कांदा टोमॅटोची 'बॅचलर' भाजी... उर्फ सुगरण्याचा सल्ला

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in पाककृती
14 Nov 2008 - 3:43 am

आधी नमू स्वाती अन्नपूर्णा | जीने तृप्त केले बहुतांना |
आणि दुसरी ती मेघना | आयडियादाती ||

या दोघींबरोबरच ही पाकृ आमच्या अजून एका मित्राला अर्पण... कुंदन . हा भला माणूस निष्णात स्वैपाक करतो, सध्या दुबईत असतो आणि रोज मला फोन करून 'काल पनीर मटर केलं होतं', 'आज आलू पराठे करणार आहे' असं सांगून कसला सूड उगवत असतो कोण जाणे.

***

मिपावर बर्‍याच नविन नविन पाककृति नेहमीच येत असतात. आणि या विभागात आमच्या स्वातीताईचा नंबर पहिला आहे. तिच्या पाकृ माझ्यासाठी तरी नेहमीच फक्त एक बघायचा / ऐकायचा विषय आहे. खाणार कसं? ते आधी बनवायला लागेल ना? ती भानगड कोण करणार? तर हे असं.

आणि दुसरी मेघना. तिने एकामागोमाग दणक्यात ३-४ खत्तर्नाक पाकृ अतिशय मस्त लिहिल्या होत्या. त्यातल्या साबुदाण्याच्या खिचडीच्या पाकृ नंतर तर ३-४ दिवस लाळेरं लावून फिरायची पाळी आली होती. हो ना राव... तर मेघनाच्या ष्टाईलने प्रभावित होऊन आम्ही पण एक पाकृ लिहायचीच असं ठरवलं.

तर या दोघींच्या प्रभावाखालीच असताना आम्हाला एक गुरू भेटला आणि त्याने आम्हाला एक झटपट आणि सर्वोपयोगी अशी पाकृ शिकवली.

तो मेहेरबान, कदरदान पेश है... १० मिनट मे तैयार होने वाली और संकट समय मे काम आने वाली 'कांदा टोमॅटोची बॅचलर भाजी'. बॅचलर भाजी यासाठी की, एकटं असताना, रात्री दमून घरी आलं आणि फारसं चवीढवीकडे लक्ष न देता काही तरी पटकन करायचं असेल तर बरेच 'बॅचलर' जे पाकशास्त्रात फारसे पारंगत नाही आहेत (माझ्यासारखे) ते अश्याच काहितरी पाकृचा आधार घेतात. :)

***
खरं म्हणजे, लहानपणापासूनच मला पाकशास्त्रात आज्जिब्बात गति नाहिये. स्वैपाक हा खाण्याचा प्रकार आहे, करण्याचा नव्हे, असं वाटायचं. अजूनही वाटतं. लहानपणी आईने आणि लग्नानंतर बायकोने मला या बाबतीत बिघडवायचा खूप प्रयत्न केला. मी काही माझ्या मतांपासून ढळलो नाही. बरं माझ्यावर कधी हॉस्टेलवर रहायची पाळी नाही आली त्यामुळे एकंदरित निभावलं होतं. पण गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर एक मोठी आफत आली आहे. झालंय असं की सध्या एकटं रहायची पाळी आली आहे. स्वैपाकाबाबतचा माझा दृष्टिकोण असा असल्याने जेवणखाण सहजिकच बाहेर हॉटेल मधे सुरू झाले.

तशी काही ही माझी एकटं राहायची पहिलीच वेळ नाही. आधीही राहिलो आहे. आणि प्रत्येकवेळी सुखेनैव निरनिराळ्या उपाहारगृहांना उदार आश्रय दिला आहे. या वेळी पण तसेच निभेल याची खात्रीच होती. पण नाही, तसे होणे नव्हते. सुरूवातीला काही दिवस हॉटेल मधे जेवलो. पण मग तेच तेच खाऊन कंटाळा आला. एक दिवस तर मी जाऊन बसलो माझ्या नेहमीच्या हॉटेलात तर त्या वेटरने ऑर्डर न घेताच पदार्थ आणून ठेवले समोर. मी म्हणलं 'हे काय रे भाऊ?' तर म्हणाला, 'साहेब, तुमच्या आवडत्या डिशेस माहीत झाल्या आता.' मग मी हॉटेल्स बदलून जेवायला लागलो. पण लक्षात आलं की हॉटेल मधलं जेवण काही झेपत नाहिये आपल्याला. (कोण रे तो वय झालं म्हणतोय माझं? आधीच च्यायला मिपावर काही तथाकथित मित्र 'काका' म्हणताहेत. येडे लेकाचे.) पण मग आता करायचं काय? कैतरी कराच्चं म्हणजे कराच्चंच. मग हळू हळू एकदम प्राथमिक स्वैपाकाला सुरूवात केली. म्हणजे ब्रेड-बटर खाणे आणि वरती थोडा फलाहार. किंवा नुसताच भात करणे. आणि तो दह्यात कालवून खाणे. मग पुढची पायरी, टिन मधले 'सरसों का साग' नाहीतर 'पालकपनीर' गरम करून ब्रेड बरोबर खाणे वगैरे. मग माझी भीड चेपली आणि मी खिचडी वगैरेचा प्रयत्न केला. ते पण जमलं. मग माझा एक माझ्या सारखाच बॅचलर मित्र, प्रशांत, धावून आला आणि माझा गुरू बनला. माग आम्ही काय काय बनवून खायला लागलो. म्हणजे बनवायचा तो, खायचो आम्ही दोघं आणि साफसफाई करायचो मी. पण परत माझं नशिब फुटलं आणि प्रशांत गेला परत भारतात. आता आली का पंचाईत? परत एक्सपरीमेंट सुरू झाले. आणि माझ्या एका मल्याळी मित्राने मला ही झटपट पाकृ शिकवली. आता एवढं सगळं वाचून तुम्हाला वाटेल काय जबरी असेल पदार्थ वगैरे. पण तसे काही नाही. पदार्थ आहे साधाच, पण पटकन तयार होणारा आणि म्हणूनच अडीअडचणीला उपयोगी पडणारा, ही खरी महती त्याची. आणि तो सर्वोपयोगी पण आहे. म्हणजे भात, पोळी, ब्रेड, खुबूस कशाही बरोबर खा. (खुबूस म्हणजे अरब देशात मिळणारा एक भाकरी सारखा प्रकार. सगळ्या दुकानात मिळतो. त्याचे २ प्रकार असतात, मैद्याचा आणि गव्हाच्या पीठाचा. सगळ्या बॅचलर्सचा तारणहार.)

तर घ्या...

***

वाढणी: एका माणसासाठी. (दुसरा असेल आपल्याबरोबर तर आधी त्याला संभाव्य धोक्याची पूर्ण कल्पना द्यावी आणि त्याच्या स्वत:च्या जबाबदारीवर तो सामिल होत आहे असे वदवून घ्यावे.)

साहित्यः २ मध्यम आकाराचे कांदे, २ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ लहान मिरच्या, ४ लसणाच्या पाकळ्या, एवढंस्सं आलं. १-१|| चमचा चिकन मसाला. (चिकन मसाला का? तर त्याच्यात सगळे इतर मसाले असतात म्हणून. म्हणजे आपल्याला बाकी काही घालत बसावे लागत नाही हो. आणि हो, त्या चिकन मसाल्यात चिकन नसतं त्यामुळे शाकाहारी मंडळींना खायला हरकत नाही अजिबात.)

कृती: मिरचीचे आडवे - तिरके काप करायचे. लसणाच्या पाकळ्या बारीक चिरायच्या. खरं म्हणजे लसूण ठेचायचा. पण आपण बॅचलर आहोत ना... मग आपल्याकडे खलबत्ता किंवा मिक्सर वगैरे नसणार. म्हणून बारीक चिरायचा (जमेल तसा, कारण परत तेच, आपण नवशिके बॅचलर ना? मग इतकं बारीक चिरायची वगैरे सवय नसते ना.) आल्याचं पण तेच. मस्त बारीक चिरायचा.

कांद्याच्या आणि टोमॅटोच्या लांब फोडी (काप) करायच्या. मला वाटतं मसाला डोश्यात जी भाजी असते त्याच्यात असा लांब कापलेला कांदा असतो.

एका कढईत तेल गरम करून मोहरीची फोडणी करायची. मोहरी तडतडली की त्यात आधी मिरची, त्यानंतर लसूण आणि शेवटी आलं घालायचं. ते चांगलं लालसर होईपर्यंत परतायचं त्या फोडणीत.

आता आधी चिरलेला कांदा घालायचा आणि मग थोड्या वेळाने चिरलेला टोमॅटो घालायचा. (किती वेळाने? तसं नक्की सांगता नाही येणार. पण २-३ वेळा भाजी करून खाऊन झाली आणि कांदा कच्चट राहिला की मग आपोआप येतो अंदाज :) )

थोडा वेळ हे सगळं नीट हलवत राहायचं. नाहीतर करपेल एका बाजूने. (तुम्हालाच खायचं आहे हे लक्षात असू द्या.) टोमॅटो आणि कांदा बर्‍या पैकी शिजला की मग त्यात हे सगळं मिश्रण बुडेल इतपत पाणी घालायचं. चवीपुरतं मीठ आणि चिकन मसाला घालायचा. नीट ढवळायचं.

साधारण ५-१० मिनिटं मध्यम आचेवर उकळत ठेवायचं. झाली भाजी तयार.

आहे की नाही झटपट? आणि सोप्पी पण. साहित्य पण फार नाही लागत. या भाजीत अजून एक करता येतं. खाताना त्यात मस्त पैकी तिखट जाडी शेव टाकून खायची. फारच छान लागते मग तर.

तर ही पाककृति इथेच संपली. पण कृति मात्र नाही संपली. पुढची कृति म्हणजे ही भाजी भाताबरोबर आणि खुबूस बरोबर ओ येईपर्यंत हाणायची. जेवायला बसताना जवळ दह्याची वाटी घ्यायला विसरू नका. कारण भाजी एकदम तिखटजाळ होते. आणि त्या बरोबर थोडं दही खाणं दुसर्‍या दिवसाच्या दृष्टीने बरं असतं. ;)


या तर मंडळी खायला. आजच केली होती. आणि खाल्ल्यावर हे लिहू शकलो म्हणजे नक्कीच बरी झाली होती. ;)

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

14 Nov 2008 - 4:17 am | भाग्यश्री

वा मस्त दिसतीय.. कधी केली नाही अशी..
नक्कीच करून पाहणार.. फार सोपी वाटतेय..
फोटोही मस्त! भूक लागली! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

नंदन's picture

14 Nov 2008 - 4:25 am | नंदन

भाजी मस्त आहे. बेसिक आणि झटपट! या प्रथमेत बटाटा, पनीर इ. घालून पुढची पायरी गाठता येत असावी असा अंदाज.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सूर्य's picture

14 Nov 2008 - 4:37 am | सूर्य

वा ! भाजी छान झालेली दिसतेय..
आमचे हॉस्टेलवरचे दिवस आठवले. :)

- सूर्य

घाटावरचे भट's picture

14 Nov 2008 - 4:50 am | घाटावरचे भट

भाजी मस्त दिसतीये. करून पाहायला हवी.

रेवती's picture

14 Nov 2008 - 5:27 am | रेवती

झालाच आहात ना बिपीनभाऊ, तर स्वातीताईनं सांगितलेली उत्तरप्रदेशी भाजी करून बघाच.
मस्त लागते व सोपी आहे.

रेवती

रामदास's picture

14 Nov 2008 - 8:39 am | रामदास

चौफेर बॅटींग चालू आहे. थोडे दिवसानी सौदीत हाटेल टाकायचा विचार दिसतोय.अडल्या नडल्यांना चार घास .

पिवळा डांबिस's picture

14 Nov 2008 - 8:44 am | पिवळा डांबिस

बिपिनभाऊ,
एक मित्राच्या नात्याने सल्ला देऊ?
रागावू नका, पण आता बायकोला बोलावून घ्या!!!!
नायतर तुमचं कठीण आहे.....
एकदा पोटात अल्सर झाले ना, तर जन्मभर पस्तावावं लागेल....
:)

आपल्या बायकांना आपल्यापेक्षा खूपच छान स्वयंपाक येतो यावर दृढ विश्वास असलेला,
डांबिसकाका

सुनील's picture

14 Nov 2008 - 2:01 pm | सुनील

हहपुवा

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2008 - 3:45 am | बिपिन कार्यकर्ते

अमा डांबिसमियाँ, आपका हुक्म सर आँखो पर. लगेच बोलावतो तिला इथे... नाही आली तर, लोकली दुसरी शोधावी म्हणतो ;)

आपल्या बायकांना आपल्यापेक्षा खूपच छान स्वयंपाक येतो यावर दृढ विश्वास असलेला
१०१% सहमत. पण तिथेच घोळ झाला ना... कधी पाऊल नाही टाकलं स्वैपाकघरात... आता भोगतोय. :(

बिपिन कार्यकर्ते

नाही आली तर, लोकली दुसरी शोधावी म्हणतो

माशाल्ला , माशाल्ला, मरहब्बा .. जन्नत जन्नत ..
अबब !! काय हे .. घोर कलियुग .. जगदंब! जगदंब!!
असो , तुम्हाला अशी पर्यायी सोय देणारी एजन्सी सापडली तर सांगा भौ .. तिकडं येतोच मग .. नाय तरी आम्हाला सध्या पर्यायांशीवाय पर्याय नाही.

विसोबा खेचर's picture

14 Nov 2008 - 10:06 am | विसोबा खेचर

मस्त रे..! सचित्र पाकृ आवडली.. :)

तात्या.

आनंदयात्री's picture

14 Nov 2008 - 11:11 am | आनंदयात्री

अरे वा बिपिनकाका !! तुम्ही सध्या पहिलीत आहात, मी चवथीत आहे अन उत्तम स्वयंपाक येणार्‍या बायका ग्रॅजुएट असतात. पुरण, चकलीसारखी चकली, शंकरपाळ्यासारखे शंकरपाळे, झालच तर गेलाबाजार एखादी पास्ता सारखी कॉन्टिनेंटल डिश येणार्‍या स्त्रिया पीयचडी असतात.
तुम्हाला पुढचे टारगेट म्हणजे बटाटा भाजी, भेंडी, कोबी, गवार अन कोणतेही वरण !! मग तुम्ही चवथीत याल .. अन मग आपण दोघेही चवथीतच राहु !! कारण या लेव्हल पर्यंत झालेल्या मानसिक शारिरिक त्रासामुळे हुच्च शिक्षणाची विच्छा संपलेली असते.

आता घ्या हलकटाचा सल्ला:
धमाल मुलासारखे सुग्रण बायको असणारे मित्र शोधा .. त्यांची इच्छा नसली तरी त्यांच्या बायका तुम्हाला जेवायला बोलावतात .. चांगलं चुंगलं खाउ घालतात.
अदितीसारख्या सज्जन नवरा असणार्‍या विक्षिप्त मैत्रीणी शोधा .. त्या अन त्यांचा नवरा मिळुन स्वयंपाक करतील आण तुम्हाला जेवायला बोलावतील. कींवा ते एखाद्या छानश्या हाटेलात जेवायला जाणार असतील तर तुम्हाला पण नेतील अन जेवु घालतील !!
असे प्रसंग वारंवार आल्यावर तुम्हीच तुम्ही तयार जेवणाला विटताल अन निमुट शहाण्या पुरुषासारखे जगु लागताल !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Nov 2008 - 11:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण पाकृ मी काही वाचली नाही. जेवायच्या आधी मी पाकृ वाचत नाही. ;-)

आधीच च्यायला मिपावर काही तथाकथित मित्र 'काका' म्हणताहेत.
आणि तथाकथित मैत्रीणी+बहिणी ज्या कधीमधी काकाही म्हणतात त्यांना विसरू नका म्हणजे झालं.

आंद्यासाठी:
अदितीसारख्या सज्जन नवरा असणार्‍या विक्षिप्त मैत्रीणी शोधा .. त्या अन त्यांचा नवरा मिळुन स्वयंपाक करतील आण तुम्हाला जेवायला बोलावतील. कींवा ते एखाद्या छानश्या हाटेलात जेवायला जाणार असतील तर तुम्हाला पण नेतील अन जेवु घालतील !!
माझ्या नवर्‍याच्या हातचं तू अजून जेवला नाही आहेस, एकदा जेवलास तर पुढच्या वेळी त्याच्याशीच बोलशील जेवण्याबद्दल! (बाकी तो सज्जन आहे आणि मी विक्षिप्त हे वादलेस आहे.) तुला नीट आठवत नाही आहे, पण छानश्या हाटेलात तूच हरी पत्ती खर्च केली होतीस.

असे प्रसंग वारंवार आल्यावर तुम्हीच तुम्ही तयार जेवणाला विटताल अन निमुट शहाण्या पुरुषासारखे जगु लागताल !!
अरे अगदी खरं! उगाच का माझा नवरा एवढा छान स्वयंपाक करायला शिकला! ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2008 - 4:11 am | बिपिन कार्यकर्ते

आंद्याभाऊ,

मी दुसरीच्या पहिल्या सहामाहीत आहे. मला भात, खिचडी, तयार लोणचं, बुक्की मारून फोडलेला कांदा, साधं वरण, फोडणी घातलेलं वरण, बटाट्याची भाजी आणि वरती लिहिलेली बॅचलर भाजी एवढं सगळं येतं.

अवांतर निरीक्षणः आपल्या दोघांचे काही मित्र / मैत्रिणी कॉमन आहेत असे मला वाटते. ते जर का खरे असेल तर आपण त्यांच्या पासून कसे सांभाळून राहतो या बद्दलच्या नोट्स शेअर करूयात.

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

14 Nov 2008 - 11:23 am | विजुभाऊ

याच्या पुढची पाककृती "टोमॅटोची विवाहीत" भाजी अशी येउद्यात
बाकी अन्द्यालाडुचा सल्ला पटला. अनुभवातून त्याला हे ज्ञान प्राप्त झाले आहे.
तो सध्या सुपात आहे जात्यात भरडला जाईल तेंव्हा पाहु. त्याला सुग्रण बायको मिळो ही सदीच्छा. ( त्यामुळे आपल्याला उत्तम डीशेस मिळतील ; त्याची इच्छा असो वा नसो)
झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

आनंदयात्री's picture

14 Nov 2008 - 11:34 am | आनंदयात्री

मला बायको मिळाल्यावर मी का म्हणुन तुम्हाला डिशेस गिफ्ट द्यायच्या ??

यशोधरा's picture

14 Nov 2008 - 11:35 am | यशोधरा

बिपिनदा, सुगरण्याचा सल्ला आवडला! :)

मनस्वी's picture

14 Nov 2008 - 11:49 am | मनस्वी

छानच हो बिपिनकाका. आता पुढची डीश कोणती शिकवताय..?

अभिरत भिरभि-या's picture

14 Nov 2008 - 11:49 am | अभिरत भिरभि-या

आमच्या सारख्या अडल्यानडल्या लोकांसाठी उत्तम Reference|
आणखी पाकृ हव्या आहेत.
(मेस मधे बटाटे खाऊन वैतागलेला)
अभिरत

यशोधरा's picture

14 Nov 2008 - 12:30 pm | यशोधरा

अभिरत, तुम्ही बंगलुरुमधे ना?? मग गाजरांऐवजी बटाटे कसे काय मिळताहेत तुम्हांला??
भेळ बनवतात, त्यातही गाजरे घालतात!! :(

अभिरत भिरभि-या's picture

14 Nov 2008 - 2:11 pm | अभिरत भिरभि-या

आमच्या भागातल्या रेस्टारंटमधे बटाटा पापुलर आहे.

इकडच्या भेळीला (बंगलोरच्या भाषेत "बेल" ) भेळ म्हणणे हा भेळीचा अपमान आहे. गंमत म्हणजे ही असली फडतूस भेळ लोकांना कौतुकाने खाताना दया येते. :S

छोटा डॉन's picture

14 Nov 2008 - 2:28 pm | छोटा डॉन

बटाटा आमच्याइथेही ( कोरमंगलामध्ये) लागेल तेवढा मिळतो ...

>> इकडच्या भेळीला (बंगलोरच्या भाषेत "बेल" ) भेळ म्हणणे हा भेळीचा अपमान आहे. गंमत म्हणजे ही असली फडतूस भेळ लोकांना कौतुकाने खाताना दया येते.
+++१, सहमत आहे.
पहिल्यांदा भेळ खाल्ली तेव्हा शहाण्याने भेळमध्ये चक्क " गाजर + मुळा" कापुन टाकला होता, मी डोक्याला हात लावला, त्याला ( मनातल्या मनात ) म्हटले " पुन्हा जर ह्यात गाजर दिसले तर मार खाशील ...". असो.

अजुन एक झांटामाटिक अनुभव ...
आमच्या एरियातला एक भेळवाला ओळखीचा झाला आहे. आमचे नेहमी येणे जाणे असते तिकडे ...
त्याला एकदा आम्ही मित्रांनी घोळात घेऊन " हम भेळ बनाता है, तुम खाली देखो" म्हणुन सांगितले व चक्क मी स्वतः भेळ बनवली भेळच्या गाड्यावर ( स्गळे साहित्य तयार असल्याव्र आमचे काय जातेय तयार करायला ) व त्यालाच उलट आग्रह करु करुन खाऊ घातली. तो म्हणाला "साब इस्कु बंबय्या बेल बोला हम", आम्ही नुसते हसलो मग ...
त्या सज्जनाने त्या दिवशी भेळ चे पैसे नाहीत घेतले आमच्याकडुन ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

रेवती's picture

14 Nov 2008 - 9:31 pm | रेवती

गाजर, मुळा?
वेड लागलयं का त्या भेळवाल्याला?

रेवती

यशोधरा's picture

14 Nov 2008 - 5:29 pm | यशोधरा

नायतर काय!! त्याला भेळ म्हणायचे म्हणजे जरा अतिच आहे!

रेवती's picture

14 Nov 2008 - 8:40 pm | रेवती

माझ्या नणदेनी एके ठिकाणी भेळ खाल्ली तर त्यात स्पेशल भेळ म्हणून काजू, बेदाणे व बदामाचे तुकडे घातले होते.
चिडचिड होणारच.

रेवती

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Nov 2008 - 9:21 pm | ब्रिटिश टिंग्या

कारण तो बटाटावड्यातसुद्धा काजु अन् बदाम टाकतो अन् साजुक तुपात वडा तळतो!

- टिंग्या दिवाडकर!

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

रेवती's picture

14 Nov 2008 - 9:28 pm | रेवती

नाव महित नाही.
पण मी भेळेचं वर्णन ऐकून भरपूर हसले होते.

रेवती

वल्लरी's picture

14 Nov 2008 - 12:38 pm | वल्लरी

नेहमी प्रमाणे सबसे हटके presentation.....
पाककृती छानंच.........
________________________________________
अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मि़ळते भाकर
----संत बहीणाबाई

स्वाती दिनेश's picture

14 Nov 2008 - 12:39 pm | स्वाती दिनेश

बिपिन, मस्त लिवलयस रे.. भाजीही छान झालेली दिसत्ये,:)
स्वाती

लिखाळ's picture

14 Nov 2008 - 5:25 pm | लिखाळ

>>बिपिन, मस्त लिवलयस रे.. भाजीही छान झालेली दिसत्ये,<<
हेच म्हणतो .. भाजी मस्त दिसते आहे.. झटपट :)

खरेतर सर्व भाज्या अश्याच कराव्यात मसाले वेगळे टाकावेत ;)
-- लिखाळ.

कुंदन's picture

14 Nov 2008 - 12:53 pm | कुंदन

भाजी मस्त झालेली दिसतेय.

पुढच्या विकांताला येईन तेंव्हा तुला आलु मटर करुन खाउ घालीन.

कुंदन's picture

14 Nov 2008 - 12:53 pm | कुंदन

भाजी मस्त झालेली दिसतेय.

पुढच्या विकांताला येईन तेंव्हा तुला आलु मटर करुन खाउ घालीन.

वाहीदा's picture

14 Nov 2008 - 12:53 pm | वाहीदा

बिपिन ,
तुलआ एकादा सुगरण् मुल्गा 'बॅचलर' आहे का बघेन्यात ??
:-)
त्याला ही रेसीपि दिली तर ??

मेघना भुस्कुटे's picture

14 Nov 2008 - 1:05 pm | मेघना भुस्कुटे

धमाल आहे रेसिपी... मजा आली. :)

पक्या's picture

14 Nov 2008 - 1:30 pm | पक्या

लेख छान जमलाय. मजा आली वाचायला.

वेताळ's picture

14 Nov 2008 - 1:38 pm | वेताळ

पण ही टोमॅटो भाजी मला अजिबात आवडत नाही.गवारीची भाजी, वाग्यांची भाजी हे माझे नावडते प्रकार आहेत. भरलेली वांगी मला मात्र आवडतात.
वेताळ

छोटा डॉन's picture

14 Nov 2008 - 1:41 pm | छोटा डॉन

आमच्या आदरणीय "बिपीनकाकांची" झटापट "कांदा टॉमेटोची बॅचलर भाजी" वाचुन मज्जा आली ...
भाजी सारखीच शैली खुसखुशीत आहे, मस्तच, अजुन अशाच पाकॄ येऊद्यात ...

आता मी कितवीत आहे आणि तुम्ही कितवीत आहात हा हिशोब नाही काढत, गणित अंमळ कच्चे आहे ना ...
पण तुमच्या रुम पार्टनरची ऐश असेल भौ, एवढे भारी भारी करुन खायला घालताय , मग अजुन काय पाहिजे ?

>> जेवायला बसताना जवळ दह्याची वाटी घ्यायला विसरू नका. कारण भाजी एकदम तिखटजाळ होते. आणि त्या बरोबर थोडं दही खाणं दुसर्‍या दिवसाच्या दृष्टीने बरं असतं.
=)) =))
मस्तच, अगदी शब्दश: खरे आहे ....

( येडा कुठचा ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अवलिया's picture

14 Nov 2008 - 1:46 pm | अवलिया

वा बिपिन भौ

मस्तच पाक कृती...

(बिगारी नापास) नाना

जैनाचं कार्ट's picture

14 Nov 2008 - 1:49 pm | जैनाचं कार्ट (not verified)

काका लई भारी !

आवडली बरं का.. आज रातच्याला हाय प्रयोग करुन सांगतो कसा जमला ते ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

घाटावरचे भट's picture

14 Nov 2008 - 1:58 pm | घाटावरचे भट

चांगली आहे पाकृ. गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात....

सुनील's picture

14 Nov 2008 - 2:12 pm | सुनील

पाकृ आणि सांगण्याची पद्धत आवडली.

आजकाल विविध पाकृ बरोबरच त्यांच्या सादरीकरणाचेही विविध प्रकार येत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

बिपिनभौ, एक सुचवणी. या भाजीत बटाट्याचा समावेश करा आणि चिकन मसाल्याऐवजी कांदा-लसूण मसाला वापरून पहा. तसेच आले चिरण्याऐवजी कीसा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Nov 2008 - 5:36 pm | ब्रिटिश टिंग्या

जमलयं जमलयं!
१ नंबर!

आज रात्रौ करुन पहायला हवी ही भाजी!

- आपला
(बॅचलर) टिंग्या!

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

JAGOMOHANPYARE's picture

14 Nov 2008 - 6:06 pm | JAGOMOHANPYARE

सुन्दर...

अभिज्ञ's picture

14 Nov 2008 - 7:15 pm | अभिज्ञ

बिपीनदा
जबरि पाकृ.
और भी आने दो.

सुनील म्हणतात,
त्याप्रमाणे बटाटा इज मस्ट.
सिमला मिर्ची हि टाकता आली तर बघा.

अभिज्ञ.

प्राजु's picture

14 Nov 2008 - 9:26 pm | प्राजु

त्रिवार अभिनंदन..
चला म्हणजे पुढच्या सुट्टीत वहिनी आणि मुली आल्या की, किमान भाजी तरी तुझ्या हातची खायला मिळेल त्यांना. आणि तो पर्यंत ही भाजी आणखी चांगली करायला लागला असशील. :)
बाकी,एकूणच रेसिपी आणि त्यातल्या बारिक सारिक सूचना वाचून अंमळ करमणूक झाली. मजा आली. बाय द वे बिपिनदा, मी तुला एक अशी मस्त भाजीची रेसिपी सांगेन एकदम सुटसुटीत. पण थोडे दिवस हीच भाजी हाण. हिचा कंटाळा आला की मग सांगेन तुला. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

14 Nov 2008 - 9:29 pm | स्वाती दिनेश

काय तू पण? तो.. आणि बायको आल्यावर भाजी बिजी करतोय? वाट बघ! कशा फर्माइशी पूर्‍या करुन घेत असेल एक्केक.. हे कर,ते कर.. असं सांगून.. ;)
स्वाती

सुक्या's picture

15 Nov 2008 - 1:31 am | सुक्या

मी पण एकदा बॅचलर मुलांमधे रहात असताना असला प्रकार केला होता. ते बॅचलर मुले खुप छान स्वयंपाक बनवायचे. मी आपला उगीच कांदे काप, तांदुळ धु असे करायचो. एकदा अगदी न रहावुन खिचडी चा सोपा पाक् प्रकार बायकोला विचारला अन् ती मुले नको नको म्हणत असताना बनवला. मुलांनी बग ती खिचडी "त्राही माम् त्राही माम्" करीत खाल्ली. तेव्हापासुन मी काही बनवतो म्हटलं की सगळे बेंबीच्या देठापासुन "नको" म्हणतात.

तसा मी स्वयंपाकात एकदम् "ढ" नाहीये .. दुध गरम करने , अंडी उकडने, कांदा कापने यात माझा कुनीही हात धरु शकत नाही.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2008 - 4:02 am | बिपिन कार्यकर्ते

०१. रेसिपी आवडली असं सांगणार्‍या सर्वांचे आभार.
०२. न सांगणार्‍यांना (त्यांच्या आणि त्यांच्या सर्व प्रियजनांच्या) वाढदिवसाच्या शुभेच्छा.
०३. प्रतिसाद टाकले पण पाकृ आवडली असे न सांगणार्‍यांना बघून घेण्यात येईल.

काही लोकांनी अवांतर प्रतिसाद टाकले आहेत त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. त्यांनी एखादा धागा सुरू केला की आम्ही पण असेच अवांतर प्रतिसाद टाकू. आणि या धाग्याचा आम्हाला झालेला एक वैयक्तिक फायदा म्हणजे कुंदनशेठ वठणीवर आलेले आहेत आणि त्यांनी लवकरच आम्हाला भेट देऊन त्यांचे प्रसिद्ध पाककौशल्याचा फायदा आम्हाला करून द्यायचे कबूल केले आहे. (आता आमी पन कट्टा करनार... टुक टुक) लेखणी (कळफलक) ही कशी तलवारीपेक्षा श्रेष्ठ असते याचे प्रत्यंतर आले.

पहिली ओळ वगळता बाकी सगळे ह. घेणे हे वे. सां. न. ल. :)

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

15 Nov 2008 - 7:51 pm | ऋषिकेश

जरा उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
लै भारी बरं का का रेशिपी बिपीनभाउ :) बाकी बिपीनभौंना काका म्हणणार्‍यांनी संपूर्ण उस त्यांच्यासारखा नुसत्या दातांने सोलून-खाऊन दाखवावा (संदर्भः ऑर्कुट) .. बाघोबाच्या इतक्या जवळ जावे वगैरे वगैरे ;)

बाकी बेशिक रेसिपी मस्त.. आता यात पनीर / बटाटा वगैरे घालून दुसरी पायरी.. नंतर फोडणीचे वेगवेगळे प्रकार करून तिसरी पायरी गाठता येईल.. (हे सगळं वरही बर्‍याच जणांनी सांगितलेले दिसले.. पण आता टाईप केले आहे तर असु दे :) )

ह्या झाल्या माझ्यासारख्या कुडमुड्या आचार्‍याच्या टिप्स.. बाकी खास टिप्स साठी बल्लवाचार्य प्रभाकरपंत / पाकात मुरलेल्या (म्हणजे पाककलेत रे ;) )स्वातीताईला गाठावे

-(कुडमुडा) ऋषिकेश