळा जोक लोक सगळ्या ताज्या पाकृच्या धाग्यावर टाकणार? ;)

पण खरं उत्तर सांगायचं तर

एक मस्त वाफ आली की मग त्यात बेसन पीठ भुरभुरुन टाका व नीट मिक्स करा , आणि कढईवर झाकण ठेवुन द्या.
'बेसन पीठ भुरभुरुन' ऐवजी 'चार अंडी फोडून आतला गर हलकेच मिसळून' टाका.

पुढ पाणी टाकू नका आणि मस्त अंडा-कोथिंबीर भुर्जी चापा.

पंगा's picture

14 Aug 2011 - 4:03 am | पंगा

पुढ पाणी टाकू नका आणि मस्त अंडा-कोथिंबीर भुर्जी चापा.

तिथेच तर गोची आहे.

मूळ पाकृ भुर्जीची नसून झुणक्याची आहे. बेसनाऐवजी अंडी वापरली, तर (आपणच म्हटल्याप्रमाणे) कोथिंबीर भुर्जी होईल, कोथिंबीर झुणका होणार नाही.

प्रश्नकर्त्याने 'हीच पाककृती (बोले तो, कोथिंबीर झुणक्याची पाककृती) अंडे घालून कशी करता येईल' असे विचारले आहे. सबब, सब्स्टिट्यूट पाककृतीत (१) कोथिंबीर असली पाहिजे, आणि (२) तिला 'झुणका' म्हणता आले पाहिजे.

(नाहीतर काय, बेसनाऐवजी अंडी वापराल आणि खाली प्राजुतैंनी विचारल्याप्रमाणे कोथिंबिरीऐवजी पुदिना घालाल. होणार्‍या प्रकाराला 'हीच पाककृती' - अर्थात 'कोथिंबीर झुणका' - म्हणता येईल काय?)

विनायक प्रभू's picture

14 Aug 2011 - 5:33 pm | विनायक प्रभू

सजावटी साठी दोन चकत्या शिजवलेल्या अंड्याच्या ठेवल्या की झाले.
किंवा झालेल्या झुणक्यावर एक भुर्जीचा थर चढवायचा.

इंटरनेटस्नेही's picture

14 Aug 2011 - 11:21 am | इंटरनेटस्नेही

किती वेळा तोच शिळा जोक लोक सगळ्या ताज्या पाकृच्या धाग्यावर टाकणार?

ज्योक शिळा असला तरी मी आजच केला आहे.. या आधी कधीही मी हा ज्योक केला असल्यास, मी माझे (सदस्य)नाव बदलून टाकेन! ;)

साती's picture

14 Aug 2011 - 3:31 pm | साती

कारण मी हे इथे इन जनरल बर्‍याच लोकांनी केलंय त्याबद्दल लिहिलंय. :)

एक डाऊट: ही पाककृती अंडे घालुन कशी करता येईल?

प्रस्तुत पाककृती ही अंडी घालून करणे तुमच्यासाठी बहुधा शक्य नसावे. (किंबहुना, ही गोष्ट येथील कोणाच्याही आवाक्यातील असण्याबद्दल साशंक आहे.)

मात्र, प्रस्तुत पाककृती ही आपल्याला अंडी वापरून करता येईल का, याबद्दल निश्चित कल्पना नसली, तरी त्याबाबत कदाचित विचार करता यावा.

इंटरनेटस्नेही's picture

14 Aug 2011 - 5:39 pm | इंटरनेटस्नेही

पंगा..
=)) =)) =)) =))
आम्हाला पोट दुखे पर्यंत हसवल्याबद्दल, आपली भेट होईल तेव्हा माझ्यातर्फे तुम्हाला एक एग पकोडा विथ बडवायझर लागु!

प्राजु's picture

12 Aug 2011 - 11:11 pm | प्राजु

धन्य धन्य ! वाह वाह वाह!

कुंदन भौ!! अगदी कसं शिकवल्यासारखं केलंस हो सगळं!! धन्य धन्य धन्य झाले मी.

बाय द वे.. ही पाकृ. पुदीना घालून करता येईल का?

तुम्ही म्हणाल तर गवत घालुनही करुन देईन तुम्हाला.

चालेल. गवताच्या पातीसारखीच कांद्याची पात असते... तिचा झुणका आवडेल हो मला. :)
कधी येऊ?

इंटरनेटस्नेही's picture

12 Aug 2011 - 11:19 pm | इंटरनेटस्नेही

प्रकाटाआ

प्रीत-मोहर's picture

12 Aug 2011 - 11:22 pm | प्रीत-मोहर

वावा

रेवती's picture

13 Aug 2011 - 1:02 am | रेवती

धन्य हो कुंदनभाऊजी!
एका नातेवाईकांकडे ही भाजी खाल्ली होती.
कोथिंबिरीचा स्वाद झकास येतो.

हा सध्याच्या प्रंपरेनुसार बॅचलर प्रकार दिसतोय, कोथिंबिरीच्या काड्या अंमळ जास्तच दिसताहेत, असो, बाकी मला तो सैतानाच्या त्रिशुलासारखा डाव आवडला, मस्त आहे.

सहज's picture

13 Aug 2011 - 10:36 am | सहज

तुने पैसा बहोत कमाया!...

अपने घर मे भी है रोटी...

चिट्ठी आयी है.....

कुंद्या बिचारा मिळेल ते खाउन रहातो. :-(

एका शेख अंकलनी टाकली होती एक बॅचलर पाकृ त्यातला पिडाकाकांचा प्रतिसाद वाच. पैशे कमवुन तब्येत खराब करुन मग डॉक्टरला पैशे देण्यात काय हशील?

कुंदन's picture

14 Aug 2011 - 2:23 pm | कुंदन

सहजराव ,
या एकदा इकडे , तुम्हाला झुणका खाउ घालतो आणि मग बोला तुम्ही. तुमचा "कुंद्या बिचारा मिळेल ते खाउन रहातो. " हा गैरसमजही दुर होईल मग.

नितिन थत्ते's picture

13 Aug 2011 - 9:22 am | नितिन थत्ते

वा वा वा.

कुंदनशेठना (स्वैपाकाला) बाई ठेवायची काय गरज आहे?
.
.
.
.
(काड्यांसकट कोथिंबिर खाणारा)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Aug 2011 - 12:18 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे कुंदोबा.

फक्त कोथिंबीर निवडून घेतली असतीस तर उत्तम झाले असते.

अशावेळी सासुचा फार उपयोग होतो असे कळाले आहे.

सोत्रि's picture

16 Aug 2011 - 6:27 pm | सोत्रि

फक्त कोथिंबीर निवडून घेतली असतीस तर उत्तम झाले असते.

म्हणजे 'काड्या' कमी करा असे तुला म्हणायचे आहे का ?
तसे जर असेल तर 'उलटा चोर कोतवाल को डांटे' असे कायसे म्हणतात तसे झाले ;)

- (काड्या (साफ) करणारा ) सोकाजी

परिकथेतील राजकुमार's picture

17 Aug 2011 - 12:39 pm | परिकथेतील राजकुमार

तसे जर असेल तर 'उलटा चोर कोतवाल को डांटे' असे कायसे म्हणतात तसे झाले

आमच्या बोलण्याचा अर्थच कळला नाही तुम्हाला. मी म्हणत होतो की 'निवडून घ्या', म्हणजे योग्य वेळेची आणि ठिकाणाची निवड करुन मगच काड्या टाका. सगळीकडेच काड्या टाकल्या तर मग चव बेचव होते.

सोत्रि's picture

17 Aug 2011 - 1:02 pm | सोत्रि

आमच्या बोलण्याचा अर्थच कळला नाही तुम्हाला

मालक, अहो मी 'काडी सारली' होती हो, उगाचच, हलकट्पणा दुसरे काय :lol:

- ('बरोब्बर जागी' काडी सारणारा) सोकाजी

वेताळ's picture

13 Aug 2011 - 12:23 pm | वेताळ

बॅचलर लोक पण झुणका घरी बनवु लागल्या मुळे महाराष्ट्रातील झुणका भाकर केंद्रे बंद पडली आहेत.

उत्तम प्रयत्न कुंदनसेठ.
फक्त तो परा म्हणतो त्या प्रमाणे जरा काड्या कमी केल्या असत्यास तर अजुन झकास झाला असता.
पुप्रशु. :)

सोत्रि's picture

16 Aug 2011 - 6:29 pm | सोत्रि

ह्म्म्म्म

परा म्हणतो काड्या कमी करा....

- (कोड्यात की काड्यांत पडलेला) सोकाजी

शुचि's picture

13 Aug 2011 - 4:14 pm | शुचि

>> बारीक कापुन घ्या. >>
लिहीलय पण कोथिंबीर बारीक कापली नाहीये. काड्या खूप आहेत. =))
"काड्यांचा झुणका" नाव समर्पक ठरेल :)

कच्ची कैरी's picture

13 Aug 2011 - 4:22 pm | कच्ची कैरी

मस्त आणि नविन!

आर वा... कुन्द्याने माझ्या रिक्वेष्ट चा मान ठेवून पाक्रु टाकली त्याबद्दल त्याचे अभिनंदन :D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2011 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त.

आमच्याकडे (कांदा नसतो) बेसन पीठ भाजून घेऊन, मीरची,लसुन, मोहरी, हळद,जीरे, कोथिंबीर टाकून हा आयटम मी डोळे बंद करुन वर लै भारी म्हणून खाल्ला आहे. कांद्यामुळे भारी चव लागत असेल. सुधारीत आपल्यासारखी पाकृ करुन पाहिल्यावर प्रतिक्रिया पुन्हा टाकतो तो पर्यंत ही केवळ पोच.

मनातल्या मनात : हजारवेळा म्हटलं आहे, कमीत कमी मिपावरच्या पाकृ तरी बघत जा.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

18 Aug 2011 - 11:58 pm | कुंदन

कांद्याशिवाय झुणका / पिठले अशी कल्पनादेखील करवत नाही.

जागु's picture

14 Aug 2011 - 12:26 am | जागु

वा असा झुणका सगळ्या पालेभाज्यांचा करता येतो.

साती's picture

14 Aug 2011 - 1:53 am | साती

वा कुंदोबा,तुम्हीही आता शेफ बनलात तर!
मस्तच आहे पा.कृ.
अशाच प्रकारे मेथी,कोबी यांचाही झुणका छान होतो.

शी बाई, काय तू पण कुंद्या, आधी बेसन भाजून घ्यायचे असे तू सांगीतले होतेस अन मग त्यात हव्वी तेवढी कोथींबिर टाकायची असे ही म्हणालेलास
आता हे तर तू सगळं उलटं करुन लिहीलेस
हे काय रे कुंद्या, आधी मस्त बेसन भाजायचे ना रे ?
असो ...
बाकी पाकृ बघुन पोटात घालमेल झाली..अल्लाह-परमेश्वरा आज आ़झान लवकर होऊदे म्हणजे इफ्तारीला पटकन बसायला मिळेल !

--नोनव्हेज रेसिपीला कंटाळलेली वाहीदा

प्रभो's picture

15 Aug 2011 - 7:26 pm | प्रभो

मस्त रे कुंद्या!!

विसोबा खेचर's picture

17 Aug 2011 - 12:34 pm | विसोबा खेचर

क्लास..!

मुलूखावेगळी's picture

18 Aug 2011 - 7:38 pm | मुलूखावेगळी

वा मस्त लागते ही भाजी
पण आमच्याकडे ह्यासाठी जाड डाळीचे पीठ करतात न त्या भाज्यांना भरड भाजी असं महन्तात